वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे.
November 14, 2023
नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी ….
August 1, 2017
नेहेमीचा शौनक अभिषेकींचा खर्ज /शास्त्रीय आवाज येथे अधिक मऊ / हळुवार आणि भावगीत सुलभ वाटतोय. त्यामानाने राहुलचा थोडा कठोर/ टणक वाटतोय.(” किंचित हार्श” ला हा शब्दपर्याय जवळचा वाटतो कां?)
December 20, 2021
लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही.
October 1, 2018
भारतीय उपचार पद्धतीला हजारों वर्षांची परंपरा लाभली आहे. तसेच हजारो वनस्पतींचा वापरही होत आलेला आहे. कितीतरी वनस्पती घराघरांत सहजतेने वापरण्यात येत आहेत. शेकडो वनस्पती आमच्या दैनंदिन आहाराचा भाग झालेल्या आहेत, आमच्या पूर्वजांनी सांगितलेले औषधी तत्व विसरलो असलो तरी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर सुरूच आहे. प्राचीन ज्ञानाचा आजच्या संदर्भाने पूर्ण कौशल्यासह वापर करून आपली प्रगती साधने आवश्यक आहे.
June 11, 2012
"आईनस्टाईन म्हणायचा ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची ."
हे पटवून देताना कालच्या लोकसत्तातून गिरीश कुबेरनी फारच सुंदर लेख लिहला आहे..
गेल्या आठवड्यात आपल्या देशाच्या भांडवली बाजाराचा निर्देशांक ३० हजारांच्या पुढे गेला. त्याच कालावधीत अँपल कंपनीचे भांडवली बाजारातील मुल्य तब्बल ८०४ बिलियन डाँलर इतके प्रचंड वाढले.
अजून सोपे सांगायचं तर ५२,२६,००० कोटी रुपये इतकी झाली . आपल्या देशातल्या सर्व कंपन्यांचे बाजारमुल्य आहे ५२,१५,००० कोटी.
अजून सोपं .......
अँपलकडे आजमितीला रोख रक्कम आहे १५,६०,००० कोटी रुपये आणि आपल्या देशातल्या तीन सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांचं (रिलायन्स , टिसीएस आणि एचडिएफसी बँक ) एकत्रित मूल्य आहे १३,००,००० कोटी रुपये . म्हणजे अँपलने या तीनही कंपन्या विकत घ्यायचे ठरवले तरी २ लाख कोटी शिल्लक राहतील .....
हे तर काहीच नाही अँपलचे मुल्य ब्राझील, सिंगापूर ,मलेशिया वगैरे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुल्यापेक्षाही अधिक आहे.
वरच्या संख्यापुराणाचा सारांश खूप खूप महत्त्वाचा आहे..........
आज जगातल्या पहिल्या पाच कंपन्या आहेत अँपल , अँमेझाँन, अल्फाबेट म्हणजे गुगल, मायक्रोसाँफ्ट आणि फेसबुक.
या सर्व कंपन्यावर नजर टाकताच लक्षात येईल की,
१) या पाचही कंपन्या नवअर्थकाळातल्या आहेत.
२) या पाचही कंपन्या या पहिल्या पिढीच्या आहेत.
३) या पाचही कंपन्या म्हणजे एक कल्पना होती.
४) या पाचही कंपन्या एकाच देशात जन्मलेल्या आहेत. तो म्हणजे अमेरिका . त्यातही ही सर्व मूळ अमेरिकनच्या पोटी जन्माला आलेली नाहीत तर ती निर्वासीतांची मुलं आहेत.
५) आतातरी कल्पनाशक्तीला महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे . ज्ञानाला मर्यादा असतात पण कल्पनाशक्तीला नाही. ज्ञान भरपूर आहे पण त्याचं काय करायचं हेच माहीत नसेल तर काय उपयोग ? तेव्हा ज्ञान कमी असलं तरी एकवेळ चालेल पण कल्पनाशक्ती हवीच हवी.
"कल्पनाशक्तीला मुक्त वाव द्यावा" .
हे लिहू नका, ते वाचु नका, हेच खा, हे खाऊ नका..... अशा निर्बंधी समाजाची संतती किरटीच असते.
June 7, 2017
बँकेचे पहिली शाखा मांडवी (बडोदा) मध्ये उघडली गेली. दोनच वर्षात बँकेने दुसरी शाखा अहमदाबाद इथे काढली गेली. त्यानंतर मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली इथे बँकेने शाखा काढल्या. बँक खऱ्या अर्थानी वाढली ती दुसऱ्या महायुद्धानंतर.
July 20, 2021
समुद्राचं पाणी छोट्या वाफ्यांमध्ये जमा करून सूर्यप्रकाश व वारा यांच्या साहाय्याने त्याचं बाष्पीभवन केलं जातं. सर्व पाणी निघून गेलं की खाली जाड मीठ उरतं. पूर्वी असं मीठ खडे मीठ म्हणून विकल जाई. समुद्राच्या पाण्यात फक्त सोडियम क्लोराइडच नाहीतर मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांची संयुगेही अल्प प्रमाणात असतात.
March 4, 2023
८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या .
March 21, 2017
मित्रांनो सध्या तापाची साथ जोरात सुरु आहे.
लहान बाळापासून वयस्कर माणसांपर्यंत सर्व जण तापाने आजारी आहेत व दवाखान्याच्या खेपा घालत आहेत.
दोन तीन दिवस औषध,injection, saline लावून देखील ताप कमी जास्त होत राहतो.मग तुमचा डॉक्टर रक्त तपासायला सांगतो,ज्यात प्लेटलेट कमी झाल्याचे समजते किंवा डेंगू ची टेस्ट positive येते.
ह्यावर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायचा सल्ला मिळतो.
घाबरलेला पेशन्ट आणि धास्तावलेले कुटुंबीय त्याला ऍडमिट करतात. ट्रीटमेंट सुरु होते,सलाईन चा ,injections चा मारा सुरु होतो,रोज रोज रक्त तपासणी केली जाते .
पण दुर्दैवाने काहींच्या प्लेटलेट्स वाढण्याच्या ऐवजी उलट कमीच होताना दिसतात.
अश्या वेळी कोणीतरी सांगितलेले किंवा वाचलेले उपचार म्हणजे पपईच्या पानांचा रस,ड्रॅगन फ्रुट,किवी इत्यादी पेशन्टला देण्यात येतात मात्र विशेष फायदा होताना दिसत नाही.
सुदैवाने अश्या डेंगू तापासाठी किंवा कोणत्याही viral तापासाठी (म्हणजे चिकूनगुण्या,फ्लू इत्यादी) अगदी रामबाण औषध आहे
Eupatorium 200 (यूपाटोरीयम 200)
पेशन्टला डेंगू झाला असेल, ताप उतरत नसेल,प्लेटलेट खूप कमी झाले असतील,अंगदुखी फार असेल,डोके खूप दुखत असेल
तर अधिक वेळ न दवडता वरील औषध liquid मध्ये मागवा.
अर्धा लिटर पाणी चांगले उकळून घ्यावे मग थंड झाल्यावर एका प्लास्टिक च्या बाटलीत भरून घ्यावे
ह्या बाटलीत वरील औषधाचे फक्त 3 थेंब टाकावे आणि बाटली झाकण लावून जोरजोरात हलवावी आणि
2 - 2 झाकण औषध दिवसातून दर 3- 3 तासाने देत रहावे.
पेशन्टला 24 तासात फरक जाणवेल,आराम होईल आणि 48 तासात तो जवळजवळ बराच होईल.
तर तुमचा कोणी नातेवाईक आजारी असेल तर Eupatorium 200 हे औषध होमिओपथी च्या दुकानातून लगेच मागवा आणि सांगितल्याप्रमाणे सुरु करा.
डॉ प्रसाद हजारे,भिवंडी ठाणे
व्हाट्स अप 9881374994
October 24, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti