(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रभो नाम तुझे मल्हारी

    प्रभो नाम तुझे । मल्हारी । भत्त*ांचा कैवारी ।
    राणी म्हाळसा । सुंदरी । शोभे सूर्याप्ररी । प्रभो नाम तुझे ।।धृ।।
    पहिले ठाणक हे । मूळ महिलार । भत्त*ांचे माहेर ।
    खंडेराव रूद्राचा । अवतार । होतो जय जयकार ।।
    अंगणी नाचती । अवधारा । उधळुनीया भंडारा ।।
    प्रभो नाम तुझे ।।धृ।।
    दुसरे ठाणक हे । पालीत । पहा मनुजा ख्यालीत ।
    पालीत पाहुनीया । देवराव । श्री मार्तंड भैरव ।।
    घालीत नगाऱ्या । वर घाव । विघ्ना सुटला धाव ।।2।।
    प्रभो नाम तुझे ।।धृ।।
    तिसरे ठाणक हे । बाळ्यांत । सदरच्या किल्ल्यात ।
    मुल देव बसले । खुशभत्त* । गड जेजुरीला जात ।।
    माथा वन्दीले । चरण । भवजलधी तारण ।।3।।
    प्रभो नाम तुझे ।।धृ।।
    चौथे ठाणक हे सातारा । शेगुडी देव पाहता ।
    आनन्दले चित्ता । अवचिता । हरली माझी चिता ।।
    प्रभु म्या देखियला । अवधारा । हरपले असे धारा ।।4।।
    प्रभो नाम तुझे ।।धृ।।
    पाचवे ठाणक हे । जेजुरी । नवखण्ड मेदिनी ।
    परतुन आणीली । धनंगिरी । बाणु उजव्याकरी ।।
    राणी म्हाळसे । हे माते । पसन्न हो भत्त*ाते ।।5।।
    प्रभो नाम तुझे ।।धृ।।

    गायक - श्री. नितिन श्री.

      October 15, 2015


  • पुण्यातील भरत नाट्यमंदिराचा वर्धापन दिन

    ‘भरत नाट्य मंदिर’ या सर्वांची पंढरी आहे. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडकपासून ते राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत विविध स्पर्धा याच ठिकाणी होतात.

      October 15, 2021


  • टिळक सुटले १६ जून आनंदाचा क्षण

    १६ ता. रात्री ती गाडी पुणे स्टेशनापर्यंत न नेता अलिकडेच हडपसरला थांबली . चिटपाखरूही नसलेल्या त्या स्टेशनातून टिळकांना बंद चारचाकीमधे बसवले व पुण्याकडे रवाना केले. तरीदेखील आपल्याला येरवड्यात पाठवतील असे टिळकांना वाटत होते पण गाडी उजव्या हाताला बंडगार्डनच्या पुलाकडे न वळता शहराच्या दिशेने जाऊ लागल्यावर आपली नक्की सुटका झाली याची त्यांना खात्री पटली. गाडी गायकवाडवाड्यापाशी आल्यावर सामानासकट त्यांना उतरवले व धुरळा उडवत गाडी निघुन गेली.

      June 16, 2022


  • आयटी विश्व मराठीतलं – 1990 ते 2024

    आपलं प्रत्येकाचं लहानपणी एक स्वप्न असतं. मला व्हायचं होतं आर्किटेक्ट. शाळेत असताना अक्षर छान होतं. ड्रॉइंग चांगलं होतं. आणि सृजनशील निर्मितीची आवड होती. त्यामुळे तेव्हापासूनच काहीतरी नवं नवं बनवायचं याची ओढ होती. पण कदाचित विधिलिखीत वेगळेच होते त्यामुळे इंजिनीअरिंगला गेलो आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअर म्हणून बाहेर पडलो.
    संगणक क्षेत्राशी संबंध अपघातानेच आला.

      November 3, 2024


  • महापालिका आणि प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का?

    मुंबईत जागांचे भाव एवढे कडाडले आहेत आणि त्यावर पालिकेचा ना प्रशासनाचे नियंत्रण आहे ! एखादी वन-रूम किचन किंवा वन-बीएचके जागा घ्यायची म्हंटले तरी सहज ७० ते ८० लाख रुपये मोजावे लागतात आणि ते सुद्धा जुन्या बिल्डींग मध्ये.

      October 5, 2015


  • द्विपाद पूर्वज

    आजचा माणूस सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दोन पायांवर चालू शकत होता. पण तेव्हा माणूस हाच फक्त काही द्विपाद प्राणी नव्हता. माणूस जन्माला येण्याच्या सुमारे एक लाख वर्षं अगोदर जन्माला आलेल्या निअँडरटालसारखे, माणसाचे इतर भाऊबंदसुद्धा दोन पायांवर चालू शकत होते. इतकंच काय, पण त्या अगोदर चाळीस लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकससारख्या मानवपूर्व प्रजातीही द्विपाद होत्या. माणसाच्या पूर्वजांचं हे ‘दोन पायांवर चालणं’, हा मानवी उत्क्रांतीतला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळेच उत्क्रांतीशास्त्रात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे – ‘सर्वात प्रथम दोन पायांवर चालणारा माणसाचा पूर्वज कोणता?’. अलीकडेच केल्या गेलेल्या एक नव्या संशोधनानं याबद्दलच्या माहितीत भर टाकली आहे. फ्रान्समधील प्वाट्ये विद्यापीठातील फ्रँक गाय आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केलेलं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

      November 22, 2022


  • लठ्ठपणा

    साधारणतः लठ्ठपणा व गोड यांचा छत्तिसाचा आकडा असतो, मात्र याला अपवाद असतो मधाचा. मध गोड असला तरी कफ-मेदावर अप्रतिम काम करतो.
    सकाळी उठल्यावर पाण्यासह मध घेतल्याने (साधारणतः कपभर पाण्यात एक चमचा मध) लठ्ठपणा कमी होतो.
    फक्‍त मध शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेला व मधमाशांनी तयार केलेला असण्याची खात्री असायला हवी.
    खडीसाखर सुद्धा लठ्ठपणामध्ये खाता येते. गोड मिठाया बंद केल्या तरी थोड्या प्रमाणात दुधाबरोबर आहारात खडीसाखर घेण्याने कफ-मेद वाढत नाहीत.
    वजन वाढले की भात खाणे सहसा बंद केले जाते. मात्र देशी वाणाचे, साठेसाळी, रक्‍तसाळी, जिरगा, काळी गजरी वगैरे तांदूळ पचायला सोपे असतात, त्यातही जर शिजविण्यापूर्वी ते थोड्या तुपावर परतून घेतले व कुकरऐवजी भांड्यामध्ये शिजवले, तर ते कफ-मेद वाढवत नाहीत.
    रोज सकाळी तांदळाचा मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्‍ती कृश होते.

    "उकळलेले गरम पाणी‘ हासुद्धा वजन कमी करण्यासाठी सोपा; पण प्रभावी उपाय होय. एकंदर आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जे पाणी उकळून घ्यायचे ते साधारणतः 15-20 मिनिटांसाठी उकळणे अपेक्षित असते. आयुर्वेदातील शारंगधर संहितेत उष्णोदक म्हणजे पाणी उकळण्याची विशेष पद्धत दिलेली आहे.
    अष्टमेनांशशेषेण चतुर्थेनार्धकेन वा ।
    अथवा क्वथनेनैव सिद्धमुष्णोदकं वदेत्‌ ।।
    श्‍लेष्मामवातमेदोघ्नं बस्तिशोधनदीपनम्‌ ।
    कासश्‍वासज्वरहरं पीतमुष्मोदकं निशि ।।...शांरगधरसंहिता

    अगोदर गाळून घेतलेले स्वच्छ पाणी पातेल्यात ठेवून अष्टमांश, चतुर्थांश किंवा अर्धे शिल्लक राहीपर्यंत अग्नीवर उकळावे व गरम असतानाच प्यायला द्यावे. हा पाण्याचा काढा वात व कफदोष शमवतो, अवाजवी वाढलेला मेद कमी करतो, लघवी साफ होण्यास मदत करतो, अग्निदीपन करतो, खोकला, दमा व तापामध्ये हितकारक असतो. ताप आलेला असताना तसेच जुलाब होत असतानाही या प्रकारचे पाणी पिण्याचा औषधाप्रमाणे उपयोग होतो.
    लठ्ठपणामध्ये मिठावर सुद्धा निर्बंध येतात. अति प्रमाणात मीठ कोणासाठीच चांगले नाही, पण अजिबात मीठ बंद करून वरून मीठ घेणे किंवा कच्चे मीठ खाणे टाळणे चांगले. मात्र अन्न शिजवताना चवीपुरते सैंधव वापरण्यास हरकत नाही. याखेरीज आयुर्वेदिक अन्नयोग संकल्पनेवर आधारित पुढील काही नियम लठ्ठपणा कमी करण्यासाठी लक्षात घ्यावे लागतील.

    अध्यशन न करणे - एकदा खाल्ले की ते अन्न पचण्यापूर्वी पुन्हा काहीही न खाणे. दोन खाण्यांमध्ये किमान 3-4 तासांचे अंतर असणे अपेक्षित होय.अहिताशन न करणे - स्वतःच्या प्रकृतीला अहितकर ते अहिताशन होय. स्थूल व्यक्‍तींनी प्रकृतीचे व कफ-मेदाचे भान ठेवून सुरवातीला सुचविलेल्या पथ्यकर गोष्टी सेवन करणेच आवश्‍यक.मात्रानिश्‍चिती - प्रत्येकाने अन्नाची मात्रा अग्नीच्या पचनसामर्थ्याच्या सापेक्षतेने ठरवायची असते.त्यामुळे लठ्ठपणातही पथ्यकर आहार, फार कमी नाही व फार जास्ती नाही अशा योग्य प्रमाणात सेवन करणे श्रेयस्कर असते. त्यातही द्रवपदार्थांवर भर दिला उदा., सकाळी फक्‍त भाताची पेज, रात्री फक्‍त सूप तर वजन कमी होण्यास निश्‍चित हातभार लागतो.अनाठायी डायट करून उपासमार करून घेण्याऐवजी या प्रकारे आहाराचे नीट नियोजन, आचरण, व्यायाम, औषधोपचार यांची सुयोग्य जोड दिली तर लठ्ठपणाची भीती राहणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    9422301733

      January 6, 2017


  • जानेवारी ०६ : कपिल देव निखंज

    भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू

      January 6, 2011


  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – २

    प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं रक्तांगुलीय-लसदंगुलि-पल्लवाढ्याम्‌।माणिक्य-हेम-वलयांगद-शोभमानां पुण्ड्रेक्षु-चाप-कुसुमैषु-सृणीर्दधानाम्‌॥२॥

    आई ललितांबेच्या मुखकमलाचे स्मरण केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्य श्री आई जगदंबेच्या हस्त कमलाचे वैभव विषद करीत आहेत. ते म्हणतात,

    प्रातर्भजामि- मी सकाळी आराधना करतो, स्मरण करतो. ललिताभुजकल्पवल्लीं- आई ललितांबेच्या हाताचे. जे कल्पवल्ली प्रमाणे आहेत. अर्थात एकदा हा हात मस्तकावर असला की काय वाटेल ते प्राप्त होते. मनात येताच हवे ते मिळते.

    रक्तांगुलीय- लाल रंगाच्या अंगठ्या,

    लसद्- त्याने चकाकणारी,

    पल्लवाढ्याम्‌- जणू पालवी प्रमाणे अत्यंत सुंदर असणारी.

    अंगुली- बोटे.

    आई जगदंबेच्या हातातील बोटात लाल रंगाच्या अंगठ्या शोभून दिसतात. लाल सर्वाधिक हा आकर्षक रंग आहे. त्यामुळे अत्यंत आकर्षक अंगठ्या असाही अर्थ होतो.
    आईचा हात गोरापान असल्यामुळे त्यावर लाल रंग सुंदर दिसतो त्यामुळे लाल रंगाच्या, असाही अर्थ होतो.

    माणिक्य- माणिक नावाच्या लालबुंद रत्नांपासून बनविलेले,

    हेमवलय- सोन्याची कंकणे,

    अंगद- बाजूबंद, वाकी इत्यादी हातातील अलंकार.

    शोभमानां- या सगळ्यांनी आईचे हात शोभून दिसत आहेत. आई ललितेचे स्वरूप चतुर्भुज असते. या चार हातांमध्ये,

    पुण्ड्रेक्षु- लाल रंगाचा ऊस.

    चाप- धनुष्य

    कुसुमैषु- इषु म्हणजे बाण. फुलांचे बाण.

    सृणी:- अंकुश.

    दधानाम्‌- धारण करणाऱ्या, या हातांचे मी स्मरण करतो.

    आईला चार हात आहेत. अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ आईच्या हातात आहेत.
    यात रसपूर्ण फल देणारा ऊस धर्माचे, पराक्रमाची माध्यम असणारे धनुष्य अर्थाचे, फुलांचे बाण हे कामाचे तर आत्म नियमनकारी अंकुश हे मोक्षाचे प्रतीक आहे.
    या चारही गोष्टी आईच्या हातात आहेत.

    आपल्या भक्तांना हे सर्व देते म्हणून त्या हातांचे स्मरण.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 29, 2020


  • उदंड जाहली वाहने!

    भारतात झपाट्याने विस्तार पावणाऱ्या उद्योग क्षेत्रांमध्ये मोटार उद्योग आणि दूरसंचार क्षेत्रातील उद्योगांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. अगदी पन्नास वर्षांपूर्वी जो समाज स्वत:ची सायकल बाळगणाऱ्याला श्रीमंत लेखित असे त्याच समाजात आता स्वत:ची कार असणे एक सामान्य बाब झाली आहे. चार चाकी गाडी हे आता श्रीमंतीचे लक्षण राहिलेले नाही.

      February 1, 2009