(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सप्टेंबर २८ – माजिद खान आणि ‘गस’ लोगी

  • कर्करोग जनजागृती दिवस

    कर्करोग जनजागृती दिवस

    कर्करोगाची त्यांची ओळख रंगाद्वारे पामेला महिलेने जगाला दिली असे म्हणावयास हरकत नाही.

  • संधी आहेच, तर प्रहार मुळावर करावा !

    अण्णांना सध्या देशभरातून मिळणारा पाठिंबा पाहता हे सरकार अण्णांचे आंदोलन चिरडून टाकण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. सरकारला माघार घ्यावीच लागेल. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय आंदोलकांना काबूत ठेवण्यासाठी जे कायदे तयार केले त्याच कायद्यांचा हे सरकार आपल्याच लोकांविरुद्ध वापर करीत आहेत; परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. लोकांचा आवाज असा दाबता येणार नाही. त्यामुळे सरकारला तडजोड करावीच लागेल; परंतु ही तडजोड स्वीकारताना अण्णांनी व्यवस्था परिवर्तनाच्या चक्राला गती देण्याचे काम करावे. व्यवस्थेत बदल झाला आणि तोही आमुलाग्र झाला तर ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई जिंकली, असे म्हणता येईल!

  • सदाबहार चित्रपट ‘पडोसन’ची पन्नास वर्षे

    काही विनोदी सिनेमे असतात असे जे आज ही आपणास मनमुराद आंनद देतात आपल्या कुटुंबियां सोबत ‘पड़ोसन ‘हा सिनेमा बघण्याची आज ही मज्जा काही आगळीच असते. अगदी हसवत ठेवणारा सिनेमा..

  • रवींद्र पिंगे’ – एक भ्रमंती पसंद फिरस्ता !

    मराठी वाङ्मयातील एक लोभसवाणे आणि सर्वांचे आवडते नांव म्हणजे -रवींद्र पिंगे ! हात बहुप्रसवा आणि अतिशय प्रासादिक !! सहज सोपे लेखन -पटकन जीवाला भिडणारे . आणखी त्यांचे एक वैशिष्ट्य होते-गुणग्राहकता.

  • शेतकरी नवरा-नको रे बाबा !

    आपला भारत कृषिप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न अनुत्तरीतच आहे व त्यावर अजून तरी काही ठोस पाऊले उचल्याची बातमी नाही. नुसते अनुदान देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही.

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग ५

    आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे. आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. !

  • मार्मोरिस प्रवासगाथा – वाराणसी: काशीची दिव्यता आणि अद्भुत आध्यात्मिक प्रवास

    मार्मोरिस प्रवासगाथा – वाराणसी: काशीची दिव्यता आणि अद्भुत आध्यात्मिक प्रवास

    भारतातील हजारो शहरांमध्ये काही शहरे फक्त वास्तूंच्या आणि रस्त्यांच्या ओळखीवरून जिवंत राहत नाहीत; ती शहरं जन्माला येतात श्रद्धेतून, संस्कृतितून आणि अध्यात्मातून. अशीच एक नगरी म्हणजे वाराणसी किंवा काशी.

  • अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ७

    नोव्हेंबर डिसेंबरमधे कधी तरी हिमवृष्टी सुरू होते. गाडी चालवताना जर हिमवृष्टी होत असेल, तर काचेवर येणारे हे हिमकण, जणू आकाशातून अलगद उतरत येत असतात. गाडीच्या बाजूच्या काचेतून हिमकणांचा वर्षाव बघत रहावा. गाडीच्या वेगाप्रमाणे यांचा देखील वेग बदलल्या सारखा वाटतो. एरवी अलगदपणे उतरणारे हे हिमकण, गाडी वेगात जात असली म्हणजे पावसाच्या सपकार्‍यासारखे जोरात येऊ लागतात. सारा आसमंत असंख्य पांढर्‍या शुभ्र हिमकणांनी भरून जातो. आपल्याकडे पावसाळ्यात आभाळात बसून दळण दळणारी म्हातारी आजीबाई, इकडे हिवाळ्यात येऊन आभाळात कापसाची बोंडं फोडत बसते. मग त्या बोंडांतून निघणार्‍या पांढर्‍या शुभ्र म्हातार्‍या, लाखो पर्‍यांच्या पंखांवर बसून चहूबाजूने तरंगत तरंगत जमिनीवर उतरू लागतात. सुरवातीला रस्ते नुसते ओले होतात. मग जसजशी हिमवृष्टी वाढू लागते, तसंतसं हे बर्फ जमिनीवर, रस्त्यावर चिकटू लागतं. बघता बघता त्यांचा चांगला पांढरा शुभ्र थर तयार होतो.

    हळू हळू पांढर्‍या रंगाने काना कोपरा भरून जातो. झाडांच्या फांद्यांवर, फांद्यांच्या बेचक्यामधे, झुडपाच्या काटक्यांवर बर्फ साचू लागतं. सूचिपर्णी वृक्षांच्या हिरव्यागार छत्र्या बर्फ तोलत उभ्या रहातात. रानावनात बर्फाची पेरणी करावी तशी जमीन बर्फाने झाकली जाते. घरांच्या छपरांवर, खिडक्या दारांच्या वरच्या पट्ट्यांवर, कुंपणांवर, पायर्‍यांवर, बर्फाच्या पांढर्‍या पट्ट्या दिसू लागतात. पार्क करून ठेवलेल्या गाड्या बर्फाने झाकल्या जाऊन जणू बर्फाची मॉडेल्स करून ठेवली असावीत, तशा दिसायला लागतात.

    हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजामुळे येणार्‍या हिमवादळाची (snow storm) आगाऊ कल्पना असतेच. त्यात हिमवादळ जवळ आल्याच्या सूचना रेडिओ आणि टी.व्ही. वर येऊ लागल्या की snow scrappers, ट्रक्स वगैरे जय्यत तयारीनिशी बाहेर पडतात. मोठ्या आणि अधिक रहदारीच्या रस्त्यांवर, लवकर बर्फ वितळण्यासाठी ट्रक्स मधून salt टाकलं जातं. पण आजूबाजूचे छोटे किंवा कच्चे रस्ते मात्र तसेच बर्फाच्छादित रहातात.

    हिमवर्षाव फारच जोरात सुरू झाला की गाड्यांचा वेग मंदावतो. वातावरण कुंद झालेलं असतं. रस्त्यांवर साठलेल्या बर्फांमधे पुढच्या गाड्यांच्या चाकांचे ठसे उमटलेले असतात. आधीच कमी जाणवणारी माणसांची वर्दळ आणखीनच कमी जाणवायला लागते. रस्त्यावरची रहदारी खूपच कमी होते. वाटेतल्या एखाद्या छोट्या गावातल्या घरातला मंद दिव्याचा उजेड हवाहवासा वाटायला लागतो. बर्‍याच काळ चाललेल्या हिमवृष्टीने, चांगला काही इंचांपासून ते १-२ फुटांपर्यंत बर्फ साचतो. Snow scrappers रस्त्यांवर फिरत, रस्त्यांवरचा बर्फ रस्त्याच्या कडेला ढकलून देतात. वरचे वर हिमवृष्टी होत राहिली तर रस्याच्या कडेला अशा लोटलेल्या बर्फाचे चांगले २-४ फूट उंच असे बंधारे तयार होतात. ते चांगले मार्च एप्रिलपर्यंत रहातात. येणार्‍या जाणार्‍या गाड्यांच्या धुराने, मातीने, ते पांढरे शुभ्र बंधारे हळू हळू मातकट, काळसर होऊन जातात. दुकानांच्या पार्कींग लॉट्समधे, घरांच्या आगेमागे, चर्चेसच्या प्रांगणांमधे, शेत मळ्यांच्या बांधावर, असे साचलेले बर्फाचे ढीग महिनोन महिने पडून असतात.

    रात्री गाडी चालवताना जर हिमवर्षाव होत असेल, तर येणार्‍या जाणार्‍या तुरळक गाड्यांच्या प्रकाशझोतात पडणारे हिमकण, सोनेरी झळाळी घेऊन चमकायला लागतात. वाटेवरल्या छोट्या गावांमधल्या काही चुकार दिव्यांच्या मंद चंदेरी प्रकाशात अलगद उतरणारे हिमकण, पावसाळ्यात कंदीलाभोवती गर्दी करणार्‍या चिलटांसारखे वाटायला लागतात.

    पेनसिल्व्हेनीयाच्या या डोंगराळ भागातून जाता येता सह्याद्रिची आठवण आल्याशिवाय रहात नाही. फरक एवढाच की सह्याद्रिचे कभिन्न कातळ वार्‍या पावसाने झोडपले जातात आणि उन्हामधे पोळले जातात तर इथले दगड धोंडे बर्फाने झाकले जातात. रस्त्याकडेच्या डोंगरांच्या भिंतीतून पुढे आलेले दगडांचे कोपरे, कंगोरे माथ्यावर बर्फाच्या टोप्या घालून स्वस्थ बसलेले असतात. हिमवर्षाव संपून गेला की त्यांच्या या पांढर्‍या टोप्या बरेच दिवस तशाच असतात. काही ठिकाणी बर्फ थोडंसं वितळून, त्याचं पाणी दगडावरून खाली पडायला बघत असतं पण थंडीच्या प्रभावाने ते परत थिजतं आणि दगडाच्या टोकाला बर्फाचे लटकते लोलक तयार होतात. काही काही ठिकाणी, कातळावरून पडणार्‍या पाण्याचे असे थिजलेले धबधवे झालेले पहायला मिळतात.

    इथल्या डोंगरांच्या आणि टेकड्यांच्या या न संपणार्‍या रांगांमुळे, या भागातल्या डोंगर रांगांना endless moutains असंही एक नाव आहे. त्यांच्या अंगभूत निळाईमुळे त्यांना blue mountains असं देखील संबोधलं जातं. डोंगरांच्या या निळ्या जांभळ्या लाटा, त्यांच्या माथ्यावर चमकणारं शुभ्र धवल बर्फ आणि दर्‍यांमधे साचलेलं आणि रुप्यासारखं झळाळणारं बर्फ, यांचं एक अजब मिश्रण होऊन जातं. कधी कधी या क्षितीजापर्यंत पसरलेल्या डोंगर रांगा म्हणजे एक अजस्र वळवळणारं जनावर वाटतं. जमिनीवर पडलेल्या बर्फामुळे या जनावराची कातडी पांढरी धप्प वाटत असते तर पर्णरहित झाडांची गर्दी त्या कातडीवरच्या राठ केसांप्रमाणे वाटत असते.

  • लोथल येथील सिंधु-सरस्वती संस्कृतीची वसाहत व जगातील सर्वात जुना डॉक

    लोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे. ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत. पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे !