(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तूप आणि त्यातील घटक

    शुद्ध तूप हा प्राणीजन्य पदार्थ आहे. यात वनस्पती तूपचा समावेश होत नाही. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, पण त्यापासून बनवलेला शुद्ध तूप हा टिकाऊ पदार्थ आहे. बाजारातून आणलेल्या शुद्ध तुपाला घरच्या तुपासारखा वास नसतो. सायीसकट कोमट दुधास विरजण लावून त्याचे दही झाल्यावर ते घुसळून वर तरंगत असलेले लोणी बाजूला काढून ते कढवितात म्हणजे उष्णता देतात. योग्य उष्णता मिळाल्यानंतर लोण्यातील पाण्याचा अंश बाष्परूपात निघून जातो, वर बुडबुड्याच्या स्वरूपात दुधातील काही पदार्थ वर येतात.

      November 13, 2023


  • हवामान पूर्वानुमान

    हवामान खात्याने “आज कडकडीत ऊन पडणार” म्हटले असेल तर बाहेर पडताना नक्की छत्री बरोबर ठेवावी असे एकेकाळी उपहासात्मक बोलले जायचे. परंतू त्याच हवामान खात्याचे अंदाज आता हमखास बरोबर ठरू लागले आहेत. हवामानाची माहिती मिळविण्यासाठी आधुनिक प्रगत साधने आणि हवामान प्रारूपांमधील अचूकता यामुळेच ही नेत्रदीपक प्रगती हवामान विभागाने साधली आहे. याचीच साद्यंत माहिती देणारा हा लेख…

      February 28, 2024


  • माझा जन्म… आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – २

    सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत.

    माझा जन्म.....
    माझा जन्म हा ….
    माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
    या पृथ्वीवर ….
    जन्म घेण्याशिवाय
    मला
    दुसरा पर्यायच नव्हता ....

    प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. नराचा शुक्राणू आणि मादीचं पक्व बीजांड यांचं संयोग झाला म्हणजे अपत्य पिढीच्या सजीवाचा गर्भपिंड निर्माण होतो, मादीच्या गर्भाशयात त्याची वाढ होते आणि प्रजातीनुसार, ठरलेल्या काळानंतर, अपत्य पिढीचा अेक सजीव, मादीच्या शरीराबाहेर येअून, या पृथ्वीवर स्वतंत्रपणं जगू लागतो. यात, अपत्य पिढीच्या सजीवाला काहीही पर्याय नसतो. निसर्गनियमानुसार त्याचा जन्म होतो.

    वनस्पतींच्या बाबतीतही हे खरं आहे. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संयोग होअून, फुलातून, त्या प्रजातीचं फळ निर्माण होत.
    जनक पिढीचा जन्मही याच प्रकारानं झालेला असतो. त्यांना तरी कोणता पर्याय होता? त्यांच्या आअीबाबांनी त्यांना जन्माला घालून या पृथ्वीवर आणलं होतं. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म ……

    ही साखळी अशीच चालू होती.

    मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे.

    आता कवितेचं दुसरं कडवं वाचा.

    बाबांचा शुक्राणू...
    त्यांच्या मातापित्यांच्या ....
    अनेक पूर्वपिढ्यांतील ....
    आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आला ...

    आअीचं बीजांड ...
    तिच्या मातापित्यांच्या .....
    अनेक पूर्वपिढ्यांतील ....
    आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आलं ...

    बाबांचा शुक्राणू ... आअीचं बीजांड
    ....माझा जन्म
    आणि …
    आअीबाबांच्या आनुवंशिक तत्वाचा ....
    पुनर्जन्म..

    मागच्या अनेक पिढ्यातून माझ्या पिढीपर्यंत अेक चेतना संक्रमीत होत आली हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्‍या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    गजानन वामनाचार्य

    शनिवारचा सत्संग - 2
    शनिवार 3 डिसेंबर 2016

      December 3, 2016


  • कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांची जादु ……

    श्रावण महिना लवकरच सुरु होईल. सणासुदीच्या या दिवसात सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघानेच आले. मुंबई-पुण्यातल्या असुरक्षित जीवनात खर्‍या सोन्याचे दागिने घालून प्रवास करणेही कठीण झाले आहे. सोन्याच्या किमतीही आता आकाशाला भिडायला लागल्या आहेत. त्यामुळे अस्सल सोन्याचे दागिने घालण्यावर मर्यादा आल्या आहेत.

    बदलत्या काळाची गरज ठरलेले, कलाकुसर, नावीन्य, सुरक्षितता, हौस आणि कमी वजनातील २४ कॅरेट सोन्याचे फॉर्मिंग दागिने महिलावर्गात विशेष प्रिय ठरले आहेत.

    एक काळ असा होता की, विवाहानंतर सौभाग्य लेणं म्हणून ठसठशीत मोठं मंगळसूत्र, चार सोन्याच्या बांगड्या-पाटल्या, कानातील वजनदार झुमके वगैरे घालणार्‍या स्त्रिया सर्रासपणे दिसायच्या. किंबहूना असे दागिने घालून मिरवणार्‍या स्त्रिया “घरंदाज” समजल्या जायच्या. आजही टिव्ही मालिकांमध्ये जुन्या काळातल्या स्त्रिया भरगच्च आणि भारदस्त दागिने गालून मिरवताना दिसतात.

    जसा काळ बदलला. महिलांना शिक्षणाची पुरेशी संधी उपलब्ध झाली, आणि त्यांनीही विविध क्षेत्रे पादाक्रांत करायला सुरुवात केली. महिला नोकरी - व्यवसायात आगेकुच करु लागल्या. त्यांच्या हातात स्वकमाईचा पैसा शिल्लक राहु लागला. परंतू सोन्याच्या दागिन्यांची भारी उपजत हौस असली तरी ही जोखीम अंगावर बाळगणं त्यांना धोक्याचं वाटु लागलं. मग खोट्या दागिन्यांचे... सोन्याचा मुलामा दिलेले दागिन्यांचे दिवस सुरु झाले. मात्र हे खोटे दागिने फार काळ टिकत नसत. ते खोटे आहेत हेसुद्धा जाणकाराच्या पटकन लक्षात येई.

    नव्या तंत्रज्ञानाने जसं सगळं जग व्यापुन टाकलं तसं हे दागदागिन्यांचं क्षेत्रही व्यापायला सुरुवात केली. १ ग्रॅम सोन्यातल्या दागिन्यांची सद्दी सुरु झाली. दिसायला ठसठशीत पण वजनाला आणि खिशाला हलके असलेल्या या दागिन्यांवर महिलामंडळ खुष झालं आणि बघताबघता हा उद्योग मोठी भरारी घेऊ लागला.

    senoritas-raani-haar-601कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांचे नाजुक कलाकुसर असलेले असंख्य नमुने तयार होऊ लागले. या दागिन्यांच्या जादूने महिलावर्गाला संमोहीत केलं नसतं तरच नवल. लग्न समारंभासारख्या प्रसंगी एकच मोठा दागिना वापरण्यापेक्षा तेवढ्याच सोन्यात शुद्ध सोन्याच्या कसाचे चार-पाच नावीन्यपूर्ण दागिने वापरणं ही कल्पना महिलांना अतिशय आवडली. खिशाला परवडतील अशा थोडक्या पैशात, नवनवीन नाजूक कलाकुसरीचे दागिने मिळु लागल्यामुळे मोलकरणीपासून ते उच्चभ्रु वर्गातील महिलांपर्यंत सर्वांनीच त्यांचं स्वागत केलं. वर्ष-दोन वर्ष पैसे साठवून एखादा दागिना पदरात पडण्यापेक्षा दर दोन - चार महिन्याने एक नवीन दागिना घरी आणणं महिलांना अधिक सोईचं ठरु लागलं.

    कमी वजनातील हे दागिने पूर्ण तांब्याचे बनवलेले असतात. त्यावर इलेक्ट्रो फॉर्मिंग मशिनने सोन्याचा एक मायक्रॉनचा म्हणजे अत्यंत सुक्ष्म अशा सुवर्णकणांचा थर दिला जातो. पूर्ण नियंत्रणाकाली दिलेल्या स्प्रेमुळे हा थर एक सारखा व पक्का बसतो.

    शुद्ध सोन्यात घडविलेले दागिने कधीही चेपतात किंवा वाकतात. मात्र या फॉर्मिंग दागिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तांब्यावरचे असल्याने जास्त दणकट व टिकाऊ असतात. त्यामुळे त्यांच्या दबले जाण्याची किंवा वाकण्याची अजिबात भिती नसते. रोजच्या वापराने त्यांची थोडीफार झीज होते. या दागिन्यांवरच सुवर्णकणांचा पातळ मुलामा दिला असल्याने फार जोरात व सातत्याने ते दगड, फरशी, लाकूड वगैरेसारख्या कठीण पृष्ठभागावर घासले गेले तरच त्यावर चरे उमटण्याची शक्यता असते. शुद्ध सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे या दागिन्यांवरही घाम, अॅसिड, सौंदर्यप्रसाधने वगैरेंचा परिणाम होतो. मात्र गरम पाण्याचा या दागिन्यांवर काहीही परिणाम होत नाही.

    senoritas-logoलक्षवेधी असे हे कमी वजनातील फॉर्मिंगचे दागिने आता बाजारात वेगवेगळ्या ब्रॅंडसखाली उपलब्ध झाले आहेत.

    अस्सल मराठी म्हणता येईल अशा “सेनोरिटा” ब्रॅंडने अस्सल मराठमोळी रेंज कमी वजनात आणली आहे. अगदी पेशवाई थाटाचे दागिनेसुद्धा उपलब्ध आहेत आणि तेसुद्धा अतिशय कमी किंमतीत. फॉर्मिंग दागिन्यांमध्ये मंगळसुत्र, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, कर्णफुले, पायल, चेन, ब्रेसलेट, अंगठ्या वगैरे सर्वकाही भरपुर डिझाईन्समध्ये आणि ते ही आपल्या बजेटमध्ये म्हणेच रु. ४९९ ते रु. ३९९९ पर्यंत उपलब्ध आहेत.

    “स्वर्ग” या आणखी एका नावाजलेल्या ब्रॅंडनेही हे कमी वजनातील फॉर्मिंग दागिने बाजारात आणले आहेत.

      August 8, 2015


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग एक !

    बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही.

    आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार.

    काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, हवा, पाऊस पाणी, या गोष्टी आपण नाही बदलू शकत. आणि हे सर्व आयुर्वेदात लिहिलंय हं !
    (दूष्यं देश बल काल...यावर सविस्तर भाष्य पूर्वी झालंय.)

    जेव्हा दुसरा बदलू शकत नाही, तेव्हा आपणच बदलायचं असतं, हा साधा सोपा नियम आहे. निसर्गाच्या काय किंवा शरीराच्या काय, विरोधात गेलात तर पुनः विरोध हा होणारच. अगदी वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे ते परत आपल्याकडेच उलटणार, यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमधे कर्माचा सिद्धांत म्हणतात.

    भारतीय संस्कृतीतील, इतिहासातील, पुराणातील, दाखले देण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हाही काही जणांची नाके मुरडतात. काही जणांचा जातीयवाद उफाळून येतो, काही जणांचा बुद्धीवाद, काही जणांचा समाजवाद असा उफाळून येतो, की बोलायचं काम नाय.
    हे सगळं का करायचं ? कशासाठी करायचं ? का जगायचं ?
    आयुर्वेद सांगतो,
    पुरूषार्थ प्राप्तीसाठी !
    झालं....
    टीकाकार आता विचारतील,
    "म्हणजे स्त्रीयांन्ला काहीच म्हत्त्व दिलं न्हाई म्हणाकी, तुमच्या आयुर्वेदात "
    या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी भारतीयत्व समजून घ्यावं लागेल, तरच आयुर्वेद नीट समजून घेता येईल. समजून घ्यायचा तो भावनेच्या स्तरावर !! बुद्धीच्या स्तरावर शिकायचे ठरवले तर त्याचे असे अनेक वेगवेगळे विकृत अर्थ निघतात. असो !

    धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ मिळवण्यासाठी, आरोग्य दिलं जातंय, हे महत्त्वाचे आहे. ते जर करणार नसाल, तर आरोग्य मिळवून तरी काय करायचंय ?

    तर आपण या निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. त्याअनुसार मला बदलून घेतलं पाहिजे, ही धारणा तयार करायला पाहिजे. नाहीतर आरोग्यापासून आपण दूर जातोय हे लक्षात ठेवावे.

    निसर्गातील अन्य पशुपक्षी, प्राणी यांचा अभ्यास केला, त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला, त्यांच्या राहणीमानाचा, फूड हॅबिटॅटचा विचार केला, तर अनेक रहस्य आपणाला उडगलतील.

    जो निसर्गाने केलेला नियम मोडतो, तो आजारी पडतो, असे लक्षात येते. आणि निसर्गाच्या बरोबरीने जो जगतो, त्याला नियत आयुष्य आनंदाने जगता येते.

    निसर्गाने केलेले नियम, हे वैश्विक नियम आहेत, उत्तरधृवासारख्या काही अत्यंत प्रतिकुल परिस्थिती सोडल्या तर निसर्गाने केलेला कोणताही नियम मोडण्याची तशी गरज भासत नाही.
    फक्त आपण आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे.
    आजच्या भाषेत, आरोग्यासाठी आपण इकोफ्रेंडली व्हावं !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.05.2017

      May 6, 2017


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – १०

    क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरीसाक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी ।
    दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी ॥ १०॥

    क्षत्रत्राणकरी- क्षत्र शब्दाचा एक अर्थ आहे संकट. त्यापासून त्राण म्हणजे संरक्षण करणारी.

    महाऽभयकरी- अभय अर्थात सर्व प्रकारच्या भीतीं पासून मुक्ती देणारी.

    सामान्य जीवनात सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. त्यालाच आपण त्राण म्हणजे संकट समजतो. आई जगदंबेच्या कृपेने ही मृत्यूची भीती नष्ट होते. एकदा ही भीती नष्ट झाली की माणूस खऱ्या अर्थाने अभय होतो.

    माता- जसा एखादा बालक स्वतःला आपल्या आईच्या जवळ अत्यंत सुरक्षित समजतो. तसेच सर्व विश्व जिच्या चरणाजवळ सुरक्षित असते ती विश्वमाता.

    कृपासागरी- अपार कृपेचा सागर असणारी.

    साक्षान्मोक्षकरी- प्रत्यक्ष मोक्ष प्रदान करणारी. हा शब्द समजून घ्यायला हवा. मोक्ष ही देहपतनानंतर ची अवस्था. ती प्रत्यक्ष कशी असेल? देहातीत झाल्यावरचा जो आनंद तो मोक्ष. मात्र तोच आनंद ज्यावेळी या देहात प्राप्त होतो त्यावेळी तिला मुक्ती, जीवनमुक्ती असे म्हणतात. हा प्रत्यक्ष मोक्ष प्रदान करते तिला साक्षान्मोक्षकरी असे म्हणतात.

    सदा शिवकरी - सदैव कल्याण करणारी. विश्वेश्वरी- संपूर्ण विश्वाची स्वामिनी. श्रीधरी- श्री म्हणजे वैभव. सकल वैभवाला धारण करणारी.

    दक्षाक्रन्दकरी- दक्षाला कन्या वियोग दुःखात आक्रंदन करायला लावणारी. निरामयकरी- आमय म्हणजे रोग. सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती देणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी-सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 7, 2020


  • हरपत चाललेलं समाजभान

    दररोज ट्रेनमध्ये एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते..जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले..आपण काय करतोय, कुठे आहोत असं ना स्वत:चं भान ना आजुबाजूचं..! गंभिर गोष्ट म्हणजे ह्याला कोणताही वयोगट अपवाद नाही..

      July 26, 2016


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ७

    भगवान श्रीविष्णूंच्या हातातील विविध आयुधांचे वर्णन केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज श्रीहरीच्या आसन स्वरूपात विराजमान असणाऱ्या भगवान श्री शेषांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,

      December 10, 2020


  • ‘नोटा’ : लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल..!

    ‘नोटा (None Of The Above)’ हा मतदान यंत्रावरील पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांचा ‘नकाराधिकारा’चा हक्क मान्य करुन निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला प्रभावी पर्याय आहे. राजकीय पक्ष आणि त्यांनी निवडणूकांत उभे केलेले उमेदवार, यांना नाकारण्याचा मतदारांचा अधिकार म्हणजे मतदान यंत्रावरचा सर्वात शेवटी उपलब्ध करुन दिलेला NOTA हा पर्याय..!

      April 19, 2019


  • शिव्या

    माणसाच्या तोंडात सदैव असलेली गोष्ट म्हणजे शिवी. क्रोध,तिरस्कार व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्या सर्वच भाषेत उपलब्ध आहेत. कधी राग आला म्हणून तर कधी राग यावा म्हणून शिव्यांचा उपयोग होतो.अगदी जन्मापासूनच त्याचे बाळकडू मिळते.

      August 27, 2023