वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
असीमा चॅटर्जी या भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होत्या ज्या सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसिन क्षेत्रात त्यांचा कामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचे सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे विंका अल्कलॉइड्सवरील संशोधन, एपिलेप्टिक औषधांचा विकास आणि मलेरियाविरोधी औषधांचा विकास आहे. त्यानी भारतीय उपखंडातील औषधी वनस्पतींवर देखील मोठ्या प्रमाणात काम केले. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स मिळविणारी त्या पहिल्या महिला होत्या.
August 13, 2025
जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्त्वं नसती आणि त्यांचे पालन करणारी माणसे नसती तर माणुसकी हा शब्दही कदाचित जन्माला आला नसता. दुर्दैवाने अलीकडच्या काळात तत्त्वांना अडगळीत टाकून स्वार्थ साधून घेणाऱ्या लोकांना खोटी का होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
April 19, 2009
आज प्रत्येकालाच आपल्या घरात सगळ्या सुखसोयी अशाव्यात असे वाटत असते आणि ते योग्यच आहे परंतू आर्थिक ओढाताण करून सगळ्या गोष्टी विकत घेणे कितपत योग्य आहे? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि आवड आहे. काहींना कर्ज काढून वस्तू विकत घेतल्या की काहीतरी विशेष केल्यासारखे वाटते आणि पैश्याची बचत केल्याचा आनंद होतो. असो. एका बाबांची कैफियत मांडण्याचा छोटासा प्रयत्न !
July 11, 2011
नववर्ष स्वागताच्या या यात्रेला ‘शोभायात्रा’ असं शोभेचं ‘दिखावू’ नांव देऊन उगाच आपली शोभा करून घेऊ नका. या ऐवजी या यात्रेला ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’ असं खणखणीत नांव द्या.
March 27, 2017
काही इंधने रंगाने काळसर असतात, म्हणून त्यास ‘काळी तेले’ (ब्लॅक ऑइल) असे म्हटले जाते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उर्ध्वपातन होताना न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर करता येतो. खनिज तेलाच्या काही उर्ध्वपातित भागात या अवशिष्ट भागाचा अंश मिसळून जे इंधन तयार होते त्याला एलडीओ (Light Diesel Oil) म्हणतात.
March 8, 2023
मी लेखन करायला लागलो, त्याला आज काही वर्ष उलटून गेली. एखादी गोष्ट,व्यक्ती भावते, एखादा सुंदर अविस्मरणीय अनुभव येतो, मनात ठसलेल्या काही गतस्मृती जाग्या होतात, काही खूप आनंद देणारे प्रसंग घडतात आणि मग मात्र ते शब्दरूपात उतरल्याशिवाय शांत बसवत नाही. अधूनमधून काही वैचारिक स्फुरतं.
December 13, 2023
श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म वऱ्हाड प्रांतातील सुप्रसिद्ध ‘कारंजा’ या गावी झाला. त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता असली तरी जन्मशतकाविषयी विद्वानात मतभेद आहेत. काहींनी त्यांचा जन्म शके १३०० च्या सुमारास झाला असे म्हटले आहे, तर कुणी १३१४ हाच शक जन्मशक म्हणून मानतात.
July 4, 2025
जनजागृतीमुळे शहर व ग्रामीण भागात तीन वर्षांत हजारो शौचालये उभारली गेली, परंतु त्याचा प्रत्यक्षात कितपत वापर होतो हा संशोधनाचा विषय आहे. सरकारकडून शौचालय बांधणीसाठी १२ हजार रुपये अनुदान मिळत असल्याने कोणी त्यास नाही म्हणत नाही.
November 19, 2021
शिर्षक वाचून हैराण झाला असाल परंतु हे आजचे वास्तव आहे हे कुणीही नाकारणार नाही. एखादी समस्या आली की आपण उपाय शोधतो अर्थात अनेक उपाय असतात ते थकले की माणूस त्या समस्यांना कंटाळतो आणि मग तो शेवटच्या उपायाकडे वळतो तो म्हणजे आत्महत्या.
आजपर्यंत अनेक डॉक्टर्स , समन्वयक उत्तम भूमिका निभावतात परंतु मानवी मन भन्नाट आणि प्रचंड वेगवान आहे.
August 12, 2023
जेंव्हा शिक्षक नव्हतो तेंव्हा ” प्रशिक्षक (ट्रेनर ) झालो. प्रक्रिया थोडीफार तीच ,पण आवडली. शिक्षक बनून- learning तर प्रशिक्षक बनून unlearning followed बाय relearning ! फरक काय तो एवढाच !
September 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti