(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सोशियल सर्विस लीग, एक सेवाभावी संस्था

    सर नारायण गणेश चांदवडकर, श्री भालचंद्र कृष्णा भाटवडेकर, श्री गोकुळदास के. पारेख, सर जमशेटजी जीजीभॉय आणि इतर अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी गिरणी कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, गरिबी संपावी, त्यांना चांगले माणूस होता यावे म्हणून १९ मार्च, १९११ रोजी त्यांनी ‘सामाजिक सेवा लीग’ अशी अद्वितीय सेवाभावी संस्था स्थापन केली. लीगचे पहिले सचिव म्हणून श्री एन.एम. जोशी यानां मान देण्यात आला.

      January 16, 2015


  • या चोरट्यांना “बेल आऊट” पॅकेज कशासाठी?

    ही लोकशाही आता सर्वसामान्य लोकांची राहिलेली नाही. मूठभर लोकांनी मूठभर लोकांच्या भल्यासाठी संपूर्ण जनतेला वेठीस धरून, लुबाडून चालविलेली व्यवस्था म्हणजे भारतातील वर्तमान लोकशाही असेच म्हणावे लागेल. भारत अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे म्हणतात आणि ते खरेच आहे.

      December 4, 2011


  • जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा

    दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

      August 16, 2014


  • घरातच फुलवा बाग

    घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते.

      January 11, 2011


  • जागतिक पियानो दिवस

    दी चित्रपटांतील सुमधुर संगीतातून ठसा उमटविलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडगोळीतील शंकर यांचा पियानो पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षांपूर्वीचा आहे. स्कीडमायर कंपनीच्या या अप्राइट पियानोमध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या आहेत. संगीतकार नौशाद हे स्वत: उत्तम पियानोवादक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या अनेक गाण्यांत पियानोचा वापर केला आहे. ‘अनमोल घडी’ या चित्रपटात ‘जवाँ है मुहब्बत हसीं है जमाना..’ या नूरजहाँने गायलेल्या गाण्यात पियानोचे दर्शन घडते.

      March 29, 2022


  • चिरा गल्ली गणेशोत्सव मंडळ, भुसावळ

    भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे).

      September 6, 2022


  • जांभया येणे

    कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील "बेसल गॉंग्लिया' नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना अनेक स्नायूंचे कित्येक सेकंद टिकणारे आकुंचन होत राहते. परिणामी व्यक्तीचे श्व सन दीर्घ पूरक स्थितीत जाते म्हणजे श्वाचस आत घेण्याची क्रिया नेहमीच्या श्वावसोच्छ्वासापेक्षा लांबते. त्याच वेळी घशाचा आकार विस्तारतो. खालचा जबडा व जीभ खाली जाते. दीर्घ श्वासस घेण्याने फुफ्फुस व पोट यातील पडदा (डायफ्रॅम) पोटाकडे सरकतो. परिणामी छातीच्या पोकळीत ऋण भार (negative pressure) तयार होतो. शरीरातील नीलांमधील रक्त छातीकडे (हृदयाकडे) जाते. त्यामुळे हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा सुधारतो. दीर्घ श्वीसनाचा दुसरा मोठा फायदा म्हणजे फुफ्फुसातील बंद कोष उघडले जातात.

    आपल्या नेहमीच्या किमान 40 टक्के फुफ्फुसातील कोष कार्यान्वित होत नसतात. अशा न उघडलेल्या कोषातून प्राणवायूची देवाणघेवाण होत नाही. प्राणवायू कमी असणारे रक्त तसेच हृदयाकडे परत जाते व रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घटते. मधूनच दीर्घ श्वेसन झाले तर हा दोष टळतो. अनेकदा हॉस्पिटल्समध्ये अति दक्षता भागात रुग्णांना कृत्रिम श्वा‍स होणाऱ्या "व्हेंटिलेटर' र्(ventilator) मशिनवर ठेवले जाते. या वेळी रुग्णाला जांभई येत नाही. त्यामुळे बंद असणाऱ्या कोषातील "अशुद्ध' (म्हणजे प्राणवायू कमी असणारे) रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तात मिसळते. परिणामी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घसरते. तसे होऊ नये म्हणून जास्त दबावाने प्राणवायू देणयाची प्रथा आहे. कधी कधी खूपच जास्त दबावाखाली प्राणवायू वापरावा लागतो. हायपर बॅरिक ऑक्सि न चेंबर(hyper baric oxygen chamber) जांभई येताना चेहऱ्यावरचे स्नायू व हाताचे स्नायूदेखील कार्यान्वित होतात.

    या क्रियांनीदेखील रुधिराभिसरणाला चालना मिळते. शिवाय स्नायूंच्या आत असणाऱ्या काही मज्जा-स्वीकारांना (sensory receptors) चालना मिळते. यांच्यामधून मज्जारज्जूत व मेंदूत जाणाऱ्या चेतनांमुळे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. ही झोपेची पूर्वतयारी आहे. हाताच्या स्नायूंचे हे काम मेंदूच्या हालचाल केंद्राच्या (motor cortex) ताब्यात नाही. एखाद्या व्यक्तीला पक्षाघात (hemiplegia) झालेला असला तर ती व्यक्ती आपला (उजवा किंवा डावा) हात स्वेच्छेने हलवू शकत नाही. कारण या हालचाल केंद्राचा व हात हलविण्यास जबाबदार असणाऱ्या मज्जारज्जूतील पेशींचा संबंध दुरावलेला असतो. अशा व्यक्तीला जांभई आली तर मात्र हात उचलला जातो, ताणला जातो. हीदेखील बेसल गॉंग्लियामधून देखरेख केलेली एक प्रतिक्षिप्त क्रियाच असते. असा लुळा पडलेला हात जांभईच्या वेळी हलताना पाहून पाहणाऱ्याला नवल वाटते.

    उत्क्रांत होत असताना अनेक श्वानपदांना आपल्या संरक्षणासाठी वास घेणे महत्त्वाचे ठरते. मोठ्या प्रमाणात श्वा स घेण्याने बरीच हवा नाका -घशात जाते. या भागात नेहमी होणारी हवेची हालचाल संथ गतीने व कमी घनफळाची असते. त्यातील वाढीमुळे वास घेण्याची क्षमता वाढते. झोप येण्यापूर्वी आपल्या आसपास धोकादायक श्वावपदाचे अस्तित्व जाणणे प्राणिमात्राच्या जीवन-मरणाच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे. हा गुणधर्म सर्व प्राण्यांत दिसतो व मानवातदेखील उतरलेला आहे. झोप येण्यापूर्वी जांभया येऊ लागतात. ही क्रिया अनैच्छिक प्रतिक्षिप्त असते. कंटाळा येणे ही मानसिक प्रक्रिया झोप येणे या शारीरिक क्रियेशी संबंधित आहे.

    ज्या वातावरणात मन रमू शकत नाही (कंटाळवाणे व्याख्यान) तेव्हा मनाला तेथून दूर जावेसे वाटते. पण सांस्कृतिक आणि इतर कारणांनी शरीर तेव्हा दूर जाऊ शकत नसले तर मन त्या वातावरणातून दूर एखाद्या कोषात गेल्याप्रमाणे लक्ष काढून घेते. म्हणजेच मनाची झोप सुरू होते. मानवी भावना संसर्गजन्य असतात. एखादी व्यक्ती घाबरली तरी आजूबाजूच्या व्यक्ती भयभीत होतात. एखादी व्यक्ती हसू लागली की सोबतच्या माणसांनाही हसू फुटते. त्याचप्रमाणे जांभया देणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणाऱ्या जांभया येऊ लागतात. क्वचितच जांभया येणे हे एखाद्या मेंदूच्या विकाराचे लक्षण असते. फेफरे (epileptic fit) येणाऱ्या रुग्णाला फिट येण्यापूर्वी जांभया येऊ लागणे शक्या असते. मेंदू-ज्वर या आजारातदेखील रुग्णाला सारख्या जांभया येतात. अफू हा एक मादक पदार्थ आहे. त्याचे नियमाने सेवन करणाऱ्या व्यक्तीला अफूचे व्यसन लागते. अशा व्यक्तीला अफू मिळाली नाही किंवा मादक पदार्थांचे परिणाम नष्ट करण्याची औषधे दिली तर सतत जांभया येऊ लागतात. जांभई येणे हा जरी वैश्विणक अनुभव असला तरी त्याबद्दल संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती अजून मिळालेली नाही. व्यवहारात असे दिसते की कोणत्याही कारणाने रात्री झोप न मिळाल्यास दिवसा सारख्या जांभया येतात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई

      February 14, 2017


  • महंमद रफी

    तो दिवस असाच ढगाळलेला होता आणि संध्याकाळी बातमी आली महंमद रफी गेले, सुन्न झाले होते.

      August 9, 2021


  • झांझीबारवासियांची लाडली ‘डालाडाला’

    जगभरच्या सरकारने प्रवासी-सेवा ताब्यात घेतल्या. मात्र सरकारी व्यवस्थापनातली गलथानता अनुभवल्यावर ओरड सुरू झाली. ‘‘सरकारकडे प्रशासनाचे व कायदा-कानूच्या अंमलबजावणीचे काम करण्याऐवजी बस आणि आगगाड्या चालवायच्या फंदात कशाला पडायचं? खाजगीकरणामुळे सरकारी अंमलाचे घुमजाव युग आले.

      December 9, 2023


  • सिर्फ खिलौना छीना हैं

    १८ नोव्हेंबर २०१६ रोजी बाजार बंद होताना आपल्या मुम्बई शेअर - बाजाराचा निर्देशांक ( SENSEX ) २६१५० होता . अगदी आत्ता आत्ता तो २८००० अंशांच्या पातळीला स्पर्श करत होता . अगदी " लाजते , पुढे सरते , फिरते " अशातली गत होती . त्यामुळे सारेच मोहरलेले होते . पण मग गाडी बिनसली . आणि बघता बघता या लोकप्रिय निर्देशांकाने २००० अंशाने मार खाल्ला . जणू काही मातम झाल्यागत त्याची चर्चा सुरू झाली . आधी हाच निर्देशांक वाढत असताना त्यामागची कारणे शोधावी असे कोणालाही वाटत नव्हते . पण याच निर्देशांकाचे दक्षिणायन सुरू झाल्यावर मात्र झोप पार उडाली . निर्देशांक २७५०० आणि पुढे असताना तो तसा असावा का हे विचारात नाही कधीच घेतले , पण तो २६५०० अंशांच्या खाली येताच मात्र सगळे एकदम विचारमग्न . मग काय ? सायरस मिस्त्रीची उचलबांगडी , अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल ( अनपेक्षित ? ) , मोदी सरकारचा नोटा - बदलिचा निर्णय असे सगळे मुद्दे सुचायला लागले . आपल्या सगळ्यांनाच . ही कारणे कि सबबी ? हे समर्थन कि सारवासारव ? ही आपणच आपली घालून घेतलेली समजूत कि आपल्याच व्रुत्तीचे लंगडेपण ? हे सगळे जसे एकच आहे ना ; अगदी तसेच या निर्देशांकाच्या चढ - उताराचे आहे हो !

    हे सगळे अनुभवत असताना मला अलीकडेच प्रदर्शित झालेल्या " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमातला एक संवाद सारखा आठवत होता . त्यात अलिजे ( अनुश्का शर्मा ) आयन ( रणबीर कपूर ) ला सांगते कि " ( तुम्हारा ) सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं " .

    या संवादाला असणारी या सिनेमातील पार्श्वभूमी ही इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे . रणबीर कपूरची मैत्रीण आणि अनुश्का शर्माचा तिच्या घरच्यानी ठरवलेला नवरा ( दोन्ही या सिनेमातले हो ) यांना हे दोघं नको त्या अवस्थेत बघतात . त्यावर फारच अतिरन्जित आणि नाटकी पद्धतीत रनबिर प्रतिक्रिया व्यक्त करतो . तेंव्हा आयुष्याकडे मोकळ्या , रोखठोकपणे पाहानारी अनुश्का त्याला त्याची जाणीव करून देत इतक काहीही झालेले नाही किंवा असे काहीतरी , कधीतरी होणारच होते असे सांगताना म्हणते कि " तुम्हारा सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं " .

    हे विधान वेगळ्या संदर्भात , वेगळ्या अर्थाने आपल्या शेअर - बाजारांच्या निर्देशांकाबाबतही लागू पडते कि ! ! निर्देशांक १५०० - २००० अंशांनी जरूर कमी झाला आहे . पण आपल्या देशांच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठी घसरण झाली आहे असे काही निर्देशान्काच्या अधोगतीचे कारण नाही ना ! झाले असले तर फक्त इतकेच झाले आहे की " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं "

    असं लिहीत असताना सहजच असा विचार मनात आला कि असं काही लिहिण्याचा मला नैतिक आधिकार आहे का ? पण मग वाटले कि असा आधिकार मला आहे . कारण बाजाराकडे पाहण्याचा असाही एक द्रुष्टीकोन असू शकतो कि ! आणि दुसरे म्हणजे या काळात , टप्प्याटप्प्याने पण मोठ्या रकमेची प्रत्यक्ष गुंतवणूक मी केली आहे कि ! मला आर्थिक द्रुष्टीने सक्षम वाटणार्या कंपन्याचे शेअर्स मी या काळात खरेदी केले आहेत आणि होता होइतो ती दीर्घकालिक गुंतवणूक म्हणून केली आहे .

    पैशांची असो नाहीतर भावनांची , तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची गुंतवणूक आपसूकच , अगदी सवयीने दीर्घकालिक च असते .

    एकंदरीत काय , आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आपण भारतीय नागरिकांना , आणि पर्यायाने निर्देशांकाच्या माध्यमातून जगभर सर्वानाच , हेच सांगत आहे कि झाले आहे इतकेच कि " सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं "

    असा विचार करत असतानाच एकंदरीतच शेअर - बाजार आणि " ऐ दिल हैं मुश्किल " या दोन गोष्टीत असणारी अनेक साम्यस्थळ लक्षात यायला लागली . या सिनेमातील दोन पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे या सिनेमाच्या वितरणाबाबत वादंग झाले . दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ते अनावश्यक नक्कीच नव्हते . यातल्या एका पाकिस्तानी कलाकाराचे सिनेमातील भुमिकेचे नाव " अली " . अलिजे ( अनुश्का शर्मा ) त्याच्या प्रेमात . पूढे त्याच्याशी ती लग्न ही करते . पण तो अनुभव काही फारसा सुखद नसतो आणि म्हणून ती त्याच्यापासून दूर होते असे या सिनेमात दाखवले आहे . हे कीती सांकेतिक आहे ? पाकिस्तान ला कितीही चान्गुलपनाने वागवा , ते वाईटच अनुभव देणार हे या सिनेमात आहे ही गंमतच आहे . पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादग्रस्त बनलेल्या सिनेमातच अस असाव अशा अर्थाने विरोधाभासी गंमत . असा प्रकार गुंतवणूक क्षेत्रातही वेगळ्या प्रकारे घडू शकतो कि !

    तसेही गुंतवणूक क्षेत्र बदनाम आहे हे एक साम्य .

    त्याशिवाय गुंतवणूक आणि करमणूक ही दोन्ही क्षेत्रे अशी आहेत की एरवी या दोन्ही क्षेत्रांना सरकारी हस्तक्षेप नको असतो ; पण हे अडचणीत आले की सरकार ने आपण हून यांना मदत करावी अशीच यांची अपेक्षा असते .

    गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रातील तिसरे साम्य म्हणजे काळा पैसा आणि अवैध मार्गाचा पैसा या दोन क्षेत्रात येत असतो अशी कुजबूज सुरु असते .

    " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमाचा हवाला देत सांगायचे तर गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रात असणारे एक अजून साम्य म्हणजे Flop आणि Blockbusters या दोन्ही शक्यता असणे .

    पण त्याचवेळी हीही गोष्ट सांगितली पाहिजे की ( पुन्हा या सिनेमातलाच संवाद आधाराला घेत ) " रोने और हँसने के बीचवाला रास्ता " असं मानवी आयुष्याचे वर्णन करता येते . आणि अशा आयुष्याला अत्यावश्यक असणाऱ्या गुंतवणूक क्षेत्रात , विशेषतः शेअर - बाजारातही अशा संधी , पद्धती ( strategies ) ही नक्कीच उपलब्ध असतात . कारण कोणत्याही बाजारात " . . . . दिल नही टूटा हैं " असं असतेच .

    " असन्गाशी संग , प्राणांशी गाठ " अशी सर्वसाधारण सर्वत्र परिस्थिती असताना शेअर - बाजार मात्र आपला चुकलेला निर्णय सुधारण्यास संधी देत असतो . आपल्या आयुष्यात , आपल्या गुंतवणुकीत असे जे काही " पाकिस्तान " असेल ते बाजूला करण्यास , सिनेमात जे धाडस अनुश्काची अलिजे दाखवते ते आपण दाखवणार कि तो भावनेचा प्रश्न करत निश्कारणच स्वतःच स्वतःचीच " ऐ दिल हैं मुश्किल " अशी परिस्थिती करून घेणार हा प्रश्नच असतो . कारण त्यासाठी " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " या प्रश्नाचे आपलेच आपल्यालाच उत्तर द्यावे लागते . देत राहावे लागते .

    याचे सोपे , साधे स्वरूप म्हणजे आकर्षक आणि कुचकामि विरुद्ध कदाचित कधी अनाकर्शक पण भक्कम यांत फरक असतो हे समजून घेत तसेच सातत्याने वागणे आपण अंगवळणी पाडून घ्यायला हवी . या सिनेमातील संवाद तोंडी लावायला घेत सांगायचे झाले तर " अमीर - रईस " , " इजाजत - जसबात " , " मोहोब्बत - आदत " यातला फरक समजून घेणं गरजेचे असते . कारण " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं " .

    अशा वेळी या सिनेमात अनुश्का शर्मा ( अलिजे ) रणबीर कपूर ( आयन ) ला त्याच्या घरी येताना निवडुंग भेट म्हणून देतांना किंवा ती फूल का देत नाही जे सांगते ते इथे वेगळ्या अर्थाने समजून घेतले तर ! " फूलों के रंग बिखर जाते हैं , खुशबू निकल जाती हैं " ह्या तिच्या वाक्याप्रमाने गुंतवणूकीच्या संधी कोणत्या आणि टिकाऊ स्वरूपाच्या कोणत्या हा विचारी विवेक कधीही अनाठायी नसतो .

    हा सिनेमा काय किंवा आपली भावनिक - आर्थिक गुंतवणूक काय , अतिशय गाभ्याचे काय यावर लक्ष देणे महत्वाचे असते . या सिनेमाचाच दाखला देत सांगायचे तर " वो मेरा शोहर ( नवरा ) हैं ; मेरा वजूद ( अस्तित्व ) नही हो सकता " हे आपण निक्शून बजावत अंमलात आणले तर आपली कोणतीही गुंतवणूक अयशस्वी होणे कठीण होईल . मात्र त्यासाठी " सिर्फ खिलौना छीना हैं . . . . . " या निकषांवर तपासणी होणे आवश्यक आहे . ( जाता जाता , वजूद या शब्दाचा एक अर्थ जसा अस्तित्व आहे ; तसे या शब्दाचे देह , स्रुशटी , प्रकट होणे असॆ इतरही अर्थ आहेतच कि आणि यातल्या कोणत्याही अर्थाने . . . . . . )

    नवरा , लग्न असा संदर्भ सुरू आहे म्हणून याच सिनेमातील अजून एका विधानाची आठवण झाली . सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) अयान (रणबीर कपूर ) ला सांगते कि " कवीने लग्न केलेच पाहिजे . कारण साथीदार चांगला मिळाला तर आयुष्य चांगले जाते ; साथीदार वाईट मिळाला तर साहित्य चांगले होते " . या दोन्ही प्रकारचा अनुभव तुम्हांला एक माणूस म्हणून सम्रुद्ध करत असतो . कवि म्हणून ही ते महत्वाचे असते आणि गुंतवणूकदार म्हणूनही . त्यातही आपण गुंतवणूक केलेल्या साधनाशी आपण सर्वच इतके भावूक असतो कि जणु काही आपण कवि म्हणून केलेली ती एक कविताच . शिवाय तसेही आपण आपल्या गुंतवणुकीत इतके सर्वार्थाने गुंतलेले असतो कि जणु काही आपले आपल्या गुंतवणुकीशी लग्नच लागलेले आहे . याच सिनेमातील संवादात सांगायचे झाले तर " रिश्तोंकी गीली जमीन पर फिसलना " तर होतच राहाते . हे टाळण्यासाठी एक लिटमस चाचणी म्हणजे " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " ?

    तसे आपले आपल्या गुंतवणुकीवर एकतर्फी प्रेम असतेच कि ! आपले आपल्या गुंतवणूकीवर प्रेम नक्कीच असते ; आपल्या गुंतवणूकीचे आपल्यावर असते का ? . पण आपण या एकतर्फी प्रेमातच इतके मशगूल असतो कि काही विचारू नका आणि काही सांगू नका ! " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमात कवि सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) चा स्वखुशीने वेगळा झालेला नवरा तारिक ( शाहरुख खान ) म्हणतो कि असं एकतर्फी प्रेम सोपे नसले तरी सोयीचे असते . कारण " एकतरफ़ा प्यार कि ताकद मेरे अकेले पे निर्भर होती हैं " . पण असॆ एकतर्फी प्रेम सुफल संपूर्ण होत नाही ना ! गुंतवणूक तर तशी सुफल संपूर्ण करावीच लागते . नव्हे ; ती तशीच असण्यासाठीच करायची असते . आणि तसेच होण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " या प्रश्नाचा चक्रव्यूह .

    या प्रश्नाला चक्रव्यूह अशासाठी म्हणले कि यात अभिमन्यु होण्याचीच शक्यता जास्त असते . कारण " मी अपूर्ण आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे " हा अनुभव प्रेमात पडणे आणि गुंतवणूक करणे यातला समान धागा आहे .

    पण हा चक्रव्यूह हवाहवासा वाटणारा आहे . कारण प्रेम आणि गुंतवणूक ही दोन्ही क्षेत्रे " तुझे नसणे मला अजमावत राहते " अशी अनुभूती देणारी .

    कोण कोणाला हे मात्र विचारायचं नाही ?

    नसणे की नडण हे तर नाहीच नाही .

    " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमातील एक वाक्य अगदी सुरुवातीपासूनच्या जाहिराती पासून खूप प्रसिद्ध झाले आहे . त्यानुसार ऐश्वर्या राय रणबीर कपूर ला सांगते की " मै किसिकि ज़रूरत नही ; ख्वाइश बनना चाहती हूँ . "

    आजमितिला गुंतवणूक ही आपली ख्वाइश झाली आहे . ती ज़रूरत बनली पाहिजे . जरूरत म्हणले तर फार रुक्ष होते का ? मग " ऐ दिल हैं मुश्किल " चा हवाला देत सांगायचे तर असं वागणे " अधूरे इश्क का जिक्र " , " प्यार मे जुनून ( वेडेपणा ) " , " दोस्ती मे सुकून ( दिलासा ) " असं आपण आपल्या गुंतवणुकीबाबत विचार करताना वागायला शिकावे लागेल . शिकत राहावे लागेल . लागेलच . तशी प्रत्यक्षात क्रुति करणे गरजेचे असते . नुसते तसं बोलून काहिच होत नाही . " गुफ्तगू बेचारोन की आदत होती हैं " हेच खरं ! झालेल्या चुका विसरता येत नाहीत हे कितीही खरे असले , " जख्मों के कर्ज अदा नही होते " हे सत्य असले तरी त्यातून बाहेर येण्यासाठी आपले दुःख , आपले अश्रू यांवर आवर घालता यावाच लागतो . . . . आयुष्यातही आणि गुंतवणुकीतही . हे अगदीच अशक्यच नसले तरी फारसे सोपे ही नसते ना ! म्हणून तर या सिनेमात ऐश्वर्या राय रणबीरला म्हणते ना . . . . " तुम्हारे आँसू भी कितने वफादार हैं ! तुम्हारे इजाजत के बिना बाहर भी नही आते ! " . आपली गुंतवणूक आपल्याला असं म्हणेल तो खरा आपला दिवस ! ! ! !

    तोपर्यंत आणि नंतरही आपण स्वतःला सतत हेच सांगत राहीले पाहिजे की " आज जाने की जिद ना करो " . कारण

    " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं "

    चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क, मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ, डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल - ९८२०२९२३७६
    Email - tilakc@nsdl.co.in

      November 22, 2016