वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सर्वाधिक क्सोटी बळी यष्ट्यांमागून मिळविणारा मार्क बाऊचर आणि आजचे आघाडीचे यष्टीरक्षक
December 1, 2010
एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले.
प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे ताट त्वरित खाऊन टाकले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.
पुजा संपल्यावर श्रीगुरु दत्ताञेय गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार.
तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले. 'शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।। शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।।' करुणा ञिपदीचे हे बोल ऐकून श्रीगुरु दत्ताञेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले.
तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".
तेव्हा श्री गुरु दत्ताञेयांनी प्रश्न केला, " इथे सत्ता कोणाची ? " ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, " देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ". त्यावर श्री गुरु दत्ताञेय म्हणाले, "अरे तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता. त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले ?" त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.
या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.
टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळ्ये त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणस आपण जर राग आवरु शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.
??आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते. तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते.
ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.............
October 17, 2016
सनातन भारतीय संस्कृतिनुसार वर्षातील साडेतीन मुहूर्त अतिशय महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, अक्षयतृतीया व विजयादमी हे पूर्ण मुहूर्त आहेत. कार्तीक शुक्ल बलि प्रतिपदा हा अर्धामुहूर्त आहे. या दिवशी कार्यरंभ केल्यास कार्य सिध्दीस जाते. हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. वर्षातील पहिला मुहूर्त गुढीपाडवा होय म्हणूनच याला विशेष महत्व आहे. वर्ष भरा चे सद्संकल्प या दिवशी करावयाचे असतात. सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. विकारी नाम संवत्सर शालीवाहन शके १९४१ शनिवार दिनांक ०६/०४/२०१९ पासून सुरू होत आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात जनता आपल्या घरावर गुढी उभारते एका काठीला कडुनिंबाची अगदी बारीक बारीक फांद्या, गाठ्या, गडवा, भगवा ध्वज व पोलक्याच कापड लावण्यांत येते. भगवा ध्वज म्हणजे वैराग्याचे प्रतिक, पोलक्याचे कापड म्हणजे देवीच्या शौर्याचे प्रतिक, काठी म्हणजे शस्त्राचे प्रतिक होय. श्रीकृष्णाने गीता सांगितली पण त्यांचे हातात सुदर्शन चक्र होते. यांतील भावार्थ म्हणजेच गुढी उभारणे होय. या दिवशी सकाळी मंगल (अभंग) स्नान करण्यांत येते. सद्गुरुची व विविध देवदेवतांची अंत:करणापासून पूजा करण्यांत येते. घरातील सर्वजण नविन वस्त्रे धारण करतात. ते विनम्र भावाने वर्षफल ऐकतात. संवत्सर फलांत साधारणपणे वर्षभरातील हवा, पाणी, पीक यांचे वर्णन असते. वर्षफल गुढीपाडव्यास श्रवण केल्यास धन, धान्याची व आयुष्याची वृद्धी होऊन नविन वर्ष सुखसमाधानाने जाते. अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. सस्य सर्व सुखंच वत्सरमुलं सशृण्यता सिद्धीम् ! अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे. भारतीय प्रथांना रितीरिवाजांना व प्रतिकांना निश्चित व तर्कशुद्ध आधार असतो. असे बहुतेक प्रकरणांत आढळून आलेली आहे.
फाल्गुन व चैत्र महिन्यात वसंतऋतुचा काळ असतो. अतिशय थंडी अगर अतिशय गरमी या संधिकाळात नसते. म्हणून गुढीपाडव्याला कडुनिबाची कोवळी पाने, फुले त्यांत मिरे, हिंग, मीठ व जीरे वगैरे आकून ते चुर्ण भक्षण करण्यांत येते. हे पाचक व रोग प्रतिकारक चूर्ण असते. मोहरीच्या तेलाची मॉलीश करून उन्हांत बसल्यास व पळसाच्या फुलाचे उटणे करून त्यांत कडुनिबांची पाने टाकून स्नान केल्यास प्रकृती धडधाकट राहते. या ऋतुत पानझड असते. झाडांना कोवळीपाने फुटतात. आम्रमोहर येतो. मोगऱ्यांची सुगंधी फुले, पळसाची नयनरम्य फुले व कडूनिबांची अमृतफुले याच गुढीपाडव्याच्या सुमारांस आढळून येते. सृष्टीत नवचैतन्य येते. या दिवशी घराघरावर आम्रानाची तोरणे लावण्यांत येतात. सण व उत्सव साजरे करणे हा भारताचा स्थायीभाव आहे. सकारात्म कार्यपद्धतीमुळे व संयमामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षापासून आज ही टिकून आहे. इतर अनेक संस्कृती काळाच्या ओघात नष्ट आहेत.
सध्या कलीयुग सुरू आहे. हे ४,३२,००० वर्षाचे आहे. त्यांतून फक्त ५१२० वर्षे संपलेली आहेत. व ४२६८८० वर्षे शिल्लक आहे. गुढीपाडव्यपासून शालीवाहन शक सुरू झाले आहे. शाली वाहन हे कुंभार समाजाचे असून ते ते महाराष्ट्रातील पैठणीचे राहणारे होते.
त्यांनी मातीचे सैनिक करून व त्यांत प्राण फुंकून शत्रूवर विजय मिळविला होता. असे सांगण्यात येते. याचा मतितार्थ असा आहे की, त्यांनी निर्जीव व निस्तेज समाजात चैतन्य व राष्ट्रभक्ति निर्माण करुन प्रभावी शत्रूचा पराभव केला. पंचागासाठी अनेक आधार संदर्भ त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत.
गुढीपाडव्या पासून पश्चिम महाराष्ट्रांत गौरीचे आगमन होते, असे मानण्यात येते, यावेळी सुंदर, सुंदर रांगोळ्या काढण्यात येतात. यालाच “चैत्रांगण” म्हणतात. मलबार मध्ये हा सण विशिष्ट पद्धतीने साजरा करण्यांत येतो. घरातील मुख्य व्यक्ति त्यांच्या गृहलक्ष्मीसह कुलदेवताचे पूजन करते व सर्वसंपत्ती देवाच्या पायापाशी ठेवते.
प्रभु श्रीरामरायाचे नवरात्र गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. श्रीराम या शब्दांशी भारतीयांचे अगदी जवळचे नाते जोडेले आहे. यापुढे रामराज्यच यावे.
अशी जनतेची अपेक्षा आहे. गुढीपाडव्यापासुन साधारणपणे “श्रीरामचरित" मानसाचे पारायण करण्यांत येते. श्रीरामचरीत्र मानसाच्या बालकांडात श्रीरामप्रभूचे व या कालावधीत येत असणाऱ्या ऋतुचे अतिशय बहारदार वर्णन केलेले आहे.
चर अरू अचर हर्षजयुत ! राम जन्म सुख मुल सितल मंद सुरभि वह वाऊ! हर्षित सुर संतन मन चाऊ बर्षही सुमन सुअंजली साजी! कह गयी गगन दुंदंभी वाजी गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रघुराईने वालीच्या अत्याचारातून जनतेची सुटका केली.
भोगावर त्यागाचा, वैभवावर विभुतीचा व विकारावर विचाराचा विजय म्हणजे गुढीपाडवा. ज्ञानाची गुढी खांद्यावर घेऊन विज्ञान व अध्यात्माची वाटचाल करु या. हा गुढीपाडवा निमित्त असणारा संदेश समजून घेवू या. विजयोत्सव म्हणजेच गुढीपाडवा होय.
--मो. वा. चरेगांवकर
मो. ९७६७०५९३२८
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १२ वा, (अंक २४)
September 1, 2022
मेयर या शब्दासाठी महापौर हा प्रतिशब्दबनवला आणि रुजवला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी.
December 6, 2016
मराठा समाजाचा विकास खुंटला तो, त्यांच्या राजकारणाच्या व्यसनामुळे. ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपले खिसे भरून घेतले. त्यांनी सतराशे साठ घोटाळे, भ्रष्टाचार करून आपली घर पैशाच्या पोत्यांनी भरली आणि दुर्दैवाने मराठा समाज अशाच लोकांना त्यांचा आदर्श मानू लागला..फास्ट पैसा... गाडी, बंगला, पाटीलकी, नाव, इज्जत, मान या गोष्टींसाठी मराठा समाज राजकारणात उतरून कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवू लागला..आणि या सगळ्या गोष्टींमधून त्याला सवय लागली ती 'सगळं आयतं, फुक्कट' मिळवण्याची..!
मेहनत नको.. बुद्धी वापरायला नको.. गावा-गावात मंडळं उभी करायची... गावाचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा.. आपलं नाव मोठं करून घ्यायचं कि संपलं..! मग लागलाच भिक मागायला राजकीय पक्षांकडं अन नेत्यांकडं तिकिटासाठी. मग त्यांचे तळवे चाटण आलंच...खोटी आश्वासनं.. दिशाभूल करणं .. सगळ्या गावाला राजकारण्याच्या धंद्याला लावण.. गावामध्ये भावकीत भांडण लावून देणं.. फुट पाडण हे सुद्धा आलंच.. मग गावं कसं एक राहील? आणि कसा आपला मराठा समाज हा एक- "समाज" म्हणून एकत्र येऊन एकमेकांना मदत करेल?
हे राजकारणी गावा-गावांमध्ये, भावकी-भावकीमध्ये भांडण लावून देणार.. मतासाठी फोडाफोडी करणार.. एकमेकाच्या मळ्यातल-शेतातलं पाणी अडवून धरणार.. शेताचा बांध फोडायला लावणार.. मग कसा आपला मराठा शेतकरी समाज तरी एकोप्यानं राहील..? गावात तरुण पोरांना हाताशी ठरून मंडळ स्थापन करायची... क्रिकेट च्या म्याचेस लावायच्या.. मग तरुण पोर्र पण राजकीय पक्षांच्या नावाखाली 'ब्यानरबाजी' सुरु करतात.. अगदी ५-६ वी मधल्या पोरांपासून पस्तीशी मधल्या तरुणांपर्यंत सर्वांची मुंडकी दिसतील अशा प्रकारे २५-३० जणांचे फोटो असणारे ब्याणार लावायचे.. अगदी गावच्या हागणदारी पर्यंत मग भिडतात आपलीच पोरं आपल्यात..कशासाठी..? राजकारणासाठी.. या राजकीय नेत्यांसाठी.. !
दारू पाजणारे हे पुढारी..आपल्या पोरांना मारामाऱ्या करायला पाठींबा देणार आणि निवडणुकीच्या वेळी त्याचा प्रचाराला उपयोग करून घेणार..आपला पोरगा मात्र हीच दुनियादारी करत बसतो..गावचं राजकारण त्याला पुरत लुबाडून टाकत..ना तो नीट शिक्षण घेत..ना तो नोकरी धंद्यात सेटल्ड होत..मग जातो वाया..आई-बाप..पोरगा वाया जायला लागला म्हणून फसवून कुणाच्या तरी पोरीला गळाला लावतात..मग आमच्या तरुण मराठा पोरांचे बढवलेले बैल होतात . बिनकामाचे..!
बोला.. अजून नादाला लागायचं आहे का राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या.? ब्राह्मणांना शिव्या घालून त्यांची काय वाकडी झालीयेत .?? ब्राह्मण समाज त्यांच्या बुद्धीने शिक्षण, नोकरी व व्यवसाय क्षेत्रात प्रगती करतोच आहे. १९४८ मधे नथुराम गोडसे या ब्राह्मणाने महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर देशातील समस्त ब्राह्मण समाजाची घरे जाळण्यात आली..त्यांना बेघर केलं गेलं.. ते गावोगाव सोडून शेतीवाडी जमीनजुमला सोडून शहरांकडे विदेशात निघून जाऊ लागले. आजही तुम्हाला गावागावांत अगदी एखाददुसरं ब्राह्मणाच घर दिसेल...
तर मग कळीचा सवाल हा आहे कि, गेल्या ६५ वर्षे महाराष्ट्रातील ४५,००० खेड्यागावांमध्ये ब्राह्मण नसताना मराठा समाजाची अधोगती कुणी केली..? ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, आमदार, खासदार कुणाचे होते..? सगळे मराठाच होते ना..? का मग मराठा समाजाची अधोगती का झाली..? त्यांना शिक्षणापासून वंचित कुणी ठेवलं?? खेड्यापाड्यात मराठ्यांची सत्ता असून देखील त्यांचा विकास का झाला नाही...?? बऱ्याच मार्केट मध्ये हमाल म्हणून काम करणारे मराठा तरुणच का ? राजाचे हमाल कसे झाले..? कोणी केले..? याला जिम्मेवार कोण..? मग मराठा समाजाला शेंडी लावणारे कोण ब्राह्मण कि मराठा नेते..? म्हणून मराठा समाजाने अन्य कुठल्याही समाजावर टीका, द्वेष करीत न बसता अन्य सर्व समाजांना मित्र बनवून .. आपल्या मराठा समाजातील तरुण मंडळींनी एकमेकांचा आधार घेत शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगती करावी.
मराठा समाजाच्या अधोगतीचे कारण ब्राह्मण, मागासवर्गीय किंवा अन्य कोणताही समाज नसून..सत्तेत असून सुद्धा मराठा समाजाला आधार न देणारे.. मराठा तरुणांच्या शिक्षण-नोकरी मध्ये मदत न करणारे आणि मराठा शेतकऱ्यांना वार्यावर सोडणारे आपले मराठा नेते आहेत.मराठा समाजाने आपल्या समाजातील नेत्यांना दोषी न धरता अन्य कोणत्याही समाजावर स्वतःच्या अपयशाचे खापर फोडणे म्हणजे..साप सोडून भुई धोपटणे होय..वेळीच जागृत होऊन एकत्र झालो नाहीत तर राजाचे हमाल झालेत पण येणारी जनरेशनचे काय होईल याचा विचार कराल हि अपेक्षा. वर्तमानात समाजात लाखो करोडों फक्त शिवाजी आहेत, परंतु एक हि "छत्रपती शिवरायां सारखे " काम करताना दिसत नाहीत.
वैचारिक सिद्धांत पायदळी तुडवणारे उथळ आणि स्वयंघोषीत नेते मराठ्यांच्या अधोगतीस आजवर कारणीभुत ठरलेत आणि यापुढेही ठरतील.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर मराठा समाजाचा स्वःतावरील रोष मराठा नेत्यांवरच उलटवला.
असं म्हणतात की.." मराठे युद्धात जिंकतात पण तहात हरतात" पण आजची परिस्थिती पाहून वाटतंय की तहात मराठा समाज हरला.. आणि स्वयंघोषित मराठा नेते जिंकले.. पण या संधीसाधू नेत्यांमुळे मराठा समाज अजून एकजूट होणार.पण ह्या पुढे ह्या मराठा नेत्यांना समाज कधीही माफ करणार नाही.
August 29, 2017
चंदेरी दुनियेत नेहमीच धमाल किस्से घडत असतात.. कधी ते हिरो हिरोईनचे तर कधी तंत्रज्ञांचे असतात. माझे परममित्र, ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेले काही किस्से मी इथे सादर करीत आहे..
February 15, 2024
अलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे.
August 17, 2011
आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये प्रथम हळद घालतो. हळद ही अत्यंत गुणकारी समजली जाते. जखमेवर अँटिसेप्टिक म्हणून काम करून आपली जखम लवकर बरी होण्यास हळद मदत करते. सुंदर त्वचेसाठी हळद विशेषकरून वापरली जाते. अशा ह्या सर्वगुणसंपन्न हळदीचे काही औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊयात:
February 21, 2019
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
शास्त्रकारांनी निरोगी राहण्यासाठी कसं वागायचं हे सांगितले. व्यवहारात देखील आपले आईवडील आपल्याला काही उपदेशपर गोष्टी सांगत असतात. ते हितोपदेश म्हणजे आरोग्याचा बटवा असतो.
मुलीला आई चार गोष्टी दररोज सुनावत असते.
"अस्सं वाग, अस्स कर. अस्स करू नकोस, तू ना, आमची अगदी इज्जतच काढणार आहेस." वगैरे वगैरे.
आणि मुलींनाच जास्त ओरडा खावा लागतो. तेव्हा आई हा प्राणी तिचा जगातला एक नंबरचा शत्रू असतो.
" तू सारखं सारखं तेच तेच तेच तेच सांगत राहू नकोस, झाली कटकट सुरू, तू मला सांगतेस, त्या दाद्याला का सांगत नाहीस, सगळ्या चुका काय माझ्याच असतात काय,"
आणि हे भांडण शेवटी...
" मी मुलगी आहे, म्हणून काहीही ऐकून घ्यायचं काय ? "
या वाक्यावर येऊन थांबत असतं.
प्रत्येक घरात अगदी हे असंच चाललेलं असतं.
हे खरं पण आहे. "मुलीवर लग्नानंतर लक्ष ठेवण्यासाठी तिथे मी नसणार, मुलाचं काही चुकलं, तर जे काही होईल, ते माझ्या डोळ्यासमोर होईल. मुलगी म्हणजे परक्याचं धन वगैरे, मी माझ्या मुलाला कधीही बदलवू शकते" अशा सरासर खोट्या आणि भ्रामक विश्वातून आई कधीच बाहेर येत नाही.
आणि नंतर जे व्हायचं तेच होतं. जी आई कधीकाळी शत्रू नंबर वन होती, मुलीला ती लग्नानंतर मात्र सद्गुणांचा पुतळा वगैरे भासू लागते. ( मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण जे अवतीभवती दिसतं ते सांगतोय, एवढंच. )
सांगायचंय काय तर,
लग्नानंतर मुलीला, आईनं केलेले हितोपदेश आठवू लागतात.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईची सुरू असलेली बडबड आठवून डोळ्यातून गंगाजमुना वाहू लागतात.
मनात म्हटलं जातं,
"तू त्यावेळी सांगितले होतेस,
तेव्हा मला तुझा राग येत होता,
जीवाचा अगदी त्रागा होत होता.
तू सांगायचीस,
उतू नये मातू नये,
घेतला वसा कधी टाकू नये.
एकमेकांचे उष्टे खाऊ नये.
घटाघट पाणी पिऊ नये.
उगाच आरश्यात पाहू नये.
केसांना हात लावू नये.
पदार्थ उघडा ठेऊ नये.
दुधावर फुंकर घालू नये.
पिंपात तांब्या बुडवू नये.
पातेलं खरडून वाढू नये.
ताटाच्या बाहेर सांडू नये.
पंगतीत ढेकर देऊ नये.
मधेच पंगतीतून उठू नये.
शिरा ताणून बोलू नये.
उगाच वाद ओढवू नये.
शब्दाने शब्द वाढवू नये.
उंबऱ्याच्या मर्यादा विसरू नये.
माहेरचे कौतुक सांगू नये.
कुणाचे वर्म काढू नये.
वर्मावर बोट ठेऊ नये.
मोठ्यांचा मान मोडू नये
लहानाशी खेळणं सोडू नये
दुसऱ्याचे दोष पाहू नये
दिलेले दान कळू नये.
धर्मशाळेत जेवू नये.
अंथरूणातून सूर्य पाहू नये.
गादीवर जास्त लोळू नये.
आळस मोठ्ठा देऊ नये.
तोंडाचा आऽ करू नये.
पाय पसरून बसू नये.
पाचकळ बाचकळ बोलू नये.
फिदीफिदी उगा हसू नये
भोकाड मोठे पसरू नये.
हट्टीपणा बरा नव्हे.
फुकाचे बोल बोलू नये.
कर्मकांड टाकू नये.
प्रयत्न कधी सोडू नये.
मनात विकल्प आणू नये.
भूतकाळा आठवू नये.
भविष्याचा विचार करू नये.
वर्तमानाशिवाय राहू नये.
विसरू नये देवाला
विसरू नये कर्माला
विसरू नये संस्काराला
विसरू नये राष्ट्राला
पण आता हे पटायला लागलंय,
तू सांगत होतीस, ते बरोबर असं आता वाटायला लागलंय.
तू मला तेव्हापासून बडवत होतीस,
ताईला नाही तर एका आईला घडवत होतीस.
तुझा एकेक शब्द आता मला आठवू लागलाय.
माझ्या मुलीच्या कानात तो रोज जाऊ लागलाय.
माझ्या मुलीबरोबर तेच भांडण मी करायला लागलीय.
तुझ्या नातीला आता मी तेच सांगायला लागलीय.
अगदी तुझा ठेका मला जमायला लागलाय.
'ह्यांना' सुद्धा तो जाणवायला लागलाय.
तू सांगितलेला प्रत्येक शब्द काळजात रुतून बसलाय.
आता माझ्या जीभेतून बाहेर येऊ लागलाय.
हितोपदेश तुझा आता आठवू लागलाय
मला "आई" बनवू लागलाय.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०८.०८.२०१७
August 8, 2017
पं. रामकृष्ण कवी यांनी रचलेले प्रस्तुत महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे ‘देवी माहात्म्य’ वर आधारित असून त्यात मधु,कैटभ,महिषासुर तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख आहे. दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) या वृत्तात रचलेल्या व अनुप्रास अलंकाराने नटलेल्या या स्तोत्रात शब्दांची अत्यंत आकर्षक रचना असून एकच शब्द पुनःपुनः वेगवेगळ्या अर्थांनी उपयोजल्याने कवीची संस्कृत भाषेवरील विलक्षण पकड जाणवते.
February 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti