वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
चिनी मालावर बहिष्कार टाकताय ? मग गिरीष टिळक यांचा हा लेख नक्कीच वाचा…गिरीष टिळक हे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे बंधू आहेत. शिवाय जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांना बुध्दीमान कर्मचारी मिळवून देणारी त्यांची स्वतःची कंपनी आहे.
“मी” वर आपलं प्रचंड प्रेम असतं आणि ते असलंच पाहिजे! कधीकधी हे मी प्रेम मात्र घातक ठरतं, मी जेव्हा “मी” असतो नेमकं त्याच वेळी समोरच्याला “मी” कोण आहे? हे माहित नसतं, तो पाणउतारा करतो तेंव्हा माझ्यातला ‘मी’ कळवळून म्हणतो, मी काय असातसा वाटलो की काय ? हे फक्त दाब (दम) देण्यापूरतं विचारायचं असतं पण आपल्याला माहित असतं की तो आपल्याला ‘असातसा’च समजत असतो !
सजीवांची त्वचा, कातडी, चामडी ही निसर्गाची अदभूत, अनन्यसाधारण निर्मिती आहे. त्वचा ही मानवी शरीराचेच नव्हे तर सर्व सजीवांचे बाहेरचे आवरण आहे. प्रत्येक प्राण्याची कातडी आणि तिचे सौंदर्य अप्रतीम, वैशिष्ठ्यपूर्ण असते. तिच्यावरील रंगाविष्कार अवर्णनीय आहेत. पोपटांचे, मोराचे रंग, वाघ, जिराफ, झेब्रांचे पट्टे, चित्त्यांचे ठिपके यांना जबाब नाही. कातडीवर केस असतात.
लग्नसोहळा हा सर्वांच्या आवडीचा विषय. नवरदेव, नवरी, करवले, सोकाण्या, करवल्या, वरमाई, वरबाप , वर्हाड, मांडव, बोहला, जानवसा, देवक,अक्षता, परण्या ,आहेर, वरात हे शब्द मध्यमवर्गाच्या लग्नकार्याची साक्ष देणारे. ग्रामजीवनात लग्नपायर्या ठरलेल्या असतात. हळद लावणे, तेल चढवणे, देवाचे दर्शन, मिरवणूक , मंगलाष्टके, आशिर्वाद, सप्तपदी, सूनमुख पाहणे, भोजन, रंगनाथ दर्शन, नवरी वाटं लावणे, येतीजाती, सोळावा वगैरे. तसेच वाजंत्री, तोफ वाजवणे, घोडा नाचवणे, नवरदेवासमोर नाचणे, फोटो, व्हीडीओ शुटिंग हे आता नविन आलेले प्रकार. तीसेक वर्षापुर्वीचे लग्नपध्दती वेगळी होती.साधी पत्रिका. तांदूळ वाटपाने निमंत्रण. जांभळाच्या पाल्याचा मांडव दारी. लाप्सी,भात आणि कढी हा मेनू. बैलगाडीने वर्हाड लग्नाला जाणार.नव्या पाहुण्याच्या गंजीच्या पेंढ्या उपसणार. बैल फुगूस्तर मागं बघायचं नाही. मग मानपान आलाच. वरमायचा थाट. घागर आडवी येणार.टाॅवेल-टोपी.भेटीगाठी. आदरयुक्त बोलणे. थट्टामस्करी. चावडीत उतरणे. तेव्हाच्या बेसन , पिठले भाकरीची चव आजही जिभेवर रूळलेली. सगळा गाव यायचा. झटू लागायला. स्वयंपाक, झाडलोट सगळे एकत्रच. रात्रीच्या लग्नाची शोभा काही औरच असे.लाऊडस्पिकरची ताटली वाजे.त्यावर एक माॅनिटर ठेवत. अस्सल रांगड मराठी गाणं वाजायचं. दादाच्या गाण्याला , लावणीला विशेष पसंती.पाहुण्याच्या परिस्थितीनुसार लग्न होत. रेडीयो, सायकल, घड्याळ ही मोठी भेटवस्तू.लग्नामध्ये नवरदेवाने रूसणे फुगणे आलेच.
काळ बदलत गेला. लग्नाची पध्दती बदलली. व्यवहार बदलले.ट्रकने , टेम्पोने वर्हाड जाऊ लागले. यात मुलांचा उत्साह शिगेला पोहोचतो. नवे कपडे. एकमेकांशी मस्करी. समवयस्कांचा समूह. आनंद घेणे हे वर्हाडाचे काम.' नवरदेव जातो नवरीसाठी आणि वर्हाड जात खाण्यासाठी' ही अलिखीत पण रूढ म्हण. वर्हाडाच्या अनेक तर्हा. पोरांना ट्रकच्या टपावर ठरलेली जागा.काही ट्रकचे ड्रायव्हर चांगले तर काही खडूस. टपावर बसलं की सगळ्या जगाचे आपणच राजे असा आभास. आपणच ट्रक चालवतो असच वाटायचं. खाली बघ.वर बघ.मोघम आरडा असायचा. झाड आली की कुठलीही पर्वा करायची नाही. पाला तोडायचा . कडूनिंबाच्या निंबोळ्या तोडायच्या.मनसोक्त एकमेकांना मारायच्या.ट्रकमध्ये बसलेल्या मोठ्या माणसालासुद्धा सोडायचे नाही. मस्करी करायची.आनंद घ्यायचा.कुणी ओरडायचं.उखाळ्यांसह गावातलं इत्यंभूत वर्णन आलच.पाऊस असेल तर तिथच ताडपत्री अंगावर.कोणते वर्हाड कुठे हाणलं.हा चवीनं चर्चेचा विषय. लग्नात आलेला रूखवत वाटातच खाऊन टाकायचा.कुरडया फेकून मारायच्या.मजा असायची. मन मोकळ असायच.आता शहरातल्या गर्दीत हरवलेला माणूस पाहिला की हे आनंदाचे क्षण आठवतात.
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वतःला बदलायची तयारी ठेवायला हवी.
नेमकी जेवणाची वेळ कोणती आहे, यावर पुनः मतमतांतरे असण्याची शक्यता आहे.
आयुर्वेद म्हणतो. रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल......
......केवळ वैद्य सुविनय दामले म्हणतो आहे, म्हणून नव्हे, हा अहंकार मुळीच नाही. एक आयुर्वेदभक्त म्हणून जे योग्य असेल ते सांगण्याची, आणि जे अनुभवले आहे ते इतरांना वाटण्याची मला आवश्यकता वाटते. म्हणून लिहितोय. नाहीतर मी माझ्या व्यवसायात ठीक आहेच.
समर्थ म्हणतात,
जे जे आपणास ठावे,
ते ते दुसऱ्यास सांगावे
शहाणे करूनी सोडावे
सकल जन.
मी खूप सकारात्मक बदललोय. माझ्यातला बदल मलाच आश्चर्य वाटणारा आहे.
मी जे माझ्या स्वतःवर प्रयोग करतोय, जे गेली पंचवीस तीस वर्षे प्रत्यक्ष अनुभवतोय, जे माझ्या आयुर्वेदीय ग्रंथात वाचले आहे, जे माझ्या अनेक गुरूंकडून शिकलोय, जे माझे अनेक रूग्ण श्रद्धेने करत आहेत, त्यांच्यातील बदलाचे अनुभव परत येऊन सांगताहेत, ते फक्त शब्दबद्ध करून सांगतोय. काय लिहायचे, हे सुचवणारी, लिहवून घेणारी ती निसर्गशक्ती ( देव म्हटलं तरी काही जणांना पोटशूळ उठतो हल्ली.) मला सतत मदत करतेय, त्यामुळे हे लेखन कर्तृत्व माझे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे.
कसं वागायचं, आणि ते कसं आचरणात आणायचं, स्वतःला कसं बदलायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कायदे करून सगळे प्रश्न सुटत नसतात, कायद्याची भीती दाखवून तर काहीच होत नसते. अहो, पूर्वी पोलीस म्हटले तरी भीती वाटायची. आता काही वाटेनासे झाले आहे. भीतीचा बडगा संपलाय. भारतीय विचार सरणी ही कायद्यापेक्षा पाप आणि पुण्याला जास्त घाबरते, ही वस्तुस्थिती आहे, ही भारतीय मानसिकता आहे. जे चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना सरळ मार्ग दाखवणे ही जर चुक असेल तर ही चुक मी वारंवार करेन.
धृतराष्ट्र आणि गांधारी प्रत्येक वेळी आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरुण घालत राहिली, चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत राहिली, म्हणून कौरव उन्मत्त झाले. आणि राजा असून देखील, संख्येने अधिक असूनही, स्वतः सकट स्वतःच्या कुळाचा सर्वनाश ओढवून घेतला. हा इतिहास विसरून कसा चालेल ?
चला, सावध होऊया.
त्या नीलकंठ शिवशंभुला शरण जाऊया.
आपल्या मनातील विद्वेषाचे विष नष्ट करूया.
अजूनही वेळ गेलेली नाही.
आयुर्वेद समजून घेऊन जगुया !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.02.2017
माझ्यामते मुबलक पैसा कमविला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असे नाही. खरं तर फक्त पैसा कमविला की तो “पैसेवाला” नक्कीच होतो, मात्र “श्रीमंत” होतोच असं नाही. कारण प्रत्येक “श्रीमंत” हा पैसेवाला असतोच परंतु प्रत्येक “पैसेवाला” हा श्रीमंत असतोच असे नाही.
आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात.मालिनी चिब यांचे वन लिटील फिंगर हे पुस्तक असेच प्रेरणेची पायवाट आहे. मालिनी चिब या बहुविकलांगता म्हणजे सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त आहेत. असे असूनही या शारीरिक स्थितीशी झगडत शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण या प्रवासामध्ये भारत आणि परदेशामध्ये घेतलेले अनुभव त्यांनी स्वत:च ‘वन लिटील फिंगर’ या पुस्तकातून मांडले आहेत. दिव्यांग व्यक्तींबाबत समाजामध्ये असणारे घोर अज्ञान, त्यातून निर्माण झालेली नकारात्मक वृत्ती, दिव्यांगांना समाजाकडून मिळणारी वागणूक, शासकीय यंत्रणांची उदासीनता, भारत व पाश्चिमात्य देशांमध्ये दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमधील जमीन अस्मानाचा फरक, यामुळे शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवताना येणाऱ्या अपरिमित अडचणी यांसारख्या असंख्य गोष्टींचे दाहक चित्रण आणि त्याला मालिनीने केलेला यशस्वी सामना या पुस्तकात आहे.
स्पॅम फोन कॉल अर्थात अनावश्यकपणे येणार्या फोन कॉलची संख्या भारतात एवढी मोठी आहे की भारताचा जगात चक्क दुसरा नंबर लागतो. ही माहिती दिली आहे आपल्याला येणाऱ्या फोनचा नंबर तात्काळ मोबाइल स्क्रीन वर दाखवणाऱ्या ट्रुकॉलर (Truecaller) या ॲपच्या निर्मात्यांनी.
सध्या मोबाईलच्या वापरात भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साधनाने अप्रत्यक्षपणे अनेकांना रोजगारही मिळवून दिला आहे. मोबाईल म्हटले की, ज्याच्या त्याच्या तोंडी एक शब्द नेहमी असतो तो म्हणजे सिमकार्ड. सिमकार्ड याचा अर्थ सबस्क्रायबर आयडेंटिटी मोड्युल. ही एक प्रकारची मेमरी चिप असते.
वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. कथेतील मूळ सत्य लोकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न मी आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे- त्यासाठी आपल्या कल्पनेचा ही वापर केला आहे
Copyright © 2025 | Marathisrushti