वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दोन्ही संघांच्या धावा समान होऊनही बरोबरीत न अडकलेली कसोटी आणि एकतिशीनंतर पदार्पण करणारे दिलीप दोशी
December 20, 2010
मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन ‘माईलस्टोन्स’ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो.
July 18, 2016
१९४७ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा एक उत्तम मासला असलेल्या रॉड मार्शचा जन्म.
१९६८ : पदार्पणातच देशाचे नेतृत्व करावयास लागणे ही झोप लागू न देणारी जबाबदारी आहे पण आज जन्मलेल्या ली जर्मोनला पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडचे नेतृत्व करावे लागले.
October 29, 2010
जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की मी त्या एकदंतांचे सदैव चिंतन करीत असतो. त्यांच्या त्या दिव्यशक्तित्वाचे चिंतन करतो.
January 5, 2020
मानसिक आजारामधे सुरूवातीला झोपेच्या तक्रारी सुरु होतात. त्यामधे झोप लवकर लागत नाही, पहाटे लवकर जाग येते , मधेमधे सारखी जाग येते, निद्रानाश, नाईट मिअर (यामध्ये त्या व्यक्तीस झोप लागते, परंतु भायानक स्वप्ने पडल्यामुळ ती जागी होते )
२) व्यक्तीच्या कामातील तक्रारी वाढतात. ती व्यक्ती मन लावून काम करत नाही. त्याला कामात गोडीच वाटत नाही , मनावर कसलेतरी दडपण आसलेचे जाणवते, ती व्यक्ती कामावर जाण्याची टाळाटाळ करु लागते , ती व्यक्ती कामामधे एकाग्र होऊ शकत नाही. अशा व्यक्तीचे एकाच कामामध्ये लक्ष न लागल्यामुळ कामामध्ये सतत बदल करण्याची प्रवृत्ती आढळते.
३) व्यक्तिगत संबंधामधे बिघाड निर्माण होतो. त्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले परस्पर संबधामधे बदल झालेला आढ़ळतो, ती व्यक्ती दुस-या व्यक्तीना टाळायला लागते, ती व्यक्ती स्वत: एकटी /एकल कोंड़यासारखी राहू लागते.
४) वर्तन - काही रुग्णाचे स्वत:कडे अजिबात लक्ष नसते , त्यांच्या अंगावरील कपडे अस्वच्छ असतात, ते रहातातही अस्वच्छ, अंघोळ करीत नाहीत , दाढ़ी करत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस व दाढ़ी वाढलेली असते . याउलट काही रुग्ण अतिभडक मेकअप करतात काही रुग्ण उगाचच विचित्र हातवारे करीत राहतात.
५) भावना - काही रुग्णामध्ये भावना नियंत्रित नसतात. काही गोष्टी व्यक्ती बारीक सारीक आठवाणीनी रडतात किवा हसतात .
६) विचार - व्यक्ती चे विचार हे त्याच्या बोलण्यातून समजतात. व्यक्ती खूप बोलकी असते ,बोलत असतानाच एका कल्पने वरून दुसऱ्या कल्पने वर जात असते. त्या व्यक्ती च्या बोलण्यात सुसंगतपणा नसतो, बोलणे असंबधित असते . त्यातून काहीच अर्थ बोध होत नाही.
७) भ्रम /विचारातील बिघाड - भ्रम हा एक विचित्र खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो . या विश्वासालाच सत्य धरून ते चालत असतात. त्यांना खूप समजावून सांगून ,खरे -खोटे याची समजूत घालून सत्याचा पुरावा त्यांचा समोर ठेवला तरी ते मानत नाहीत .
८) आकलन - यांमध्ये रुग्णाला स्थळ, काळ, व व्यक्ती या तीनही गोष्टीचे आकलन नसते. या आजारामध्ये स्मरणशक्ती कमी होते, स्मृतीवर परिणाम झालेला आढळतो.
Fb -गजानन वैद
whats app-7775871809
चिकित्सक सल्ला घ्यावा....
May 19, 2017
दरवर्षी २५ ऑक्टोबर रोजी जागतिक पास्ता दिवस साजरा केला गेला. जागतिक पास्ता दिवस सगळ्यात पहिल्यांदा १९९५ मध्ये साजरा केला गेला आणि तेव्हापासून तो दरवर्षी साजरा केला जातोय.
November 2, 2022
अँटी बायोटिक्स हा शब्द माहीत नसलेला मनुष्य आज घडीस सापडणे अवघड आहे! 1930 साली अपघाताने लागलेल्या या शोधाने औषधोपचाराची दिशा बदलली!
मात्र जनक फ्लेमिंग, यांच्या "या अस्त्रा चा वापर जपून करा" या सांगण्याला अक्षरशा हरताळ फासत, मनुष्य आणि प्राण्यावर याचा मारा करण्यात आला! आणि आज सुपर बग्स आणि अँटिबोटिक्स रेजिस्टन्स नावाचा भस्मासुर आपल्या वर उलटू लागला आहे!
हे कसे रोखता येईल!
पेशंट म्हणून जाताना
1) योग्य डॉक्टर/प्याथि निवाडा.
2) डॉक्टर मला लवकर बरे व्हायचे आहे,स्ट्रॉंग औषधे द्या असा बाल हट्ट धरू नका.
3) शरीरातील रोग प्रतिकार शक्तीस थोडा वाव द्या.
4) डॉक्टरांनी अँटी बायोटिक्स लिहिली असतील तर त्याचा कोर्स पूर्ण करा. अर्धवट सोडलेला कोर्स आपणास ड्रग रेजिस्टन्स कडे पावला पावलाने ढकलत असतो.
बॅक्टरीया अर्थात जिवाणू अतिशय हुशार असतो,अँटी बायोटिक्स चे स्वरूप ओळखून त्याच्या कामाच्या पद्धती पाहून आपले स्वरूप बदलतो,
आणि मग पुढील दर खेपेस नवे अँटी बायोटिक या प्रमाणे तो यशाची नवी शिखरे पादाक्रांत करतो !
आताच सापडलेला एक जिवाणू इतका शक्तिशाली निघाला की त्याला सुपर बग हे नाव देण्या वाचून गत्यंतर राहिले नाही.
अजिंक्य मी! अमर्त्य मी! अशी दर्पोक्ती करत आपल्या ला ड्रग रेजिस्टन्स च्या गर्तेत ढकलत जातो!
मागील एका वर्षात 7 लाख लोक अँटी बायोटिक चा प्रभाव न चालल्याने मृत्यू मुखी पडले आणि प्रति जैविकांचा वापर असाच चालू राहिल्यास ही संख्या काही काळात एखाद्या देशाची असणार आहे हे सांगायला ज्योतिषी नको!
सर्व सामान्य माणूस याकरता काय करू शकतो
1) स्वच्छता राखणे.
2) हात धुण्याच्या सवयी लावून घेणे.
3) खाद्य पदार्थाचे स्रोत तपासून पाहणे.
फार्मासिस्ट म्हणून आपली जबाबदारी काय?
1) काउंटर ला कोणतेही अँटी बायोटिक न देणे.
2) योग्य डॉक्टर च्या प्रिस्क्री.वर च औषध विक्री करणे.
3) जुन्या चिट्ठी वर परत परतअँटी बायोटिक्स न देणे.
4) विक्रीचा पूर्ण रेकॉर्ड ठेवणे.
5) अँटी बायोटिक्स च्या सुयोग्य वापरा बाबत पेशंट चे समुपदेशन करणे!
आपल्या येणाऱ्या पिढ्या करता काही सुयोग्य कृती करावी असे वाटत असेल तर फक्त त्यांच्या करता ही औषधे वापरण्यास शिल्लक ठेवा अन्यथा या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत!
November 21, 2016
आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात.
January 16, 2022
अमर्याद वाढणारी लोकसंख्या, त्यांच्या गरजा आणि पायभूत सुख-सोयी निमार्ण करण्यासाठी वापरले जाणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातून रोजचे वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण आणि त्यावर मात करण्यासाठी अमलात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत आणि भविष्यात हीच मोठी अडचण ठरणार आहे. आज आपला परिसर ध्वनी, जल, वायू आणि माहित नसलेल्या अनेक प्रदूषणाने व्यापला आहे आणि त्यातून कोणाचीही सुटका नाही असा अनुभव आहे. मग यावर उपाय काय?
October 11, 2014
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
जनी सर्व सुखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनी पाहे ।
मना तांची रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥
मना मानसी दु:ख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥
मना संग पां रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ।
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।
बाले लागला काल हा पाठीलागी ॥
जीव कर्मयोगे जनी जन्म झाला ।
परी सेवटी काळमूखी निमाला ।
महा थोर ते मृत्युपंथेची गेले ।
कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जिता बोलती सर्व हि जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्व हि मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
September 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti