वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एक तरुण लहानपणापासून मातीशी खेळण्यात मश्गुल असायचा. तो संवेदनशील, रागीट पण हुशार होता. काम करताना उपमर्द झाला तर तो तात्काळ प्रतिक्रिया द्यायचा आणि इतरांना अशावेळी हातभर दूर ठेवायचा. एके दिवशी संतप्त होऊन आणि चेहेऱ्यावर स्पष्ट दिसेल असा ताण घेऊन तो त्याच्या मित्राकडे गेला- कारण होतं वरिष्ठांचे त्याच्याशी असंवेदनशील वागणे ! हा मित्र त्याचा प्रशिक्षक होता.
November 14, 2022
जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.
तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.
कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’
त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’
त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.
मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’
आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
आता कबीरजी चकित झाले होते.
सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.
कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’
जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.
कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.
जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’
कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.
एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.
-- WhatsApp वरुन
July 8, 2017
फळे हि मानवी जीवनाला लाभलेले ‘वरदान’ आहे. ‘फलाहार’ हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वांनी बाळगावी.
June 4, 2019
देशाच्या सुरक्षेचा दर्जा वाढवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केले जाईल. स्वतंत्र भारताच्या सुरक्षेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल, हवाईदल ही तीन कटिबद्ध आहेत. ही तीनही दले आपापल्या पद्धतीने काम करतात. परंतू बाह्य सुरक्षेची आव्हाने इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहेत त्यामुळे संरक्षण दलाच्या तीनही दलांनी एकत्र काम करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही.
September 3, 2019
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदुंवर अत्याचार केले जात आहेत. इम्रान खान यांच्या पक्षातील एक माजी आमदार बलदेव कुमार यांनी भारतात आश्रय मागितला आहे. भारताने बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि आझाद काश्मीर प्रांतातिल मानवधिकाराचा मुद्दा सातत्याने आंतरराष्ट्रिय स्तरावर उठवत राहावा.त्यांना नैतिक/मानसिक समर्थन देत राहावे. आता पाकव्याप्त काश्मीरवरूनही भारताला आक्रमक धोरण अवलंबावे लागेल. पाकिस्तान दहशतवादाला कशा रितीने पोसतो, हे सगळ्यांना कळले पाहिजे. माहिती युध्दाचा वापर करुन हा चेहरा जगासमोर येणे काळाची गरज आहे.
October 28, 2019
रुग्ण सेवेसाठी परिचारिका ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे .रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कितीही अडचणी, समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रूग्णांची सेवा, त्यांची सुश्रूषा करणे हेच आमचे अद्य कर्तव्य असल्याची भावना अनेक परिचारिकांची असते. १२ मे रोजी जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइंटिगेल यांची जयंती असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन याच दिवशी साजरा होतो.
मॉडर्न नर्सिगची सुरुवात आणि जडणघडण इस्पितळांच्या चौकटीतच झाली आहे. नव्या जमान्यात समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. लोकांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता आणि वैयक्तिक देखभाल याचा विचार केला तर नर्सिग हा सर्वात मोठा समूह आहे. रुग्णाने लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन चांगल्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल करावी, हा सुश्रुषेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. जगभरातील परिचारिका रुग्णांची देखभाल करताना याच उद्देशाने रुग्णांची दैनंदिन सुश्रुषा करत असतात.
रुग्ण, परिवार आणि समाजाला दैनंदिन जीवनात आनंद लाभावा, त्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना रुग्णस्थितीतून बाहेर पडता यावे, यासाठी सृजनात्मक आणि नव नव्या उपायांचा परिचारिका प्रयोग करत असतात. अशा बदलांना मूर्त स्वरुप देताना परिचारिका आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रातील रुग्णांची सेवा करताना परिचारिकेला ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावी वृत्तीची जोड अनिवार्य आहे. बेसिक बी.एस्सी. नर्सिग कार्यक्रमांतर्गत अनेक संस्था परिचारिकांना ज्ञान, कौशल्य, सेवावृत्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे. नर्सिग हा सेवाभावी तसेच आरोग्य आणि लोकांच्या आरोग्यप्रती स्वत:चे योगदान देणारा व्यवसाय आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 12, 2017
स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे. इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते…..
September 1, 2020
अगदी कसं सुरळीत चालू होतं !! आर्थिक क्षेत्रात बँका नुकताच पावसाळा संपल्यावर नद्या वाहतात तशा चालू होत्या . शेअर बाजार वाऱ्याच्या झोतांनी नारळाच्या झाडासारखा डुलत होता . मंदिरा खालोखाल पोस्ट ऑफिसांमध्ये निवृत्तांची गर्दी दिसत होती . सर्वत्र आलबेल !! पण अचानक कोरोना नावाचं वादळ आलं ते जणू तांडवनृत्य करीतच .
October 25, 2022
एक ते सात ऑगस्ट हा कालावधी ५५ जागतिक स्तनपान सप्ताह७७ म्हणून साजरा केला जातो. या संबंधात भारतामध्ये १९९२ साली कायदा संमत करण्यात आला आणि तो १ ऑगस्ट १९९३ पासून भारतभर अमलात आला- त्याचे शीर्षक ५५ बालकांच्या दुधाला पर्यायी अन्न, दूध पाजायच्या बाटल्या आणि बालकांचे खाद्यपदार्थ (उत्पादन पुरवठा आणि वितरण-नियमन) कायदा १९९२७७ कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये-बालकांच्या दुधाचे पर्याय व दूध पाजण्याच्या बाटल्या यांचा वापर अथवा विक्री वाढविण्यासाठी प्रेरणा देण्यास मनाई,
June 19, 2023
बेल! शिवाची प्रिय गोष्ट ज्याखेरीज शिवपुजा पुर्णच होत नाही.
अगदी १००% भारतिय असलेला हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष माहित नसलेली व्यक्ती अर्थातच विरळाच. संपुर्ण भारतभर आढळणारं हे मध्यम आकाराचं झाड त्याच्या धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. "बिल्वे शाण्डिल्यशैलूषौ मलूरश्रीफ़लावपि" अशी वर्णनं अमरकोशात या झाडाची केली आहेत. Rutaceae ह्या लिंबू कुळाचा सदस्य असलेलं हे झाड, वनस्पतीशास्त्रात Aegle marmelos असं नाव धारण करतं. यातल ’एइगल’ हे नाव एका पुरातन ग्रीक निसर्गदेवतेच्या नावावरुन तर ’मारमेलॉस’ हे युरोपातल्या ’क्विन्स’ नावाच्या फ़ळाशी असलेल्या सांम्यावरुन ठेवलं गेलय. आजही, स्वातंत्र्यानंतरही आपण परकियांनी दिलेली नाव वापरण्यातच धन्यता मानत असतो. ईंग्रजीत ' गोल्डन अँपल ' किंवा 'बेंगाल क्विन्स' सारखी रुक्ष नावे मिळालेल्या ह्या भारतिय वृक्षाला गंधफ़ल, सदाफ़ल, शैल, महाकपित्थ, ग्रंथिल, कण्टकी, बिल्वम, बेल अशा सुंदर संस्कृत नावांनी गौरवलं गेलय.
बेलाचा वृक्ष पानझडी या सदरात गणला जातो. हा वृक्ष मध्यम आकाराचा असतो असं वरच्या ओळीतच मी लिहिलंय. साधारण १०-१२ मिटर उंची गाठणाऱ्या ह्या वृक्षाची पानं आपल्याला सुपरिचीत असतात. त्रिदल म्हणजेच तीन पर्णिकांची असलेली ही पानं हिरवीगार या सदरात मोडतात. जर नीट निरिक्षण केलं तर सहज दिसून येतं की या त्रिदलातली मधली पर्णिका कायम मोठी असते. या पानांचा देठही मोठा म्हणजे साधारण ४/५ सेमी असतो ज्यामुळे हे बेलपान त्याच्या अंगापासून लांब, एकाआड आलेली दिसतात. या बिल्वपत्रांना स्वत:चा एक खास सुगंध असतो जो त्यांना चुरडल्यावर सहज जाणवतो. या सुगंधाचे कारण म्हणजे या पानांवर सुगंधी तैलग्रंथींचे ठिपके असतात. हे ठिपके पान उजेडाकडे धरल्यास सहज दिसुन येतात. या पानांचे शिवपुजेत अनन्यसाधारण महत्व असल्याने वर्षभर यांना प्रचंड मागणी असते. मात्र धार्मिक उपयोगाखेरीज यां पानांचे आयुर्वेदिक उपयोग आहेतच. या पानांचा उपयोग सर्दीवरील काढा करण्यासाठी अजुनही केला जातो. तसेच ताज्या बेलपानांचा वापर लेप करून जखमांसाठीही करताना मी खेड्यांंमधे पाहिला आहे. साधारण हिवाळा संपत आला की या वृक्षाची पानं गळायला सुरुवात होते. अर्थात, वसंताच्या आगमनाबरोबरच येणारी नविन पालवी त्याच्या फ़ुलण्याची जणू नांदीच असते. साधारण एप्रिल मे च्या सुमारास बेलाला २ ते २.५ सेमी आकाराची हिरवट पांढरी सुवासिक फ़ुलं यायला सुरुवात होते. चार पाकळ्यांच हे फ़ुल अगदी मंद रंगाच असतं ज्यातून फ़लधारणा होवुन पुढे पावसाळ्यात बेलफ़ळं दिसायला लागतात.
पावसाळ्यात बाळसं धरणारी ही बेलफ़ळं बेलाच्या पानापेक्षा जास्त औषधी महत्व बाळगतात. शिवमंदिरांसमोर विकायला ठेवलेली लहानमोठी बेलफ़ळं आपण पाहिलेली असतातच. कठीण सालीचे हे फ़ळ पिकलेल्या स्वरुपापेक्षा कच्चं असतानाच अधीक वापरले जाते. लांबट गोल आकाराची ही फ़ळं पिकायला मात्र पुढचा उन्हाळा यावा लागतो. ही फ़ळं आतून चिक्कट गोडसर असतात. याचा गर चक्क केशरी रंगाचा असतो नी भरपूर बियाळ असतो. बेल मुरंबा खाऊन अनेकांची लहानपणं समृद्ध झाली आहे हे नक्की. याच बेलफ़ळाच्या पिकलेल्या गराचे सरबत तर अगदी अमृततुल्य लागते. याचे अनेक औषधी उपयोग आयुर्वेदात लिहिलेले आहेत. पचनशक्ती सुधारण्यासाठी, पोटाचे आजार दूर व्हायला, मलावरोधावर रेचक, मधुमेहावर साखर कमी करण्यासाठी, काविळीसाठी, वात नाशनासाठी... एक न दोन. अनेकाविध उपयोग ह्या वृक्षाचे आहेत.
अनेकांनी बेलाची पानं पाहिली असतात पण झाड पाहिले नसते. याचं खोड खडबडीत असतं नी साल करडट, पिवळसर रंगाची असते. या झाडाचे लाकूड पिवळट करडट रंगाचे असते. साधारण आपल्याला माहितच नसतं की बेलाचे लाकूड मजबूत समजले जाते. या लाकडाची गम्मत म्हणजे, कापल्यावरही काही काळ ते सुगंधीत रहातं.या लाकडाचा उपयोग बैलगाड्या, , हत्यारांच्या मुठी, शेतकामाची अवजारं बनवायलाही होतो. उत्तरेकडे, या लाकडाचा वापर कोरीव कामाच्या वस्तू बनवायला होतो. खास सांगायचं म्हणजे, या लाकडाचा लगद्याचा उपयोग आवरणाच्या कागदासाठी केला जातो. या झाडाचा डिंक चांगल्या दर्ज्याचा असून अगदी बाभळीच्या डिंकाइतका दर्जा त्यात असतो. रहाता राहीली याची मुळं! यांचाही वापर औषधांमध्ये केला जातो. प्रसिद्ध दशमुलारिष्टात याची मुळे वापरली जातात...
आपल्या पुर्वजांना या औषधी वृक्षाचं महत्व कधीच कळलं होतं. म्हणुनच अथर्व वेदात याला जळणासाठी तोडू नये असे लिहिले आहे. आजही संथाल जमातीत या झाडाला देवता म्हणुन पुजण्यात येतं नी प्राणपणाने जपलं जातं. तास पाहायला गेलं तर बेलाबद्दल लिहावं तितक कमीच. मी आयुर्वेदाच्या द्रुष्टीने मला माहीत असलेल्याच गोष्टी इथे लिहिल्या असून या वृक्षाचे अनेक औषधी गुण मला माहित नाही. जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे, बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनीत लागते नी वाढते. ताज्या बियांपासून , मुळांच्या फ़ुटव्यातून नविन रोपं सहज बनतात. ह्यामुळेच शासनाने वनशेतीसाठी हे झाड पुरस्कृत करायला हल्ली सुरुवात केली आहे.
हे लिखाण थांबवताना बेलाबद्दल सांगायचं वैशिष्ठय म्हणजे, बेल हा एकमेव वृक्ष आहे ज्यावर संस्कृत भाषेत अष्ट्क लिहिलं गेलय.
-- सुषमा मोहिते
( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )
March 13, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti