(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर

    इतिहास - समृध्दी आणणाऱ्या आपल्या धरणांचा - भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर.....

    शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला... अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे.
    निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले ते असे....

    उत्तर रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. त्याच्या निर्मितीपासून आजवरची वाटचालही मोठी रंजक राहिली आहे. .....

    दुष्काळी भागास पाणी देण्याच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२ च्या सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्या्च्या गरजेवर भर दिला होता. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९ मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधा-यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी (ता. अकोले ) येथे मातीचे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला. सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला तो एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. पाण्याखाली बुडालेली एकूण जमीन होती २२ हजार ९०० एकर. जमिनीच्या संपादनासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी - कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला गेला. धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित करण्यात आल्या. हळूहळू जसजसे धरणाचे काम पुढे जाऊ लागले. तसा भंडारद-याचा शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा मुलभूत सोयी सुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे केवढे कुतूहल वाटत होते.

    भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. थोडे थिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मो-या असून,त्या अनुक्रमे ७० फुट, १२० फुट, १७० फुट व २२० फुट अशा अंतरावर आहे. या मो-यांचे अर्धा फुट जाडीचे व्यास ३ फुट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. ७१.२८ मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे.

    जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये. ६५० फुट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा आला. शिखर स्वामिनी कळसुबाई अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे - नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यागिरीच्या डोंगरद-यांच्या कुशीत विसावली होती. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पडलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले.साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड - उजाड जागेवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. साखर कारखाने उभे राहिले. उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. पण सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या भिंतीला तडे गेले. काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. तंत्रज्ञानी जीव धोक्यात घालून अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले.

    भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला. धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक यांचे नाव देण्यात आले. धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.

    अधिकृत नाव : भंडारदरा. विल्सन डॅम / ऑर्थर लेक
    अडवलेली नदि: प्रवरा
    स्थान : शेंडी.
    सरासरी वार्षिक पाऊस : ३२२० मिलिमीटर.
    उंची : ५०७ मीटर.
    रुंदी : (तळाशी) ८२.२९.
    बांधकाम सुरू: १९१०.
    उद्घाटन दिनांक: १९२६.
    बांधकाम खर्च: १,१३,९०,०६०
    क्षमता : 11 टीएमसी
    भौगोलिक माहिती: निर्देशांक १९.५४८२, ७३.७५७० गुणक: १९.५४८२, ७३.७५७०.
    दरवाजे: प्रकार : S - आकार लांबी : १९८.१० मी.
    सर्वोच्च विसर्ग : १५१४.९९ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : २, ( १२.५ X ७.९२ मी).
    पाणीसाठा: क्षेत्रफळ : १५.५४ वर्ग कि.मी.
    क्षमता : ३१२.५९५ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य
    क्षमता : ३०४.१० दशलक्ष घनमीटर
    ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर.
    कालवा: डावा कालवा लांबी : ७७ कि.मी. क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
    ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
    ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर.
    उजवा कालवा: लांबी : ४५ कि.मी. क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद
    ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर
    ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर.
    वीज उत्पादन: टप्पा १
    जलप्रपाताची उंची : ६५ मी
    जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्यूमेक्स
    निर्मीती क्षमता : १० मेगावॅट
    विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट.
    टप्पा २
    जलप्रपाताची उंची :
    ५० मी जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्यूमेक्स
    निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट विद्युत जनित्र x:
    १ X ३४ मेगावॅट
    धरणाची माहिती :
    बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम उंची :
    ८२.२९ मी (सर्वोच्च) लांबी : ५०७ मी.

      September 17, 2016


  • मनाचे श्लोक – १२१ ते १३०

    महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला | म्हणोनी तयाकारणे सिंह जाला |
    न ये ज्वाळ वीशाळ संन्नीध कोणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||121||

    कृपा भाकिता जाहला वज्रपाणी | तयाकारणे वामनु चक्रपाणी |
    द्विजाकारणे भार्गवू चापपाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||122||

    अहिल्ये सतीलागि आरण्यपंथे | कुढावा पुढे देव बंदी तयाते |
    बळे सोडिता घाव घाली निशाणी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||123||

    तये दोपदीकारणे लागवेगे | त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागे |
    कळीलागी जाला असे बौध्द मौनी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||124||

    अनाथा दिनाकारणे जन्मताहे | कलंकी पुढे देव होणार आहे |
    जया वर्णिता शीणली वेदवाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||125||

    जनाकारणें देव लिलावतारी | बहूतांपरी आदरे वेषधारी |
    तया नेणती ते जन पापरूपी | दुरात्मा महानष्ट चांडाळ पापी ||126||

    जगी धन्य जो रामसूखे निवाला | कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला |
    देहेभावना रामबोधे उडाली | मनोवासना रामरूपी बुडाली ||127||

    मना वासना वासुदेवी वसो दो | मना कामना कामसंगी नसो दे |
    मना कल्पना वाउगी ते न कीजे | मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे ||128||

    गती कारणे संगती सज्जनाची | मती पालटे सूमती दुर्जनाची |
    रतीनायिकेचा पती नष्ट आहे | म्हणोनी मनातीत ह्ऊोनि राहे ||129||

    मना अल्प संकल्प तोही नसावा | सदा सत्य संकल्प चिती वसावा |
    जनी जल्प विकल्प तोही त्यजावा | रमाकांत एकांतकाळी भजावा ||130||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 14, 2016


  • मनोरंजनाचे जग

    निसर्ग हेच पूर्वी मनोरंजनाचे साधन होतं. हवा, पाणी, ढग, आकाश, वृक्ष, चंद्र, चांदण्या, सूर्य याभोवती गाण्याचं इंद्रधनुष्य गुंफलं जायचं. निसर्ग जसा जसा कमी होत चालला, प्रसारमाध्यमांचा संसर्ग वाढला.निसर्गदत्त सौंदर्य नजरेआड, दुर्मिळ होऊन प्रसारमाध्यमांतून अनेक गोष्टी झिरपू लागल्या. माहिती व तंत्रज्ञान युगात मनोरंजनाच्या नावाखाली नको ते उथळ, संस्कृतीचं विपर्यास्त स्वरुप, विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणारं, सासू-सुनांचे द्वेष, अंधश्रध्दा, पसरविणार्या् गोष्टी येत आहेत.

      January 5, 2019


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सतरा

    "गॅसवर तुमच्याकडे काही परमनंट औषध आहे काहो ? "

    90% पेशंटचा 100 % विचारला जाणारा एकमेव भाबडा प्रश्न. ज्यावर डाॅक्टरांची विकेटच पडते. आता या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत, एका शब्दात, आणि एखाद्या औषधांनी, कसं काय देता येणार ?

    अख्खं वर्ष हेच समजावून सांगण्यात गेलंय, की रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा होऊ नये यासाठी सावधानता बाळगणे, केव्हाही चांगलेच ना !

    दर दोन चार तासांनी खा खा खाल्ले तर पचन करायला वेळ कधी देणार ? मग वात बिघडणारच. आपल्याच कर्मानी विकृत झालेला हा वात म्हणजे आजच्या काळातील 'गॅस' होय.

    आपल्यासाठी हा वात वाढवणारे पदार्थ कोणते ते शोधून बंद करणे हे आपणच शोधायचे. कारण आपण काय खातोय यापेक्षा कसे पचवतोय हे जास्ती महत्त्वाचे आहे. खाल्लेल्याचे पचन होणे, त्यावर अग्निची प्रक्रिया होणे महत्त्वाचे ! अग्निच्या जे जे विरोधात ते ते सर्व वात वाढवणारे. जसे पाणी. अतिरिक्त प्रमाणात, चुकीच्या वेळी घेतलेले, पाणी हे वात वाढवते.

    आंबोळी इडलीच्या सुक्या पीठात पाणी घातल्यानंतरच आंबायला सुरवात होते ना ! पाणी घातल्यानंतरच पीठ फुगते, दुप्पट होते, पीठाची चव बदलते, स्वरूप पालटते, पीठ बुडबुडेयुक्त दिसते, हे सर्व बदल पीठामधे कोणी केले ? एका पाण्याने केले. म्हणजे इडली डोसा पाव पिझ्झा यासारख्या आंबवलेल्या पदार्थात गॅस मुळातच जास्ती असतो, म्हणजे आंबवलेल्या पीठाचे सर्व प्रकार गॅस वाढवतात.

    पण क्वचित प्रसंगी हे पदार्थ खावेच लागणार असतील तर याच पीठाचे खमंग, कुरकुरीत डोसे करून खावेत, खाल्ले तरी ते दिवसाचेच खावे आणि ते पचेपर्यंत दुसरे काहीही खाऊ नये, ही युक्ती आहे. हा पर्याय आहे. सोयीस्कर अर्थ काढू नयेत.

    जेवणामधे कच्चे तेल आणि सर्व प्रकारचे कच्चे मसाले वापरले तर गॅस कमी होतो.

    सूर्यास्तापूर्वी घेतलेले जेवण, गरम गरम जेवण, गोड, आंबट, खारट चवींनीयुक्त जेवण, वाताचा म्हणजे गॅसचा नाश करते. जेवणात सहा चवी आवश्यक आहेत. एखादी चव जरी कमी पडली तरी गॅस होणार.

    पाणी, तेल आणि अन्नपचन या विषयावरील मागील सर्व टीपा पुनः वाचाव्यात. नाहीतर पुनरूक्ती दोष उत्पन्न होईल.

    नियमितपणे मलप्रवृत्ती साफ राहील, असे पहावे. जेव्हा मलप्रवर्तन करावेसे वाटेल, तेव्हा "त्याचे" लगेचच ऐकावे. आणि मलमूत्र विसर्जन करून यावे. यासाठी आतून "तो" काय सांगतोय, यावर सतत लक्ष ठेवावे, म्हणजे गॅस होणार नाही.

    जे अन्नपाणी साठवलेले असते, ते गॅस वाढवणारे असते. अन्नपाणी कुजल्यावर त्यामधे गॅस तयार होतो. पालेभाज्या, कच्ची खाल्ली जाणारी आणि मोड आणून पचायला जड बनवलेली कडधान्ये, खूप पिकलेली फळे, फ्रीजमधील अन्नपदार्थ ( ते सर्व शिळेच होतात. ) रात्र उलटून गेलेला तयार आहार, गॅस वाढवतो.

    पोटात अवकाश न ठेवता ठासलेले, बकाबका खाल्लेले, बळेबळे भरवले जाणारे, मनाविरुद्ध खाल्लेले अन्न देखील गॅस वाढवणारे असते.

    जसे गाडीचे अग्निस्थान म्हणजे कार्बोरेटर आणि अतिरिक्त वायुवाहक पुंगळी म्हणजे सायलेन्सर साफ असेल, तरच गाडीचे अॅव्हरेज वाढते, हे खरे आहे ना ?

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    01.04.2017

      April 1, 2017


  • असामान्य व्यक्ती – डॉ. स्टीफन हॉकिंग

    १६४२ मधे गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच वर्षी न्यूटन जन्मला. ज्या तारखेला (८ जानेवारी) गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच तारखेला हॉकिंग जन्मला, ३०० वर्षाच्या अंतराने १९४२ मधे. हॉकिंग याचा उल्लेख योगायोग असाच करतात. जे विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेत आहेत ते अशा घटनांना नियमात कसे बसवतील?

      March 14, 2019


  • हमने तुमको देखा

    संपूर्ण “खेल खेल में ” महाविद्यालयीन जोशाने भरलेला ! हा, नीतू आणि राकेश रोशन – रॅगिंग , स्टेजवरील धमाका , थोडीशी रहस्य फोडणी , ” आजा मेरी बाहो में आ ” वाली अरुणा . बाहेर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने तरुण झाल्यासारखं वाटलं.

      May 7, 2022


  • दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव

    p-34951-dadar-hobby-exhibition

    १० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील " छंदोत्सव २०१७ " या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या सणाची सुट्टी, दुसऱ्या शनिवारची सुट्टी , उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची घोषणा आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला. परीक्षा तोंडावर आलेल्या असूनही, कित्येक पालक आपल्या मुलांना " चांगले काही " पाहायला मिळावे म्हणून आवर्जून घेऊन येत होते.कितीतरी रसिक हे कल्याण, अंबरनाथ, वसई-विरार, पालघर अशा लांबच्या ठिकाणाहूनही आले होते.

    वेगळेच क्रोशाचे काम, फेल्टच्या कापडाच्या कलाकृती,सुसंगत अशा कविता लिहिलेल्या छत्री- बुकमार्क्स- टीशर्ट- पिशव्या-किचेन्स- पिगीबँक अशा वस्तू, कागदाच्या घड्या घालून केलेली फुले आणि विविध वस्तू, ओरिगामी, पार्चमेंट आणि आयरिश फोल्ड यांच्या वापराने बनविलेल्या कलाकृती,नारळ आणि बांबू यांच्या वापरातून बनविलेल्या श्रीकृष्ण मूर्ती- गणपती- दिवे-कलश-अशा कलाकृती,केवळ कागदाच्या जेमतेम पाव सेंटिमीटरच्या विविधरंगी पट्ट्या वापरून केलेली देखणी चित्रे, झाडांची पाने- झावळ्यांच्या पट्ट्या-- हिराच्या काड्या इत्यादींपासून बनविलेल्या पर्यावरण स्नेही वस्तू आणि छोटी खेळणी, कॅनव्हासवर उतरविलेली छायाचित्रे,रद्दी कागदापासून बनविलेले दणकट फर्निचर, नैसर्गिक रंगांमधील सुलेखन, वेगळ्या प्रकारच्या भरतकामातून तयार केलेले घड्याळ- कोंबड्याच्या आकाराचा
    टिकोझी- पर्स- फ्रेम्स- अशा अनेक गोष्टी,करवंटी आणि लाकूड यापासून बनविलेल्या लामणदिवा- मोटारसायकल- पिस्तूल- अशा वस्तू अशा असंख्य कलाकृती प्रदर्शनामध्ये होत्या.
    चित्रविचित्र आकाराचे - खूप जुने आणि नवे- विविध उपयोगाचे पत्ते आणि गंजिफा, विविध मुखवटे, महाराष्ट्रातील सर्व बस सेवेची तिकिटे, नाणी-नोटा- टपाल तिकिटे- प्रथम दिवस आवरणे,सुप्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या आणि हस्ताक्षरे , जुन्या / नव्या काड्यापेट्यांची लेबल्स यांचे संग्रहही खूप छान होते.
    कागद कोरून साकारलेला आयफेल टॉवर- २ x २ इंचाचा कॅरम बोर्ड- २ इंचाचा फ्लॉवरपॉट अशा वस्तू सत्तरी ओलांडलेल्या चंद्रहास पटवर्धन यांनी बनविल्या होत्या. उपनिषदांचा अभ्यास केलेल्या यास्मिन श्रॉफ या ज्येष्ठ पारसी बाई स्वतः: काढलेल्या पक्ष्यांच्या आणि निसर्ग छायाचित्रांवरून " जगात सर्व गोष्टी शक्य आहेत, कधीही निराश होऊ नका, सकारात्मक विचार करा " असा प्रत्येकाशी व्यक्तीश: बोलून संदेश देत होत्या. मालती मेहेंदळे या सर्वात ज्येष्ठ म्हणजे ८१ वर्षांच्या छंद कलाकारांनी बनविलेली सध्या आणि क्रेप कागदाची फुले शब्दश: अचंबित करणारी होती. त्यांनी बनविलेली बकुळ, सोनचाफा, जास्वंद, आंबोली,नागचाफा अशी फुले ही कागदाची आहेत यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी बनविलेल्या कागदाच्या जरबेरा फुलांच्या शेजारी खरी जरबेरा फुले ठेवून मी एक छायाचित्र घेतले. यातील खरे कुठले आणि खोटे कुठले हे ओळखणे कठीण होते.
    छंद जोपासला की वय, जात-धर्म, भाषा असे बांध राहतच नाहीत पण खूप सकारात्मक आणि सृजनशील जीवन जगता येते.
    -- मकरंद करंदीकर.

      March 22, 2017


  • नाही म्हणजे नाही !

    पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा हा सिनेमा . पण आपल्या आयुष्यात एक व्यक्ति म्हणून , एक समाजाचा घटक म्हणून , एकवडील म्हणून , एक मित्र म्हणून , एक मैत्रीण म्हणून , एक समाज - धुरीण म्हणून , एक सहकारी म्हणून कसे वागतो आणि कसे वागले पाहिजे याबाबत एकदम झनझनित अंजन घालणारा असाच हा सिनेमा आहे . एकदम अस्वस्थ करणारा .

    त्यासाठी या सिनेमाच्या निर्मितीशी संबंधीत सर्वांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे . पण निव्वळ अभिनंदन करून आपल्या सगळ्यांच्याच नेहमीच्या सवयीने सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाहीच .

    हा सिनेमा पाहिल्यापासून माझ्या मनात एकच विचार सतत येत आहे कि सभ्यतेच्या साऱ्या गोष्टी आज अशा पध्दतीने परत एकदा तपासून घेण्याची आज वेळ आली आहे . जर आपल्या लेकी- सुनान्बाबत आपण इतके नादान पणे वागणारअसू , तर आपल्यात आणि " लड़के है , जवानी में तो ऐसा एखाद बर्ताव हो जाता है " असं म्हणणारया आपल्या देशातील एका राजकीय नेत्यांत आणि तशा मनोव्रुत्तीच्या इतरांत काय फरक राहिला ?

    असा फरक राहिला पाहीजे आणि तो प्रकर्षाने सतत जाणवत राहिला पाहीजे असं अगदी मनापासून वाटणार्या सर्वानी हा सिनेमा पाहिलाच पाहिजे . आणि त्याचबरोबर या सिनेमातील तीन तरूण मुलिन्वर जो प्रसंग येतो , तसा प्रसंगकोणावरही येणार नाही याचीही व्यवस्था आपण सगळेच मिळून कार्यरत ठेवणे आवश्यक आहे . ( नुसती सुरू करणे नाही ; सुरू ठेवणे अत्यावश्यक . )

    अर्थात असा विचार , असा व्यवहार केवळ या सिनेमातील घटने बाबत नाही तर आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंबाबत करण्याची वेळ आली आहे . आपला देश आर्थिक महासत्ता बनेल किंवा बनणार नाही . पण आर्थिक महासत्ता होणे हाकाही सर्व व्यथा दूर करणारा सार्वकालिक रामबाण उपाय नाही . एकीकडे सांस्कृतिक सम्रुध्धीच्या परंपरेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे एक देश म्हणून Human Development Index मधे जागतिक क्रमवारीत खालच्या पातळीवरअसायचे हे एक देश म्हणून शरमेचीच बाब आहे . अर्थात त्यासाठी फक्त सरकारला दोषी मानने सर्वथैव गैर आहे .

    मग याबाबतीत कसे वागावे लागेल याचे आदर्श उदाहरण म्हणजे " PINK " सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी रंगवलेली दीपक सेहगल ही व्यक्तिरेखा . आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटनांची नोंद कशी घेतली पाहिजे , संबंधितव्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात गैरवाजवी ढवळाढवळ न करता त्यांना कसे सहाय्यकारी झाले पाहिजे , तटस्थता आणि समरसता यात संतुलन कसे राखले पाहीजे , त्याचवेळी असॆ सामाजिक आयुष्य आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलजबाबदार्या यांचा तोल कसा सांभाळत राहीले पाहीजे , कायद्यासमोर दोषी व्यक्तींना उघडे पाडत असतानाच एकंदरीतच प्रचलित पध्दतीत कसे - काय - का बदल झाले पाहिजेत याचे दिशा - दिग्दर्शन करणे ( मग ते या सिनेमा प्रमाणेतिरकस , खोचक , कुचकट पणे ही का असेना ) याचे काळानुसार , प्रसन्गानुरूप , स्थितिसापेक्ष असॆ हे उत्कृष्ट उदाहरण आहे .

    या अर्थाने या सिनेमाच्या शेवटी तीन मुलिन्चा वकील म्हणून खटल्यातील Closing Remarks म्हणून अमिताभ बच्चन यांच्या तोंडी जो संवाद आहे तो फार महत्वाचा आहे . तो संवाद असा " No Means No . No हा केवळ एक शब्दनाहि . नाहीच . ते ऐक संपूर्ण वाक्य आहे . त्याला आणखी वेगळ्या व्याख्येची , माहितीची , स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही . "

    तसे या आशयाचे मुद्दे कायद्याचा अभ्यास करतांना शिकवले जातात . विशेषतः Criminal LAW शिकताना . वाढत्या वैयक्तिक वयात , आयुष्यात त्याचे नानाविध पैलू लक्षात येत राहतात .

    अगदी गुंतवणूक क्षेत्राबाबत ही .

    तसेही या सिनेमाचे नाव " पिंक " आणि गुंतवणूक क्षेत्राविषयी जास्त विस्ताराने देणाऱ्या आर्थिक नियतकालिकांना म्हणतात " पिंक पेपर्स " .

    असो .

    आणि मग तसा विचार करत असताना गुंतवणूक आणि हा सिनेमा यांची सांगड घालणारे काही मुद्दे मनात उमटू , उमलू लागले .

    यातला पहिला पैलू म्हणजे NO MEANS NO हे वाक्य . आपल्या गुंतवणूकीचे तंत्र आणि मंत्र मनात घोटवत असताना आपण मोहाला , लोभाला , पुर्वग्रहाना हे म्हणतो का ? कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या गुंतवणूकीच्यासातत्याला तात्पुरतीही सोडचिठ्ठी देण्यास पुरेशा क्रुतिशील ठामपणे NO MEANS NO म्हणायला शिकणार् ना ?

    यालाही काही वेगळे स्पष्टीकरण देण्याची थोडीही आवश्यकता नाही .

    याचा असाच ऐक पैलू म्हणजे गुंतवणूक ही सदासर्वकाळ सर्वान्चीच गरज असते . महिला आणि अल्पवयीन यान्च्याबाबत तर असतेच असते . हल्लीच्या काळात महिला त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीबाबत ही खबरदारी , जबाबदारी , काळजीस्वतःच घेउ शकतात . जिथे ही परिस्थिती नसेल तिथे ही भूमिका घरातील इतरांनी निष्ठापूर्वक , नेकिने पार पाडली पाहिजे . घरातील अल्पवयीन व्यकिन्बाबत तर ही गोष्ट घडलीच पाहिजे . जिथे हे होत नसेल तिथे हे त्यांच्या परिचितानीस्वयन्स्फुर्तिने केले पाहिजे . निदान त्याची आवश्यकता आणि प्रक्रिया लक्षात आणून तरी दिली पाहिजे . कारण त्याबाबतची माहिती सर्वाना च असतेच असॆ नाही . आणि अगदी असली तरी काहीवेळा परिस्थितीच्या रेटयात ते सुचतेच असॆनाही . जसे या सिनेमात तीन मुलिन्बाबत अमिताभ बच्चन एक वकील म्हणून करतो . हा संदर्भ केवळ ध्वन्यार्थाने नाही तर सर्वार्थाने लक्षात घेतले कि या सिनेमातील एक संवाद ( जी कायदेशीर तरतूद आहे ) आहे कि " Non - Bailable Warrant असले तरी महिला आणि बालकांना bail मिळतो , मिळू शकतो ." मात्र ही प्रक्रिया योग्य तर्हेने आणि वेळीच सुरू करावी लागते . कारण यातूनच त्यांची निर्भरता निर्माण होत असते . हे आर्थिक , भावनिक , सामाजिक आशाअनेक छ्टांनी खरे आहे .

    पिंक हा सिनेमा आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना मला जाणवलेला तिसरा पैलूं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा एक समान संदेश हा आहे कि जर आपण बरोबर असू , निर्दोष असू तर आजूबाजूच्यानी , ज्यांचा तुमच्या परिस्थितीशीएरवी काहीही संबध नाही , केलेल्या टिप्पणीकडे फार लक्ष देण्याची जरासुध्धा आवश्यकता नाहि . त्यामुळे विचलित होण्याची तर बिलकूल गरज नाही . उलट त्यामुळे स्वतःच्या मनाशी स्वतःच्या मताची , तत्वान्ची , आचरणची तपासणी ,उजळणी करून घ्यावी . या सिनेमात ऐक प्रसंग आहे ज्यात अमिताभ बच्चन तापसी पन्नू च्या overcoat चे hood तिच्या डोक्यावरून काढतो . ते दोघं मॉर्निंग वॉक ला गेलेले असतात . ती नेहमीच्या प्रमाणे चालत असते . तिला पाहून "अरे ही तर ती कोर्ट केस वाली " असॆ एक जण म्हणतो . ते ऐकून सिनेमातील मिनल अरोरा ( तापसी पन्नों ) पटकन हुड डोक्यावर घेतें . अमिताभ बच्चन तें पटकन तिच्या डोक्यावरुन काढतात . हे अनेक अर्थांनी महत्वाचे आहे . निर्दोषव्यक्तीचा स्वाभिमान - आत्म सन्मान म्हणून तर ते महत्वाचे आहेच , पण तितकेच ते कार्यपद्धतीचे निर्देशक आहे . सातत्याने केलेली गुंतवणूक विपरीत परिस्थितीत तुमच्यावर छत्र धरते आणि त्यामुळे सामाजिक टीका - टिप्पणी पासूनस्वतःला लपवण्याची वेळ येत नाही .

    या सिनेमात न्यायाधीश महाराजांचे नाव " सत्यजित दत्त " आहे हेही यासंदर्भात काहीवेळा अतिशय सूचक वाटायला लागते .

    पिंक हा सिनेमा पाहताना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या सिनेमात अन्द्रिया या भूमिकेतून तिने केलेले एक वक्तव्य . ती कोर्टात सांगते कि " पुर्वान्चल ( North - East ) मधील मुलींबद्दल निष्कारण वेगळ्या आणि वाईट नजरेनेपाहिले जाते . " गेल्या काही काळात दिल्लीत त्यांच्या बाबत ज्या घटना घडत आहेत त्या हीच गोष्ट सिध्द करत आहेत . काही वर्षांपूर्वी आलेल्या शाहरुखखानच्या " चक दे इंडिया " मधे हॉटेल मधे घडणाऱ्या प्रसंगातही याची झलक होतीचकी ! अशा मुळे त्या निरागस व्यक्तींच्या मनात आपण काय प्रतिमा निर्माण करत असतो ! गेली सहा वर्षे ऑफीस टूर मुळे माझे अनेकदा पुर्वान्चल मधे जाणे होत असते . तेन्व्हाही हे मला प्रकर्षाने जाणवत असते . त्या सात राज्यांच्यावाढत्या विकासाचा भार प्रामुख्याने तिथल्या महिला वाहात असतात हे प्रत्येकाने सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे . मोजक्याच उठवळ , उच्रुन्खल , नादान , हलकट माणसांमुळे संपूर्ण सज्जन सरळमार्गी समाजाला वेठीस धरण कधीचयोग्य नाहि . हा केवळ त्या भूभागातील मुलींना भेडसावत असलेला प्रश्न नाही . हा आपल्या संपूर्ण देशाच्या चारित्र्याचा प्रश्न आहे . विदेशी पर्यटकांना येणारा काहीवेळा अनुभव हा याच मालिकेतील कडी आहे . याला पायबन्द जसाकायद्याने बसेल , तसाच आणि तितकाच आपल्या सगळ्यांच्याच सततच्या सतर्कतेतून बसेल . अशीच संवेदनशीलता काश्मिर बाबतही हवी हे ओघानेच आले .

    हा प्रश्न जसा सामाजिक आहे आणि असतो ; तसाच आणि तितकाच आर्थिक , राजकीय ही असतो हे लक्षात घेतले कि त्याची आपल्या गुंतवणूकीच्या धोरणाबाबतीत असणारी समर्पकता वेगळी सांगण्याची आवश्यकता उरत नाही .

    अशा अनेक अर्थांनी , अनेक क्षेत्रात , अनेकदा . . . .

    No MEANS No .

    -- चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-Mail . . . tilakc@nsdl.co.in

    २३ सप्टेंबर २०१६

    ( गुंतवणूक तुमची माझी ; भाग तेरावा )

      September 30, 2016


  • भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

    २५ एप्रिल १९८२ रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात झाली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !

      April 27, 2021


  • वात दोषाचे पथ्यापथ्य

    असं म्हणतात, वाताला मित्राप्रमाणे जिंकावे, पित्ताला जावयाप्रमाणे सांभाळावे आणि कफाला शत्रूप्रमाणे वागवावे.

    वाताच्या पथ्यामधे सर्वात महत्वाचा आहारीय पदार्थ म्हणजे तेल.
    आपण ज्या प्रदेशात रहातो, त्या प्रदेशातील तेलबियांपासून घाण्यावर काढलेले तेल, अनरिफाईंड तेल कच्च्या स्वरूपात जेवणात घेणे म्हणजे वाताची अर्धी चिकित्सा आहे.

    हे तेल प्रदेशानुसार ठरवावे. जसे कोकणात खोबरेल तेल, घाटावर शेंगतेल, युपी मधे सरसोंका तेल, पण प्रदेश बदलून घेतलेले तेल पचायला जड होते.

    अंगाला तेल लावले की, त्याला बाह्य स्नेहन, अभ्यंग म्हणतात.
    आणि जेवणात वापरायचे ठरवले की ते होते, आभ्यंतर स्नेहन.

    स्नेह म्हणजे तेल.
    जेवणात आणि जीवनात हे कमी झालंय म्हणून रूक्षपणा, कोरडेपणा वाढलाय.

    त्याला उतारा?

    आतून बाहेरून स्नेहन. स्वेदन.
    वात प्रकृतीच्या रुग्णांनी तेल तूप खाल्ले तरी कोलेस्टरॉल वाढत नाही. वाढणार नाही.
    असे तेल कच्च्या स्वरूपात वापरत असताना वर गरम पाणी प्यावे. म्हणजे तेल पचायला सोपे जाते.

    तेल वेगवेगळ्या प्रकारे का होईना, पण ते पोटात जावे यासाठी ग्रंथात तब्बल चौवीस प्रकार वर्णन केले आहेत. एवढे त्याचे महत्व लक्षात घ्यावे.

    आताच्या माॅड मेडीकल नुसार तेल, तूप, नारळ, शेंगदाणे म्हणजे आरोग्याचे मोठे शत्रू.

    काय दिवस फिरवले गेले आहेत पहा, जे उत्तम आहे ते जीवनातून आणि जेवणातून काढून टाकले आणि नको ती विषारी औषधे मरेपर्यंत घ्यायची सवय लावली.

    नेहेमी नैसर्गिकरीत्या, आपोआप मलप्रवृत्ती साफ राहील यावर नीट लक्ष ठेवावे. नाहीतर परत वात वाढतो. कोणत्याही रेचक औषधांशिवाय ! पण जर काही चुकीच्या पथ्याने, विशेषतः जेवणातील तेलाचे प्रमाण कमी पडल्याने, वाताच्या आजारात, उतारवयाचा विचार करून, एखादे मृदु विरेचक औषध घ्यावे लागले तर घ्यावे.

    "काय म्हणताय ?
    संडासचे औषध रोज घ्यायचे ? अहो पण आमचे ते डाॅक्टर म्हणतात, संडासचं औषध घेऊच नये, त्याची सवय लागते म्हणे !"

    "त्यांना सांगावं, म्हणावं, संडास साफ होणारं एखादे औषध निसर्गोपचार सल्ल्याने घेतल्यानंतर, आयुष्यभराची औषधं जर बंद होणार असतील तर काऽही बिघडत नाही.

    हं, अश्या साध्या उपायांनी जर वात शांत झाला तर, हाॅस्पीटलची बिल मात्र कमी होतील, ( त्यामुळे डाॅक्टरांचं पित्त वाढेल ) हे मात्र नक्की !

    -- गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ज्ञ
    9820584716

      May 17, 2017