वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्मेरचारुमुखमण्डलां विमलगण्डलम्बिमणिमण्डलां
हारदामपरिशोभमानकुचभारभीरुतनुमध्यमाम् ।
वीरगर्वहरनूपुरां विविधकारणेशवरपीठिकां
मारवैरिसहचारिणीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ३॥
आई जगदंबेच्या अतिदिव्य सौंदर्याचे आणि वैभवाचे लोकविलक्षणत्व विशद करतांना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
स्मेरचारुमुखमण्डलां- स्मेर शब्दाचा अर्थ आहे दंतपंक्ती किंचित दिसतील अशा प्रकारचे मंद हास्य.
अशा स्मेर हास्याने, चारू म्हणजे अत्यंत आकर्षक मुखकमलाने आई जगदंबा युक्त आहे.
अशा अत्यंतिक सुंदरतम हास्याने युक्त असणार्या, विमलगण्डलम्बिमणिमण्डलां - विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, स्वच्छ, पवित्र. गंड म्हणजे गालाच्या वर आणि डोळ्यांच्या खाली असणारे, डोळे आणि कान यांच्यामधील उंचवटे.
आई जगदंबेच्या या कपोल प्रदेशावर तिच्या मणी अर्थात विविध रत्न लटकवलेल्या बटा रुळत आहेत. अशा बटांनी अधिकच आकर्षक दिसणाऱ्या,
हारदामपरिशोभमान- मोत्यांच्या असंख्य माळांनी अत्यंत शोभायमान असणाऱ्या,
कुचभार- समस्त विश्वाच्या भरणपोषणासाठी पर्याप्त स्वरूपात विश्व तृप्तीकारक अमृताने भरलेल्या स्तन मंडलाने,
भीरुतनुमध्यमाम् - मध्यभाग अर्थात नाजुक कंबर भंग पावेल की काय? अशी भीती असणाऱ्या, अर्थात आई जगदंबेची कंबर इतकी नाजूक आहे की हार आणि स्तनभाराने ती लचकेल की काय? अशी शंका निर्माण होते, इतकी नाजूक.
वीरगर्वहरनूपुरां- विश्वातील समस्त वीरांचा गर्व ज्या नुपुरांच्या अर्थात त्या पैंजणांनी युक्त असणारी चरणकमले नष्ट करतात अशा,
अर्थात जगातील सर्व वीर जिच्या चरणी शरण येतात अशा, विविधकारणेश्वरपीठिकां- अनेक शंकरांना आपले चरणपीठ म्हणजे पाय ठेवण्याचे साधन समजणाऱ्या,
मारवैरिसहचारिणीं- मार अर्थात कामदेव. त्याचे वैरी म्हणजे भगवान शंकर. त्यांची सहधर्मचारिणी असणाऱ्या,
मनसि भावयामि परदेवताम् - परमदेवता आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 17, 2020
यादेशाचे सर्वस्व कशात असेल तर ते शेतीत आहे आपल्या घामाने ही शेती कसणाऱ्या शेतकऱ्यात आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी हा विषय टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न देशाच्या दृष्टीने आत्मघाताचाच ठरणार आहे. दुर्दैवाने या देशाचे धोरण ठरविणाऱ्या संसदेला, त्या संसदेचे नेतृत्व करणाऱ्या सरकारला याची जाणीव राहिलेली दिसत नाही.
June 18, 2006
जगात सर्वत्र आर्थिक घडामोडी मोठय़ा प्रमाणावर घडत असतात किंबहुना बहुतेक घडामोडींचं केंद्र हे अर्थकारणच असतं. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राची निवड ही ह्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
February 7, 2022
जहाजावर नोकरी करावी लागेल हे माहीत नसताना म्हणजे सुमारे 15 वर्षांपूर्वी आमच्या जुन्या घरात मोठा फिश टँक बसवला होता. आता दोन वर्षांपूर्वी नवीन घर बांधताना अजून मोठा फिश टँक घरात बसवून घेतला. फिश टँक मध्ये रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे सुंदर सुंदर मासे आणि त्यांची शांत व संथ हालचाल पाहून आपल्यालाच शांत शांत वाटू लागतं.
October 24, 2019
आज भाऊबिज. भावाला बहिणीने ओवाळायचा दिवस. आपल्या हिन्दू संस्कृतीत प्रत्येक नात्याची पूजा बांधली आहे..बाकी सर्व सोडा पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘धद्या’ची पूजा करून ‘गल्ल्या’चीही कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून.
November 1, 2016
सप्त महासागरावर तरंगणारे हे अंडाकृती विश्व म्हणजे एक प्रकारचे महान बेटच आहे आणि या महाबेटाचे मध्यवर्ती ऊर्जा केंद्र म्हणजेच अलौकिक अशा अध्यात्मिक तेजाने उजळून निघणारे ‘जंबुद्वीप’ (Rose apple island) म्हणजेच आपला हिंदुस्थान होय. प्राचीन ग्रंथात या जंबुद्वीपाचे वर्णन, महत्त्व सांगितले आहेच.
January 21, 2023
उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही .
September 9, 2024
पाणी शुद्धीकरण भाग नऊ
या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ?
ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण पोचतो यातही स्पर्धा व्हायची, बिचारा पाणी काढणारा तसाच तहानलेला रहायचा....
आठवतंय का शाळेतील पाण्याचे पिंप ? पी ई चा तास संपला की, धावत पळत पिंपाभोवती पाणी प्यायला धावत जाणं.... एकाने नळाखाली भांड धरलं असताना मधेच कोणीतरी नळ बंद करणे, पाणी वरून पित असताना मुद्दाम कोपरावर हात मारून पाणी त्याच्या शर्टावर सांडणे, मग रागाने भांड्याला तोंड लावूनच पाणी पिणे, खूप घाई असली तर नळाखाली पाणी पडण्याची वाट न बघता पिंपाचे झाकण काढून वरूनच भांडे बुचकळवून प्यायलेले पाणी. हातावरची सर्व शुद्धी पाण्यात उतरायची...
गंमत होती सर्व ...
गेली ती सारी गंमत.....
"एवढं अशुद्ध पाणी तुम्ही पित होतात बाबा," लेकीनं प्रांजळपणे प्रश्न विचारला. तिला म्हटलं,
" यामुळेच आमची इम्युनिटी वाढत होती. असंच पाणी पिण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे चांगलं शुद्ध पाणीच कधीतरी बाधायचं...." माझं तिरकस उत्तर.
त्यावर ती म्हणाली,
" आमच्या शाळेतच्या बाजुला लमाणी लोकांची वस्ती आहे. तिथली मुलं आम्ही खेळताना पाहून ग्राऊंडवर येतात आणि आमच्याबरोबर खेळतात. काय साॅलीड स्टॅमिना असतो एकेकाचा, पण अस्वच्छ दिसतात. आंघोळ नाही. वर कपडे नसतातच, सर्व अंगाला माती लागलेली, हात न धुताच खातात, पाणी पण साधेच पितात, न ऊकळलेलं."
तेव्हा लेकीला कुलकर्ण्यांची एक चारोळी ऐकवली,
" पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं,
कुठेही उगवतं,
म्हणून त्याचं
कसंही निभावतं "
खरंच आहे, यानेच त्यांची प्रतिकारक्षमता वाढत असेल का ?
जमिनीवर पडलेलं खायचं नसतं, आमच्या लहानपणी खाली पडलेली एक सुद्धा चिंच, बोर किंवा लिमलेटची गोळी वाया जाऊ देत नव्हतो. काळा झालेला आंबा, काळा भाग काढून टाकून खात होतो, पक्ष्यांनी खाऊन टाकलेले पेरू आधी खात होतो, चुकुन खाली पडलेला प्रसादाचा पेढा किंवा फुटाणा मटकावीत होतो, आता आमच्या पोरांना शाळेला जाताना रोज उकळलेलं पाणी देतोय, पण शेंबडं ते शेंबडच !
जरा पाणी बदललं, सहलीला गेली, भेळवाल्याकडचं पाणी प्याली, मामा मावशीकडून सुट्टीवरून आली की आजारी पडलीच म्हणून समजा. असं का ?
एवढ्या निर्जंतुक पाण्याची रोज सवय असली तर जरा कधी पाणी बदललं तर आजारी पडणारच ना !
आजच्या भाषेत "इम्युनिटी" कशी वाढणार आणि कधी वाढणार ? जरा पिऊ देत ना साधं पाणी, बारा गावं, बारा ठिकाणचं पाणी पिऊन सगळीकडचं पाणी पचवायची सवय होते ना ! आणि एखाद्या रोगाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, दंडावर, अर्धवट मारलेले रोगजंतुच टोचून भरतात ना !
हे असं लिहिलेलं पण काही मातांच्या पचनी पडणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.01.2017
January 5, 2017
मॉलमध्ये गेल्यानंतर ट्रॉली ढकलत शॉपिंग करणं, हे आपल्यापैकी अनेकांना आवडतं. परंतु कोणे एके काळी या ट्रॉलींचा वापर करणं ग्राहकांना अपमान वाटत होता. चातुर्याने केलेलं प्रमोशन आणि बदल यांच्यामुळे ट्रॉली अर्थात शापिंग कार्ट आज कमालीच्या लोकप्रिय आहेत. अमेरिकेतील एका सुपरमार्केटच्या मालकाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी तयार केलेली ही कार्ट आता सर्वसामान्यांच्या हाती जाऊन विसावली आहे.
अमेरिकेतील ओक्लोहोमा शहरात असलेल्या ' पिग्गली विग्गली ' या सुपरमार्केटचा मालक सिल्यान गोल्डमन आपल्या ग्राहकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न करत असे. ग्राहकांना खरेदीचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. ग्राहकांनी जास्त सामान घेतल्यानंतर ते सांभाळता येत नसल्याने एका क्षमतेपलीकडे ते खरेदीच करत नसल्याचं गोल्डमनच्या लक्षात आले. त्यासाठी काय उपाय करता येईल, याचा तो विचार करू लागला. बास्केट उपलब्ध करुन दिलं तरीही तीच समस्या कायम राहत असल्याचं त्याला माहिती होते.
एके रात्री तो ऑफिसमध्ये बसून याच विषयावर विचार करत होता. त्यावेळी त्याच्या सुपरमार्केटमधील मेकॅनिक क्रेड यंग त्याच्या केबिनमध्ये आला. त्याचक्षणी गोल्डमनला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या केबिनमधील लाकडी खुर्चीला बास्केट लावण्यास सांगितलं. त्यानंतर त्या खुर्चीच्या चारही पायांना चाकं लावण्यास सांगितलं. ही चालतीफिरती खुर्ची पाहून गोल्डमन खूश झाला. त्याने अशाप्रकारच्या काही खुर्च्या तयार करुन सुपरमार्केटमध्ये ठेवण्यास सांगितलं.
उत्साहाने दुसर्या दिवशी गोल्डमन आल्यानंतर त्यानं पाहिलं, तर एकही ग्राहक या खुर्च्या वापरत नसल्याचे त्याला दिसून आलं. आम्ही खरेदी केलेलं सामान अशा खुर्च्यावर ठेवून आम्ही फिरायचं का, असा प्रश्न ते विचारु लागले. गोल्डमनने मग वेगळा मार्ग अनुसरला. त्याने या खुर्च्या ओढण्यासाठी काही माणसं ठेवली. हळूहळू लोकांना ही सुविधा आवडू लागली. तोपर्यंत त्यात बरेच बदल होत गेले. ४ जून १९३७ साली गोल्डमनने सुरू केलेली ही फिरती खुर्ची नंतर शॉपिंग कार्ट म्हणून लोकप्रिय पावली.
आज संपूर्ण जगात या कार्टचा वापर केला जातो. आता तर लहान मुलांना त्यावर बसवण्याची सोयही करण्यात आली आहे.
कधी एके काळी खूळ म्हणून ज्याकडे पाहिलं जात होते, आता त्याकडे खरेदी करतानाची महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं जात आहे.
October 9, 2016
गणपती आणि गाणपत्य संप्रदायाचा चालताबोलता विश्वकोश म्हणजे कै. जयंतराव साळगावकर ! त्यांनी हे सुवर्णगणेशाचे सुंदर मंदिर मालवणमध्ये बांधले आहे.
येथे गणपतीचा थाट पूर्णपणे वैभवशाली आहे. गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. रिद्धी सिध्दीही नेहेमी पाहायला मिळतात त्यापेक्षा वेगळ्या आहेत . गणपतीच्या दोन्ही बाजूंना मूषक जोडी, दोन बाजूंना लामणदिवे,अत्यंत देखणी प्रभावळ आणि राजेशाही चौरंग ही आणखी काही वैशिठ्ये ! गाभारा प्रशस्त आहे.
त्यामानाने मंडप लहान आहे पण ८ खांब, त्यावरील विविध रूपातील गणेशमूर्ती, विविध दिवे आणि प्रवेशद्वारातील २ हत्ती इत्यादींमुळे तो खूप प्रसन्न आणि आकर्षक वाटतो. भविष्यात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या अमाप वाढू शकते. त्यादृष्टीने मात्र मोठ्या वाहनांसाठी वाहनथांबा, शिस्तबद्ध दुकाने, प्रसाधनगृहे, थोडे रुंद रस्ते यांचे नियोजन आत्ताच करायला हवे.
April 13, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti