वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पुरम्दरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां ,
पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारताम् |
मुकुंदरमणीं मणिलसदलंक्रियाकारिणीं,
भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् ॥८॥
पृथ्वीवर जेव्हा एखादी स्त्री सम्राज्ञी पदावर आरूढ होते त्यावेळी इतर मांडलिक राजांच्या राण्या तिची दासी स्वरूपात सेवा करतात.
आई जगदंबा त्रिपुरसुंदरी या अनंतकोटी ब्रह्मांडांची सम्राज्ञी असल्याने तिच्या सेवेला उपस्थित असणाऱ्या अलौकिक दैवी शक्तींचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
पुरंदरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां - पुरंदर अर्थात देवराज इंद्र. भगवान ब्रह्मदेवांच्या एका दिवसात चवदा इंद्र होतात असे वर्णन आहे. सध्या असणाऱ्या इंद्राचे नाव पुरंदर आहे. त्यांची पुरंध्रिका म्हणजे स्त्री. ती देवी शची, आई जगदंबेची, चिकुरबंधसैरंध्रिका म्हणजे वेणी घालणारी दासी असते.
पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारताम् - पितामह अर्थात भगवान ब्रह्मदेव. त्यांची पतीव्रता म्हणजे देवी सावित्री, सरस्वती. आई जगदंबेचा सोबत चर्चा करून अर्थात तिला गोष्टी सांगून तिचे मनोरंजन करते.
मुकुंदरमणीं मणिलसदलंक्रियाकारिणीं- मुकुंद अर्थात भगवान श्री विष्णू. त्यांची रमणी म्हणजे देवी लक्ष्मी. ती आई त्रिपुरसुंदरी ला विविध अलंकारांनी नटवत असते.
भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् - सुर वधू अर्थात देवतांच्या स्त्रिया.टिका शब्दाचा एक अर्थ आहे श्रेष्ठ. त्या श्रेष्ठ देवस्त्रिया आई जगदंबेच्या चेटी म्हणजे दासी असतात.
अशा अद्वितीय भुवन अंबिकेची मी आराधना करतो.
जय श्रीत्रिपुरसुंदरी.!
जय जगदंब !!
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 9, 2020
आपल्या सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याला अंत:करणापासून सलाम करण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईकवर किळसवाणं राजकारण करणाऱ्या कर्मदरिद्री राजकीय पक्षांच्या वर्तणुकीने व्यथित होऊन तीन वर्षांपूर्वी लिहिलेला हा माझा लेख आपल्या जांबाज सैनिकांना अर्पण करतो. शक्य असल्यास शेअर करून अनेकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद !
October 13, 2016
परदेशात १ ऑगस्ट हा National Mountain Climbing Day म्हणून साजरा केला जातो. ह्या मागचा इतिहासही काहीसा गमतीदार आहे.
August 1, 2020
अख्ख्या जगात हजारो कालगणन पध्दती आहेत, त्यांच्या दिनदर्शिका आहेत, त्यांचे अनुयायी वर्षानुवर्षे नववर्ष दिवस नियमितपणे साजरे करीत आहेत आणि अेकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देअून, नवीन किंवा ठेवणीतले पोशाख घालून मेजवान्या झोडीत आहेत.
April 1, 2017
हिवताप एक अत्यंत जुनाट रोग जो सबंध भारतामध्ये पसरलेला आहे. भारतापासून ते थेट आशिया खंडातही तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एवढेच नव्हे तर चीन, युरोपमध्येही मलेरियाचा प्रभाव जास्त आहे. अनेक देशात मलेरियाला औषध सापडत नव्हते. अनेक शास्त्रज्ञांनी बरेच फिरून मलेरियाचा शोध लावण्याकरीता प्रयत्न केले. तसेच साधारण १७व्या शतकात पेरू या देशात एक झाडाचे साल सापडले. यावर प्रक्रिया करताना साल पाण्यात उकळून त्याचा रस पिण्याकरिता रोग्याला दिल्यास नक्कीच आराम वाटतो.
November 24, 2023
नेन्सी वेक हिचा जन्म न्यूझीलंड मध्ये वेलिनटन शहरात ३० ऑगस्ट १९१२ रोजी झाला. 1914 त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलिया च्या उत्तर सिडनी भागात स्थाईक झाले.वयाच्या १६ व्या वर्षी ती घरातून पळाली आणि नर्स म्हणून काम करू लागली.पुढे ती न्यूयार्क येथे गेली व नंतर लंडनला जाऊन पत्रकारितेचा कोर्स केला.
January 12, 2023
दरम्यानच्या काळात रॉसला इटालियन वैद्यक शास्त्रज्ञ गिओव्हानी बॅटिस्टा ग्रासी याच्या वागणुकीचा अत्यंत कटु, संतापजनक व अपमानास्पद अनुभव आला. रॉसने मलेरियावरील केलेले संपूर्ण संशोधन हे ग्रासीने स्वत:च्या नावावर एका वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध केले. ही मौल्यवान शोधकार्याची चोरी झाल्याचे रॉसच्या लक्षात येताच त्याने पत्राद्वारे कडक शब्दात व अत्यंत शिवराळ भाषेत ग्रासीची निर्भत्सना केली. दोघांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारासंबंधीचे पुस्तकच रॉसने स्वखर्चाने प्रसिद्ध केले. मलेरियासंबंधीत संशोधनाच्या वाटेवरील ही एक उद्वेगजनक व कलंक लावणारी घटना होती.
नोबेल पारितोषिक समितीला या सर्व पत्रव्यवहाराची, तसेच रॉस व त्याखेरीज इतर शास्त्रज्ञांनी मलेरिया परोपजीवांवरील केलेल्या संशोधनाचीही पूर्ण कल्पना होती त्यांनी या संपूर्ण संशोधनाचा खरा जनक डॉ. रोनॉल्ड रॉसच आहे याची खात्री करून १९०२ सालातील वैद्यकीय शास्त्राचे नोबेल पारितोषिक रॉसला बहाल केले. रॉसच्या जीवनातील सुवर्ण दिवस अखेरीस उजाडला.
मलेरियाच्या परोपजीवांचे मनुष्य व डास यामधील जीवनचक्राचे निसर्गाचे कोडे रॉसने सोडविले होते याबद्दल हे पारितोषिक नसून मलेरियाचा प्रसार कसा होतो, व तो रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत या रॉसच्या क्रांतीकारी योजनांच्या संदर्भात त्याने ते मिळविले होते. वस्तुत: रॉसचे हे संशोधन नोबेल पारितोषिकासाठी लावलेल्या निकषांच्या चौकटीत बसणारे नव्हते. त्याचे काम हे अपवादात्मक स्वरुपाचे होते आणि अपवादही नियमांच्या चौकटीत बसू शकतो हे रॉसच्या कामाने सिद्ध केले होते. मान्यताप्राप्त ठरले होते.
नोबेल पारितोषिकानंतर अनेक मानपत्रे व बक्षिसांचा रॉसवर पाऊसच पडला Fellow of Royal College of Surgeon And Fellow of Royal Society म्हणून निवड झाली. १९१३ मध्ये Royal College चे उपाध्यक्ष, इंग्लंडच्या राजाने Order of Bath, बेल्जियमच्या राजान Order of leopord II या व अशा अनेक बहुमानाच्या पदव्या त्याला दिल्या. संपूर्ण युरोपातील राष्ट्रे व अमेरिकेनेही त्याचा गौरव केला. १९१० साली स्विडनची राजधानी स्टॉकहोम येथील Karolinska Institute च्या १०० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवाचे प्रसंगी रॉसला M.D. ही पदवी देण्यात आली.
हे सर्व मानसन्मान व पारितोषिके मिळून सुद्धा रॉस स्वतःच्या वैयक्तिक व्यवसायात अयशस्वी झाला. ना पैसा व ना मन:शान्ति अशी अवस्था होऊन रॉस दु:खी व निराश झाला. त्याच्या मोलाच्या संशोधनाकरिता सरकारने कोणत्याही स्वरूपात पैशाची मदत केली नाही हीच त्याच्या जीवनातील मुख्य खंत होती.
रॉस इंग्रजी वाङ्मयाचा गाढा उपासक व लेखक होता. The child of ocean, The spirit of storm, The Emigraots या सारख्या कादंबऱ्या, अनेक दर्जेदार कविता संग्रह, गणित व संख्याशास्त्र (Statistics) यावरील पाच पुस्तके व पुढे १९२३ साली ५४६ पानांचे स्वत:चे आत्मचरित्र रॉसने लिहीले. या आत्मवृत्तात ज्या दु:खद संकटातून त्याच्या संशोधनाची वाटचाल होत गेली त्याचे प्रदीर्घ वर्णन व स्वत:चे आत्मचिंतन प्रगट केले आहे.
“अॅनॉफेलीस डासाची मादी ही काही सहजपणे हार मानणारी कीटक नसून तिला नेस्तनाबूत करण्यासाठी अखंड परिश्रमाची गरज आहे" हेच वाक्य थडग्याशी पोहोचेपर्यंत रॉस वारंवार उच्चारित होता. या पृथ्वीतलावर एक ना एक दिवस नक्की उजाडेल ज्यावेळी अॅनॉफेलीस मादी नाहिशी झालेली आढळेल हीच त्याची एकमेव अंतिम इच्छा होती.
नोबेल पारितोषिक विजेता, महान किर्तीचा वैद्यकीय शास्रज्ञ, गणितकार, संसर्गजन्य रोग व सांडपाणी निर्मूलनाचा तज्ञ, संपादक, कवी, कांदबरीकार, संगीतप्रेमी, नाटककार अशा विविध गुणांनी संपन्न असलेला डॉ. रोनॉल्ड रॉस हे खरोखरीच एक अजोड़ व्यक्तिमत्त्व होते.
-- डॉ. अविनाश वैद्य
October 5, 2022
२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे.
August 6, 2016
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले ओडिशा राज्य म्हणजे इतिहास, परंपरा, कला, आध्यात्म आणि निसर्गाचा अद्भुत संगम. बंगालच्या उपसागरात मिसळणारा वारा, हजारो वर्षांची वारसा जपणारी मंदिरे, आदिवासी लोक-संस्कृती आणि समुद्र किनाऱ्यांची शांतता – असे हे ओडिशा पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देणारे गंतव्य आहे.
December 4, 2025
मानव जन्म पूर्व प्रारब्धाने प्राप्त होतो.जन्म घेतानाच त्याची कुंडली तयार असते. त्याच्या आयुष्य तीन प्रकारच्या संबंधाने बांधलेले असतात.
April 29, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti