(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री देवी

    दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री देवी

    अस्त्र-शस्त्र : त्रिशुळ
    वाहन : गो माता

    दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.

    नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.

    या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

    एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
    नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
    भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

    सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.

    पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

    -- निखिल आघाडे

      October 2, 2016


  • सुर्य नमस्कार का घालायचे ?

    आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.--

    आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस

    फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.

    सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.

    1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले

    ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.

    नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.

    फक्त केले पाहिजे रे !!?

    अरविंद जोशी B.Sc.
    ९४२१९४८८९४

      March 3, 2017


  • आतून कीर्तन वरून तमाशा !

    १९७४ साली ‘जय जगदीश हरे’ नाटकाच्या तालमीला अप्पासाहेब इनामदारही येत असत. त्यांचा मुलगा प्रकाश हा खलनायकाच्या मदतनिसाचं काम करीत असे. माझा प्रिय मित्र जयंत सावरकर माझ्या मित्राचं काम करायचा.

    एकदा लंच टाइममध्ये अप्पासाहेब म्हणाले, “मला ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या लोकनाट्याचे काही प्रयोग करायचे आहेत. त्यात शाहिराचं काम करशील का? ” हे लोकनाट्य मधुकर नेराळे (हनुमान थिएटरचे मालक) ‘जसराज थिएटर्स’ या संस्थेतर्फे पूर्वी सादर झालेलं होतं. (त्यावेळी हे लोकनाट्य फारसं चाललं नाही. पण नंतर ते ‘वैशाली थिएटर’ चे बी. पालांडे यांनी चालवायला घेतलं आणि त्याचे बरेच प्रयोग केले. ) दामू केंकरे दिग्दर्शित या लोकनाट्यात अप्पासाहेब स्वतः कीर्तनकाराची भूमिका करत असत. पूर्वरंगात शाहिराचं काम गायक नट प्रकाश घांग्रेकर हा करायचा व त्यातील कोतवालाची मुख्य विनोदी भूमिका नटवर्य शंकर घाणेकर करायचे.

      July 4, 2026


  • या मातीला जाग केव्हा येणार ?

    देवभूमी असणाऱ्या उत्तराखंड मधून आलेल्या या राष्ट्ररक्षकाची महती , या देशाच्या मातीतील प्रत्येक कणाला का नव्हती , हेच कोडे उलगडत नाही , आणि म्हणून वाटत राहते की, या मातीला जाग तरी केव्हा येणार ?

      May 19, 2025


  • स्कंदमाता – पांचवी माळ

    स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात.

      October 18, 2018


  • खंडोबाची थोडी माहिती

    " आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी " ह्या ओळी गाणे बनून सगळे कडे घुमत आहेत, Groups वर गाणे share होत आहेत . पण ह्या ओळी नक्की काय आहेत हे समजून घेउ...

    जेजुरी ला गेल्यावर तळी-भंडार हा आवशक विधी त्याचे हे बोल/ मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात , विड्याची पाने , खोबरं , लाह्या , सुपार्या , दक्षिणा , भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वर खाली करतात हि कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते . येळकोट हा कानडी शब्द आहे कानडी मध्ये येळू म्हणजे ७ आणि कोट म्हणजे कोटी , खंडेराया सोबत मणि-मल्ला शी युद्ध करताना ७ कोटी सैन्य होते , सदानंद हे खंडेरायाचेच एक नाव . ह्या सात कोटी सैन्या वरून संदानादाचा येळकोट हा गजर रूढ झाला .

    हे झालं तळी भंडार .

    आत्ता खंडोबा विषयी थोडेसे ,

    खंडोबा हे भगवान परमशिवाचेच स्वरूप होय मार्तण्ड भैरव असेही म्हंटले जाते. खंडोबा हा मुळचा कन्नड प्रांतातला , वीरशैव पंथातील दैवत . कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलारलिंग संबोधले जाते. ह्याचा सासर नेवासे गावचा . लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणार्या पत्नी ला पळवले आणि तिच्याशी गांधर्व-पद्धतीने विवाह केला.

    पुढे शिकारी ला गेल्यावर देव खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला . तिथे त्याच प्रेम बाणाईशी जडले. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरी ला आले, पण म्हाळसाबाई ला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरु झाले , खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो , ह्या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक-गीते आणि जागरण गीते लिहली गेली आहेत , पुढे ,बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरगडावर लावून देतात, अधून मधून भेटी ला जातात.

    खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी . खंडेराया ला बेल - दवणा आणि भंडारा-खोबरे वाहायची पद्धत आहे .
    दवणा हि एक सुगंधी वनस्पती आहे, खंडोबाला वाहिलेला बेल-भंडारा हातात घेवून आण म्हणजे शपथ खायची पद्धत मराठा समाजात रूढ आहे.

    खंडोबाने जेव्हा मणी-मल्लाचा पराभव केला तेव्हा मणी-मल्ल दैत्य खंडोबाला शरण आले , मणि च्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता त्याने विनंती केली कि "मला तुझा वाहन होऊ दे" आणि मल्लाने विनवणी केली "तुझ्या नावा आधी माझा नाव लागू दे" त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला , आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो "मल्हारी" ठरला .

    खंडेरायाची मूर्ती जर निट पहिली तर काळ-भैरवाच्या मूर्तीशी भयंकर साम्य आढळेल फक्त शस्त्रांचा क्रम बदलला कि दैवत वेगळं ठरतंय . म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत . पण कालभैरव हा ब्रम्हचारी दाखवला गेला आहे . ज्योतिबाची मूर्ती उभी आहे आणि खंडोबाची मूर्ती बैठी आहे , ज्योतिबाला गुलाल-खोबरं तर खंडोबाला भंडार-खोबरं वाहिला जाता . कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय कोल्हापुरात जोतीबा असा भोळा शंकर .

    खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे . एक सेना-प्रमुख म्हणून शिस्त प्रिय असणे रास्तच आहे . ह्या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत , त्यात मणीचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी , पाली-पेम्बर , नेवासे-पारनेर आणि मंगसुळी .
    खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्धकाळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्वचे होते , त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जगती ठेवली जायची त्यातूनच "जागरण-गोंधळ " ह्या लोक-कलेचा उगम झाला . सेनापती खंडोबाला त्यामुळेच जागरण अतिशय प्रिय आहे .

    लग्न झालेल नवीन जोडपं खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात,, ह्या प्रसंगी कडी-लंगर तोडायची प्रथा आहे. कडी-लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते ती गोंधळात पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्ती च्या वेळी तोडली जाते .

    मल्हारी मार्तंडाला बोली भाषेत खंडोबा म्हणतात कारण ह्याच्या हातात कायम "खंड" म्हणजे खड्ग / तलवार आहे. खंड धारण करणारा म्हणून खंडोबा .

    -- संकलन : शेखर आगासकर
    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम. लेखकाचे नाव मला माहित नाही.

      July 26, 2017


  • सेनादलांसाठी जीवनाधार संशोधन

    भारताच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान भारतातच विकसित करून, आपल्या संरक्षण दलांना उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य संरक्षण संशोधन आणि विकास संस्था करीत आहे. या संस्थेने विकसित केलेल्या काही आयुधांची आणि तंत्रज्ञानाची झलक आपण पत्रिकेच्या मागील अंकांमध्ये पाहिली आहे. हीच संस्था जीवन विज्ञान क्षेत्रातही मौलिक संशोधन करून, आपल्या जवानांना टोकाच्या विषम आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. याच संशोधनाचा हा थोडक्यात आढावा…

      October 22, 2023


  • पकडा पंढरीचा चोर

    आषाढी आली. वारकरी पंढरपूरला निघाले. पण हा पंढरीचा चोर फक्त पंढरीत राहत नाही, सगळीकडे फिरत असतो. बस त्याला पकडणारी नजर हवी. आजपर्यंत ह्या पंढरीच्या चोराला कोणी, कसे पकडले सांगत आहेत निरेन आपटे.

      March 10, 2026


  • दोन ध्रुव

    माझ्या परिचयातील दोन चित्रकार असे आहेत की, जणू दोन ध्रुवच! दोघांनीही कलेची उपासना ही संघर्षातूनच केलेली आहे. मात्र आज दोघांच्यातही मोठी तफावत आहे. त्यातील एक म्हणजे, राम. रामला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती.

      July 27, 2023


  • मराठी पाट्या

    भाषेच्या राजकारणात नेहमीच भारतीय भाषेचा बळी जातो. इंग्रजीच्या वर्चस्वाबद्धल कोणीच काही ब्र शब्द उच्चारीत नाही कारण सर्वसामान्या पेक्षा राजकारणी,संस्थाचालक,नोकरशहा व शहरी लोक इंग्रजीला शरण गेले आहेत. अशावेळी भारतीय भाषेचा विकास करण्याची जबाबदारी भारतीय भाषा प्रेमी यांची आहे.

      November 22, 2020