वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
घरचं ‘पाणी’ शुद्ध आणि हाॅटेलातल्या ग्लासातलं ‘पानी’ अशुद्ध ? मराठीतला तोंच चणा हिंदीत चना होतो…भैय्या, पान्च्य (पांच नव्हे ना !) रुपये का चना देना)….आगला टेशन थाना (ठाणे नव्हे) .. खाना खानेको गये है.. हे जर आपण चालवून घेतो तर आपल्याच मराठी माणसांचे कांही आपल्याला न पटणारे उच्चार चालवून घ्यायला काय हरकत आहे ? ती त्यांची बोली भाषा असेल तर असूंदे. त्यांची इतकी टवाळी कां करावी ?
September 29, 2019
आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,
February 23, 2020
हा विचारप्रवर्तक लेख आहे. त्यांनी मुख्य मुद्दे समर्थपणें हाताळलेले आहेत, मी basically त्यांच्याशी सहमत आहे. केवळ कांहीं गोष्टींचा थोडासा ऊहापोह.
याबद्दल माझें मत मी शेवटी मांडणार आहे. आत्तां इथें त्याची चर्चा केल्यानें विषयांतर होण्याची भीती आहे. पहा परिशिष्ट – (२) .
मात्र, मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद चांगला ( बराच) मिळाला आहे, असें मला वाटतें.
मध्य-युगातही युरोपीयांची ‘क्रूसेडस्’ या नांवानें मध्य-पूर्वेत मुस्लिमांशी जी युद्धें झाली, ती भाषिक नव्हती, ती धर्माधिष्ठित होती.
तेव्हां, हल्लीहल्लीपर्यंत तरी, हें धर्माधिष्ठित, तत्वज्ञानाधिष्ठित (philosophy) असेंच राजकारण होते. जेव्हांपासून भारतात भाषावार-प्रांतरचना झाली तेव्हांपासून राजकारण भाषाधिष्ठित बनले (अपवाद कदाचित तमिळनाडुचा. आणि तमिळांच्याही राजकारणाचा उगम, १८ व्या -१९ व्या शतकातील ‘आर्य-आक्रमण’ हा अयोग्य सिद्धांत आहे, हेंही आपण पाहिलें). पाकिस्तान-निर्माण हाही धर्माशी संबंधित प्रश्न केला गेला, भाषिक नव्हे, संस्कृतसंबंधी तर नव्हेच नव्हे.
इतिहासाचार्य राजवाडे सांगतात त्याप्रमाणें, (त्यांच्या काळीं) पुण्याची मराठी ही ‘नागर अथवा शिष्ट मराठी’ ( जिला राजोपाध्ये ‘प्रमाण-मराठी’ म्हणतात), समजली जात होती. त्याच्या ३०० वर्षें आधी पैठणची ‘ब्राह्मणी’ मराठी ही प्रमाण-मराठी समजली जात असे; व ७०० वर्षांपूर्वी, (म्हणजे, ज्ञानेश्वरांच्या काळीं) देवगिरीच्या भोवतालच्या प्रदेशातील ‘ब्राह्मणी’ मराठी ही प्रमाण-मराठी समजली जात असे.
आपल्याला ज्ञानेश्वरीची आज जी प्रत दिसते, ती एकनाथकालीन ‘प्रमाण-मराठी’मध्ये आहे. पण इतिहासाचार्य राजवाडे यांना पाटांगण-बीड येथें एक ज्ञानेश्वरकालीन ज्ञानेश्वरी सापडली, जी ज्ञानदेवांच्या काळानंतरच्या दोनचार दशकांमधील आहे. (श्री. माडगांवकर यांना सुध्दा अशीच त्या काळची आणखी एक प्रत मिळाली होती). त्या प्रतींची भाषा अर्थातच ज्ञानेश्वरकालीन ‘प्रमाण-भाषा’ आहे. एकनाथांच्या काळापर्यंत प्रमाण-भाषेचें रूप बदललें होतें, म्हणून त्यांना ज्ञानेश्वरीचें तत्कालीन भाषेत पुनर्लेखन करावे लागलें.
( हल्लीच्या काळातही, असें उदाहरण दिसतें. वरदा प्रकाशनचे भावे यांनी बर्याच जुन्या मराठी पुस्तकांचें पुनर्मुद्रण केले, त्यावेळी त्यांनी बदललेल्या भाषिक रूपांप्रमाणे, जुन्या-मराठीचें आधुनिककालीन मराठीत पुनर्लेखन केलें. )
(पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
September 26, 2016
एकुणातच साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आजकाल जिकिरीचे झालंय. त्यातून फारसे काही हाती लागत नाही,हेही एक प्रमुख कारण असावे. पण काही योग कोणीतरी आपल्या वाटेवर आणून ठेवले असतात आणि आपण ते जगायचे असतात.
August 5, 2022
जम्मू-काश्मीरच्या जम्मू भागातील केरन या गावात गेल्या आठवडाभरापासून घुसखोरी करून ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना शेवटी हुसकावून लावण्यात आले आहे. भारतीय लष्कराने विलक्षण संयमाने पार पाडलेली ही लष्करी मोहीम आता संपली आहे. लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांनी ही घोषणा केली.
October 17, 2013
” आंधी” चित्रपट भारतभर व मुंबईत मेट्रो थिएटरमध्ये गर्दीत सुरु असतानाच देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली, त्यात या चित्रपटांवर बंदी आणली गेली. हा बहुचर्चित चित्रपट काही महिन्यांनी पुन्हा सेन्सॉर करण्यात आला आणि मग पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. संजीव कुमार व सुचित्रा सेन यांचे यातील काम अप्रतिम. कोशीश आणि आंधी सारखे खास चित्रपट गुलझार यांनी संजीव कुमार यांना करण्यास दिले, आणि दोन्ही चित्रपटा साठी संजीव कुमार यांनी बेस्ट कलाकाराची बक्षीसे मिळवली. आंधी हा चित्रपट म्हणून तर अप्रतिम आहेच पण यात आहेत आर डी बर्मन यांची गाणी. ” आंधी ” चित्रपट म्हणजे राजकारणाच्या पाश्वभूमीवरील संवेदनशील प्रेम कथा. इंदिरा गांधीच्या आयुष्याशी असलेल्या काहीशा साधर्म्यामुळे ह्यावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. जे के (संजीव कुमार) हा हॉटेल मॅनेजर असतो, त्याच्या प्रेमात आरती (सुचित्रा सेन) ही एका राजकीय पुढाऱ्याची मुलगी पडते. लग्नानंतर काही वर्षांनी काही अपरिहार्य कारणांमुळे आरती राजकारणात प्रवेश करते. कालांतरानं आरतीची आरती देवी होते. जे के आणि आरती देवी दोघं एकमेकांपासून वेगळे होतात. अनेक वर्षांनी पुन्हा दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा दोघांना जाणवतं की एकमेकांवरचं प्रेम अजूनही तेवढंच आहे. आयुष्यातील ध्येयाला मिळविण्यासाठी नायिकेने कठोर निर्णय घेतलेला असतो पण पतीशी भेट झाल्यानंतर स्वतःच्या भावनांना ती आवर घालू शकत नाही. त्यानंतर पतीच्या अस्तित्वामुळे तिच्या आयुष्यात येणारे वादळ.
या चित्रपटातील गाणी जशी अप्रतिम तसेच संवाद देखील थेट हृदयाला भिडणारे आहेत. गाणी, संवाद या बरोबर संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांचा अभिनयही अवर्णनीय! काही प्रसंगांचे चित्रीकरण कायमचे लक्षात राहणारे. भेटीनंतर पतीच्या घरात शिरतानाची तिची भिरभिरती नजर. ही नजर आपणास बरेच काही सांगून जाते. माझ्याशिवाय हा कस् आयुष्य जगतोय, ह्याच ठीक चाललंय ना, एक नजर बरेच काही सांगून जाते. संवाद ही कसे, एकाच वाक्यातून जीवनातील अर्थही सांगून जाणारे. दिर्घ काळानंतरच्या पहिल्याच भेटीत तो म्हणतो 'थोडा पतला हो गया हुं'. मी शरीराने तर खचलोच पण मानसिक दृष्ट्या (तुझा सहवास नसल्याने) कमजोर बनलो आहे. एका प्रसंगात नायिका म्हणते. तुम्हारी साथ कविता न होती तो तुम सामान्य होते.
ह्या चित्रपटातील ३ गाणी मंत्रमुग्ध करून टाकतात.
https://www.youtube.com/watch?v=9ezj1yuRmIc
१) तुम आ गये हो नूर आ गया हैं
२) इस मोड से जाते हैं
३) तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं
https://www.youtube.com/watch?v=wBYMGrThxkI
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 14, 2022
आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या कामात स्वराज्य आणि स्वदेशी हे दोन मंत्र महत्त्वाचे होते. या दोहोंचा परस्परांशी संबंध होता व असे म्हटले आहे की, स्वदेशीशिवाय स्वराज्य अपूर्ण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीचा अर्थ वेगळा होता आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्याचा अर्थ वेगळा झाला. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी स्वराज्य आणि स्वदेशी आवश्यक आहेत आणि स्वातंत्र्यानंतर आर्थिक स्वावलंबनासाठी स्वदेशी आवश्यक आहे असा विचार मांडण्यात आला.
November 24, 2023
१९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते.
October 18, 2010
१८६८ मध्ये लंडन येथे बेंजामिन वॅडी या पेंटरने पहिल्यांदा वॉटर हीटर तयार केला, त्याला गिझर असे नाव होते. त्यामुळे आजही आपण गिझर हा शब्द वॉटर हीटरला नेहमी वापरतो. १८८९ मध्ये एडविन रूड या नॉर्वेच्या इंजिनियरने अधिक प्रगत असा इलेक्ट्रीक वॉटर हीटर तयार केला.
August 13, 2023
आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”!
September 28, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti