वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्वामींच्या चित्राखाली तुम्हांला एक वाक्य दिसेल,
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"
आता ह्यात शब्द किती तर सहा. आता ह्यातल्या कुठल्याही शब्दामागे "च" हे अक्षर लावा आणि अर्थ बघा कसा होतो.
"भिऊच नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"
"भिऊ नकोसच मी तुझ्या पाठीशी आहे"
"भिऊ नकोस मीच तुझ्या पाठीशी आहे"
"भिऊ नकोस मी तुझ्याच पाठीशी आहे"
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे"
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच"
।। श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
भि......ती कशाची उरात धरतो
ऊ.......न सावली नियम जगाचा
न.......को अंतरू परमात्म्याला
को.....णी नाही त्याविना तुझला
स.......तत रहा तू नामस्मरणात
मी......पण नाही स्वामी चरणी
तु.......झे न काही माझे न काही
झ्या....गिरदारी कुणा दाखवतो
पा......मर जीव हे सारे असती
ठी......क समजुनी राहे जगती
शी......घ्र धाव घे स्वामीपाशी
आ......दरे वंदन करी स्वामीशी
हे........ची विनवितो मी सर्वांशी
!! श्रीस्वामी समर्थ !!
'' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"
-- अनुराग
December 7, 2016
रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो !
July 27, 2017

आपल्या मनाने एकदा का नवीन काही करायचं ठरवलं, तर एखाद्या खडकाळ जमिनीतूनही पाण्याचा झरा सापडतो. अगदी तसेच मनात असलेल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जयंत परबने ई-कचऱ्याच्या भंगारातून कॉम्प्युटर तयार केला. आपल्या स्वतःच्या हिंमतीवर हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये आपल्या प्रगतीची गुढी उभारणाऱ्या या छोट्या स्टीव्ह जॉब्सचा हा प्रवास...
आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी सर्वांनाच मिळत नाही. त्याचे उच्च शिक्षण घेताना पैशांचा अडसर येतो आणि हे जमले तरी अपेक्षित नोकरी मिळेल की नाही, याची साशंकता असते. पण मुंबईतील घाटकोपरमधे राहणाऱ्या जयंत रवींद्र परब या 17 वर्षीय तरुणाने मात्र शाळेतच असताना कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्कचे क्षेत्र निवडले. त्यात प्रावीण्य मिळवून फक्त अडीच हजारांत कॉम्प्युटरही तयार केला आहे. त्यात ड्युअल कोअर प्रोसेसर, 1 जीबी रॅम, 80 जीबी क्षमता असलेली हार्ड डिस्क, वाय-फाय, ब्ल्यू टूथ आणि स्पीकरची सोय दिली आहे. जयंतने फक्त अर्ध्या तासात भंगारातील ई-कचऱ्यापासून हा कॉम्प्युटर तयार केला आहे. पाचवीत असताना त्याच्या वडिलांनी त्याला बिघडलेला लॅपटॉप खेळण्यासाठी म्हणून दिला, खेळता-खेळता त्याने लॅपटॉप उघडून दुरुस्त केला.
जयंतचे वडील रवींद्र परब आधी रिक्षाचालक होते, जोडधंदा म्हणून त्यांनी कॉम्प्युटर दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. वडिलांसोबत जयंत हे काम शिकू लागला. कार्यालये, रुग्णालये, शाळांमधील भंगार आणि ई-वेस्ट विकत घेण्यासाठी वडिलांसोबत तो जात असे आणि अचानक एके दिवशी जुने पार्टस् वापरून कॉम्प्युटर बनवावा, अशी कल्पना त्याला सुचली. मग त्याने व्हेंटीलेटर नऊ इंच स्क्रीन वापरून हा कॉम्प्युटर तयार केला. तोही फक्त साडेपाच हजार रुपयांत. यापुढे तो गरजू मुलांना अद्ययावत कॉम्प्युटर बनवून वर्षभर त्याची सर्व्हिसिंग मोफत देणार असल्याचे सांगतो.
अभ्यासात नापास... हार्डवेअर नेटवर्किंगमधे प्रावीण्य ....जयंतने नववीत नापास झाल्याने शिक्षण अर्धवट सोडले होते. शिक्षणाची आवडच कमी असल्याने त्याने शाळेकडे कायमची पाठ फिरवली. घराच्यांनीही त्याला विरोध न करता आवडीच्या क्षेत्रात शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अपयशाने न खचता जयंतने हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला. वडिलांच्या कामात हातभार लावत होताच. शिक्षण सोडले तरी त्याचा आत्मविश्वास ढळला नव्हता. कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये नव्याने आलेले तंत्रज्ञानही शिकत गेला. काळाप्रमाणे बदलण्याच्या त्याच्या या सवईमुळेच आज हे शक्य झाले आहे, असे त्याचे वडील रवींद्र परब सांगतात. जयंतला अभ्यासाठी कधीही आग्रह केला नाही. जे काम करशील त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न कर, इतकेच त्याला सांगितले होते. या वर्षी त्याने दहावीची परीक्षा दिली. सर्व विषयही त्याला सोपे गेले आहेत. दहावीनंतर पुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगकडे जाण्यापेक्षा कॉम्प्युटरमधे नव्याने येणाऱ्या प्रणालीबाबत जाणून घेण्याचा माझा प्रयत्न राहील, असे त्याने सांगितले.
ई-कचऱ्याबद्दल निरक्षरता... आपल्याकडे ई-कचऱ्याबद्दल असाक्षरता असल्याने त्याच्या पुनर्वापराबद्दल कमी विचार केला जातो. मुंबईत नऊ हजार 400 टन ई-कचरा दरवर्षी तयार होतो, त्यापैकी तीन हजार टन कचऱ्याचा पुनर्प्रक्रियेसाठी वापर केला जातो. कॉम्प्युटर इंजिनिअर्स आणि कुशल कारागीरांना सोबत घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम जयंत हाती घेणार आहे. ई-वेस्ट गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कॉम्प्युटरचे वापरायोग्य पार्टस् वेगळे केल्यास कॉम्प्युटर बनवण्याचा बराच खर्च वाचू शकेल.
व्यवसायाभिमुख व्हा... या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय करावा. विद्यार्थी आपला वेळ व पैसा शिक्षण घेण्यासाठी खर्च करतात, त्यापैकी सगळ्यांनाच मनासारखी नोकरी मिळत नाही, अशाने बेरोजगारी वाढते. व्यवसायाबद्दल नियोजन सुरू करून योजना आखली असता त्यात यश शक्य आहे, असे जयंतचे मत आहे. तो आणि त्याचे वडील सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे प्रशिक्षण देतात. नवउद्योजकांना त्याबद्दल व्यवसाय मार्गदर्शनही करतात.
-- संतोष द पाटील
October 18, 2021
श्री गणेशा नमुनी तुला
नंतर नमितो कुलस्वामिनीला
मातापूरवासिनी रेणूकेला
कृपा प्रसादे ।१।
तुझा महिमा असे थोर
दुःख नष्ट होती सत्वर
कृपा करिसी ज्याचेवर
पावन होत असे ।२।
गणेश जन्मकथा सांगतो
तयाचा महिमा वर्णितो
आनंदीभाव समर्पितो
तुम्हासाठी ।३।
सर्व दुःखे दुर कराया
तुम्हांसी सुखे द्यावया
जन्म घेती गणराया
तुम्हां करिता ।४।
असतील देव अनेक
देवाधीदेव महादेव एक
सर्व विश्वाचा अधिनायक
तयामध्ये कैलासपती ।५।
शिवपत्नी पार्वती
रही कैलास पर्वतीं
माता जगताची ती
उमादेवी ।६।
उमाशंकर मिळून
सर्व जगाते सांभाळून
कैलासावरी राहून
पालनपोषण करताती ।७।
एके दिनी सकाळी
पार्वति निघाली अंघोळी
पुष्पे घेऊन निरनीराळी
पुजेसाठी ।८।
आनंदी उमादेवी
शिवप्रतिमा मनी वसवी
अंतःकरणी ती रमवी
रुप सदाशिवाचे ।९।
स्नानास निघाली पार्वती
पूजासाहित्य बाहेर ठेवती
मनी विचार करि
प्रेमभरे ।१०।
बेसोनी स्नानघराबाहेर
मनींते बहूत विचार
विचारांना देती आकार
आनंद रुपे ।११।
हाळद घेतली हातीं
चंदन मिश्रीत गोळी करी ती
बाळरुप प्रतिमा बनविती
तयापासून ।१२।
जगन्माता पार्वती
विश्वाची श्रेष्ठ शक्ति
कोतुके बाळ पाहे ती
हर्षभरे ।१३।
सचेतन केला बाळ
प्रेमे आलिंगुनी जवळ
घालितसे पुष्पमाळ
कंठी ज्याचे ।१४।
बाळाचे तेज निराळे
सुवर्णापरी रुप आगळे
तयाचा महिमा कुणा न कळे
पार्वतीविणे ।१५।
धावूं लागला छोटा बाळ
आनंदून गेली उमा सकळ
शिरी बांधली पुष्पमाळ
पार्वतीने ।१६।
बाळासंगे खेळली
स्नानाची तिज आठवण झाली
सांगतसे माय माऊली
बाळाते जवळी घेवूनी ।१७।
तू एक काम करावे
दारापाशी बसून राहावे
आंत कुणा येवू न द्यावे
आज्ञा माझी ।१८।
आनंदे लागला बागडूं
कुणासंगे ही लढू
परत जाण्या भाग पाडू
ह्या विचारी ।१९।
आज्ञा केली मातेने
पाळीन मी आनंदानें
रोकीन तयाते बळजबरीनें
बाळ बोले ।२०।
छोटे शस्त्र हाती देऊनी
पार्वती सांगे समजावूनी
वाट तयाची रोकूनी
धराविसी ।२१।
पार्वती गेली स्नानासी
बैसवुनी बाळा द्वारासीं
द्वारपाल तो बनलासी
बाळ माझा ।२२।
बाळ आनंदे फिरु लागला
तिकडून शिव आला
स्नानगृही जाऊ लागला
बाळ रोके त्यासी ।२३।
हांसु लागला बाळ बघोनी
कौतूक तयाचे करुनी
प्रेमभरे जवळ घेऊनी
सदाशिवे ।२४।
शिव चालला स्नानगृहात
बाळ त्याला रोखीत
तुम्ही न जावे आंत
सांगे बाळ ।२५।
प्रथम त्याचे कौतूक केले
आंत सोडण्या विनविले
वाकून बाळ आलिंगले
विश्वनाथे ।२६।
कोप आला शिवासी
पाहूनी बाळ हट्टासी
त्याच्या विरोधासी
बघुनिया ।२७।
बाळ असूनी लहान
मुर्ति गोंडसवानी छान
जगन्मातेची शक्ति अंगिकारुन
प्रतिकार करु लागला ।२८।
बाळाअंगी पार्वतीचे बळ
म्हणून झाला निश्चयी अवखळ
कांही सुचेना तये वेळ
विश्वेश्वरासी ।२९।
असे तो जगनेमातेचे बाळ
तयामध्ये विश्वाचे बळ
कठीण वाटली शिवे ती वेळ
तयासी पाहूनी ।३०।
बाळ हट्टाने पेटून
शिवाचा करिती अपमान
द्वारी त्याना रोखून
अडवितसे ।३१।
राग येवू लागला मनीं
समज न येई बाळा सांगुनी
संताप आला तत्क्षणी
क्रोधाग्नी पेटला ।३२।
हांती घेऊनी त्रिशूळ बनता बाळाचा काळ
शिरच्छेद केला तत्काळ बाळाचा ।३३।
बाळ पडला धारातीर्थी
धडावेगळे शरीर होती
तत् क्षणीं निश्चेष्ट पडती
जमिनीवर ।३४।
पार्वती आली बाहेरी
नजर आता बाळावरी
दुःख होतसे मनावरी
मृत बाळ बघूनिया ।३५।
एकदम निराश झाली
सारी स्वप्ने धुळीस मिळाली
हूरहूर मनी लागली
पार्वतीस ।३६।
शोक न तिजला आवरे
मृत बाळ बघूनी गोजिरे
ज्या पाही ती प्रेमभरे
पार्वती देवी ।३७।
खिन्न मनाने बैसली
दुःखाश्रु पडती खाली
अत्यंत निराश झाली
उमादेवी ।३८।
शिव झाले शांत
बघूनी उमेचा आकांत
तियेसी देवूनी हात
उठवितसे ।३९।
बघूनी शिवाचे शांत रुप
गेला होता त्यांचा कोप
सोडूनी द्यावे मनातील ताप
पार्वती बोले ।४०।
माझ्या बाळा जीवदान द्यावे
त्याच्या बालहट्टा क्षमावे
विनवितसे जीवेभावे
पार्वतीदेवी ।४१।
स्तुती केली ईश्वराची
पूजा करुनी शिवाची
विनंती करिसी त्याची
बाळप्राणा ।४२।
बघूनी पार्वतीभक्ति
पावला उमापती
बाळासी जीवदान देती
सदाशिव ।४३।
आज्ञा केली शिवगणा
कैलासतील जावे वना
दिसेल प्राण्याचे शिर आणा
प्रथम दर्शनी ।४४।
गेले आनंदे शिवदूत
शिर मिळवण्या वनांत
बघितला छोटा ऐरावत
सरोवरी बागडतसे ।४५।
गजराजाचे शिर छाटले
घेवूनी शिवदूत आले
शिवचरणी अर्पिले
ऐरावत शिर ।४६।
उठवोनी बाळ शरीर
घेऊनी गजराजाचे शिर
ठेवती तयाचे वर
बाळाचे शरिरी
शिवशक्ति प्राण घातले
पूर्ववत् ते सचेतन पावले
मानवी देही दिधले
गजराज शिव ।४७।
नवीन बाळ जन्मास आले
गजशिर मानव देह दिधले
माता-पित्यास वंदन केले
बाळ राजे ।४८।
शिवपार्वतीचे बाळ जाहले
गजानन तयाचे नांव ठेवले
शिवदूतें कौतूक केले
गणेशाचे ।४९।
शिवपार्वतीची अपूर्व शक्ति
गणेशाते मिळती
दोन्ही तेज एकरुप होती
गणेशामध्ये ।५०।
महादेव आशिर्वाद दिधला
गणेशाते श्रेष्ठ ठरविला
प्रथम पुजा मान तयाला
सर्व देवांमाजी ।५१।
प्रथम पुजा श्री गणेशाची
कार्ये होतील सार्थ नंतरची
हीच असेल प्रथा पूजेची
आज्ञा केली शिवे ।५२।
सर्व संकटे निवारसी
कार्ये नेती सिद्धीसी
दुःखापासून मुक्त करिसी
गणेश कृपें ।५३।
विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती
कार्ये निर्विघ्न पार पडती
सुख समृद्धी घरी नांदती
त्यांचे आशिर्वादे ।५४।
तू होशील ज्ञानदेवता
सकळजण तुज वंदिता
प्रसन्न होऊनी ज्ञान देता
विद्वान होतील ।५५।
श्री गणेश जन्मसोहळा
सर्वाना भासे आगळा
आकाशातून वाहती पुष्पमाळा
सर्व देव मिळूनी ।५६।
पुष्पांची वृष्टी केली
पृथ्वीमाता पावन झाली
तिच्यावरील दुःखे शमली
श्री गणेशामुळे ।५७।
गणेश दैवत सुख समृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करिसी सर्वांचे
प्रथम मान तुला ।५८।
गणेश दैवत सुखसमृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करीसी सर्वांचे
प्रथम पुजामान तुला ।५९।
वंदन तुज गणराया
सर्वांचे भले कराया
सर्व समभाव मनीं यावया
कृपा करावी ।६०।
रोज एकदा स्त्रोत्र म्हणूनी
एकविस दुर्वा लाल फूल वाहूनी
गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूनी
गणेशा पूजावे ।६१।
नित्यनियमे पठन करावे
चतुर्थीला एकविस आवर्तने
भक्तिभाव मनीं ठेवणे
भक्तासि पावतसे ।६२।
भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थीला
श्री गणेशाचा जन्म जाहला
आनंदे सण उत्सावूं लागला
सकळजन ।६३।
।। शुभं भवतू ।।
डॉ. भगवान नागापूरकर
२- ०८०८८३
January 1, 2018
विश्वास नांगरे पाटील म्हणतात,
परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , "मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ." चहा कडवट लागला .
नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे . काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार.
सैराट करमणूक म्हणून पहा पण आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .
योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .
केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत 1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले.
आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!
February 6, 2017
आपला अर्ज ‘यथायोग्य कार्यवाही’ साठी पाठविला आहे. याचा अर्थ सरकारी भाषेत काय असतो?
June 24, 2010
वेदकालीन शिल्पकार समाज शोधण्यासाठी वैदिक वाङमयाव्यतिरिक्त अन्य मार्ग नाही. सिंधू संस्कृतीचा कालखंडही साधारण वैदिक काळाच्या जवळपासचाच गृहित धरल्या जातो. त्यामुळे उत्खननातील पुरावेही शिल्पकारांची माहिती पुरवितात परंतु उत्खननातून उपलब्ध झालेली माहिती वैदिक समाजजिवनाचीच आहे, याबाबत निर्णायक मत अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकलेले नाही. काही समान तथ्यांचा केवळ आधार घेतला जातो. प्रस्तुत लेखकाने प्रचलीत धारणांचाच आधार घेऊन वेदकालीन विश्वकर्मा समाजाची स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
February 4, 2026
प्रकाशन दिनांक :- 09/01/2005
सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सुनामी लाटांनी दक्षिण आशियाई देशांना हादरविले. प्रचंड प्रमाणात प्राण आणि वित्तहानी झाली. सगळ्याच प्रसारमाध्यमात केवळ सुनामीच्या विध्वंसाचीच चर्चा होती.
January 9, 2005
हेल्मेट वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे यात सामान्य नागरिकांच्या जीवनाचे धोक्याचे प्रमाण कमी होते. पण त्यासाठी सरकारानेच ‘प्रबोधन’ करायला पाहिजे असे म्हणणे हि मोठी शोकांतिका आहे. पुणेसारख्या शहरांमध्ये धर्माच्या नावाखाली हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविण्यात आले. त्यांना एवढंच म्हणावे लागेल, “सर सलामत तो पगडी पचास”.
March 27, 2019
कोणतीही कविता निर्माण व्हायला मराठीत (किंवा इतर कुठल्या भाषेत) कोणते शब्द अस्तित्वात आहेत हा दैवाचा भाग अटळपणे नेहमी प्रकर्षाने असतो. मुख्यत्वे संस्कृत आणि फारसी/अरबी/उर्दू शब्द जसेच्या तसे किंवा अपभ्रष्ट रूपांमधे अवतरून सध्याच्या मराठी भाषेतले शब्दभांडार तयार झाले आहे. केवळ एक उदाहरण म्हणून मी ग. दि.माडगूळकरांचे खालचे सुंदर गीत उद्धृत करत आहे.
February 19, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti