वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
९६४-६५ मध्ये ग्रेग चॅपल यांनी सात आठवड्यामध्ये १० शतके केली. शाळेच्या एका सामन्यामध्ये त्यांनी व्दिशतक केले आणि अँशले वूडकॉक यांच्याबरोबर पहिल्या विकेटसाठी स्कॉट कॉलेज विरुद्ध ३०० धावांची भागीदारी केली.
August 16, 2021
मग कशासाठी हा सारा अट्टाहास आपण करीत आहोत आपण? याचा निदान नरकात जाण्यापूर्वी प्रत्येकाने गंभीरपणे विचार करावा.
December 15, 2010
पीडीए ही संस्था म्हणजे आधुनिक मराठी रंगभूमीची गंगोत्री. या रंगमंचावर भालबा द्रोणाचार्यासारखे वावरले. त्यांनी वसंतराव कानेटकरांसारखे स्वतःचे दालन निर्माण करणारे नाटककार, डॉक्टर श्रीराम लागूंसारखे नटसम्राट आणि जब्बार पटेलांसारखे कुशल दिग्दर्शक निर्माण केले.
October 19, 2021
आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत.
September 21, 2023
मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे. मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असते. या पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे.
February 4, 2022
या सगळ्यात आपल्या भावना आणि विचार एकमेकांशी संभाषण साधून व्यक्त करण्याचे वरदान मानवाला लाभले आहे. पूर्वीच्या काळापासून आपण संदेशवहनासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आलो आहोत या मागे एकच उद्दिष्ट की, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे तसेच आपले विचार मांडणे. अगदी पूर्वीच्या काळी जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी तार यंत्रणा अस्तित्वात होती. तसेच पोस्टमनद्वारे येणाऱ्या आपल्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या पत्राची अनामिक ओढ होती.
December 24, 2023
ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो.
March 27, 2019
नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपूर्वी बहुतांशी उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठप्प झाले. परंतु पुढील काळात परिस्थिती सुधारली.
December 29, 2022
आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे.
September 28, 2025
पाणी शुद्धीकरण भाग एक
दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे.
दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा त्यांचे मृत शरीर यामुळे दोष उत्पन्न होतात. तसेच अतिसूक्ष्म आणि स्थूल कृमी किटक, पालापाचोळा, चिखल, पाण्यावर वाढणारे डासाप्रमाणे असणारे अन्य जीवजंतु, किंवा त्यांच्यापासून तयार होणारे विष "जीवन" दूषित करतात.
आजच्या काळात वेगवेगळ्या रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी, अधिकृत आणि अनधिकृत कत्तलखान्यातून बाहेर पडणारे रक्त, मल, मांस, युक्त दुषित आणि कुजलेले पाणी, गावागावातून नदीमधे टाकला जाणारा उकीरड्यावरील जैववैविध कचरा, तसेच प्रत्येक घराघरातून बाहेर पडणारे साबणयुक्त रसायनमिश्रीत सांडपाणी........ कित्ती मोठ्ठी यादी होईल...
हे सर्व दूषित पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित करत आहेत.
भीती निर्माण करण्यासाठी नव्हे तर रोगाची कारणे शोधून काढून ती कारणे आपल्या जीवनशैलीतून कमी करता आली तर, किंवा काढता येतील तेवढी काढण्यासाठी या रोगांची यादी देतोय.
हे रोग फक्त अशुद्ध पाणी पिऊनच होतात असे नव्हे तर रोग होण्याच्या कारणामधे इतर कारणांबरोबरच दूषित पाणी हे देखील एक महत्वाचे कारण दुर्लक्ष करून चालणार नाही.
आठ प्रकारचे उदर रोग, वारंवार तहान लागणे, पोट फुगणे, वेगवेगळे तापाचे प्रकार, खोकला, भूक नाहीशी होणे, डोळे येणे, वेगवेगळे त्वचारोग, खाज येणे, गलगंड इ. अनेक रोग ग्रंथकार वर्णन करतात. त्याचबरोबर मुळव्याध, आदि गुदरोग, स्त्रीयामधील प्रदर आदि रोग, हत्तीरोग, रक्ताल्पता, शिरोरोग देखील नदीतील अशुद्ध पाणी, शुद्धी संस्कार करण्याअगोदर प्यायल्याने निर्माण होतात.
आजच्या भाषेत व्हायरल फिवरचे अनेक प्रकार नावं बदलून आपल्यासमोर रोज येत आहेत, अगदी चिकुनगुनीयापासून स्वाईन फ्लु, इबोला पर्यंत सर्व प्रकार पाण्याशी संबंधीत आहेत.
दूषित पाणी ज्या भागात आहे, त्या भागात हे आजार जास्त प्रमाणात पसरले आहेत. हे पण व्यवहारात दिसते.
या दूषित पाण्याखेरीज, अन्य ठिकाणचे जल, वापरासाठी नसेल तर याच दूषित जलावर योग्य ते शुद्धीसंस्कार करून नंतर ते वापरावे, म्हणजेच "रिसायकल" करून वापरावे, इथपर्यंत स्पष्ट आदेश देणारी आयुर्वेदाची दृष्टी, दूरदृष्टीची नाही, असे कसे म्हणू शकतो ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
28.12.2016
December 28, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti