वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. पु.लंच्याच शब्दांत “ती फुलराणी” म्हणजे “स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसांची कथा !”
January 29, 2022
जोखीम अशी घ्यावी जी खरोखरीच आपल्याला यशाकडे घेवून जाईल. मग अशी जोखीम ती कोणती?
December 29, 2010
…एका इसमाने पैज म्हणून अंगावरील सर्व कपडे काढले आणि मैदानात धाव घेतली. हा एका जहाजावर खानसामा होता (स्वयंपाक्या) आणि त्या दिवशी पाच तास एका खानावळीच्या भट्टीसमोर तो वैतागला होता.
August 4, 2010
मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही हे जाणत्या पूर्वजांच्या लक्षात आल्यामुळे वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्बोधन करत बसण्याऐवजी युक्तीचा शोध सुरु झाला आणि त्यातूनच जन्मला वटसावित्री नावाचा एक अत्यंत उपयुक्त सण.
पुरुषांनी सरपणासाठी वृक्षतोडीसारखी व जंगल साफ करून शेती करण्यासारखी मेहनतीची कामं करायची पूर्वापार पद्धत असल्यामुळे इतर सर्व वृक्षांबरोबरच मानवासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या वटवृक्षाचीही सर्रास कत्तल करण्यात येत होती. जे पुरुष वृक्षतोड करतात ते त्याचं संरक्षण करू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन आपल्या थोर पूर्वजांनी ती जबाबदारी स्त्रियांवर सोपवली. माणूस पापभिरू असल्यामुळे ज्या वटवृक्षाच्या खोडाला धागे बांधून त्या वृक्षाची पूजा केल्याचे त्याने बघितले त्या वृक्षावर त्याने कधीही कुऱ्हाड चालवली नाही. माणसाची विज्ञानापेक्षा जप-तप,अंगारे धुपारे,देव, पोथ्या-पुराणं यांच्यावर जास्त श्रध्दा असल्यामुळे वृक्ष रक्षणाच्या या कृतीला सणाचं रूप देण्यात आलं आणि वटसावित्री नावाचा तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला.
आपले सर्व सण हे पूर्णपणे विज्ञानाधिष्टीत आहेत, पण त्यांना हेतुपुरस्सर अंधश्रद्धेचं स्वरूप देण्यात आलं आहे.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
June 8, 2017
प्रभो नाम तुझे । मल्हारी । भत्त*ांचा कैवारी ।
राणी म्हाळसा । सुंदरी । शोभे सूर्याप्ररी । प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पहिले ठाणक हे । मूळ महिलार । भत्त*ांचे माहेर ।
खंडेराव रूद्राचा । अवतार । होतो जय जयकार ।।
अंगणी नाचती । अवधारा । उधळुनीया भंडारा ।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
दुसरे ठाणक हे । पालीत । पहा मनुजा ख्यालीत ।
पालीत पाहुनीया । देवराव । श्री मार्तंड भैरव ।।
घालीत नगाऱ्या । वर घाव । विघ्ना सुटला धाव ।।2।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
तिसरे ठाणक हे । बाळ्यांत । सदरच्या किल्ल्यात ।
मुल देव बसले । खुशभत्त* । गड जेजुरीला जात ।।
माथा वन्दीले । चरण । भवजलधी तारण ।।3।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
चौथे ठाणक हे सातारा । शेगुडी देव पाहता ।
आनन्दले चित्ता । अवचिता । हरली माझी चिता ।।
प्रभु म्या देखियला । अवधारा । हरपले असे धारा ।।4।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पाचवे ठाणक हे । जेजुरी । नवखण्ड मेदिनी ।
परतुन आणीली । धनंगिरी । बाणु उजव्याकरी ।।
राणी म्हाळसे । हे माते । पसन्न हो भत्त*ाते ।।5।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
गायक - श्री. नितिन श्री.
October 15, 2015
डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला..
मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..!
कारण,
एकूणच मनुष्याचे आचरट वर्तन पाहाता तो मानसीक पातळीवर अद्याप आपल्या पुर्वजांच्याच पातळीवर असावा अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे..!!
(आपले राजकीय नेते, अध्यात्मीक 'बाबा', मेणबत्ती संप्रदाय आणि दुटप्पी 'आम आदमी' म्हणजे आपण सर्व यांच्यामूळे मी प्रसवलेला 'सिद्धांत')
-- गणेश साळुंखे
November 11, 2016

आपल्या सूर्याचं जवळपास निम्मं आयुष्य संपलं आहे. सुमारे पाच अब्ज वर्षांनंतर सूर्य मृत्यू पावणार आहे. त्याचा परिणाम आपल्या ग्रहमालेवर अर्थातच होणार आहे. त्यातही सूर्याच्या जवळ असणाऱ्या ग्रहांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. हे कसं घडून येणार आहे, याची कल्पना देणारी एक घटना संशोधकांनी नुकतीच टिपली आहे.
May 12, 2023
बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।।
बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती.
मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु.
विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. त्यांच्याशी युद्ध करून श्रीविष्णूंनी त्यांना मारले.
श्रितकौस्तुभेया- कौस्तुभ हे भगवान विष्णूच्या गळ्यातील रत्नाचे नाव. त्याने अलंकृत.
एकत्रित अर्थ पाहता, मधू राक्षसाचे विनाशक भगवान श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्याने अलंकृत.
आई जगदंबेची दृष्टी वारंवार भगवान श्रीहरीच्या हृदयावर जात असल्याने तेथे असणाऱ्या कौस्तुभमण्याने ती दृष्टी अलंकृत होते असा भाव.
हारावलीव हरिनीलमयी विभाति- हरी म्हणजे हिरवा तर नील म्हणजे निळा. हिरवे रत्न पाचू तर निळे रत्न नीलम. महालक्ष्मी चे डोळे तसे हिरवट निळे आहेत. जणु त्या मण्यांची माळ तयार केली तर ती जशी दिसेल तशी आईची कटाक्ष मालिका विभाति म्हणजे शोभून दिसत आहे.
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला- भगवंताला देखील जी काम म्हणजे प्रेमभावना प्रदान करते अशी ती कमलालयाया:- कमळामध्ये निवास करणाऱ्या आई महालक्ष्मीची कटाक्षमाला- वारंवार टाकलेले कटाक्ष यांची जणू माला.
कल्याणमावहतु मे - मला कल्याण प्रदान करणारी होवो."
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 14, 2020
प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे.
July 13, 2025
26 नोव्हेंबर 2019 ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. गेल्या पाच वर्षात सागरी सुरक्षेमध्ये काय सुधारणा झाल्या, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळात अजून काय जास्त सुधारणा करणे गरजेचे आहे या सगळ्या विषयावर चर्चा होणे जरुरी आहे.
November 24, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti