वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारत लवकरच स्वतंत्र होईल आणि भारताला जागतिक व आर्थिक घडामोडीत निश्चित महत्वाचे स्थान मिळेल, असा दृढविश्वास असलेले उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांनी डिसेंबर, १९४० मध्ये त्यावेळच्या म्हैसूर संस्थानच्या सहाय्याने हिंदुस्तान एअरक्राफ्ट ही कंपनी बंगलोर येथे स्थापन केली. २३ डिसेंबर, १९४० रोजी नोंदणी झालेली ही संस्था केवळ चार कोटी रुपयांच्या भांडवलावर सुरू झाली.
June 27, 2023
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.
January 11, 2010
कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.
मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.
मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.
दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?”
मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या.
मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली.
मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते."
खंबिरपणे उभे राहा.कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेन बघा त्याचा खंबीरपणे सामना करा...कोन्हीही तुमचे काहीही करू शकनार नाही.. यश तुमचेच....
नाहीतर....
जग तुम्हाला आडवे करेल..
विचार करा
August 18, 2016
हल्लीच्या जीवनात नावासोबतच आवाजालाही महत्त्व आहे. निसर्गाने प्रत्येकाला जसा वेगळा चेहरा, शरीररचना दिली, तशीच आवाजाची अर्थात ध्वनीची देणही दिली आहे. एका व्यक्तीचा आवाज दुसऱ्या व्यक्तीशी मिळताजुळता असू शकतो, पण तो हुबेहूब असू शकत नाही.
April 16, 2022
केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०१५ साली ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा करण्याचे घोषित करण्यात आला होते.
हातमाग उद्योगाला अच्छे दिन
खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत होती. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होते आणि त्याच्या मोबदल्यात खाण्यास लागणारे अन्नधान्य मिळत होते. शेतात उत्पादित झालेले धान्य त्याच गावात फिरत राहत होते. पैसा नावाची वस्तू त्यांना माहीतच नव्हते, त्यामुळे जो तो आपापली कामे अगदी चोख आणि व्यवस्थितपणे करीत असत. यांच्यासाठी गावात बारा बलुतेदार ही पद्धत आस्तित्वात आली होती. ज्यामुळे प्रत्येकाचे काम अगदी सहजपणे कुठलीही समस्या निर्माण न होता पूर्ण होत असे.
ज्याचे काम त्यानी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी,चांभारानी चपला शिवाव्यात,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुणब्यानी शेती करावी, साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे. मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे. त्या कापडाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापड जाडजूड, टिकाऊ आणि अनेक वर्षे ते कापड फाटले तरी फाटत नव्हते.
उन्हाळ्याच्या दिवसात तर या कापडाला जास्तीची मागणी असते . भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपडा. हा कपडा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागावर विणून तयार करीत असत. आज ही ह्या समाजातील बरीच मंडळी हा उद्योग करतात. देशात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भिवंडी, सोलापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर सारख्या ठिकाणी हा समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे कपडे विणणे ; परंतु इंग्रजांनी भारतात येऊन ज्याप्रमाणे इतर व्यवसायावर घाला घातला तसेच या हातमाग उद्योगांवर सुध्दा घाला घातला गेला.
इंग्रजांनी भारतात येऊन जाडजुड कपड्यांच्या जागी मऊ तलम व वजनाने हलकी वाटणारी टेरीकॉट कापड तयार करण्याची यंत्रणा आणली आणि या खादी उद्योगाला घरघर सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशीचा तीव्र लढा सुरू करण्यात आला होता. बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकाने परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपले बलिदान देऊन स्वदेशीचा लढा सर्वदूर पोहोचविला होता. याच दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती .
यावरून विदेशी कपड्याने भारतात किती मोठे साम्राज्य निर्माण केले होते, याची जाणीव होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी या खादी कपड्यांच्या उद्योगाला चालना मिळेल अशी छोटी आशा होती. मात्र झाले उलटेच. खादी उद्योगाला स्वातंत्र्यानंतर सुध्दा घरघर लागली. ज्या समाजातील लोकांचा हा मुख्य व्यवसाय होता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या लोकांना पोट भरण्यासाठी इतर कामाच्या शोधात भटकत रहावे लागू लागले यातूनच हा समाज जो पूर्वी एका ठिकाणी स्थिर होता तो संपूर्ण देशात पसरलेला दिसून येतो. तरी ही त्या॑नी मूळ व्यवसाय सोडलेली नाही. आज ही या समाजातील ४३ लाख हून अधिक लोक खास करून हातमागाचा व्यवसाय करतात.
ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणारी कुटूंबातील महिलांसाठी हाच व्यवसाय उदरनिर्वाहचे एक साधन आहे. या खादी व्यवसायास चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, या राष्ट्रीय हॅण्डलूम दिवसा मुळे सरकारच्या या निर्णयाने भविष्यात खादी हातमाग उद्योगाला अच्छे दिन येतील असा विश्वास करण्यास काही हरकत नाही. आपण सर्व भारतीय नागरिकांनी देखील या उद्योगास चालना मिळावी म्हणून वर्षातून एक तरी खादीच्या कापडाचा पोशाख वापरावे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
सन २०२३ची नोबेल पारितोषिकं नुकतीच जाहीर झाली आहेत. यांतील भौतिकशास्त्रातलं पारितोषिक अणूंतील इलेक्ट्रॉनसंबधीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, प्रकाशस्पंदांच्या निर्मितीसाठी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक नॅनोतंत्रज्ञान ज्यावर आधारलेलं आहे, त्या अतिसूक्ष्मकणांच्या निर्मितीवरील संशोधनासाठी देण्यात येणार आहे.
October 16, 2023
भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय..
February 1, 2017
रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६ व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे `हॅम्लेट’, `मॅक्बेथ’, `ऑथेल्लो’, `किंगलियर’ या शोकांतिका किंवा `एज यू लाइक इट’, `ट्वेल्थ नाईट’ अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर डय़ुमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली.
March 27, 2022
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं.
December 16, 2021
‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर.
चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची.
सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी.
‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘
हा समर्थ संदेश अखेरच्या श्वासापर्यंत पाळला तो शंभूराजांनी.
‘आम्ही हिंदू सांप्रत सत्वशून्य झालो आहोत’ अशी चीड व्यक्त करतानाच वेद- स्मृती यांनी नेमून दिलेली क्षत्रिय वर्णनिहाय कर्मे करणे आम्हाला औरंगजेबसारख्या यवनाधमामुळे शक्य होत नाही असे शंभूराजे; रामसिंगला लिहितात.
हिंदू मंदिरे पाडून जिथे अन्यपंथीय प्रार्थनास्थळे उभारली आहेत; ती पाडून पुन्हा मंदिरे उभारण्याचे आदेश देतात शंभूराजे.
गोव्यात पोर्तुगीज पाद्र्यांनी चालवलेल्या धर्मांतरणाच्या अनन्वित अत्याचारांना ‘जशास तसे उत्तर’ देतात ते शंभूराजे.
‘धर्माशिवाय जगणे म्हणजे साक्षात मरण आहे’ असं बुधभूषण या ग्रंथात शंभूराजे लिहितात.
‘माझ्या मुलुखातून कोणीही माणूस धर्मांतर करवून बाटवता येणार नाही’ असे कलम शंभूराजे तहात घालतात.
शिवराय- शंभूराजे यांना 'सेक्युलर' ठरवणाऱ्या निधर्मीवादी आणि हिंदुद्रोही बांडगुळांनो; संपूर्ण शंभूचरित्र तपासून पहा. असे खंडीभर पुरावे सापडतील......
शंभूराजे म्हणजे साक्षात रुद्र आहेत. ज्यांच्या तृतीय नेत्राच्या तेजाने अवघे हिंदुत्व उजळून निघाले.
‘धर्मवीर’ ही उपाधी कोणाला शोभून दिसत असेल तर ती शंभूराजांनाच.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(व्याख्याते: शंभूराजांची राजनीती; संपर्क: 0251-2863835)
December 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti