(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कृष्ण ते कुसुमाग्रज…फक्त लढा म्हणा

    कृष्ण चरित्रामधील एक प्रसंग आहे. इंद्र गोकुळावर कोपला. गोकुळावर त्याने विजांचा कडकडाट केला आणि मुसळधार पाऊस पाडून सगळ्या गावकऱ्यांना संकटात आणलं. घरे, शेती, गाई-गुरे बुडू लागली. गावकरी हतबल झाले. सगळे कृष्णाकडे गेले. कृष्ण अशावेळी घाबरायला हवा होता. पण कृष्णच तो…तो तर बासरी वाजवत बसला होता. त्याच्या आसपास गावकरी जमा झाले तेव्हा कृष्णाने बासरी खाली केली आणि ते काही बोलण्याआधीच कोसळणाऱ्या मुसळधार पावसावर मी उपाय सांगतो असे आश्वासन दिले. मी युक्ती करतो असा धीर दिला.

      March 6, 2026


  • आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…

    आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…

    आश्विन शुक्ल  प्रतिपदेला होणारी घटस्थापना ह एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय

      October 11, 2020


  • रणजी आणि पहिले एकदिवसीय द्विशतक

    राजेशाही थाटाची, पौर्वात्य किमयेची आणि उच्छृंखल अशी फलंदाजी रणजी करीत. लवचिक मनगट अनेकांजवळ असते, वेळही बरेच जण अचूक साधतात पण या दोन्ही गोष्टींसोबत उपजत नजाकत ज्या फार विरळा किमयागारांजवळ असते त्यात रणजींचा समावेश होतो. १९९७ च्या विश्वचषकातील एका सामन्यात बांद्र्याच्या मिडल इन्कम ग्रुप ग्राऊंडवर बेलिंडाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील पहिले द्विशतक झळकावले. तोपर्यंतच काय, त्याच्यानंतरही सुमारे १३ वर्षे ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमली नाही.

      September 10, 2010


  • सन आयलाय गो आयलाय गो, नारली पुनवेचा @ वरली कोलीवाडा..

    काल इतक्या वर्षात पहिल्यांदाच कोळी बांधवांचा ‘नारली पुनवे’चा सण साजरा होताना प्रत्यक्ष पाहिला. आता पर्यंत नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा करातात, ते टिव्हीवर पाहिलं होतं. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून दुसऱ्या दिवसापासून मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव आपली होडी दर्यात ढकलतो, येवढंच शाळेच्या पुस्तकांतून नाॅलेज मिळालं होतं

      August 27, 2018


  • किचन क्लिनीक – दुधीभोपळा

    किचन क्लिनीक – दुधीभोपळा

    ह्यालाच पांढरा दुधी असे देखील म्हणतात.ह्याचे किती प्रकारची व्यंजने बनत असतील हे सांगणे जरा कठिणच आहे,पण सगळ्यांचा आवडता दुधी हलवा म्हणा,खीर म्हणा,चटणी म्हणा,भाजी म्हणा,सुप इ पदार्थ करतात हे मला माहिती आहे.

    जसा ह्याचा उपयोग भाजीमध्ये होतो तसाच ह्याचा औषधी उपयोग देखील आहेत बरं का!
    ह्याचे वेल असते जे दुरवर पसरते ह्या वेलीला हि फिकट हिरव्या रंगांचा लांबट अशी फळे लागतात.ज्याचा उपयोग खाण्याकरिता केला जातो.

    हा चवीला गोड,थंड असते व पित्तनाशक व कफकारक असतो.आता ह्याचे औषधी उपयोग पाहुया:

    १)हातापायांची आग होत असल्यास तळव्यांना रात्री झोपताना दुधीभोपळ्याचा किस बांधुन झोपावे.

    २)हातापायांना भेगा पडल्यास दुधीभोपळ्याचा रस व एरंडेल तेल मिसळून लावावे.

    ३)शौचास कधीपातळ कधी घट्ट किंवा चिकट होत असेल तर जुन झालेला दुधीभोपळा घ्यावा व त्याचे सालकाढुन तो किसुन त्याचा किस तुपावर परतावा व त्यात जीरे,मिरी,खडीसाखर व सैन्धव घालून खावा.

    ४)ज्यांना कायम संडासला साफ न होण्याची तक्रार असते त्यांनी जेवणात रोज दुधाची भाजी घ्यावी.

    ५)नियमीत ४चमचे दुधी रस+१/४ चमचे जिरे+१ चमचा मध हे मिश्रण पहाटे सुर्योदयापुर्वी रिकाम्या पोटी घ्यावे व तासभर काही खाऊ नये.हा प्रयोग ४२ दिवस करावा ह्याने शरिरातील उष्णता कमी होते व जेवणास रुची येते तसेच ह्रूदयाला देखील बळ मिळते.

    कोवळा दुधी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात व जुन दुधी खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 8, 2016


  • …कधी रे येशील तू?

    माझा जन्म साताऱ्यातील एका खेडेगावचा. एक वर्षाचा झाल्यावर पुण्यात आलो. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं व्हायचं. या गावी जाण्यामुळे खेड्यातील जीवन जवळून पाहिलं. शहरातून काही दिवसांसाठीच गावी जात असल्याने आमच्या वयाची मुलं आमच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पहायची आणि मोठी माणसं ‘आली बामणाची पोरं’ म्हणायची.

      May 14, 2023


  • ग्रामीण भागातील नागपंचमी

    श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे हिरवागार परिसर ओढे नदी नाले पाऊस भरपूर असल्यामुळे खळखळ वाहत असतात. तर काही वेळा महापूर येण्याची सुद्धा शक्यता असते या महिन्यांमध्ये सर्वत्र आनंदी आनंदतरळत असतो. या नागपंचमीला लग्न झालेल्या नवक्या मुली माहेरहून सासरला येतात घरात मुली आल्या म्हणजे घर गजबजून जाते. या महिन्यामध्ये पोषक वातावरण पावसाची रिमझिम तर सारखी चालू असते. पाऊस चालू झाला म्हणजे पावसाच्या रिमझिम मध्ये लहान मुले मुली घराच्या बाहेर पटांगणामध्ये आनंदाने गाणे म्हणतात….।

      August 9, 2022


  • डोक्यावरचे केस जाणे आणि त्यावरील उपाय

    डोक्यावर जेथे केस नसतील अशा ठिकाणची त्वचा ताणून धरा आणि तेथे केसांच्या मुळाना मुळयाचा रस लावा. हे झोपण्यापूर्वी करा. त्यामुळे तो रस सर्वत्र डोक्यावर पसरून जेथे केसाच्या मुलांना अवरोध निर्माण झाला आहे तेथून तो आतमध्ये पाझरून केसांची मुले जी अवरोधित झालेली आहेत, त्यांना मोकळे करण्यास मदत करेल. सकाळी उठून आयुर्वेदीक शाम्पूने स्नान करा. यामुळे देखील पून:च्च केस येण्यास मदतच होईल.

      September 11, 2011


  • मोरया माझा – ९ : मोरयाला दूर्वा २१ च का वाहायच्या?

    मोरयाला दूर्वा किती? २१. मोरया ला मोदक किती? २१. मोरया समोर दक्षिणा किती? २१. हे तर सगळ्यांना नक्की माहिती आहे पण २१ च का?

      September 10, 2019


  • छोटीसी बात चित्रपट

    अमोल पालेकर या सिनेमात larger than life असलेल्या भूमिकेत कधीच नव्हता. कुठल्याही गर्दीत दिसणारा तो एक सामान्य माणूस होता. उगाच व्हिलनच्या खिशात चावी ठेवून “चाबी अब मै तेरे जेब से निकाल कर हि ये ताला खोलुंगा पीटर” म्हणत हिरोगिरी करणाऱ्याच्या भानगडीत तो कधी पडला नाही.

      January 9, 2022