वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
टाकोज हा मेक्सिकन पदार्थ असून अमेरिकेत आणि कॅनडा मध्ये दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टाकोज दिवस साजरा केला जातो.
October 4, 2021
जंगलातल्या मोकळ्या माळावर चरणांरा ‘रानगवा’ एवढ्या बेफिकिरीत वावरत असतो, की तो जणु काही त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राटच आहे. त्याची ताकदच तशी प्रचंड असते. शरिराचा विलक्षण सुंदर घाट आणि पिळदार स्नायू यामुळे तो दिसतोही उत्तम शरीर कमावलेल्या पैलवानासारखा. व्यायामानं जसं पैलवानाचं शरीर चमकत असतं तशीच त्याची त्वचाही चमकत असते. त्याचं ते ‘बेरड’ रूपंच सगळ्या जंगलविश्वाला टरकावत असतं.
September 9, 2018
भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही.
October 11, 2020
मुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत.
February 5, 2019
मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग ! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की,
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ||
ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ||
देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ||
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ||
संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की, एखादा मनुष्य प्रपंचातील विषय भोग घेत असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्याने त्या विषयांचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करने सोडून दिले. परंतु त्याने वाईट कर्म सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंवा मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. याचाच अर्थ असा की, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग समोर उभा राहतो.
संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय असेही सांगतात की, हे असे उफराटे वर्म म्हणजे उलटे वर्म आहे. आणि धर्मा अंगीच अधर्म आहे. ज्या कर्मामुळे देवात आणि भक्तामध्ये अंतर पडते ते कर्म म्हणजे पाप कर्म ! आणि देवाचे कर्म म्हणजेच सत्कर्म ! हे लक्षात घेऊनच भक्ताने नीतीने आणि न्यायाने जगायला शिकले पाहिजे. खोटे व्यर्थ संकल्प चांगल्या व्यक्तीने कायमचे सोडून द्यावे.
तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ असेल, जिथे आपला परमार्थ असेल तेथे आपण आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत राहावे.
*विठोबासी शरण जावे |*
*निजनिष्ठे नाम घ्यावे ||*
विठोबाचे शरण जाऊन त्याचे नाम घेत अखंड चिंतन करत राहण्यातच खरा धर्म आहे, खरा स्वार्थ आहे आणि खरा लाभ आहे. कारण विठोबाचे नामस्मरण हे फक्त निमित्तमात्र आहे, परंतु त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आपण सकात्मक विचाराने पुढील कार्य करायला लागतो, ज्याचे भोग आपणास सकारात्मकच मिळते.
-- डॉ. शांताराम कारंडे
November 12, 2018
भारतातील प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटण्याचे आयुर्वेदिक महत्वही आहेच. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे.
पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात.
खाली दिलेले सर्व सामान आपणाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळु शकेल. त्यात गुढळ्या असल्यास फोडून घेऊन , चांगले चाळून घ्यावे व हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
साहित्य
| मसूर डाळ पीठ | 110 | ग्राम |
| आवळकाठी | 10 | ग्राम |
| सरीवा | 10 | ग्राम |
| वाळा | 10 | ग्राम |
| नागर मोथा | 10 | ग्राम |
| जेष्टमध | 10 | ग्राम |
| सुगंधी कचोरा | 10 | ग्राम |
| आंबेहळद | 2 | ग्राम |
| तुलसी पावडर | 10 | ग्राम |
| मंजीस्ट | 10 | ग्राम |
| कापूर | 2 | ग्राम |
हे घरी बनवलेले उटणे आपण सणासुदीला वापरु शकता. उटणे फक्त दिवाळीतच का वापरायचे? घरच्या घरी बनवलेले उटणे केव्हाही वापरता येईल.
October 28, 2016
८ जून १९४८ रोजी एअर इंडियाने भारत इंग्लंड हवाई सेवा सुरू केली. एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडिया जवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती.
June 8, 2021
कर्करोगाच्या संभाव्य कारणांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आणि कर्करोगाच्या प्राथमिक स्तरावर ओळखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हे याचे मुख्य उद्दीष्ट आहे.
November 7, 2021
काल माझा एलएलबी च्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला .सकाळ पासून मनात सारखी हुरहूर होती .कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर , परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र.मी अधून मधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते.घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मित हास्य असलेला फोटो पाहत .नकळत मला माझे वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली .आजचा तो दिवस आहे ज्याची वाट प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने पाहतो .प्रत्येकाची ती जिवणपरिक्षा असते . तशी माझ्याही विचारांची घालमेल मनात सतत सुरू होती बाबाचा फोटो पाहून.... त्या जीवन परीक्षेबाबत ,विचारा विचारात नकळत आठवले ते दिवस .मी बारावी पास झाली मी मेडीकल ला जाणारी पण खूप वादळ येऊन गेले आयुष्यात कारण बाबाचे ठीक दुसर्या दिवशी कॅन्सर ने निधन झाले मी बाबाच्या लाडकी लेक .आयुष्याच नकोस वाटले होते बाबा गेल्यावर मग तिथे जीवनाचा काय प्रश्न .मी फक्त बाबाच्या दुःखात बाबांना ओल्या डोळ्यांनी शोधत फिरणारी .पण अश्यात माझा भाऊ याने तो जिथे शिकला त्याच लॉ कॉलेज मधे प्रवेश केला माझा .माझे वक्तृत्व अतिशय चांगले त्यामुळे माझ्या आपल्याना तो निर्णय फार आवडला .मी कॉलजमध्ये जाण्याचे टाळत होते पण आई कडे पाहून परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती तेव्हा कॉलेज सुरू केले.नवीन अभ्यासक्रम हातात पडणारी भलीमोठी पुस्तक .कॉलेजमधील अभ्यासक्रम शिकून झाला .क्लासमेट नवीन शिक्षक ही नवीन पण न घाबरता आत्मविश्वासाने मी अभ्यास सुरू केला .पातूर ते अकोला बस ने प्रवास करावा लागत असायचा बस स्टँड वर गेले की बाबाची आठवण यायची .. बाबाच्या ओळखीचे लोक दिसायची तिथेच नकळत आसवे डोळ्यातून वाहत असायची.तो रोजचा बस चा प्रवास माझ्या सदैव आठवणींचा राहील .कारण मी सलग तीन वर्षे बस मध्ये माझे आसवे पुसत पुढे गेलेली आहे .बस वेगाने धावायची त्यापेक्षाही वेगाने माझे मन धावायचे बाबांच्या आठवणी मध्ये ....पण दुःखाने व्याकुळ झालेल्या मनाला बाबा गेल्यावर ज्यांनी मला धीर दिला असे माझे आई भावंड आणि माझ्या बाबाचे मित्र मोहन जोशी काका या सर्व लोकांनी मला जो धीर दिला आज त्या धिरामुळे मी स्वतःला सावरत इथपर्यंत आले असे मला वाटत होते.विचारा विचारात सकाळ झाली .मी लवकर तयार होऊन नेहमीच्या बस स्टँड वर आली .आजचा तो दिवस आहे जो कशा आला केव्हा आला मला कळत नव्हतं असे मनात विचार चालू होते .मी फार उत्सुक होते निकाल पाहायला .बस मध्ये बसून केव्हा अकोला आला कळलेच नाही. कॉलेज मध्ये पोहताच सर्व मैत्रिणी भेटल्या माझ्या नवीन प्रकाशित पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा देत.आमच्या चांडक मॅडमने ही माझे खूप कौतुक केले.सगळाच आधीपेक्षा वेगळं घळत होत निकाल या वेळी ऑफलाईन लागला होता त्यामुळे निकाल पहायची आतुरता शिगेला पोचली होती.लवकरच आमचा निकाल मॅडमच्या हाती आला आम्ही सर्व कॅबिन मध्ये गेलो सर्वांचा एकामागून एक निकाल कळत होता.आता मॅडमनी माझी मार्कशीट हातात घेतली अन् मी फर्स्ट क्लास पास झाल्याचे कळवले .कॉलेज मध्ये टॉपर येण्याचा आनंद तर होताच पण ह्या क्षणाला माझे नकळत डोळे भरून आले.कारण माझ्या मैत्रिणी त्यांच्या बाबांना कॉल करून निकालाची बातमी देत होत्या .त्यावेळी मला वाटले आज माझे बाबा असते तर मी फर्स्ट क्लास टॉपर आल्याचे त्यांना किती कौतुक असते .अभिमानाने त्यांनी माझी पाठ थोपटून मला कौतुकाने अॅडव्होकेट म्हणून हाक मारली असती क्षणभर मी त्या निकालाच पाहत राहिला .ती माझी गेलेली पाच आठवणींचे आठवत .तेवढ्यात मैत्रिणीने विचारले विशाखा तू घरी कॉल नाही केला मग लगेच भानावर येत माझ्या भावा बहिणींला कॉल करू सांगत मी ती आनंदाची बातमी त्यांना दिली सांगताना डोळे भरून आले अन् लगेच कॉल कट केला .सर्वांसारखे माझेही स्वप्न होते. की बाबाचे नाव मोठं करावे अन् त्यावेळी कौतुकाने त्यांनी मला शाबासकी द्यावी .पण मात्र सदैव मन ते सोबत असल्याची जाणीव करून देते .कारण जेव्हा मी पेपर द्यायला जायची तेव्हा मैत्रिणीचे बाबा याचे तेव्हाही माझ्या भोळ्या मनाला मनात बाबा नसल्याची उणीव करून जायचे ...असे आसवांच्या पुरात गेलेली माझे पाच वर्षे पूर्ण झाली अन् आज तो निकालाचा दिवस माझ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी गाथा लिहीन गेला हा माझा दुःखाचा प्रवास या वेळी सोबतीला होत्या माझ्या बाबांच्या आठवणी माझ्या सोबत आहेत जे मला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त लढ विशाखा असे म्हणतात.कालचा निकालाचा दिवस हा सदैव माझ्या स्मरणात राहील...... कारण ती माझ्या जीवनातील पहिली यशाची पायरी मी चढले पण खरे बाबाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मला त्यांच्या आठवणीला जीवन नौका करीत ...कारण बाबाचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे.
अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जि.अकोला
July 30, 2019
इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-दृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते।
दृष्टि: प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टराया:।।९।।
इष्टाविशिष्टमतयोऽपि- इष्ट म्हणजे आवश्यक असलेली. विशिष्ट अर्थात योग्य प्रकारची.
त्याला अ उपसर्ग लावला. अर्थात विशिष्ट प्रकारची नसलेली.
मती म्हणजे बुद्धी.
अपि म्हणजे सुद्धा.
एकत्रित अर्थ केला तर 'आवश्यक असणारी विशिष्ट प्रकारची बुद्धी नसली तरीसुद्धा.'
यया दयार्द्रदृष्टया- जिच्या दयापूर्ण दृष्टीने.
त्रिविष्टपपदं - स्वर्गातील स्थान.
सुलभं लभन्ते- सहजतेने प्राप्त होते.
अर्थात आई महालक्ष्मीच्या दयापूर्ण दृष्टीने ज्यांच्याजवळ स्वर्गात जाण्यासाठी आवश्यक बुद्धी नाही. तितकी ज्यांची पुण्य कर्मे नाहीत त्यांनादेखील सहजपणे स्वर्गाचे स्थान प्राप्त होते.
स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची बुद्धी असावी लागते. शास्त्राचे,यज्ञयागाचे ज्ञान असावे लागते. मात्र आईची कृपा झाली तर असे ज्ञान नसणाऱ्यांना सुद्धा, याच जगात धनसंपत्तीच्या आधारे स्वर्गीय आयुष्य जगता येते. हा भाव.
कशी आहे ती दृष्टी? तर प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां- प्रहृष्ट अर्थात पूर्णपणे फुललेल्या,
कमलोदर म्हणजे कमळाच्या आतील गाभ्याप्रमाणे.
दीप्तिरिष्टां- म्हणजे सौंदर्याने युक्त असलेली.
अर्थात कमळाच्या आत असणाऱ्या गाभ्याप्रमाणे परम कोमल, आकर्षक, रसपूर्ण अशी आईची दृष्टी आहे.
पुष्करविष्टरा- पुष्कर म्हणजे कमळ. तर विष्टर म्हणजे आसन. अर्थात कमळावर बसलेल्या, त्या आई महालक्ष्मीची दृष्टी,
पुष्टिं कृषीष्ट मम - मम म्हणजे माझे, पुष्टी म्हणजे कल्याण, कृषीष्ट म्हणजे करो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 18, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti