वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतीय रेल्वे ही खऱ्या अर्थाने भारतीयत्वाची खूण सांगणारी आणि हिमालयापासून कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत देशाला जोडणारी, एकात्मतेचे महत्त्वाचे प्रतीक ठरलेली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा केवळ लोहमार्ग-बांधणीचा वा तांत्रिक सुधारणांचा आहे; तितकाच एक संघटनयंत्रणा (ऑर्गनायझेशन) म्हणून रेल्वेच्या होत गेलेल्या विकासाचाही हा इतिहास आहे. १८५० नंतर रेल्वेच्या उभारणीला जसा वेग आला, तसाच त्यानंतर १०० वर्षांनी, म्हणजे १९५० नंतर स्वतंत्र भारताची रेल्वे सेवा प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या प्रकारे संघटित करावी, या प्रयत्नांनीही वेग घेतला… तिथवरच्या इतिहासातून उलगडणाऱ्या या प्रशासनखुणा…
August 9, 2023
असा प्रश्न विचारला तर लोक पटकन सांगतील, अहो त्यात काय एवढे कठीण? मोरयाचा एकदा तुटलेला असतो म्हणून त्यांना एकदंत म्हणतात. पण हे बरोबर आहे का? इतका वरपांगी अर्थ त्यात असेल का? जर वर्णन केल्याप्रमाणे मोरयाचा एक दात तुटला, अर्धा आहे तर मग त्याला दीडदंत म्हणायला नको का? एकदंत कसा?
September 4, 2019
डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो.
October 21, 2023
शबरीमालाच कशाला, आपल्या प्रत्येक रूढी-प्रथा-परंपरा या का आणि कधी अस्तित्वात आल्या, त्या त्याकाळची समाज व्यवस्था, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातील किती परंपरा आता सुरु ठेवायला हव्यात आणि कालानुरूप त्यात बदल करावेत की नाही ह्याची कल्पना अभ्यासांती प्रत्येकाला येऊ शकेल. हा अभ्यास केवळ हिन्दूंनीच करावा असं माझं म्हणणं नाही. आपल्या देशातील सर्वच धर्म-पंथाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे.
March 23, 2019
१२) मेथी- बिया फोडणीत, दळ कोशिंबीर, लोणच्यात वापरतात. चवीला मसाले कडू. यात ५०% तंतू असल्यामुळे त्यात अन्नातील साखर व चरबी अडकून शरीरात त्यांचे शोषण कमी होते. बियात एन-३ फॅटी अॅसिड खूप प्रमाणात असल्यामुळे रक्तातील चरबी कमी होते. बियांमुळे ग्लुकोजचा पेशीतील ज्वलनाचा वेग वाढतो व रक्तातील साखर कमी होते. ही क्रिया मेथीच्या भाजीमुळे होत नाही. बिया मधुमेहाच्या औषधांबरोबर वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्याव्यात. यात कॅल्शियम १६०, फॉस्फरस ३७०, लोह ७, फोलिक अॅसिड ८४ कोलीन ११६१ मॅग्नेशियम १२४ जस्त ३ मि. ग्रॅ. प्रतिशत.
१३) धणे- मूत्रविकारावरावर घेण्याचा प्रघात. पोटातील वायू कमी करतो. पचन सुधारते. रक्तातील मेद कमी होण्यासाठी मदत होते. कॅल्शियम ६३०, फॉस्फरस ३९३, पोलिक ॲसिड ३२ मॅग्नेशियम ४७५, जस्त ३ कोलीन १०७७ मि. ग्रॅ. प्रतिशत बीटा कॅरोटिन ९४२ मायक्रो. धण्याच्या पुडीमध्ये भेसळ म्हणून घोड्याची लीद वापरतात. म्हणून शक्यतो घरीच दळावेत.
१४) हिंग- फोडणीत जाणारा हिंग पोटातील वायू कमी करतो. औषधात त्याचा अर्क वापरतात. कॅल्शियम ६९०, फॉस्फरस ५०, लोह ४० व मॅग्नेशियम ८० मि. ग्रॅ. प्रतिशत.
१५) कडूलिंब/कडीपत्ता- बहुधा जेवताना पानात टाकला जाणारा पाला. पाचक रस निर्माण करणारा. यात कॅल्शियम ८३० फॉस्फरस ५७ फोलिक अॅसिड ९४ मॅग्नेशियम ४४ मि. ग्रॅ. व बीटा कॅरोटिन (अ) ७५६० मायक्रो. प्रतिशत. हा खाल्ल्यास किती खनिजे पोटात जातील!
१६) पुदिना- पोटदुखीसाठी, पोटातील वायू कमी करण्यासाठी उपयोगी. कॅल्शियम भाग चार २०० फॉस्फरस ६२ लोह १६, फोलीक अॅसिड ११४ मॅग्नेशिअम ६० व बीटा कॅरोटिन १६२० मायक्रो. पाचक.
१७) तीळ- कॅल्शियम १४५० फॉस्फरस ५७०, लोह १०, फोलीक ॲसिड १३४ तांबे, मँगनीज ३, जस्त १३ मि. ग्रॅ. असते. एन ३ फॅटी अॅसिडस् असतात. वाटून त्वचेला लावल्यास त्वचा मऊ राहते. कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना व तीळ यांचे नित्य सेवन केल्यास हाडे मजबूत राहतील व अॅनिमियाला प्रतिबंध होईल.
१८) मोहरी- नगण्य दिसणारी मोहरी फोडणीच्या रुपात ठाण मांडते. कॅल्शियम ४९०, फॉस्फरस ७००, कोलीन २११, मँगनीज ३ व जस्त ५ मि. ग्रॅ. प्रतिशत.
१९) जायफळ पूड करून वापरतात. बहुधा गोड पदार्थात. थोड्या प्रमाणात घेतल्यास पोटात वायू धरत नाही. मळमळ थांबते व वारंवार शौचाची तक्रार थांबते. जायफळाचा परिणाम व सुवास 'मिरीस्टीसीन'मुळे होतो. जायफळ अतिप्रमाणात खाल्ल्यास आकडी येते व उलट्या होतात. स्वयंपाकात वापरात येणारे प्रमाण कमी लोह ८, असल्यामुळे दुष्परिणाम होत नाहीत.
March 11, 2023
दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला.
July 24, 2021
कदंबवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं,
महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणींम् |
दया विभव कारिणी विशदरोचनाचारिणी,
त्रिलोचन कुटुम्बिनी त्रिपुर सुंदरी माश्रये ॥२||
परांबा त्रिपुरसुंदरीच्या अलौकिक वैभवाला विशद करताना आचार्यश्री म्हणतात,
कदंबवनवासिनीं- कदंब वृक्षाला स्वर्गीय वृक्ष, कल्पवृक्ष असे म्हणतात. अशा वृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी.
कल्पवृक्षाच्या वनातच निवास केल्यावर कोणतीही इच्छा क्षणात पूर्ण होणार. मग उरलेल्या वेळेचे करायचे काय? तर शास्त्र सांगते साहित्य संगीत आणि कलेमध्ये समय सत्कारणी लावावा. त्यानुसार, कनकवल्लकीधारिणीं- कनक अर्थात सोन्याची. वल्लकी अर्थात वीणा धारण करणारी.
महार्हमणिहारिणीं- महार्ह अर्थात अत्यंत सुयोग्य. मणि म्हणजे रत्न. हारिणी अर्थात अशा रत्नांच्या माळा धारण करणारी. मुखसमुल्लसद्वारुणींम् - मुखामध्ये आनंदाने वारुणी धारण करणारी. वारूणी शब्दाचा आपल्याला केवळ एकच अर्थ माहिती असतो.
वारुणी शब्दाचा दुसरा अर्थ आहे मध मिश्रित पाणी.
योगशास्त्रानुसार ब्रह्मरंघ्रामधून पाझरत असणाऱ्या अमृताला वारुणी असे म्हणतात. त्या दिव्यरसाने आत्मानंदात निमग्न.
दया विभव कारिणी- शरणागत भक्तांवर दया करणारी आणि त्यांना वैभव प्रदान करणारी.
विशदरोचनाचारिणी- विशद म्हणजे मोठ्या प्रमाणात, विशाल आकारात, रोचना म्हणजे कुंकुम धारण करणारी. भव्य तिलक धारिणी.
त्रिलोचन कुटुम्बिनी- भगवान शंकरांची पत्नी .
त्रिपुर सुंदरीमाश्रये- आई त्रिपुरसुंदरीला मी शरण जातो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 3, 2020
श्रीमद् शंकराचार्यांच्या या भक्तिपूर्ण स्तोत्रात श्रीकृष्णरूपातील श्रीविष्णूची मानसपूजा वर्णिली आहे. शिखरिणी या भावनाप्रद वृत्तात केलेली ही रचना भाविकांच्या मनाला भिडल्याखेरीज रहाणार नाही.
November 1, 2020

आजचा माणूस सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दोन पायांवर चालू शकत होता. पण तेव्हा माणूस हाच फक्त काही द्विपाद प्राणी नव्हता. माणूस जन्माला येण्याच्या सुमारे एक लाख वर्षं अगोदर जन्माला आलेल्या निअँडरटालसारखे, माणसाचे इतर भाऊबंदसुद्धा दोन पायांवर चालू शकत होते. इतकंच काय, पण त्या अगोदर चाळीस लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकससारख्या मानवपूर्व प्रजातीही द्विपाद होत्या. माणसाच्या पूर्वजांचं हे ‘दोन पायांवर चालणं’, हा मानवी उत्क्रांतीतला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळेच उत्क्रांतीशास्त्रात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे – ‘सर्वात प्रथम दोन पायांवर चालणारा माणसाचा पूर्वज कोणता?’. अलीकडेच केल्या गेलेल्या एक नव्या संशोधनानं याबद्दलच्या माहितीत भर टाकली आहे. फ्रान्समधील प्वाट्ये विद्यापीठातील फ्रँक गाय आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केलेलं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
November 22, 2022
आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-
अग्निदीपक - भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
अपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
अवलेह - साखरेचा गुळाचा पातळ पाक.
कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
काढा - काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.
कुपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
केश्य - केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.
चूर्ण - सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.
ज्वरघ्न - तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.
दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ.
पथ्य - शरीरास/आरोग्यास हितकारक
प्राणिज - प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.
पित्तशामक - वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
पित्तहारक - शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
फांट - घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.
भस्म - एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.
मारण - धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.
मूत्रल - शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.
रेचक - ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.
वटिका - गोळ्या
वांतिकारक - सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.
वायुकारक - वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
शोधन - शुद्ध करणे
स्नेहन - वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.
स्वरस - अंगरस. ओल्या वनस्पतीस कुटून व फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.
स्वेदन - घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.
हिम/शीतकषाय - घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.
हीनवीर्य - ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध..
संकलन :- श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच
-- WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार
October 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti