वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कृष्णावळ - अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द आजकाल कोणीही वापरत नाही.
कृष्णावळ चा अर्थ कांदा ! कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे.
कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात, म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.
कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.
आणि कांदा पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.
May 4, 2016
कोकणातील एक सर्वांत चांगले थंडपेव म्हणजे कोकम सरबत. ते आता शहरातही लोकप्रिय झाले आहे. कोकाकोला किंवा इतर शीतपेयांमध्ये शरीराला फार हानी होते तशी कोकम सरबतामुळे होत नाही.
November 7, 2023
…ग्राऊन्ड्समन ‘बॉसर’ मार्टिन मात्र नाराज होता – त्याची इच्छा इंग्लंडने किमान 1,000 धावा कराव्यात अशी होती.
August 22, 2010
भजाया जनी पाहता राम येकु | करी बाण येकु मुखी शब्द येकु |
क्रिया पाहता उेरे सर्व लोकू | धरा जानकीनायकाचा विवेकु ||131||
विचारूनि बोले विवंचूनि चाले | तयाचेनि संतत्प तेही निवाले |
बरे शोधिल्याविण बोलो नको हो | जनी चालणे शुे नेमस्त राहो ||132||
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी | जेणे मानसीं स्थापिले निश्चयासीं |
तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे | तया भाषणें नष्ट संदेह मोडे ||133||
नसे गर्व आंगी सदा वीतरागी | क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी |
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा | इंही लक्षणी जाणिजे योगिराणा ||134||
धरी रे मना संगती सज्जनाची | जेणे वृति हे पालटे दुर्जनाची |
बळे भाव सद्बुेि सन्मार्ग लागे | महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ||135||
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे | भयातीत ते संत आनंत पाहे |
जया पाहता द्वैत कांही दिसेना | भय मानसी सर्वथाही असेना ||136||
जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले | परी जीव अज्ञान तैसेचि ठेले |
देहेबुेिचे कर्म खोटे टळेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||137||
भ्रमे नाडळे वित ते गुफ्त जाले | जिवा जन्मदारिद ठाकूनि आले |
देहेबुेिचा निश्र्चयो ज्या टल्íना | ठ्ठजुने ठेवणे मीपणे आकळेना ||138||
पुढे पाहता सर्वही केंदलेसे | अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे |
अभावे कदा पुण्य गांठी पडेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||139||
जयाचे तया चूकले प्राफ्त नाही | गुणे गोविले जाहले दुःख देही |
गुणावेगळी वृति तेही वळेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||140||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 16, 2016
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते.
August 29, 2018
हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती . १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसर्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
January 14, 2019
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची ४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या “इंडियन पॅनोरमा” विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.
November 12, 2021
भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना
September 3, 2010
पाण्याचा सारांश
पाणी पिताना तहान लागेल तेव्हाच प्यावे.
तहान असेल तेवढेच प्यावे.
तांब्या पितळीच्या कल्हई केलेल्या पातेल्यातील प्यावे, नाहीतर मातीचे मडके उत्तम.
काच किंवा स्टील हे सुद्धा चांगले पर्याय आहेत, पण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी ? कभी नही. विष आहे ते. आज दुधही प्लॅस्टिकच्या पिशवीतच मिळते. प्रत्येक वेळी हे प्लॅस्टीक फूड ग्रेडचे असेल, यावर माझा तरी विश्वास नाही.
सकाळी उठल्यावर गरज असल्यास फक्त आठ घोट पाणीच प्यावे, ते सुद्धा तोंड धुवुन, दात घासून झाल्यावरच ! त्याअगोदर नाही.
पाणी जेवता जेवताच प्यावे. सकाळी तहान नसताना, रात्री झोपताना, कधीही अधेमधे उगाच बाटली दिसली की, रात्री जर लघवी करून आले तरी पाणी शक्यतो नकोच.
पाणी जेवताना जरूर प्यावे आणि जेवणानंतर पचन पूर्ण झाल्यावर, दोन तासांनी शरीराने मागितले तरच. नाहीतर फक्त एखादा कप भर. मिक्सरचे काम झाल्यावर मिक्सर कसा धुवुन ठेवला जातो, तसं.
पावसाचे पाणी जमिनीला लागायच्या अगोदर साठवले तर शुद्धीकरण नको. नाहीतर शुद्ध केल्याशिवाय अजिबात नको.
अति पाणी अतिरिक्त पिल्याने मधुमेह, मुतखडे, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमा, अॅलर्जी, कफाचे सर्व आजार, जलोदर, संधीवात, सूज येणे, पीसीओडी, थायराॅईड, सारखे आजार तसेच वाताची दुखणी वाढतात. रक्तदाबासारख्या आजारात जर शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढणे, ही चिकित्सा असेल तर वरून पाणी का ढोसावे ?
अजीर्ण, अपचन सारख्या आजारात अन्य काही न खाता, केवळ गरम गरम पाणी पिणे हे औषध आहे.
प्रदेशानुसार पाणी आपले गुणधर्म बदलते.
तहान लागली तर पाणी जरूर प्यावे. पण तहान हा रोग असेल तर मात्र साधे पाणी हे औषध नाही. त्यासाठी काही औषधे घालून मसाला पाणी घोट घोट घ्यावे.
सूर्यास्त झाल्यावर पाणी पचनशक्ती बिघडवते, म्हणून रात्रौचे जेवण देखील सायंकाळीच करावे.
संडास साफ होण्यासाठी पाणी पिणे भ्रामक आहे. पाणी संडासवाटे बाहेर पडतच नाही, ते लघवीवाटे बाहेर पडते. म्हणजे पुनः किडनीना गरज नसताना अतिरिक्त काम.
मग संडास साफ कसा होणार ? त्यासाठी जेवताना तेल कच्च्या स्वरूपात वापरावे, आणि जेवताना गरम पाणी वापरावे. बात खतम.
ग्रीष्म आणि शरद ऋतु सोडून निरोगी माणसाने देखील पाणी कमीच प्यावे.
पाणी तोंडात घोट घोट घेऊन, घोळवून मगच हे लाळमिश्रीत पाणी प्यायले तर पचन सुधारेल.
फ्रिजमधले पाणी. ना रे बाबा ना !
आपण उजव्या हाताने जेवतो, पानातील उजव्या बाजुचे पदार्थ भरपूर खावेत, पण डाव्या बाजुचे पदार्थ कमी खावेत. म्हणून भारतीय परंपरेत पाण्याचे भांडे डाव्या बाजुला ठेवतात.
सर्वात महत्वाचे आपण भारतात राहातो, भारतातील सर्व नियमांनी आपण बांधलेलो आहोत. उगाच पाश्चात्यांनी सांगितले म्हणून आपण तसेच वागायचे, हा गुलामीचा भ्रामक मूर्खपणा आता बंद करूया,
भारतीय आहोत, भारतीय म्हणून जगुया.
पाणी हे जसे जीवन देणारे आहे, तसे आलेला जलप्रलय जीवन उद्ध्वस्त करून जातो, हे पण लक्षात ठेवूया !
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.01.2017
January 16, 2017
सत्तावीस नक्षत्रांच्या मालिकेत पाचव्या क्रमांकावर हे नक्षत्र येते. राशींचा विचार केल्यास वृषभ आणि मिथुन राशींच्या व्यक्तींचा जन्माच्या वेळी, पहिल्या २ चरणासाठीवृषभ आणि नंतरच्या दोन चरणांसाठी मिथुन राशी आहे. कष्ट आणि शृंगार वा मौजमजा करणाऱ्या अशा दोन स्वभावाचे व्यक्तींचा राशींसाठी मृग नक्षत्राची योजना आहे. शीतरंग म्हणजे निळा, जांभळा, हिरवा, हिरवट जांभळा, पिवळट हिरवा, पोपटी या रंगांचा सकारात्मक प्रभाव या नक्षत्रावर पडतो. या नक्षत्रावरच पावसाचा जोर अधिक असतो. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीवर जलतत्वाचाच प्रभाव अधिक असतो.
December 23, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti