(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय वायुसेना दिवस

    हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.

      October 8, 2021


  • नमस्कार का करावा ?

    लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले जातात. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्या व्यक्तींचेच चरणस्पर्श केले पाहिजे ज्यांचे आचरण योग्य असेल.

      August 1, 2017


  • बुलेट ट्रेनचा खरा चेहरा…!

    हा प्रकल्प लालफीतशाहीत अडकला किंवा इतर प्राथमिकतांकडे दुर्लक्ष करून केवळ बुलेट ट्रेनचा उदो उदो केला गेला, तर इंडिया शायनिंगसारखी परिस्थिती ओढवू शकेल. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने आजवर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. २०२२ सालपर्यंत नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भारत-जपान मैत्रीची बुलेट ट्रेन एकही लाल सिग्नल न लागता पळवावी लागेल.

      November 26, 2017


  • डॉ. पॉल रत्नसामी

    पॉल रत्नसामी यांचा जन्म चेन्नईला १९४२ साली झाला. चेन्नईच्या विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांनी न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात संशोधन केले व पुढे बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रा. फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन केले. औद्योगिक उत्पादन करताना वापरावी लागणारी उत्प्रेरके (Catalyst) हा या दोन्ही ठिकाणच्या संशोधनाचा विषय होता.

      October 9, 2023


  • अन्नप्रतिष्ठा

    जीवनाचे अध्यात्म समजून घेताना रोजच्या जगण्यातील प्रत्येक घटनेचा ऊहापोह चिंतनाच्या पातळीवर करणे आवश्यक असते. तेव्हाच दैनंदिन जीवनप्रवाहात अध्यात्म उतरू शकते. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणे आणि आपल्यासह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणे जमायला हवे. याची सुरूवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकविले, तर ते आचरणशील होते. अलीकडे लग्न किंवा इतर उत्सवादी कार्यक्रमात अन्न टाकू नये, असे सांगितले जाते. जेवताना अन्न टाकायचे नसतेच. तो सुसंस्कृत जगण्याचा अविभाज्य भाग आहे; पण तरीही भराभर वाढून घेणे आणि नुसतीच चव चाखून ते टाकणे, असा तऱ्हेवाईकपणा वाढतो आहे. आपले तत्त्वज्ञान तर अन्न प्राशनाविषयी खूप खोलवर जाऊन बोलते. अन्नाची निंदा करू नये, त्याला नावे ठेवू नये आणि ते टाकू नये, असे साक्षात् उपनिषदांनी नोंदवून ठेवले आहे. त्याचे पालन होत नाही. बाहेरील मोठा कार्यक्रम तर जाऊ द्या; पण घरातही खूप अन्न वाया जाते. त्याचा विचार व्हावा. रोज हजारो भुकेल्यांचे पोट भरेल एवढे अन्न राज्यात वाया जात असेल. ते जर आपण वाचवले, तर ‘अन्नदान श्रेष्ठदान’ सारखी आध्यात्मिक कृती घडेल. तैतरिय उपनिषदाच्या भृगुवल्लीमध्ये नवव्या अनुवाकात म्हटले आहे की,

    अन्नं बहु कुर्वीत। तद् व्रतं। पृथिवी वा अन्नम्।
    आकाशोऽन्नादः। पृथिव्यामाकाशः प्रतिष्ठितः।
    आकाशे पृथिवी प्रतिष्ठिता।
    तदेतदन्नमन्ने प्रतिष्ठितम्।
    ह य एतदन्नमन्ने प्रतिष्ठितं वेद प्रतितिष्ठति।
    अन्नवानन्नादो भवति।
    महान् भवति। प्रजया पशुभीर्ब्रह्मवर्चसेन।
    महान् कीर्त्या।

    अर्थ असा की, विपुल अन्न निर्मित करणे हे एक व्रत आहे. आकाश अन्नाद आहे. त्यातही पृथ्वीप्रमाणेच अन्नस्थित असते; त्यामुळे अन्नवास होणे हे ब्रह्मवर्चस्वाइतके मोठे होणे आहे. यावरून रोजच्या भोजनातील आध्यात्माची आपल्याला कल्पना येते. इंग्रजीत एक म्हण आहे की, Money Saved is money earned याचा अर्थ पैसा वाचविणे हे पैसा मिळविण्यासारखेच असते. याचाच संदर्भ घेऊन आपण अन्न या घटकाकडे पाहिले पाहिजे. अन्नाचा काटकसरीने वापर करणे हे अन्न निर्माण करण्यासारखेच आहे. आपल्याला घासातील एक घास भुकेल्याला ठेवणे, याला मनाची उदात्तता लागते. अतिथी-अभ्यागताची गरज लक्षात घेऊन त्याला अन्न देणे हे मानव्याच्या दृष्टीने परमभाग्य होय!

    नव्या युगात ‘बुफे डिनर’ असते. मुळात लागेल तेवढे घेण्यासाठी बुफेची व्यवस्था असते; मात्र माणसं भराभर वाढून घेतात. ते खपणारे नसतेच; मग टाकून देतात. पंगतीतही वाढपे पुन्हा येतील की नाही, या भावनेने दोनऐवजी चार पुऱ्या घेतल्या जातात आणि मग अन्न वाया जाते. असे होऊ नये म्हणून स्वतःच पुढाकार घेणे श्रेयस्कर आहे. आपल्या रूढीप्रमाणे ‘अन्नसंस्कार’ केला जातो. सोळा संस्कारांपैकी हा एक महत्त्वाचा संस्कार आहे; पण अलीकडच्या काळात या संस्काराचे आपण संस्कृतीत झालेले परिवर्तन मोडीत काढले असून एक विकृती म्हणून ही आपली अन्न संस्काराची परंपरा पुढे येत आहे. असे होणे प्रासंगिक घातकपणाचेच नव्हे, तर नव्या पिढीला बिघडविणारे आहे. आपण नव्यांच्या ओंजळीत जी संस्कार शिदोरी देतो तीच घेऊन ते पुढे जात असतात. त्यांच्या मन-बुद्धीचा विकासदेखील त्यावरच होत असतो आणि आपणच जर बेफिकीरीने जगत-वागत राहिलो, तर त्यांच्यावर तरी संस्कार होणार कसा? त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेऊन वागले पाहिजे. जेवण झाल्यानंतर ‘अन्नदाता सुखी भव’ असे म्हणण्याची एक रीत आहे. त्यातून अन्न देणारा आणि घेणारा दोघांचेही संस्कार दिसून येतात. जिभेला असलेले वळण जेव्हा मनाला लागते आणि त्याबरहुकूम मेंदू काम करतो तेव्हाच विवेकी आचरण घडत असते. यास्तव अन्नप्रतिष्ठा जपणे ही कुण्या एकटयाची नव्हे, तर राष्ट्रातील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.

    — प्राचार्य प्रशांत पाटील (सगुण निर्गुण, मटा. २८ नोव्हेंबर २०१६)

      December 13, 2016


  • शीतपेयांचे दुष्परिणाम

    आजची तरुण पिढी व लहान मुले पाण्याऐवजी कारबोनेटेड शीतपेय आवडीने पिताना दिसतात. अशा पेयात मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर इतर अनेक द्रव्ये असतात. शरीरात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या प्रक्रियेसाठी योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ही पाण्याची गरज इतर कोणतेही पेय भरून काढू शकत नाही. आपले शरीर पाण्याचा साठा करून ठेवू शकत नाही.

      June 14, 2023


  • पाक धार्जिण्या नेत्यांमुळे जम्मू-काश्‍मीरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता

    पीडीपीचे सरकार आल्यापासून फुटीरतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणारा फुटीरतावादी मसरत आलम याच्या सुटकेनंतर आता मुख्यमंत्री सईद यांनी आशिक हुसेन फक्तू या फुटीर नेत्याला सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सईद यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जी भीषण वक्तव्ये केली आहेत ती धक्कादायक आहेत.

      March 12, 2015


  • दशश्लोकी निर्वाणदशकम्

    दशश्लोकी निर्वाणदशकात श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वेदांताचे सार सांगितले आहे. या रचनेच्या नावाशी साधर्म्य असलेले शंकराचार्यांचेच निर्वाण षटकही प्रसिद्ध आहे. नर्मदा तीरी एका गुहेत श्री गोविंदपादाचार्यांची भेट झाल्यावर त्यांनी विचारलेल्या ‘ तू कोण आहेस? ’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही दोन स्तोत्रे !  परंतु दोघांची जन्मकथा एकच असली तरी त्यांच्या विषय मांडणीमध्ये फरक आहे

      July 13, 2023


  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ८-ब/११

    • ‘आजच्या जगात भौतिक व्यवहारासाठी संस्कृतचा कांहींही उपयोग नाहीं’ ( इति शिरवळकर) –
    • हा मुद्दा आपण आधीच हाताळला आहे. आंतरराष्ट्रीत कीर्तीचे ज्येष्ठ विद्वान (कै.) दिनेश माहुलकरांचा अनुभव व त्याचें कथन काय सांगतें, तें आपण पाहिलें आहे. अन्य उदाहरणेंही पाहिली आहेत. त्यामुळे, यावर अधिक लिहिण्याची जरूर नाहीं.

    *(ज्यांना प्रा. माहुलकरांची माहिती नसेल , त्यांनी सरोजिनी वैद्य या, महाराष्ट्र राज्य विकास संस्थेच्या संचालक असतांनाचें, वक्तव्य वाचावें. या संस्थेनें माहुलकरांचें पुस्तक प्रसिद्ध केलेलें आहे. माहुलकरांनी त्यांचें मराठी पुस्तक प्रकाशनासाठी या राज्यसंस्थेला देऊन संस्थेचा बहुमान केलेला आहे , अशी वैद्यबाईंची कृतज्ञतेची भावना आहे. माझा व माहुलकरांचा व्यक्तिगत परिचय होता, हें माझें भाग्यच! ).

    • दुसरें म्हणजे, आपलें जुने, कालिदास-भास-भारवि-दंडी-भवभूती-पाणिनी-वररुचि-पतंजलि-कौटल्य-व्यास-वाल्मीकि इत्यादींचें साहित्य आपण वाया जाऊं देणार आहोत काय ? धर्माचें जाऊ द्या, पण वेद हे जगातील अति-प्राचीन वाङमयांपैकी एक आहे (कदाचित् सर्वात-प्राचीनही असेल) , आपण त्याला दुर्लक्षून, त्याला ‘लुप्त’ किंवा ‘नष्ट’ होऊं देणार आहोत काय ? तसें केलें तर, आपल्यासारखे ‘हतभागी’ आपणच!
    • हें म्हणजे, ‘आपले माता-पिता अतिशय म्हातारे झाले आहेत, त्यांचा व्यावहारिक उपयोग काय?’, असें म्हणण्यासारखेंच आहे. (माझ्याप्रमाणें साठी-सत्तरीच्या पुढलें वय असलेल्या मंडळींना माझ्या या कथनाची योग्यायोग्यता पटेलच).

    (इथें माझा हेतू अजिबात व्यक्तिगत नाहीं ; तर मुद्दा मांडण्यासाठी दिलेलें हें फक्त उदाहरण आहे ; हें कृपया ध्यानीं घ्यावें, ही माझी शिरवळकरांना विनंती).

    • कर्मकांडाचा भाग सोडून द्या, पण श्राद्ध व पितृपक्ष यांचा मूळ उद्देशच, आपल्या पूर्वजांची आठवण काढणें व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणें, यासाठीच आहे. आपण मोठ्या लोकांची जयंती, पुण्यतिथी, सेंटेनरी वगैरे साजरी करतो, यामागचा हेतू, त्यांची स्मृती कृतज्ञतापूर्वक जागवणें, हाच आहे.

    हें सर्व करायचें , मग पुरातन साहित्याचें जतन कां करायचें नाहीं ?

    • ‘वंदे मातरम्’ या गीतानें स्वातंत्र्यपूर्व काळात लाखो भारतीयांना स्फूर्ती दिली. ‘जन-गण-मन’ हें तर भारताचें राष्ट्रगीत बनलें . ‘ सत्यम् शिवम् सुंदरम्’ हा एक पॉप्युलर वाक्प्रचार बनलेला आहे. आणि, हे सगळे आधुनिककालीन आहेत, पुरातन नाहींत. म्हणजे, अगदी २०व्या शतकातही संस्कृतचें जें महत्व होतें, तें ध्यानात येईल.
    • जर्मनी, USA वगैरे पाश्चिमात्य देशांमध्ये आजही संस्कृतचा अभ्यास करणारी अध्यासनें आहेत, विद्वान आहेत ; आणि आपण भारतीयांनी मात्र त्या साहित्याच्या विरोधात बोलायचें, याच्यासारखी खेदकर parody दुसरी नसेल.
    • मला ‘ मॅस्लोची नीड्-हायरार्की ’ या मानसशास्त्रीय सिद्दांताची आठवण येते. त्या सिद्धांताप्रमाणें , ‘उभ्या-त्रिकोणा’च्या आकृतीतील, ( ) , पायाजवळच्या, म्हणजे खालच्या तळाजवळच्या-भागातील , needs (आवश्यकता) आधी पूर्ण व्हाव्या लागतात ; आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच, वरच्या (उच्च) पातळीतील needs पूर्ण करण्याकडे कल असतो. त्यामुळे, लोक आधी, जीवनोपयोगी, career साठी आवश्यक, प्रोफेशनसाठी जरुरी असलेल्या, गोष्टीतच बुडालेले असतात. म्हणून, भाषेची शुद्धाशुद्धता, संस्कृत-भाषेचें महत्व व तिच्यातील ज्ञानामुळे होणारा फायदा, असल्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, किंवा त्याचें महत्वही त्यांना वाटत नाहीं. तें ठीकच आहे, तें परिस्थितीजन्य आहे ; व त्यामुळे, त्यासाठी त्यांच्या priority साठी त्याना दोष देतां येत नाहीं.

    पण , वर उल्लेखलेल्या ‘३ टक्क्यांनी ’ जरी याचा विचार केला , तरी काळजी करायचें कारण नाहीं.

    • लिपी व संस्कृतचा तसा अर्थाअर्थी संबंध नाहीं, व प्रादेशिक भाषांच्या लिप्यांमध्ये संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहेत, याचा उल्लेख आपण आधीच केला आहे.

    त्यातून आतां, सॉफ्टवेअरद्वारें ‘ट्रान्सलिटरेशन ’ ( लिपीबदल) क्षणार्धात शक्य होतें. त्यामुळे, भारतीय भाषांच्या संदर्भात तरी, लिप्यांच्या भिन्नत्वाचा प्रश्न निकालात निघालेला आहे.

    • व्यासंगी विद्वान ( व लोकसत्ताचे भूतपूर्व प्रमुख संपादक) अरुण टिकेकर यांचें संस्कृतसंबंधी, मराठीसंबंधी व in-general भाषेसंबंधी कांही विचार उद्धृत करतो –

    “भाषेच्या बाबतीत आपलें ‘तोडी नाख तबला अने फोडी नाख पेटी’ असें झालें आहे. संस्कृत भाषेचा पाय आपण तोडून टाकला. संस्कृत थोडी फार आली की बर्‍याच भारतीय भाषा कळण्याची सोय होते, हें आपण विसरलो आणि संस्कृत ही ‘मृत भाषा’ असा ग्रह करून घेतला. संस्कृत ही ब्राह्मण्याची निशाणी असल्याचें मानलें. .... पाठांतर करणें कमीपणाचें मानलें. ....... ‘द्विभाषा-कोविद’ , ‘त्रिभाषा-कोविद’ मंडळी आज अचानक कुठे गेली ? या प्रश्नाचा शोध घेतला की, देश-स्तरावर मराठी प्रभाव कां उरला नाहीं, मराठी-भाषकांना कोणत्याच क्षेत्रात कोणीच कसें विचारत नाहीं, ..... कन्नड-बंगाली भाषांचा प्रभाव कां ‘वाढत चालला आहे’, याचें उत्तर मिळतें. ..... संस्कृत ही शिष्टांची, तथाकथित उच्चभ्रूंची, उच्चवर्णीयांची भाषा, म्हणून ती आम्ही शिकणार नाहीं. शिवाय ती ‘मृत भाषा’. ती शिकवायचें-शिकायचें कारणच नाहीं, हें आहे आमचें तर्कट. संस्कृत शिकल्यानें मराठी चांगली होईल हें कोणालाच ‘पटत’ नाहीं. ….. एक भाषा चांगली आली तर दुसरीही लवकर समजते-उमगते हें मानायला आम्ही तयार नाहीं. …. मुंबई-पुण्याकडल्या आणि कोंकण-घाटाकडल्या मराठी भाषकांची हिंदी हा तर देशभरच्या लोकांच्या चेष्टेचा विषय असतो. मग आम्हाला कोणती भाषा नीट, व्यवस्थित येते म्हणायचें ? कोणतीच येत नाहीं हेंच विदारक सत्य आहे” .

    मोठा उतारा आहे, पण महत्वाचा आहे. मोठ्या व्यासंगी, संशोधक, संस्कृती,भाषा यांच्या बद्दल आस्था बाळगणारा, सामाजिक विचार करणारा, सामाजिक कमतरतांबद्दल मन:पूर्वक खंत बाळगणारा, अशा अरुण टिकेकरांचें कथन उद्धृत केल्यावर, त्या विषयाबद्दल आणखी कांहीं बोलायची आवश्यकता नाहीं.

    • ‘भौतिकशास्त्रांच्या सर्व शाखांमधील संशोधन आणि ज्ञानाचा आवाका वेगानें वाढत असतांना तें ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्याचा मर्यादित वेळ द्यावा लागत असतांना तो वेळ क्लिष्ट संस्कृतच्या अध्ययनात कोण वाया घालवूं शकेल ? ’ ( इति शिरवळकर) –
    • कुणालाही जें करावेसें वाटतें, तें करण्याचें त्यांना भारतीय संविधान स्वातंत्र्य देतें.

    *मात्र, एक गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी की, जर समाजातील सर्वांनीच , फक्त भौतिकशास्त्र, फक्त इंजिनियरिंग , फक्त कंप्यूटर अशा कुठल्याही एका क्षेत्रातच शिक्षण, कार्य व करियर केलें तर, सगळा समाज एकसुरी होऊन जाईल, लोक जणूं ‘क्लोन’सारखे होऊन जातील. आणि, तसें झालें तर, समाजासाठी ती फारच धोकादायक गोष्ट आहे. समाजानें मल्टिडायमेन्शलच असायला हवें, तरच त्याची सर्वांगीण प्रगती होईल.

    *सामाजिक काय, सांस्कृतिक काय, भाषिक काय, या सर्वांच्या बाबतीत हें ध्यानात ठेवायला हवें की, कधीच परमनंट ‘Steady State ’ नसते ; तेव्हां जर प्रगती होत नसेल तर अधोगती निश्चितच ! आणि, हें, ’आज’ म्हणजे सद्य स्थितीत कळत नाहीं, तर कांहीं काळाने मागे-वळून पाहिल्यावरच तें जाणवते, आणि ‘हा Turning Point होता ’ असें त्यावेळेसच कळतें.

    *(एक उदाहरण म्हणजे, आपण औरंगझेबाच्या राज्याकडे बघूं. त्याच्या कृत्यांमुळे मुघल साम्राज्य रसातळाला जाईल, असें कुणी त्याच्या राज्यकाळात वर्तवलें असतें, तर त्याला सगळ्यांनी वेड्यातच काढलें असतें. पण मुघल साम्राज्याचा र्‍हास त्याच्या उत्तर-काळापासूनच सुरूं झाला , हें सत्य, नंतर, मागून पाहिल्यावर प्रतीत होतें.)

    *म्हणून, कुणाला भौतिकशास्त्र शिकायचें असेल, त्याने (अथवा तिनें) तें जरूर करावें, अन्य कुणाला कला-क्षेत्रात जायचें असेल त्यानें तसें करावें, कुणाला भाषाशास्त्रात, किंवा खासकरून संस्कृतशी संबंधित क्षेत्रात कार्य करायचें अशेल, तर त्याला ( / तिला ) ती फ्रीडम आहे. आणि, भाग्याची गोष्ट अशी की, विविध लोकांच्या आवडीनिवडी भिन्नभिन्न असतातच. उदा., नाटक-सिनेमात करियर करणार्‍यांना कुणी सांगून बघावें की, ‘इथें पाय जमवणें कठीण आहे, इथें अस्थैर्य आहे, इथें रात्रंदिवस काम करावें लागतें, हेल्थवर अनिष्ट परिणाम होतो, पहा किती आत्महत्या होतात तें’, वगैरे वगैरे. पण ज्याला / जिला त्या क्षेत्रात जायची तीव्र इच्छा आहे, तो / ती या सगळ्या सांगण्याकडे कानाडोळाच करेल.

    *त्यामुळे, शिरवळकरांनी असें assume करूं नये की, सगळ्याच लोकांना सायन्स व त्यावर आधारित विषयांमध्येच रस असेल ; व कुणालाच संस्कृत शिकायची इच्छा नसेल.

    • समाज कुणावरही अमुक एका प्रोफेशनची सक्ती करूं शकत नाही, (आणि, तसें केल्यास काय होऊं शकेल, याची कल्पना येण्यासाठी आयन रँड या लेखिकेची ‘अँथम’ ही कादंबरी अवश्य वाचावी).
    • संस्कृतचें अध्ययन जर इतकें useless असतें, तर मग जर्मनी, इंग्लंड व USA मधील reputed युनिव्हर्सिटींनी (उदा. हार्वर्ड) , संस्कृत विषयाची ‘चेअर’ ठेवलीच नसती , आणि आजही ( होय, आजही, अगदी २१ व्या शतकातही ) पाश्चिमात्य ज्ञानी व्यासंगी विद्वानांनी त्यांचें आयुष्य संस्कृत व पुरातन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासात घालवलें नसतें. मला पाश्चिमात्यांचें उदाहरण देतांना कांहीं आनंद होतो आहे असें नाहीं , पण सत्य नजरेआड करूनही चालणार नाहीं. हें म्हणजे कस्तुरीमृगासारखें होतें आहे ; त्याला माहीतच नसतें आपल्याकडे काय अमूल्य ठेवा आहे , पण सर्वत्र तो सुगंध दरवळत असतो. आम्हीच आमच्याकडील अशा अनमोल ठेव्याला ठोकरायचें , आणि पाश्चिमात्यांनी त्याचें महत्व जाणून त्याचा अभ्यास करायचा, या paradox ला काय म्हणावें !
    • शिरवळकरांच्या शेवटच्या कमेंटबद्दल :

    असें मोरेही म्हणत नाहींत, किंवा अन्य कुणीही म्हणत नाहीं की, ‘आपली मातृभाषा सोडून द्यावी व फक्त संस्कृतचाच अंगिकार करावा, तिच्याच वापराचा आग्रह धरावा ’. हा शिरवळकर यांचा केवळ अपसमज आहे. भारतात बहुभाषिकत्व अनेक सहस्त्रकांपासून आहेच. त्यामुळेच तर आपण इतर अनेक भाषा शिकतो. इंग्रजी तर आपण शिकतोच शिकतो, कारण ती काळाची गरज आहे. पूर्वी गोव्याचे लोक पोर्तुगीझ शिकत. शेजारील-प्रदेशाची भाषाही आपण अनेकदा शिकतो (जसें , गुजराती). कांहीं जण तर, फ्रेंच, जर्मन, चिनी मँडेरिन , जपानी, रशियन, स्पॅनिश, अशा परदेशीय भाषाही शिकतात. त्याचप्रमाणें, कुणालाही संस्कृत शिकायाला हरकत नसावी.

    • ‘संस्कृतसाठी राष्ट्रभाषेचा दर्जा हा निष्फळ प्रयत्न’, हें शिरवळकरांचे म्हणणें एका अर्थानें बरोबर आहे.
    • आपण या विषयावर कांहीं चर्चा केलेली आहे. एक तर, ही संधी १९४७-१९५० नंतर गेलेली आहे. दुसरें म्हणजे, आजही भारताची ऑफिशियली कुठलीही राष्ट्रभाषा नाहीं (हिंदीसुद्धा).
    • संविधानानें अनेक भाषांना मान्यता दिलेली आहे, तशी मान्यता संस्कृतलाही द्यायला (अजून दिली नसल्यास) , हरकत नसावी.

    (पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      October 9, 2016


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंचवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    शब्दाने शब्द वाढवू नये.

    अरे म्हटले की, कायरे असे उत्तर येते. आणि अहो म्हटले की, काय हो, असा प्रतिध्वनी येतो.
    रामराम म्हटले की, राम राम असेच प्रत्युत्तर मिळेल.

    ही जगाची रिती आहे. जगायची नीती आहे.

    आणि गरज नसताना शब्दाने शब्द का वाढवावा ? याने भांडण वाढते. भांडण मिटवायचे असेल तर एकाने तलवार काढली तर दुसऱ्याने ढाल स्विकारावी. म्हणजे भांडण मिटते.

    उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये.
    या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण !

    उंबरा हा घराला असतो. उंबरा ही घराची सुरवात आहे.
    बाहेरील काही सरपटणारी जनावरे दरवाजा आणि त्याखालील जमिनीच्या फटीतुन आत येऊ नयेत, यासाठी घराच्या पुढील आणि मागील मुख्य दरवाज्यांना उंबरठा असतो. म्हणजेच उंबरा हा घराचे एका अर्थाने संरक्षण करीत असतो.

    घर हे सर्वांचेच असते. घरात राहून काम करणाऱ्यांचे आणि घराबाहेर राहून घरासाठी राबणाऱ्यांचे. मग ती स्त्री असो वा पुरूष. आणि हो, घराच्या मर्यादाची काही लिखित संहिता नाही की, उंबरठ्यावर बसून नियम तपासून घरात प्रवेश. घराच्या मानमर्यादांचे उल्लंघन होऊ नये, एवढंच. या मानमर्यादा प्रत्येक घराच्या वेगळ्या असतील. काही जणांच्या कपड्यांच्या, काही जणांच्या सोवळ्याच्या, काही जणांच्या डोक्यावरून पदर घेण्याच्या तर काही जणांच्या चेहेरा सुद्धा झाकून घेण्याच्या या परंपरा त्या त्या घरानुसार पाळल्या गेल्या पाहिजेत. इथे त्या घराचा आत्मसन्मान, समाजातील स्थान, लपलेलं असतं. जसं एखाद्या डाॅक्टरकडे पहाण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन असतो. त्याने नीटनेटके कपडे घालावेत, जरा चांगले दिसावे, त्याच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटतंय, असं बघणाऱ्याला वाटलं पाहिजे. हे चुक नाही. समजा, एखादा डाॅक्टर आडव्या चट्यापट्याचा शर्ट, शर्टची वरची दोन बटणं उघडी, डोळ्यावर मल्टीकलर गाॅगल, पान चघळतोय, केसांचा स्पाईक, खांद्यावर रूमाल आणि स्वतः रिक्शा चालवित, ओपीडी मधे आला तर वेटींगमधे बसलेल्या रुग्णांना कसे वाटेल ? त्यांच्या मनातील डाॅक्टर या प्रतिष्ठेला धक्का बसेल.

    अशीच प्रतिष्ठा प्रत्येक घराला जोडलेली असते. घराला म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला जोडलेली असते. घराची ही प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे.

    घराच्या उंबऱ्याचे हे नियम गृहीत धरलेले असतात. आणि तसं बघायला गेलं तर हे नियम कुठे आहेत? घराचा उंबरठा ही घराची प्रतिष्ठा आहे. तुम्ही असं काही करू नका, ज्याने आपल्या प्रतिष्ठेला बाधा पोचेल, असं खरं तर म्हणायचं असतं आईला !

    पण आता घराला उंबरेच कुठे दिसतात ? तेच तर गायब झालेत आणि त्याबरोबर घराची प्रतिष्ठा देखील !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १४.०८.२०१७

      August 14, 2017