पंढरीची वाट

पंढरीची वाट -
पाऊले चालती,
माऊली माऊली -
गजर मुखातुनी.

भागवताची पताका -
घेऊनी सोबत ,
भाबडे दिसे ते रूप -
वारकऱ्यांचे.

मनी एक भाव -
दर्शनाचा ठाव,
दुजा न विचार -
हृदयी वसे.

भजन कीर्तनाचा -
उसळे कल्लोळ,
टाळ मृदुंगाची मिळे -
साथ तया.

मेळा वारीचा -
वेगे वेगे चाले,
ओढ भेटीची मनी -
विठुरायाच्या.

कळस पडे दृष्टीस -
दुरून राऊळाचा ,
आस दर्शनाची -
वाढे अता .

क्षण एक मिळे रूप -
पहावया त्याचे ,
अष्टसात्विक जागती -
भाव सारे.

इतुक्या मायेने विठू -
घेती तुझे नाव,
दुजा कुणा नशिबी -
हे भाग्य नाही.

साजिरे गोजिरे उभे -
रूप पंढरीत,
वेड सकल जनां -
लावितसे,
वेड सकल जनां लावितसे.

राम कृष्ण हरी

प्रासादिक म्हणे

--प्रसाद कुळकर्णी



पंढरीची वाट –
पाऊले चालती,
माऊली माऊली –
गजर मुखातुनी.

भागवताची पताका –
घेऊनी सोबत ,
भाबडे दिसे ते रूप –
वारकऱ्यांचे.

मनी एक भाव –
दर्शनाचा ठाव,
दुजा न विचार –
हृदयी वसे.

भजन कीर्तनाचा –
उसळे कल्लोळ,
टाळ मृदुंगाची मिळे –
साथ तया.

मेळा वारीचा –
वेगे वेगे चाले,
ओढ भेटीची मनी –
विठुरायाच्या.

कळस पडे दृष्टीस –
दुरून राऊळाचा ,
आस दर्शनाची –
वाढे अता .

क्षण एक मिळे रूप –
पहावया त्याचे ,
अष्टसात्विक जागती –
भाव सारे.

इतुक्या मायेने विठू –
घेती तुझे नाव,
दुजा कुणा नशिबी –
हे भाग्य नाही.

साजिरे गोजिरे उभे –
रूप पंढरीत,
वेड सकल जनां –
लावितसे,
वेड सकल जनां लावितसे.

राम कृष्ण हरी

प्रासादिक म्हणे

–प्रसाद कुळकर्णी

Author