वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे चन्द्रचूड मदनान्तक शूलपाणे
स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शंभो ।
भूतेश भीतभयसूदन मामनाथं
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ १ ॥
भारतीय संस्कृतीमध्ये, उपासनेचा क्षेत्रामध्ये नामा ला प्रचंड महत्त्व आहे. सर्वच देवतांच्या सर्व पंथात, संप्रदायात नामस्मरण ही समान गोष्ट आहे. भगवंताच्या विविध नामांमधून त्याच्या विविध गुणांचे वर्णन केलेले असते. स्वरूपाचे निर्देशन केलेले असते.
याच कारणाने नामस्मरणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी या स्तोत्रात भगवान शंकरांच्या विविध नामांची गुंफण केली आहे. त्यांचे अर्थ पाहणे देखील तेव्हाचा अनुभव असेल. पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
हे चन्द्रचूड - ज्यांनी आपल्या चुडा म्हणजे केशकलापावर चंद्रकोर धारण केली आहे असे,
मदनान्तक - ज्यांनी आपल्या तृतीय नेत्रातील अग्नीने मदनाला भस्म केले असे,
शूलपाणे- शूल म्हणजे टोक. तीन टोके असल्यामुळे भगवंताच्या आयुधाला त्रिशूल म्हणतात. पाणि म्हणजे हात. ज्यांनी हातात त्रिशूळ घेतला आहे असे, तीनही गुणांचे संचालक.
स्थाणो - परम स्थिर, अविचल,
गिरीश - गिरी म्हणजे पर्वत. त्या हिमालय पर्वतावर जे शयन करतात ते गिरीश.
गिरिजेश - त्या गिरी म्हणजे पर्वतापासून जन्माला आली ती गिरीजा. अर्था देवी पार्वती. तिचे स्वामी.
महेश - सगळ्यात श्रेष्ठ देवता,
शंभो - सगळ्यांचे कल्याण करणारे,
भूतेश - सर्व प्राणिमात्रांचे स्वामी, नियंत्रक, संचालक.
भीतभयसूदन - भीत म्हणजे घाबरलेला . त्याच्या भीती चे कारण ते भय. त्या भयाला जे दूर करतात ते भीतभयसूदन.
मामनाथं
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष - हे जगदीशा ! माझ्यासारख्या अनाथांचे या संसाराच्या गहन दुःखातून रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
श्री शांकर स्तोत्ररसावली
August 5, 2020
निषेधार्ह पाणी भाग दोन
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे परत परत म्हणतात, आणि ते सुद्धा रोगांची नावे सांगायच्या अगोदरच सांगताहेत, न अम्बुपेयम्....पाण्याचा अतिरेक टाळा.
यापूर्वी, न पिबेत् सूर्येन्दु पवनम् अदृष्टम् । या श्लोकाची सुरवात त्यांनी "न" ने केली होती. या श्लोकाची सुरवात पण "न" ने केली आहे.
या उल्लेखित रोगांनी जे अशक्त झालेले रोगी आहेत, त्यांनी पाणी टाळावे.
अशक्त होण्याचे कारण यांची चयापचय प्रक्रिया बिघडलेली असते. शरीरातील दोषांच्या तरतम भावाने निर्माण झालेली रोगाची अवस्था, समान करण्यासाठी शरीर देखील काही तरी प्रयत्न (compensation) करीत असते.
सर्व रोग होण्यामागे मन्द झालेला अग्नी हेच कारण असते. अग्नी मंद झाला की, पाचनकर्म बिघडते. खाल्लेल्या अन्नाचे शरीराला अपेक्षित असलेले रूपांतरण, जे अग्निमहाराज करत असतात, ते बिघडते. पाचन बिघडले की, अन्नाचे पुढील शोषण पोषण बिघडते.
मोठ्या टोपात भात शिजवायचा असेल तर गॅस बारीक असून चालणार नाही. बर्नर मोठाच हवा तरच तांदुळ शिजतील, नाहीतर टोपात जे काही तयार होईल, त्याला भात असे म्हणता येणार नाही.
एक सुभाषित आठवतेय का, विद्येविना मति गेली....
तसं आहे, हे सर्व अनर्थ एका अग्निने केले. ज्या अग्निचा पाणी हा शत्रू आहे. म्हणून पाणी कमी (गरजेपुरतेच) प्यावे.असं वाग्भटजी सांगताहेत.
कोणताही रोग व्हायला लागला कि शरीर खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाची चव बिघडवून टाकते. चव बिघडली की, पाणी पण बेचव लागते. आणि खाण्या पिण्याची इच्छाच नाहीशी होते. शरीर जे सांगतेय, ते दीर्घकालीन विचार केला तर नेहेमी फायद्याचेच असते.
वाहातुक पोलीस शिटी मारून, बोलावून कसे सांगतो,
"पुढे अपघात झाला आहे. तातडीचे काम सुरू झाले आहे. इथून पुढे वाहाने नेऊ नका.अगदी स्कूटी सुद्धा जाणार नाही. जरा त्रास झाला तरी चालेल, पण आपली गाडी या मार्गाने नेऊ नका. वळवा. आणि परत मागे न्या. वाटलं तर दूरच्या पर्यायी मार्गाने जा"
तसं पोटात जेव्हा गडबड सुरू झालेली असते, तेव्हा "त्याचा" इंद्रियरूपी ट्रॅफिक अंमलदार मनामार्फत आतून सूचना देतो, "आतमधे किरकोळ दुरूस्तीचे काम सुरू आहे. कोणालाही, कोणत्याही कारणासाठी आत पाठवू नका. अगदी पाण्याला सुद्धा ! उगाच त्रास करू नका, त्रास देऊ नका. उगाच जबरदस्ती करू नका. थांबा थोडी विश्रांती घ्या.आणि द्या."
शरीराची ही अवस्था लंघन करण्याची असते. ही विशिष्ट अवस्था ओळखता यायला हवी. यावेळी फक्त जिभेवर संयम ठेवता यायला हवा. की पुढचे सगळं ट्रॅफीक जाम टाळता येते. नाहीतर टाळक्याला ताप होतो.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
January 10, 2017

आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढ धोकादायक वेगाने वाढत आहे. या तापमान वाढीची कारणे, त्याचा धोका यांची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत देणारे अप्रतिम पुस्तक
June 16, 2014
‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर.
चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची.
सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी.
‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘
हा समर्थ संदेश अखेरच्या श्वासापर्यंत पाळला तो शंभूराजांनी.
‘आम्ही हिंदू सांप्रत सत्वशून्य झालो आहोत’ अशी चीड व्यक्त करतानाच वेद- स्मृती यांनी नेमून दिलेली क्षत्रिय वर्णनिहाय कर्मे करणे आम्हाला औरंगजेबसारख्या यवनाधमामुळे शक्य होत नाही असे शंभूराजे; रामसिंगला लिहितात.
हिंदू मंदिरे पाडून जिथे अन्यपंथीय प्रार्थनास्थळे उभारली आहेत; ती पाडून पुन्हा मंदिरे उभारण्याचे आदेश देतात शंभूराजे.
गोव्यात पोर्तुगीज पाद्र्यांनी चालवलेल्या धर्मांतरणाच्या अनन्वित अत्याचारांना ‘जशास तसे उत्तर’ देतात ते शंभूराजे.
‘धर्माशिवाय जगणे म्हणजे साक्षात मरण आहे’ असं बुधभूषण या ग्रंथात शंभूराजे लिहितात.
‘माझ्या मुलुखातून कोणीही माणूस धर्मांतर करवून बाटवता येणार नाही’ असे कलम शंभूराजे तहात घालतात.
शिवराय- शंभूराजे यांना 'सेक्युलर' ठरवणाऱ्या निधर्मीवादी आणि हिंदुद्रोही बांडगुळांनो; संपूर्ण शंभूचरित्र तपासून पहा. असे खंडीभर पुरावे सापडतील......
शंभूराजे म्हणजे साक्षात रुद्र आहेत. ज्यांच्या तृतीय नेत्राच्या तेजाने अवघे हिंदुत्व उजळून निघाले.
‘धर्मवीर’ ही उपाधी कोणाला शोभून दिसत असेल तर ती शंभूराजांनाच.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(व्याख्याते: शंभूराजांची राजनीती; संपर्क: 0251-2863835)
December 3, 2016

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ
March 5, 2026
आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,
February 23, 2020
घरात कोणाला ताप आला की आपण चटकन थर्मोमीटर तोंडात किंवा काखेत ठेवून ताप मोजतो अतिशय उपयुक्त असे हे साधन आहे. थर्मोमीटर इतिहास तसा फार जुना आहे. १५९३ मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली याने पहिला थर्मोमीटर तयार केला होता, त्याला त्यावेळी धर्म थर्मोस्कोप असे नाव होते. तो फार अचूक नव्हता. अचूक असा थर्मोमीटर १६४१ मध्ये तयार झाला.
October 5, 2022
प्लास्मा थेरपी ही कोविड १९ संसर्गावर उपचार करणारी एक प्रयोगात आणलेली प्रक्रिया आहे. हे कोणतेही औषधं/उपचार नाही. हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे.
April 25, 2020
बदल नेहमी आपल्या भल्यासाठीच होत असतो म्हणून वर्तमानावर नजर ठेवून बदलण्याची तयारी सर्वांनी (व्यावसायिकांनी आणि कर्मचाऱ्यांनीही) ठेवावी.
December 14, 2022
“जैत रे जैत” मधील “जांभूळ पिकल्या झाडाखाली —- ” ची नजाकत जावेद अख्तरने – ” होली आई ,होली आई, देखो होली आई रे ” मध्ये बरहुकूम आणली आहे. संपूर्ण गाणं रंगछटांनी भरल्यावर, विशेषतः पिकलेल्या जोडीने ” तुम हो तो हर दिवाली, हर दिन मेरी होली हैं ” हे जीवनोत्सवावर भैरवी भाष्य करणं आणि यातून त्यांचे अभिन्नत्व दाखविणे हे फक्त केवळ !
March 28, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti