वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र
क्षणं क्ष्मा च लक्ष्मीः स्वयं तं वृणाते |
किरीटस्फुरच्चामरच्छत्रमालाकलाचीगजक्षौमभूषाविशेषैः ‖ १७ ‖
ज्यावेळी एखाद्या शरणागत भक्ताला भगवंताची कृपा होते त्यावेळी त्याला कोणकोणते अद्वितीय लाभ होतात ते सांगतांना जगद्गुरु श्रीशंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र- हे त्र्यक्ष अर्थात तीन नेत्र असणाऱ्या भगवान शिवशंकरा ! आपल्या नेत्राचा कटाक्ष जेथे पडतो. अर्थात ज्या कोणावर ही कृपादृष्टी प्राप्त होते. त्याला,
क्षणं - क्षणात म्हणजे तत्काल. अल्पावधीतच,
क्ष्मा च - पृथ्वी अर्थात पृथ्वीचे साम्राज्य आणि
लक्ष्मीः - अर्थात सर्व प्रकारचे वैभव.
स्वयं तं वृणाते - स्वत:च वरते. अर्थात या सर्व गोष्टी त्याच्याकडे आपोआपच चालत येतात. कोणत्याही प्रयासाशिवाय त्याला प्राप्त होतात.
त्या देखील कशा? तर-
किरीट- मुकुट अर्थात शिरोभूषण,
स्फुरच्चामर- लखलखीत रत्नजडित सोन्याच्या दांडीने युक्त चवऱ्या, त्यांनी वारा घालणाऱ्या दासी, अर्थात अनेक प्रकारचे सेवेकरी,
छत्र- मस्तकावरील छत्र. सर्व प्रकारच्या तापापासून, त्रासापासून मुक्ती,
माला- मोत्याच्या माळा, सौंदर्य आणि शीतलता,
कलाची- बाहुभूषणे.
गजक्षौमभूषा- आभूषणांनी सुसज्जित असणारे , अंबारीयुक्त असे हत्ती.
विशेषैः - या सगळ्या विशेष आभूषणांसह.
अर्थात राजवैभवाशी संबंधित सगळ्याच लहान सहान गोष्टी देखील त्याला सहज प्राप्त होतात. परिपूर्ण वैभवाने युक्त असे स्वानंद साम्राज्य त्याला प्राप्त होते. आतला आनंद प्राप्त होतो.
बाहेरून आता त्याला काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 26, 2020
यासाठी केला होता अट्टहास असे बिरुद या सोहळ्यास देण्यास हरकत नाही, असा महत्वाचा विवाहसंस्कार लग्नविधी म्हणजे मंगलाष्टक. मंगलाष्टकांशिवाय लग्न लागले हे शास्त्रसंमत होत नाही. आंतरपाटाच्या दोहोबाजूला रुबाबदार नवरा आणि अधोमुखी गौरवर्णा अलंकार पुष्पमंडित सालंकृत नवरी उभे असतात. पौराहित्य करणाऱ्या ब्राह्मणाच्या शात्रोक्त मंत्रोच्चाराने नांदी होऊन नातेवाईक देखील एकेक करीत पाच, सात मंगलाष्टकांमधून देवदेवतांना, निसर्ग देवतांना, पवित्र नद्यांना सहजीवनासाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले जाते. मंगलाष्टकांच्या नादमधुर झंकाराबरोबरच डोईवर पडणाऱ्या पवित्र फुलादी धान्याच्याअक्षतांच्या रूपाने नातेवाईक, सख्या सोबत्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छाने वधु-वर प्रसन्न होतात. शेवटची मंगलाष्टक ‘वाजंत्री बहू गल्बला न करणे’ संप्पन्न होते. आंतरपाट दूर होतो. हा अत्यंत नाजूक क्षण असतो. नववधु शिर झुकलेल्या वराच्या गळ्यात वरमाला घालते आणि नंतर वर-वधूच्या गळ्यात पुष्पमाला घालतो. वधु-वर मंत्रमुग्ध होतात. मंगलाष्टकांतील आवाहनानुसार गगनातून देव आशीर्वाद द्यावयाचा क्षण मंगलमय वाद्याने वातावरण भारून टाकतो. लग्नसभेत आनंदीआनंद होतो.
परंतु अलीकडच्या काळात या मंगलमय पवित्र धीरगंभीर धार्मिक सोहळ्यास, थट्टामस्करीच्या नावाने गालबोट लावणारी प्रथा रूढ होऊ लागली आहे. मित्रमंडळी, नातेवाईकांच्या फाजील उत्साहाने आणि खोट्या प्रतिष्ठेच्या आविष्काराने या वरमाला अपर्णाच्या मंगलमय भावूक क्षणांचा चोळामोळा करताना वधु-वराला उचलून घेऊन त्यांना हार घालण्यापासून परावृत्त करण्याची दांडगाई केली जातेय. या चढाओढीत विवाहसंस्काराचे पावित्र्य आणि गांभीर्य सहजी नजरेआड केले जातेय. आपण आपल्याच सहकारी वधु मैत्रिणीचे आणि वर मित्राचे भावविश्व क्षणार्धात उधळतो आहे याची पुसटशी जाणीव या सवंगड्यांना का नसावी बरे! मग गदिमांच्या ओळींची पुन्हा आठवण येते.सीता स्वयंवराचे किती विलोभनीय दृश्य रेखाटले आहे या वरमाला अर्पण सोहळ्याचे.
आकाशाशी जडलें नातें धरणीमातेचें
मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
पुढे गदिमा, सीतेच्या लज्जेचे मार्मिक वर्णन करतात,
फुलुं लागलें फूल हळूहळू गाली लज्जेचें
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
आणि तो वरमाला अपर्णाचा अधीर क्षण काय वर्णावा
पित्राज्ञे उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें
आणि झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे
स्वयंवर झाले सीतेचे...
आपण प्रत्येकाने अशा चुकीच्या प्रथांना मुळातूनच पायबंद घातला पाहिजे. पुढील पिढीच्या समाजमनावर होऊ घातलेले वाईट परिणाम रोखण्यासाठी, हिंदू संस्कृतीच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी या कुप्रथेविरुद्ध विरुद्ध व्यापक जनजागृती करावयास हवी. इंग्रजाळलेल्या आजच्या तरुण, हिंदू मराठी पिढीसमोर आदर्शवादी आणि विवेकपूर्ण लग्नसोहळे संपन्न होऊन, आजच्या तरुणाईला स्वैर वृत्तीपासून परावृत्त करायला हवे.
लेखक : घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
March 2, 2025
हा सिद्धांत आइन्सटाइनने मांडलेला असून या मधे speed आणि time यांचे relation सांगित ले आहे. दोन्ही एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात . अर्थात ‘speed’ वाढला तर ‘Time’ Slow होतो . TIME हा Relative आहे तो सर्वांसाठी सारखाच नसून, वेगवेगळा आहे. या मधे आणखी दोन concept आहेत- Motion आणि time Dilation .
March 26, 2019
एखाद्याचं व्यक्तिमत्त्व केसांमुळे अधिकच खुलून येतं असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरणार नाही. त्यामुळेच केस गळणं हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो. बघता बघता डोक्यावरील केस गळायला लागतात आणि लवकरच, टक्कल पडण्याची भीती वाटायला लागते.
April 28, 2023
क्रिकेटच्या जन्मभूमीच्या संघाच्या कप्तानाने परदेश दौर्यावर शरीरवेधी गोलंदाजीसारखे तंत्र वापरावे ही सभ्यांच्या खेळाला काळिमा फासणारी घटना होती. मुद्दामहून फलंदाजाच्या छाताडाच्या दिशेने आपटबार आदळायचे, लेगसाईड खेळण्यासाठी मुश्किल करून ठेवायची – पाच-पाच क्षेत्ररक्षक लावून – आणि फलंदाजाचा अंत पहायचा असे हे तंत्र होते. यातील सर्वात वाईट गोष्ट अशी की फलंदाजाला गंभीर इजा होण्याचा संभव अशा गोलंदाजीतून उद्भवतो.
January 16, 2011
भुसावळ, सोलापूर आणि सांगली या ” माझ्या ” गावांमध्ये सकाळची प्रभातफेरी माझ्यासाठी अत्यावश्यक असते. शनिवारी सकाळी उठून ताजी फेरी मारली सोलापुरात !
July 30, 2022
शेंदरी हे नैसर्गिक खाद्य रंगाचे झाड आहे. याचा वापर परंपरागतरित्या शेंदरी रंगा साठी खाद्यपदार्थां मधे केला जातो. वृक्षा मद्धे फक्त शेंद्रीपासून निर्माण केलेल्या बिक्सिन या रंगाला अमेरिकेच्या FDA ने मान्यता दिली आहे. नैसर्गिक लिपस्टिक मधे यांचा वापर केला जातो त्यामुळे यास ‘लिपस्टिक ट्री’ असेही म्हटले जाते.
March 3, 2025
आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात भाविक नऊ दिवस देवीचे व्रत व उपवास ठेवतात. व्रताच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. पावसाळ्यात पित्त वाढतं, पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळं उपवासानं पित्त कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. जर आपण ९ दिवस व्रत/उपवास ठेवणार असाल तर या नऊ गोष्टी लक्षात ठेवा...
नवरात्रात व्रतातील आहार कसा असावा?
- हाय फायबर आणि लो फॅट असणारे पदार्थ खावे - मॉर्डरेट प्रोटीन, हाय कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खा - त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारातील द्रव पदार्थ वाढवा - सामान्य दूधाऐवजी स्किम्ड दूध प्या.
नवरात्रौत्सवात व्रतादरम्यान किती कॅलरीची असते गरज?
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये १८००-२२०० कॅलरीची व्रतासाठी गरज नवरात्रीच्या व्रतात काय करू नये? - फक्त लिंबू-पाणी पिऊन उपवास ठेवू नये. - खाहीही न खाता नुसतं दूध पिऊन उपवास करू नका, असं केल्यानं अशक्तपणा येतो. - यामुळं थकवा, ब्लड प्रेशर लो आणि चिडचिडपणा वाढू शकतो. - गॅस्ट्राइटिस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. - व्रतात आंबट फळं उदा. संत्री, लिंबू, मोसंबी खाऊ नये. - व्रतादरम्यान लंच आणि डिनरमध्ये आहाराचं संतुलन राखावं. - कुटू किंवा शिंगाड्याच्या पिठाची चपाती खावी. - साबुदान्याची खीर किंवा खिचडी खाऊ शकता. - सीताफळ, बटाट्याची रस्सेदार भाजी खाणं चांगलं राहील. - दिवसातून तीन वेळी फळं किंवा फ्रूट सॅलेड खावं. - ४-६ वेळा सुख्यामेव्यासह ज्यूस, दूध, मिल्कशेक पिणं चांगलं राहील. - नारळ पाणी आपल्या डाएटमध्ये अवश्य असू द्या - नवरात्रीच्या व्रतात कमीतकमी ८ लीटर पाणी प्यावं. - एकाच प्रकारच्या फळांपेक्षा मिक्स्ड फळं खावीत. - ताजी फळं खा, कडवट चवीचे फळं खाऊ नका.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 7, 2017
स्वामी विवेकानंदांचे मूळचे नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखा आहेत.
March 9, 2013
रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले.
December 23, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti