(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आचमन का करायचे?

    समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी नव्हते. त्यामुळे शेकडो वर्षे गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही. गुरुचरित्र मात्र टिकून आहे. म्हणून मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले . शरीर हलके वाटू लागले. असिडिटी कमी झाली. नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, " बरोबर आहे." आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.

    आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच वापरले. फक्त आम्हाला ते माहीत नाही म्हणून टाकाऊ म्हणून आम्ही ते सोडून दिले.

    अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

      June 10, 2017


  • भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर

    भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर

    हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.

      December 18, 2025


  • वावर

    माणसांचा व मनाचा वावर कुठे कुठे व कसा कसा होईल हे काहीच सांगता येत नाही. वावर सद्भावनेचा असेल तर ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ही अनुभूती येतेच.

      June 18, 2026


  • विवोन कोमे दुसऱ्या महायुद्धातिल स्त्री गुप्तहेर

    विवोन  कोमेचा जन्म .१८ नोव्हेंबर १९०९ मध्ये शांघाय चीन येथे झाला. तिचे कोडनेम होते अनेट. तिचे वडील बेल्जियमी व आई स्कॉटिश होती. तिचे शिक्षण बेल्जियम व स्कॉटलंड येथे झाले. १९३७  मध्ये तिचे चार्ली कोमेशी लग्न झाले तो रायफल ब्रिगेड मध्ये काम करत होता.

      January 10, 2023


  • जेवणाची योग्य वेळ कोणती – अंतिम भाग 20

    घड्याळ दोन तास पुढे करा.

    जेवणाची वेळ सायंकाळी सात वाजता करणे हे
    "आताच्या प्रमाणित सरकारी वेळेनुसार शक्य नाही."
    प्रत्येकाचा हाच एक प्राॅब्लेम.
    त्यालाही एक पर्याय सुचवतो.
    आपले राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे करावे. म्हणजे काही प्रश्न आपोआपच सोडवले जातील.

    मी त्या क्षणाची वाट पहातोय, जेव्हा मा. पंतप्रधान मोदीजी रात्री आठ वाजता, कधीतरी रात्री राष्ट्र के नाम संदेश घोषित करतील....

    "मित्रो, उद्या सूर्योदयापासून सरकारी कार्यालयांची वेळ बदलण्यात आली असून राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे सरकवण्यात आलेले आहे. साडेदहा ऐवजी सकाळी साडेआठला सरकारी कार्यालये सुरू होतील. आणि सायंकाळी साडेपाच ऐवजी 3.30 ला सर्व कार्यालयातील कामकाज थांबेल. जास्तीत जास्त उशीरा म्हणजे 4 वाजेपर्यंत पर्यत काम होईल. त्यानंतर सर्व सरकारी कामे बंद करण्यात येतील. त्यामुळे घरी यायला कोणतेही कारण उरणार नाही. साडेपाच ते सहापर्यंत सर्वजण घरी पोचतील. आणि पुढील एक तास जेवण बनवण्यात खर्च होऊन सात वाजता जेवण आटपेल. साडेसातला स्वयंपाकघरात कोणी गेल्यास जेवण मिळणार नाही. कुलुप लावण्यात यावे. घरातील स्त्री पुरूषांनी त्यानंतरचा वेळ सामाजिक कामांसाठी खर्च करावा. काळ वेळ ओळखून बागेत, देवळात, प्रयोगशाळेत, वाचनालयात जरूर जावे. विशेषतः महिला वर्गाने स्वतःसाठी स्पेस घ्यावी.
    चूल, मूल, रांधा,वाढा, उष्टी काढा या जोखडातून बाहेर पडावे. साडेसात ते रात्रौ साडेदहा पर्यतचा वेळ फुल्ल फॅमिली टाईम."
    रात्रीची लास्ट लोकल दीड ऐवजी 12 वाजता असेल.

    असं केल्याने पहाटे उठावे लागेल, भूक लागूनच जाग येईल, आपोआपच ब्राह्म मुहूर्तावर उठणे होईल. दिनचर्या वेळेत सुरू होईल. माॅर्निंग वाॅक बंद. त्याऐवजी दहा पंधरा मिनिटं प्राणायाम योगासाठी देता येईल.
    नाश्त्याला काय असा प्रश्नच पडणार नाही. त्याऐवजी जेवणाचीच तयारी करावी. जेवूनच बाहेर पडावे. शाळा, ऑफीस, बॅका, पोस्ट, दुकाने, माॅल, सरकारी दवाखाने, कोर्ट, संसद कामकाज नऊला सुरू झालेले असतील. जेवणाचा डबा फार जणांना न्यावाच लागणार नाही. अगदी हलका फुलका नाश्ता किंवा उत्तम प्रतीचे फळ दुपारी खावे. ते सरकारकडून पुरवण्यात येईल.

    सायंकाळी नंतर या सर्व सरकारी आस्थापने बंद झाल्याने वीजेची प्रचंड प्रमाणात बचत होईल. भारनियमन कायमचे बंद होईल. पहाटे लवकर उठायचे असल्यामुळे रात्री लवकर झोपणे होईल, त्यामुळे झोप पूर्ण होईल.
    फायदेच फायदे होतील....

    म्हणून,
    "मेरे प्यारे देशवासीयोऽऽ, ये बदलाव किसी राजकीय स्वार्थ से नही, बल्की आपकी याने आपके देह की रक्षा केलिऐ और मेरे देश की रक्षा के लिए बहोत जरूरी है, मेरी आपसे गुजारीश है, मुझे सिर्फ एकसो बीस दिन यानी तीन महिना दिजीए, आपको बदलाव जरूर दिखेगा, जिंदगीभर की यातायात, और दवाओ का काला बाजार हमेशा केलिए बंद हो जाएगा.
    बस्स मुझे आपका सहयोग चाहिए । अपने लिए, अपने परिवार केलिए और अपने देश केलिए कुछ करने का, कुछ कर दिखाने का समय आ गया है ।
    मित्रो, मुझे पूरा भरोसा है, आप मेरा साथ जरूर दोगे, शुरूवाती के दिनो मे आपको तकलीफ जरूर होगी, लेकीन आपकी सेहत मे काफी सुधार आएगा ।
    सुबह जल्दी उठने की वजह से दो लोगों की मौत....
    दवाईयों का कारोबार खत्म होने से अस्पताल पडे सुने.....
    घरेलू और सरकारी स्तर पर लाईट बिल मे भारी कमी की वजह वीज वितरण कंपनी मे भारी हडताल....
    मोदीनी सत्तर वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढली....
    आयुष मंत्रालय को सख्त आदेश जारी। सभी आयुष अधिकारी चुस्तफुस्त दिखने लगे ।

    ऐसी ब्रेकींग न्यूज आपको मिडीया दिखाएगा, पर इनपर भरोसा मत करना ।

    खुद को पहचान कर, अपने आप मे जो बदलाव आप महसूस करेंगे वो आपके अपनो केलिए बडे अच्छे साबीत होंगे।

    नई सोच के साथ भारत आगे जा रहा है, मेरा भारत बदल रहा है, अच्छे दिन आ रहे है ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    15.03.2017

      March 15, 2017


  • भारतीयांचा पहिला ब्रिटिश-विजय आणि सोबर्सचे अंतिम शतक

    … धावफलकात त्याची नोंद नाबाद अशी आढळते. विज्डेनच्या वार्षिकांकात तो ‘पोटदुखी’मुळे निवृत्त झाला अशी माहिती मिळते. खरी बात मात्र औरच आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर तो 31 धावांवर नाबाद होता आणि अख्खी रात्र त्याने पोर्ट आणि ब्रॅन्डी पिण्यात घालवली होती. त्याच्या चित्तवृत्ती दुसर्‍या दिवशी फलंदाजीस उतरताना मद्यमय झालेल्या होत्या आणि आपण मैदानावरच उलट्या करू अशी शक्यता त्याला ‘त्या’ अवस्थेतही अस्वस्थ करीत होती.

      August 24, 2010


  • पेसमेकर

    हृदयाच्या ठोक्यांची गती नियमीत करणे हे पेसमेकरचे कार्य असते. आधुनिक पेसमेकरचे बाहेरुन प्रोग्रॅमिंग करता येते. अशा काही यंत्रांमध्ये पेसमेकर व डिफायब्रिलेटर यांचा समन्वय असतो. हृदयाच्या खालच्या चेंबरचे कार्य सुधारण्यासाठी जास्त इलेक्ट्रोडच्या पेसमेकरचा वापर केला जातो.

      October 16, 2022


  • मी असा का? – महेश झगडे, I.A.S

    मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन.

      June 6, 2022


  • दिवे लागले रे “तमाच्या” तळाशी !

    शंकर रामाणींच्या भाषेत “देहयात्रेत गुंतलेल्या ” आपणां सर्वांना कोरोना नावाच्या तमाने अस्तित्वाच्या तळाशी नेऊन ठेवले पण काल सरलेल्या दीपोत्सवाने सर्वदूर भान देणारे दिवे लावले आणि आपले तळ उजळून निघाले.

      October 30, 2022


  • मूर्ती लहान पण …

    Concord म्हणजे सामंजस्य, मान्यता. ब्रिटन व फ्रांस यांच्यात करार होऊन Supersonic विमानांची निर्मिती करण्याचे ठरले. विमानाला नाव देताना ‘e’ जोडला गेला Concord च्या पुढे. म्हणून ‘Concorde’ असे त्याचे बारसे झाले.  

      September 25, 2019