वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

इजिप्तमधल्या पुरातन राजवटींतील प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक व्यक्तींचे अवशेष आज ममींच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या ममींचं पूर्ण शरीर उपलब्ध असलं तरी, ते कुजू नयेत म्हणून ममीत रूपांतर करताना, त्यांच्या शरीरातील पाणी काढून टाकलं जायचं. परिणामी या सगळ्या ममी अत्यंत शुष्क स्वरूपात आढळतात. या शुष्क स्वरूपावरून त्यांच्या मूळ चेहऱ्याची कल्पना येणं, हे जवळपास अशक्य आहे.
January 1, 2022
हल्ली पुरस्कारांचा महापूर आला आहे.गल्ली ते दिल्ली त्याचा सुकाळ आहे. देणारे आणि घेणारे त्यासाठी उतावीळ आहेत. बालवाडी पासून त्याची सुरुवात होते.आमच्या बंड्या भाषणात पहिला आला आहे.नाव न सांगता येणारा बंड्या स्वातंत्र्य याविषयावर बक्षिस मिळवतो.
January 14, 2024
अभ्रक हे महारस समूहातील पहिले खनिज असून, त्याचा उपयोग औषधी हेतूंसाठी भस्म स्वरूपात केला जातो . आचार्य वाग्भट्ट यांनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अर्श रोगावरील उपचारांमध्ये अभ्रकाचा प्रथम उल्लेख केला होता. त्याचे लॅटिन नाव “मायका” (Mica) आहे आणि इंग्रजीमध्ये हे खनिज “ग्लिमर” (Glimmer) या नावाने ओळखले जाते.
June 3, 2026
बीट हेसुद्धा पोषक कंदमूळ आहे. एक अत्यंत औषधी तसेच सर्वांना अगदी मनापासून आवडणारे फळ म्हणजे बीट. वास्तविक बीटरूट हा सेंट्रल अमेरिका येथून झाला.
December 2, 2023
कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमा शङ्करीकौमारी निगमार्थगोचरकरी ओङ्कारबीजाक्षरी ।
मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥
कैलासाचलकन्दरालयकरी- अचल म्हणजे पर्वत. तो कधीही चल म्हणजे हालचाल करत नाही. कैलासाचल म्हणजे कैलास नावाचा पर्वत. कंदर म्हणजे गुहा. आलय म्हणजे निवास. अर्थात कैलास पर्वतावरील गुहांमध्ये जी निवास करते तिला कैलासाचलकन्दरालयकरी असे म्हणतात.
गौरी- रंगाने गोरी असणारी.
उमा- कालिका पुराणांत उमा शब्दाचा एक सुंदर अर्थ दिला आहे. देवी पार्वती भगवान शंकराचे घोर तप करत असताना हिमालयाची पत्नी मैनावती आपल्या मुलीच्या त्रासाला पाहून तिला उ म्हणजे हे आणि मा म्हणजे नको. अर्थात एवढे कष्ट घेऊ नको असे म्हणाली. त्यावरून देवी पार्वतीचे नाव उमा असे पडले. वेगळ्या शब्दात ध्येय प्राप्त होईपर्यंत अविचल असणारी.
शङ्करी- शं म्हणजे कल्याण करणारी. शंकरांची सहधर्मचारिणी म्हणून तिला शांकरी असे पण म्हणतात.
कौमारी- कुमार अवस्थेत असलेली अर्थात अत्यंत पवित्र.
निगमार्थगोचरकरी- निगम म्हणजे वेद. त्यांचा अर्थ गोचर म्हणजे प्रकट करणारी. ओङ्कारबीजाक्षरी- ओंकार हेच जिचे बीजाक्षर आहे ती ओङ्कारबीजाक्षरी.
मोक्षद्वारकपाटपाटनकरी- मोक्षाच्या द्वाराचे कपाट अर्थात दाराचे पल्ले उघडून मोक्षाचा मार्ग मुक्त करणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचे अधिष्ठान असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान वैराग्य स्वरूपाची भिक्षा प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 1, 2020
खायची पानं व एरंडेल तेल
मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता वेदना त्वरीत दूर करण्यास मदत करतात. (एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय)
हे मिश्रण कसे बनवावे?
तव्यावर आवश्यकतेनुसार(काही थेंब) एरंडेल तेल गरम करावे. त्यावर खायची पानं पसरून दाबावीत. थोडी चॉकलेटी रंगाची झाल्यानंतर गॅस बंद करावा.पानं थोडी थंड झाल्यावर या पानांनी डोक्याच्या दुखर्यास भागावर शेक द्यावा. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थोडे गरम असतानाच या पानाने डोक्याला शेक द्यावा.
बडिशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आर्यन आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा भरणा असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास बडिशेप फायदेशीर ठरते.
वरील उपाय आपल्या डॉक्टरांना विचारून करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 14, 2016
इंदिरा गांधी यांनी २५ जून रोजी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला ४२ वर्षे होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड तमोयुग म्हणून ओळखला जातो. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले.
June 27, 2017
बदलती जीवनशैली, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, पैसा, मध्यमवर्गीयांच्या हातात खुळखुळणारा फिरण्यासाठी सहज उपलब्ध असलेली वाहतुकीची विविध साधने आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विविध पर्यटन कंपन्या यामुळे आता भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही पर्यटन स्थळांचे सर्वसामान्यांना आता विशेष अप्रूप राहिलेले नाही.
April 27, 2023
1) बाल गणेश ( गणपती ) —
सोनेरी रंगसंगतीचा हा श्री गणेश बालका समान आहे. हातात के ळ , आंबा , उस आणि फणस आहे .ही सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.
September 4, 2014
भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. दिवाळीचा आणि फटाक्यांच्या तसं बघता काही जवळचा संबंध नाही. तरीही काही काळापासून दिवाळीत फटाके उडवले जातात फोडले जातात. बर दिवाळीतच फोडले जातात म्हंटल तर तसंही नाही कुठल्याही आनंदाच्या क्षणी फटाके फोडून तो साजरा केला जातो पण त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आनंदाच्या भरात आपल्या लक्षात येत नाही.
October 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti