(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शोध – यशाचा

    यश या शब्दाबद्दल या सगळ्यांनी काय लिहून ठेवलंय बघा !!

      April 20, 2017


  • मोफत पाठ्य पुस्तकातील ज्ञान गंगा

    काही वर्षा पूर्वी महाराष्ट्र  सरकारने  शालान्त  परीक्षेपर्यंतच्या  विद्यार्थ्यांना  सर्व  पाठयपुस्तके  मोफत  वाटण्याची  घोषणा  केली.  ती  अमलात  आणेपर्यंत  आता  फक्त  आर्थिकदृष्टया  कमकुवत  वर्गासाठीही  लागू  करण्याची  घोषणा  नंतर  केली .  मोफत पाठ्य पुस्तक योजने वर त्या काळी बरीच चर्चा झाली. मला माझे शालेय जीवन आठवले.

      November 14, 2020


  • नवीन आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम

    इंटरसर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याजागी नवीन प्रमुखाची नियुक्तीही तितक्याच घाईने झाली. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना आयएसआयच्या प्रमुखपदावर आठ महिने राहू दिल्यानंतर त्यांची बदली आता करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएसआयचे नवे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

      July 2, 2019


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ९

    भगवान विष्णूची पत्नी रूपात जसा देवी लक्ष्मी चा गौरव केला जातो तशाच स्वरूपात भूमातेला देखील विष्णू पत्नी स्वरूपातच वंदन केले जाते. त्या भूदेवीचे वर्णन करताना, भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

      December 12, 2020


  • आता कशाला उद्याची बात?

    आता कशाला उद्याची बात?

    सतत भविष्याच्या काळजीमुळे आपण आपल्या आसपासच्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत,आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना वेळ कमी देत आहोत,जीवनाचे अमुल्य क्षण वाया घालवत आहोत आणि या सगळ्याची जाणीव आपल्याला त्या गोष्टी हातामधून गेल्यावर होते,हे आपले दुर्भाग्यच.उद्याचा अति विचार करून आपण आपल्या आजच्या सुखांवर विरजण तर नाही टाकत आहोत ना…..??

      May 31, 2019


  • मराठी चित्रपटसृष्टीचे ‘महाखलनायक’ निळू फुले : गाजलेले चित्रपट, अजरामर संवाद

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशी नावे आहेत, ज्यांच्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. या यादीत सर्वात अग्रस्थानी असणारे एक नाव म्हणजे ‘निळू फुले’. भारदस्त आवाज, डोळ्यांतील तीक्ष्ण भाव, चेहऱ्यावरील हुशार आणि धूर्त हावभाव आणि संवादफेकीची अफाट शैली यांच्या जोरावर निळू भाऊंनी तब्बल चार दशके मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या खलनायकी भूमिका इतक्या जिवंत असायच्या की, चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक त्यांचा तिरस्कार करू लागायचा. हाच त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा विजय होता.

      July 19, 2026


  • वाईट व्यसनांच्या विळख्यात !

    इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली.

      June 19, 2015


  • हिमयुगातलं तापमान

    हवेत आढळणाऱ्या ऑक्सिजन वायूतले बहुतेक रेणू हे, हायड्रोजनच्या अणूपेक्षा सोळापट जड असणाऱ्या ऑक्सिजनच्या अणूंपासून बनलेले असतात. मात्र ऑक्सिजनच्या या रेणूंबरोबरच, हायड्रोजनच्या अणूपेक्षा अठरापट जड असणाऱ्या ऑक्सिजनच्या अणूंपासून बनलेले रेणूही ऑक्सिजन वायूत आढळतात. या जड ऑक्सिजनची निर्मिती दहा-अकरा किलोमीटर उंचीवर नैसर्गिकरीत्या होत असते. हवा जितकी अधिक थंड, तितकी या जड ऑक्सिजनची निर्मिती अधिक. हवेच्या वरच्या थरात निर्माण झालेले हे जड ऑक्सिजनचे रेणू त्यानंतर खालच्या हवेत मिसळतात व सर्वत्र पसरतात. आजच्या हवेतलं या जड रेणूंचं प्रमाण, ऑक्सिजनच्या एकूण दहा लाख रेणूंत चार, इतकं आहे. हिमयुगाच्या कमाल शीतावस्थेच्या काळात संपूर्ण पृथ्वी अतिशय गारठलेली असल्यानं, त्याकाळी हवेतल्या ऑक्सिजनच्या जड रेणूंची निर्मिती अधिक प्रमाणात झाली असावी व त्यामुळे हवेतलं या रेणूंचं प्रमाणही तेव्हा अधिक असावं. जड ऑक्सिजनच्या निर्मितीचा तापमानाशी असलेला संबंध पूर्वीच अभ्यासला गेला आहे. तेव्हा जर प्राचीन काळातल्या हवेचा नमुना मिळाला, तर त्यातील जड रेणूंच्या प्रमाणावरून, त्या काळातलं हवेच्या वरच्या थरातलं तापमान कळू शकेल. हिमयुगातल्या कमाल शीत काळात हवेच्या वरच्या थरांचं तापमान किती होतं, ते जाणून घेण्यासाठी अस्मिता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हवेतील ऑक्सिजनच्या याच जड रेणूंची मदत घेतली.

    • पृथ्वीवरचं हवामान थंड झाल्यावर ध्रुवीय प्रदेशांत, पूर्वीच्या बर्फाच्या थरांवरच नव्या बर्फाचे थर जमा होऊ लागतात. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातल्या बर्फाच्या थरांपैकी, वरचे थर हे नव्या बर्फाचे असतात तर, खालचे थर हे जुन्या बर्फाचे असतात. या थरांपैकी अगदी खालचे थर तर प्राचीन काळातल्या बर्फाचे असतात. बर्फाचे हे थर निर्माण होताना, या सर्व थरांत त्यात्या काळातली हवासुद्धा अल्पप्रमाणात अडकून बसलेली असते. अस्मिता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही हवा गोळा करण्यासाठी, उत्तर ध्रुवाजवळील ग्रीनलँड आइस शीट या हिमस्तरातील सुमारे अडीच किलोमीटर खोलीवरच्या, आणि दक्षिण ध्रुवाजवळील वेस्टर्न अंटार्क्टिका आइस शीट या अंटार्क्टिकावरच्या हिमस्तरातील सुमारे दोन किलोमीटर खोलीवरच्या नमुन्यांचा वापर केला. (पूर्वीच्या प्रकल्पांमध्ये गोळा केलेले हे बर्फाचे नमुने अमेरिकेतल्या नॅशनल सायन्स फाउंडेशन या संस्थेत जतन करून ठेवले होते.) संशोधकांनी या बर्फाचे सुमारे शंभर-शंभर ग्रॅम वजनाचे, एकूण सुमारे शंभर भाग करून प्रत्येक भाग वितळवला व त्यातून मोकळी झालेली हवा काळजीपूर्वकरीत्या गोळा केली. प्रत्येक तुकड्यातून गोळा झालेल्या हवेतील नायट्रोजन, अर्‌गॉनसारखे इतर सर्व वायू वेगळे केले आणि उर्वरित हवेचं म्हणजे ऑक्सिजन वायूचं विश्लेषण करून त्यातील जड ऑक्सिजनचं प्रमाण काढलं.

    या विश्लेषणानंतर या संशोधकांनी प्रचलित प्रारूपांद्वारे, वेगवेगळ्या अक्षांशांवरील उंचावरच्या हवेत त्यावेळी किती जड ऑक्सिजन असावा, त्याचं गणित केलं. त्या प्राचीन हवेतल्या जड ऑक्सिजनच्या प्रमाणाची आजच्या हवेतील जड ऑक्सिजनच्या प्रमाणाशी तुलना केली. या तुलनेनुसार त्या काळातल्या हवेतलं जड ऑक्सिजनचं प्रमाण, ध्रुवीय प्रदेशांवरच्या हवेत सुमारे आठ टक्के, मधल्या अक्षांशांच्या म्हणजे चाळीस-पन्नास अंश अक्षांशांच्या प्रदेशांवरच्या हवेत सुमारे चाळीस टक्के आणि उष्णकटिबंधीय म्हणजे विषुववृत्ताजवळच्या प्रदेशावरच्या हवेत सुमारे पन्नास टक्के अधिक असल्याचं दिसून आलं. या संशोधकांनी त्यानंतर या वेगवेगळ्या अक्षांशावरील हवेतल्या जड ऑक्सिजनच्या प्रमाणावरून, त्यात्या ठिकाणच्या उंचीवरच्या हवेतल्या तापमानाचं गणित मांडलं. आजच्या तापमानाशी तुलना करता, दहा ते अकरा किलोमीटर उंचीवरील हवेचं त्या काळातलं हे तापमान (अक्षांशानुसार) सहा ते नऊ अंश सेल्सिअस कमी असल्याचं स्पष्ट झालं. अक्षांशानुसार आढळलेले उंचावरच्या हवेतल्या तापमानातील हे बदल त्याकाळी झालेल्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावर तापमानातील बदलांशी सुसंगत होते. पृथ्वीवरच्या सरासरी तापमानातील एक अंशाचा फरकसुद्धा पृथ्वीवरच्या हवामानात लक्षणीय बदल घडवून आणतो. त्यामुळे इतक्या अंशांचा हा बदल पृथ्वीवरच्या हवामानात मोठे बदल घडवून आणण्यास पुरेसा ठरला होता.

    प्राचीन काळातल्या पृष्ठभागावरच्या तापमानाचे निर्देशक म्हणून, जड ऑक्सिजनच्या रेणूंचा या अगोदरच इतर काही पद्धतींद्वारे वापर केला गेला आहे. परंतु, प्राचीन काळातल्या उंचावरच्या हवेचं तापमान शोधण्यासाठी केला गेलेला हा वापर अभिनव आहे. अस्मिता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनावरून सुमारे एकवीस हजार वर्षांपूर्वी, सुमारे अकरा किलोमीटर उंचीवर वेगवेगळ्या ठिकाणी तापमान किती होतं, याचं स्पष्ट चित्र उभं राहिलं आहे. ही पद्धत आता (पूर्वीच्या) इतर काळातील, हवेच्या वरच्या थरांचं तापमान जाणून घेण्यासाठीही वापरता येईल. त्यासाठी त्यात्या काळात जमा झालेल्या बर्फाचे नमुने वापरले जातील. अशा माहितीमुळे पृथ्वीच्या तापमानात विविध काळात झालेल्या बदलांचा अभ्यास अधिक तपशीलवारपणे होणार आहे. आणि यामुळेच भविष्यातील नैसर्गिक हवामान बदलांचं भाकीत करण्यासाठी वापरली जाणारी प्रारूपं आता अधिक अचूक बनणार आहेत!

    -छायाचित्र सौजन्य :
    (National Ice Core Lab / Zurich University of Applied Science / NASA)

      November 15, 2022


  • तिथी आणि तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक

    तिथी आणि तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे माहितीये?

    तुम्हाला जर आज उचलून कुणी एखाद्या निर्जन बेटावर नेऊन सोडले तर तारीख फार फार तर महिनाभर लक्षात राहील तुमच्या. त्यातही एखादाच जरी दिवस चुकला तरीही पुढचं सगळंच चुकणार, हे निश्चित. पण तिथीचं तसं नाही. तुम्ही एखाद्या निर्जन बेटावर असलात तर महिनाभराने कदाचित तिथीही विसरुन जाल. पण जर तुमचा खगोलशास्त्राचा जुजबी अभ्यास असेल तर चंद्राची कला आणि पौर्णिमेला चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, केवळ एवढ्याच निरीक्षणावरुन तुम्ही तिथी, महिना आणि पक्ष, तिन्ही ठरवू शकता. अगदी बिनचूक. आज मोठमोठ्या शहरांमध्ये दुर्बिणीद्वारे आकाशदर्शनाचं फॅड आलंय. मी ह्या खगोलशास्त्र प्रसाराच्या क्षेत्रात तब्बल ६ वर्षे काम केलंय मित्रांनो. जे ज्ञान मिळवण्यासाठी तुमच्यापैकी अनेकांनी रांगा लावल्या असतील, ते ज्ञान प्राचीन काळापासून प्रत्येक हिंदूला अगदी नकळत्या वयातच शिकवले जायचे. केवळ आणि केवळ कालगणनेसाठी!! आजसुद्धा खेड्यापाड्यांमध्ये अशी कित्येक वृद्ध मंडळी तुम्ही पाहिली असतील, जी कोणतेही घड्याळ वापरत नाहीत आणि तरीही केवळ सूर्याच्या अथवा चंद्राच्या स्थितीवरुन अचूक वेळ सांगतात. ही आहे हिंदूंची कालमापनपद्धती. जे तिथीला मानत नाहीत आणि ज्ञान केवळ ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते अशी फेकाफेक करतात, त्यांनी एकवार आपल्या आजोबांना अथवा आजीला याबद्दल चौकशी करावी. ते सांगतील ही कालमापनपद्धती प्रत्येक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात कशी वापरायचा ते. आणि ती सगळ्या जातीवर्णांच्या अगदी सामान्य माणसापर्यंत पोहोचवली गेली होती, यावरुनच हिंदूंना संशोधनाच्या दृष्टीने कालगणना किती अत्यावश्यक वाटत असे हे समजते.

    प्रत्यक्षात इंग्रजांनी आमचं उपरोल्लिखित रोजच्या आयुष्याला पूरक असं सकस शिक्षण बंद केलं आणि त्याऐवजी त्यांच्या कारभाराला सोयीचं असं कारकूनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. याचाच परिणाम आजही दिसतो की, एखादी व्यक्ती शिकलेली असली म्हणजे तिला अक्कल असेलच याची आजही खात्री देता येत नाही. यांच्यापेक्षा आमच्या रुढार्थाने कमी शिकलेल्या सिंधूताई सपकाळ जास्त सुशिक्षित वाटतात की मग!! असो. तर त्याचसोबत इंग्रजांनी आमची विज्ञाननिष्ठ कालमापनपद्धती नष्ट करुन सगळीकडेच त्यांची अवैज्ञानिक आणि अपूर्ण कालमापनपद्धती लागू केली. मी मुद्दामच विज्ञाननिष्ठ आणि अवैज्ञानिक असे दोन शब्द वापरतोय. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. विज्ञानानुसार काळ ही एक मिती आहे. आणि म्हणूनच ती नेहमीच सापेक्ष असते. त्यामुळेच आपण काळ मोजण्यासाठी जितकी अधिक परिमाणं आणि संदर्भ लावू तितका तो अचूक येतो. इंग्रजांच्या मुळात कॅलेंडरमध्येच ग्रेगोरियन आणि ज्युलियन असे घोळ. त्यातून दिवसांचा होणारा बेहिशोब कसाबसा सावरण्यासाठी दर महिन्याआड १ दिवस वाढवणं आणि फेब्रुवारीत कधी १ तर कधी २ दिवस कमी करणं अशी बनवाबनवी आहेच. इतके करुनही ह्या कॅलेंडरमध्ये महिना, तारीख आणि वर्षच तेवढे समजते आणि घड्याळात केवळ तास, मिनिटे व सेकंद. याउलट हिंदू पंचांगाच्या नावातच त्याचा अर्थ दडलाय. पंच अंग म्हणजे पाच अंगे. कोणकोणती पाच अंगे? तर तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. प्रत्येक दिवसाला ही पाच परिमाणे लावली जातात, तेव्हा कळणारा काळ हा इंग्रजी कॅलेंडरपेक्षा केव्हाही जास्तच अचूक असतो. शिवाय प्रहर, घटीका, पळे इ. तर वेगळेच!!

    लक्षात घ्या, इथे फक्त रोजच्या जीवनातलं कालमापन तेवढं घेतलंय. याहून खोलात गेलो तर फारच धक्कादायक निष्कर्ष निघतात. भागवतपुराण हे अतिशय प्राचीन आहे. आपल्या सवयीप्रमाणे सारे काही शक्यतो बायबलच्या नंतरचे ठरवायचे ह्या अट्टाहासापायीदेखील पाश्चिमात्त्यांना त्याचा काळ सहाव्या शतकाच्या पुढे ओढता आलेला नाही. ह्या भागवतपुराणाच्या ३ऱ्या स्कंधाचा ११वा अध्याय वाचा. कालमापनाची परिमाणे दिली आहेत त्यात. सगळ्यात सूक्ष्म परिमाण सांगितलेय परमाणू. सगळ्यात मोठे सांगितलेय ते श्रीहरिचा एक निमेष अर्थात हरिनिमेष. संपूर्ण अध्यायच सूक्ष्मापासून जडापर्यंत काळ कसा मोजायचा हे स्पष्ट करण्यासाठी वाहिला आहे. मी यावर पूर्वी गणित केले होते. जोडीला एक संगणकतज्ञ मित्र त्याच्या अत्याधुनिक संगणकासह मदतीला होता. गंमत काय झाली? सगळ्यात सूक्ष्म काळ मोजताना आणि सगळ्यात मोठा काळ मोजताना, दोन्ही वेळेस त्याचा अत्याधुनिक संगणक ताण सहन न होऊन अक्षरश: बंद पडला!! याचाच दुसरा अर्थ असा की, गोऱ्या चमडीला ज्याकाळी चमडी झाकण्यासाठी झाडाच्या साली गुंडाळण्याइतकीसुद्धा अक्कल आली नव्हती, त्याकाळापासून आपण अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्मापासून मोठ्यातमोठ्या काळापर्यंत अचूक कालमापन करतो आहोत. अहो, येत्या गुढीपाडव्याला युगाब्द किती सुरु होतोय माहितीये? ५११९! यावरुन दिसते की, आज जे कॅलेंडर वापरतो ना आपण, त्याच्या किमान ३००० वर्षे आधीपासून आपण रोजच्या आयुष्यात कालगणना करतोय.

    -- विनय

      January 5, 2017


  • सकारात्मक विचारसरणी

    एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.

    काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.

    वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण ल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला,
    राजा शेजारीच उभा होता.

    त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.

    त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.

    ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.

    जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते ..

    आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!

      July 26, 2017