वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नको वीट मानू रघूनायकाचा | अती आदरे बोलिजे राम वाचा |
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा | करी घोष त्या जानकीवल्लभाचा ||91||
अती आदरे सर्वही नामघोषे | गिरीकंदरें जाइजे दूरि दोषे |
हरी तिष्ठतू तोषला नामतोषे | विशेषे हरा मानसी रामपीसे ||92||
जगी पाहता देव हा अन्नदाता | तया लागली तत्वता सार चिंता |
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे | मना सांग पां रे तुझे काय वेचे ||93||
तिन्ही लोक जाळू शके कोप येता | निवाला हरू तो मुखे नाम घेता |
जपे आदरे पार्वती विश्वमाता | म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ||94||
अजामेळ पापी वदे पुत्रकामे | तया मुक्ति नारायणाचेनि नामे |
शुकाकारणे कुंटणी राम वाणी | मुखे बोलता रव्याति जाली पुराणी ||95||
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी | जपे रामनामावळी नित्यकाळी |
पिता पापरूपी तया देखवेना | जनी दैत्य तो नाम मूखे म्हणेना ||96||
मुखी नाम नाही तया मुक्ति कैची | अहंतागुणे यातना ते फुकाची |
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा | म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ||97||
हरीनाम नेमस्त पाषाण तारी | बहू तारिले मानवदेहधारी |
तया रामनामी सदा जो विकल्पी | वदेना कदा जीव तो पापरूपी ||98||
जगी धन्य वाराणसी पुण्यरासी | तयेमाजि जाता गती पूर्वजांसी |
मुखे रामनामावळी नित्यकाळी | जिवा हीत सांगे सदा चंदमौळी ||99||
यथासांग रे कर्म तेही घडेना | घडे धर्म ते पुण्य गांठी पडेना |
दया पाहता सर्वभूती असेना | फुकाचे मुखी नाम तेही वसेना ||100||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 8, 2016
सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये पंचगिरी करणारे डेविड शेफर्ड आणि ‘विक्रमी’ पंच
December 21, 2010
खरतर, साउथ आफ्रिकेसंबंधी लिहायचे म्हणजे थोडक्यात माझेच वर्णन करायचे, असा थोडाफार प्रकार होण्याची शक्यता आहे. अर्थात, मी थोडीफार तठस्थ वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण, काही ठिकाणी, माझा आणि माझ्या मतांचा उल्लेख अनिवार्य ठरावा. तेंव्हा, तेव्हढी सवलत,तुमच्याकडून अपेक्षित आहे.
August 19, 2018
१९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते.
October 18, 2010
पाण्याचा सारांश
पाणी पिताना तहान लागेल तेव्हाच प्यावे.
तहान असेल तेवढेच प्यावे.
तांब्या पितळीच्या कल्हई केलेल्या पातेल्यातील प्यावे, नाहीतर मातीचे मडके उत्तम.
काच किंवा स्टील हे सुद्धा चांगले पर्याय आहेत, पण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी ? कभी नही. विष आहे ते. आज दुधही प्लॅस्टिकच्या पिशवीतच मिळते. प्रत्येक वेळी हे प्लॅस्टीक फूड ग्रेडचे असेल, यावर माझा तरी विश्वास नाही.
सकाळी उठल्यावर गरज असल्यास फक्त आठ घोट पाणीच प्यावे, ते सुद्धा तोंड धुवुन, दात घासून झाल्यावरच ! त्याअगोदर नाही.
पाणी जेवता जेवताच प्यावे. सकाळी तहान नसताना, रात्री झोपताना, कधीही अधेमधे उगाच बाटली दिसली की, रात्री जर लघवी करून आले तरी पाणी शक्यतो नकोच.
पाणी जेवताना जरूर प्यावे आणि जेवणानंतर पचन पूर्ण झाल्यावर, दोन तासांनी शरीराने मागितले तरच. नाहीतर फक्त एखादा कप भर. मिक्सरचे काम झाल्यावर मिक्सर कसा धुवुन ठेवला जातो, तसं.
पावसाचे पाणी जमिनीला लागायच्या अगोदर साठवले तर शुद्धीकरण नको. नाहीतर शुद्ध केल्याशिवाय अजिबात नको.
अति पाणी अतिरिक्त पिल्याने मधुमेह, मुतखडे, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमा, अॅलर्जी, कफाचे सर्व आजार, जलोदर, संधीवात, सूज येणे, पीसीओडी, थायराॅईड, सारखे आजार तसेच वाताची दुखणी वाढतात. रक्तदाबासारख्या आजारात जर शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढणे, ही चिकित्सा असेल तर वरून पाणी का ढोसावे ?
अजीर्ण, अपचन सारख्या आजारात अन्य काही न खाता, केवळ गरम गरम पाणी पिणे हे औषध आहे.
प्रदेशानुसार पाणी आपले गुणधर्म बदलते.
तहान लागली तर पाणी जरूर प्यावे. पण तहान हा रोग असेल तर मात्र साधे पाणी हे औषध नाही. त्यासाठी काही औषधे घालून मसाला पाणी घोट घोट घ्यावे.
सूर्यास्त झाल्यावर पाणी पचनशक्ती बिघडवते, म्हणून रात्रौचे जेवण देखील सायंकाळीच करावे.
संडास साफ होण्यासाठी पाणी पिणे भ्रामक आहे. पाणी संडासवाटे बाहेर पडतच नाही, ते लघवीवाटे बाहेर पडते. म्हणजे पुनः किडनीना गरज नसताना अतिरिक्त काम.
मग संडास साफ कसा होणार ? त्यासाठी जेवताना तेल कच्च्या स्वरूपात वापरावे, आणि जेवताना गरम पाणी वापरावे. बात खतम.
ग्रीष्म आणि शरद ऋतु सोडून निरोगी माणसाने देखील पाणी कमीच प्यावे.
पाणी तोंडात घोट घोट घेऊन, घोळवून मगच हे लाळमिश्रीत पाणी प्यायले तर पचन सुधारेल.
फ्रिजमधले पाणी. ना रे बाबा ना !
आपण उजव्या हाताने जेवतो, पानातील उजव्या बाजुचे पदार्थ भरपूर खावेत, पण डाव्या बाजुचे पदार्थ कमी खावेत. म्हणून भारतीय परंपरेत पाण्याचे भांडे डाव्या बाजुला ठेवतात.
सर्वात महत्वाचे आपण भारतात राहातो, भारतातील सर्व नियमांनी आपण बांधलेलो आहोत. उगाच पाश्चात्यांनी सांगितले म्हणून आपण तसेच वागायचे, हा गुलामीचा भ्रामक मूर्खपणा आता बंद करूया,
भारतीय आहोत, भारतीय म्हणून जगुया.
पाणी हे जसे जीवन देणारे आहे, तसे आलेला जलप्रलय जीवन उद्ध्वस्त करून जातो, हे पण लक्षात ठेवूया !
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.01.2017
January 16, 2017
।।एकदन्ताय नम: बृहतीपत्रं समर्पयामि ।।
वांग्याच्या क्षुपाप्रमाणे दिसणारे हे १-२मीटर उंचीचे काटेरी क्षुप असते.ह्याची पाने ७-१५ सेंमी लांब असतात व मागील बाजुस शिरेवर काटे असतात.फुले निळा असतात व मंजीरी स्वरूपात असतात.फळ हे गोल १ सेंमी व्यासाचे कच्चे असताना हिरवे पांढरी रेघ असलेले व पिकल्यावर पिवळे होते.बी स्निग्ध ०.०५ सेंमी व्यासाचे असते.
ह्याचे उपयुक्तांग मुळ व फळ असते.
हे चवीला कडू तिखट असून उष्ण गुणाचे तसेच हल्के,रूक्ष व तीक्ष्ण गुणाचे असते.हे कफवातनाशक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग पाहूयात:
वेदना असलेल्या भागावर ह्याचा लेप करतात.
चाईवर मधासोबत ह्याचा लेप केला जातो.
उल्टी होत असल्यास मध व गाईच्या तुपासह हिच्या फळाचा रस घ्यावा.
डोरलीचे मुळ सर्दी,खोकला,दमा,ह्यात उपयुक्त आहे.
बियांचा उपयोग स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये होतो जसे पाळी वेळेत न येणे,स्त्राव कमी होणे इ.
वेगवेगळ्या त्वचा विकारात हिचा उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 7, 2017
गिरगावतल्या ठाकुरद्वारचं हॉटेल विनय इथं GST लागू झाल्यापासून खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात आलेले आहेत... या हॉटेलमध्ये १ जुलै २०१७ पासून नवे रेट कार्ड आले आहे... हॉटेलच्या मेन्यू कार्डवर नवे आणि जुने दर स्पष्टपणे लिहिलेले आहेत... या नव्या दराचे परिणाम बिलात दिसतात. बिल ५ ते १०% कमी झालेले आहे... हा बदल झालाय तो GSTमुळे..
हे काही काल - परवाला टाकलेलं उडुपी हॉटेल नाहीए... एका मराठी कुटुंबाचे ७७ वर्षं जुने हे हॉटेल आता चौथ्या पिढीच्या ताब्यात आहे. इथली मिसळ तर प्रसिद्ध आहेच... पण, पाव पातळ भाजी म्हणजे सोवळा तांबडा पांढरा रस्साच जणू..! GSTनंतर विनयच्या या दोन्ही लोकप्रिय डिशेस स्वस्त झाल्यात ही सुद्धा खवैय्यांसाठीची आनंदाची बातमी... दोन्ही प्लेट ६० रूपयाला होत्या त्या ५५ ला झाल्यात.सोबतचे सुट्टे पाव मात्र ३ रूपयालाचआहेत. कारण, तो हॉटेलात बनणारा पदार्थ नाही मागणीनुसार त्याच्याऑर्डरचे आकारमान बदलत असते.
मराठी माणसाने स्थापन केलेल्या आहार संघटनेवर आज शेट्टयांचं वर्चस्व आहे... मुंबईची भूक आणि चव त्यांच्या ताब्यात आहे. यातले बहुतांश लोक सरसकट जुन्या दरावर GSTचा अतिरिक्त बोजा लादत असताना एका मराठी व्यापाऱ्याने सर्वप्रथम चाकोरी बाहेरची वाट चोखाळली आहे... त्यांचं कौतुक यासाठी की, त्यांनी नव्या कररचनेचं खरं गुपित उघड केलंय...
आतातरी आपण आपली बिलं भरताना काळजी घेऊ का.? मोदी सरकारने आणलेल्या नव्या कररचनेला अभ्यासणार का.? वस्तू विकताना त्यावर जुन्या-नव्या किंमती स्पष्ट लिहाव्या लागणार असल्याचा सरकारी फतवा यायच्या आधी हॉटेल विनयने ते प्रामाणिकपणा दाखवत करून दाखवलं आहे. धंद्यातली सचोटी हीच मराठी माणसाची खरी ओळख..
August 17, 2017
माधव आपटे सरांच्या शब्दात सांगायचे झाले तर , ‘ क्रिकेट हा अत्यंत क्रूर खेळ ‘ आहे असेच म्हणता येईल . कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येणार नाही , तसाच काहीसा प्रकार जयंतीभाई ह्यांच्या बाबतीत घडला होता.
September 2, 2021
रेल्वेमुळे कमी खर्चात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिशय जलदपणे मालवाहतूक करता येते. पेट्रोल, डिझेलची बचत होते आणि हवेचं प्रदूषण टाळलं जातं. कोकण रेल्वेची 'रो रो वाहतूक सर्व्हिस' हे यामधले पुढचं पाऊल आहे. ही ६० ते ७० डब्यांची मालगाडी आहे. या मालगाडीत मालाने भरलेले ट्रक (ड्रायव्हर आणि क्लिनरसह) चढविले जातात. मुंबईजवळ कोलाड येथे या मालगाडीत ट्रक चढविले जातात व १८ ते २० तासांच्या प्रवासानंतर सुरतकल आणि अंकोला येथे ते उतरतात. पुढे इच्छित स्थळी पोहचतात. नाशवंत माल (फुले, फळे, भाज्या) लवकर आणि कमी पैशांत पोहचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. २००७-२००८ या वर्षामध्ये कोकण रेल्वेच्या माल वाहतुकीतून २६९ कोटी रुपये, तर प्रवासी वाहतुकीतून २३२ कोटी रुपये उत्पन्न जमा झालं. १९९१ सालाच्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १५ वर्षांतील उत्पन्नातून भरून निघाला आहे. रोज जवळजवळ ५० प्रवासी गाड्या या मार्गावर धावत असतात. एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलेल्या या कोकण रेल्वेची एकूण कर्मचारी संख्या ४१५१ इतकी कमी असून, १ कि.मी. रेल्वे अंतराला हे प्रमाण ४.६१ इतकं आहे; तर संपूर्ण भारतीय रेल्वेवर हेच प्रमाण १२.८७ इतकं आहे.
कोकण रेल्वेच्या मार्ग बांधणीमुळे दोन शहरांतील अंतर किती कमी झालं आहे याचा तक्ता अभ्यासनीय आहे.
| मार्ग | पूर्वीचा मार्ग (अंतर) | कोकण रेल्वे (अंतर) | बचत |
| १. मंगलोर-मुंबई | २०४१ कि.मी. | ९१४ कि.मी. | ११२७ कि.मी. |
| २. मंगलोर-दिल्ली | ३०३० कि.मी. | २२४९ कि.मी. | ७८१ कि.मी. |
| ३. कोचिन-मुंबई | १८४९ कि.मी. | १३३६ कि.मी. | ५१३ कि.मी. |
प्रवासाला लागणारा वेळ (तासांत)
| मार्ग | पूर्वीचा मार्ग | कोकण मार्ग | बचत (तासांत)
|
| १. मुंबई-मंगलोर | ४१ तास | १५ तास | २६ तास
|
| २. मुंबई-कोचिन | ३६ तास | २४ तास | १२ तास |
| ३. मुंबई-गोवा | २० तास | १० तास | १० तास |
महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील कणकवलीच्या स्टेशनमास्तर म्हणून त्याच गावातील एक महिला श्रीमती माया पाटोळे या काम बघत असत. बारीक-सारीक तक्रारींचं निवारण करणं व बराच वेळ निर्मनुष्य स्टेशनावर देखरेख ठेवण्याचं चोख काम त्या कसोशीने करीत. आपल्या गावाचं रेल्वेमुळे भलं झालं आहे, या भावनेमुळे त्यांना स्टेशन सांभाळण्यात भरपूर आनंद मिळाला आहे.
गोव्यातून कर्नाटकातील उडपी रेल्वेमार्ग सुरू झाला आणि गोव्यातील काणकोण स्टेशनजवळील दारूच्या गुत्त्याचं नशीबही फळफळलं. दुपारी उडपीहून निघणाऱ्या गाडीतून मद्यशौकीन या स्टेशनपर्यंत येत. कारण, कर्नाटकपेक्षा इथे दारू बरीच स्वस्त होती. संध्याकाळी मद्यप्राशन करून रात्रीच्या गाडीने ही मंडळी आपापल्या घरी मुक्कामास परतत.
या मार्गावरील एका खेड्यातील आजीबाईंनी रेल्वे कधीच पाहिली नव्हती. लग्न होऊन दुसऱ्या गावात राहण्यास गेलेल्या आपल्या मुलीच्या घरापर्यंत रुळांवरून धावणारी ही गाडी जाते हे ऐकून त्या अचंबितच झाल्या. एरवी तिच्या गावाला जाण्याचा रस्ता चांगला ४ ते ५ तासांचा होता. खाच-खळग्यांच्या रस्त्यानं सर्व्हिस मोटारने जाणं क्रमप्राप्त असे. पावसाळ्यात तर हाल विचारूच नका. आता मात्र कोकण रेल्वेमुळे मुलगी १ तासाच्या प्रवासाएवढी जवळ असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला.
कोकणी माणसांना, कोकणातील प्रदेशांना, अन्य जणांच्या जवळ आणणाऱ्या कोकण रेल्वेनं प्रवास करणं ही एक अक्षरशः वेगळीच अनुभूती असते. त्यातही पावसाळा संपता संपता कोकण रेल्वेचा प्रवास करणं म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची नुसती उधळण वेचून घेऊन प्रवास करणं असतं. हिरव्यागार भातशेतीच्या खाचरांमधून साचलेलं मातकट पाणी, भुरभुरत्या पावसात डोक्यावर कांबळ (इरली) घेऊन काम करणारा शेतकरी, दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, हा सर्व आनंद लुटायचा असेल तर डब्याच्या दाराजवळ उभं राहावं, गार वारा पीत हा खेळ पाहावा. या क्षणांची मजा काही और आहे. मुंबईहून रत्नागिरीकडे जाताना चिपळूण सुटलं, की निसर्गाचं रूप एकदम पालटतं. लाल माती व कातळीचे डोंगर थेट रेल्वे लाईनला भिडलेले. खळाळत वाहणारे छोटे-मोठे ओहोळ, दूरवर छोट्या खेड्यांत जाणाऱ्या तांबड्या मातीच्या पाऊलवाटा, अगदी रेल्वेरुळांना चिकटलेली हिरवी रोपटी, हे सर्व कापत अकराळ-विकराळ, तांबूस, पिंगट, काळपट अशा विविध रंगछटांच्या डोंगर-कपारीतून मार्ग काढत गाडी भोकेवाडीच्या बोगद्यात शिरते. काळ्यामिट्ट अंधारात डोंगर-कपारींच्या कडा डब्यावर चाल करून येतात. गाडीचा रुळांवरील घनगर्जनेचा घुमणारा आवाज छातीचे ठोके चुकवितो. मध्येच इंजिनाच्या जोरदार शिटीचा आवाज त्यात मिसळल्यावर आपला प्रवास कुठे चालला आहे हेच क्षणभर कळेनासं होतं. दहा मिनिटं अंधार आपला सोबती असतो, पण तो हवाहवासा वाटतो, आपला प्रवास असाच चालू राहावा असं वाटू लागतं आणि गाडी बघता बघता रत्नागिरी स्टेशनात शिरते. कोकणातील सर्वच स्टेशन चकाचक, स्वच्छ आहेत. तुरळक माणसांच्या स्वस्थ हालचालींची जाग असलेली ही स्टेशनं वातावरणामुळे मनाला समाधान देतात, पुन:पुन्हा येण्यासाठी आमंत्रण देत राहतात.
या कोकण रेल्वेचा प्रवास म्हटलं, की आजही एक आठवण मनात हमखास जागी होते. मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत कुडाळ रेल्वे स्टेशनावर आम्ही आठ जण उभे होतो. दिवस पावसाळ्याचे होते, पण आकाश निरभ्र होतं. गाडी सव्वीस डब्यांची असणार होती आणि प्रत्येक क्रमांकाचा डबा कुठच्या जागी येणार याचे इंडिकेटर संपूर्ण प्लॅटफॉर्मवर नीट लावलेले होते. आम्ही वाट बघत होतो. काही मिनिटांतच अनपेक्षितपणे आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. हा हा म्हणता सरीच्या सरी कोसळू लागल्या आणि आम्ही सर्वजण बॅगांसह नखशिखांत ओलेचिंब झालो. गाडी काही येता येत नव्हती. आम्ही हैराण... आणि एकदाचं इंजिन दिसलं, आम्ही डब्यात शिरलो... जवळजवळ संपूर्ण डबा रिकामा होता. जणू तो आमचाच राखीव डबा होता. ओलेचिंब कपडे वाळविण्यासाठी जागाच जागा होती. भिजलेले असूनही आम्ही सुखावलो. जरा विसवतो, तो खानपानाचा मारा सुरू झाला. मांडवी एक्सप्रेसमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांइतके विविध पदार्थ भारतातील कोणत्याच गाडीत बघितले नव्हते. पोहे, भजी, उपम्यापासून मटण, चिकन ते मसाला दूध अशा तब्बल बावन्न पदार्थांनी दहा तासांत हजेरी लावली होती.
स्टेशनवर पावसानं केलेली फजिती अलगद मागे पडली होती आणि सुरू झाला होता जिव्हासुख देणारा आणि नेत्रसुखद कोकण रेल्वेचा प्रवास! कोकण रेल्वेच्या 'घडण्याचा प्रवास मनात आठवत हा रेल्वेप्रवास करणं हे तर आणखीनच सुखद असतं.
-डॉ. अविनाश वैद्य
June 22, 2022
शुद्ध मराठीचा आग्रह हा दुराग्रह होऊ नये, कारण त्यामुळे कदाचित सामान्य माणूस भाषेपासून दूर पळण्याचा धोका आहे. आजची तरुण पिढी अशुद्ध मराठी लिहिते असा नेहमीच आरोप केला जातो. पण असे का याचा विचार कोणी केलाय का?
June 24, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti