वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नालंदा विद्यापीठाच्या उद्गमा बद्दल अनेक प्रवाद आहेत,त्यापैकी एक म्हणजे संघराम शहराच्या दक्षिणेस एका आंब्याच्या झाडाखाली एका हौदात नाग रहात असे,त्यावरून नाव पडले.
August 5, 2023
ऑगस्ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्लीपती बनण्यासाठी अनुकूल नव्हती. स्वारीस निघाल्यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्वारीत मराठ्यांना येऊन मिळण्याविषयी पत्रे पाठवली होती. अब्दालीशी लढायला आल्यावर आणि त्यासाठी हिंदुस्थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्यावर आणि स्वतः अब्दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्यावर, मराठ्यांना त्यावेळी दिल्लीपती कसे होता आले असते ?
March 13, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात बोलताना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. स्वामीनाथन यांनी ‘शेतकऱ्यांना वाचवा, शेती वाचवा’ , हा नारा घेऊन ठाामस्तरावर काम करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी पॅकेजने आत्महत्या थांबत नसतील तर कृषी धोरणाचा फेरविचार करावा लागेल, असे वत्त*व्य त्यांनी केले होते.
May 7, 2006
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 20, 2018
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 26-दीपं दर्शयामी-भाग तीन
जसे इंधन तशी काजळी.
जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. मेणाचा असेल तर वेगळे. राॅकेलचा असेल तर काजळी जास्ती आणि पेट्रोल जाळले तर काजळी एकदम कमी. स्पिरीटला काजळी धरणारच नाही, तर विमानातील इंधनाची ज्योतच दिसणार नाही. म्हणजे जसे इंधन तशी काजळी. भगवत गीतेमधे या अर्थाचा एक श्लोक आला आहे...
भक्ष्ययते यद् ध्वान्तम कज्जलम च प्रसूयते।
यद् दीपोज्वलेत कज्जली भवेत् ।
जायते तादृशी प्रजा।
झिरोचा बल्ब, एल ई डी बल्ब, ट्यूबलाईट, फ्लुरोसंट बल्ब, हॅलोजन, हाय मास्क बल्ब या प्रत्येकापासुन मिळणारा प्रकाश वेगवेगळा.
आपल्याला ज्या कारणासाठी प्रकाश हवा आहे, त्याप्रमाणे योजना हवी. फक्त मलाच वाचायचे आहे, किंवा लेखन करायचे असेल तर टेबल लॅम्प पुरतो ना ! तिथे हॅलोजन नको ! आता तर पेनच्या रिफिलच्या टोकापुरताच उजेड पाडणारी पेन पण निघाली आहेत.
या प्रत्येक यंत्रणेला लागणारी विद्युत उर्जा देखील वेगवेगळी असते. काही ठिकाणी एसी करंट, काही ठिकाणी डीसी करंट काही ठिकाणी स्टॅबीलायझर, काही ठिकाणी अॅडेप्टर, तर काही ठिकाणी फक्त मायक्रोचीप पुरते. तसेच आहे. दिव्यातील इंधन जसे असेल तसे परिणाम आपणास मिळतात.
जो दिवा देवासाठी तसाच तो देहासाठी समजून घ्यावा. जशी काजळी दिव्यामधे तशी देहामध्ये देखील काजळी बनते. आपल्या अन्नाचा दर्जा जसा असेल, तशी काजळी बनण्याचे प्रमाण कमी जास्त होईल.
खाल्लेल्या अन्नातून चांगले आणि वाईट असे दोन भाग तयार होतात. चांगल्या उत्तम प्रतीचा आहार जर आपण सेवन केला तर तयार होणारे प्राॅडक्ट उत्तम प्रतीचेच असणार. मध्यम प्रतीचा आहार घेतला तर मध्यम प्रतीचे प्राॅडक्ट तयार होणार. आणि हलक्या प्रतीचे अन्न घेतले तर हलक्या दर्जाचे प्राॅडक्ट तयार होणार.
आड्यात जे असेल तेच पोहोऱ्यात येणार ना !
बिर्याणी करायची असेल तर तांदुळ बासमतीचाच हवा. साधा भात करायचा असेल तर तांदुळ मसूरी किंवा कोलम हवा. आणि पेज करायची असेल तर उकडा तांदुळ उत्तम असतो. आपल्याला कोणते प्राॅडक्ट बनवायचे आहे ते ठरवले तर तांदुळ कोणता वापरायचा ते निर्णय बदलतात.
तसेच शरीर पुष्ट करायचे असेल तर आहाराची योजना वेगवेगळी हवी. केवळ मांसधातु वाढवायचा असेल तर आहार वेगळा, रक्त वाढवायचे असेल तर आहार वेगळा आणि सगळेच धातु वाढवायचे असतील तर आहार वेगळा असतो.
या अन्नाच्या दर्ज्याला आयुर्वेदीय ग्रंथकार आणि गीताकार, सत्व रज तम असे नामाभिधान करतात.
आहार सात्विक असेल तर सर्व इंद्रिये, अवयव, धातु, अगदी मन सुद्धा सात्विक बनते. आहार राजसिक असेल, तर शरीरावर होणारा परिणाम राजसिक असतो, आणि आहार तामसिक असेल तर विचार आणि कृती तामसिक होते. हेच सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी, (पटवून घेणाऱ्याला) दिव्याचे उदाहरण ग्रंथकर्ते देतात.
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" असे तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेले आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.06.2017
June 19, 2017
१९८६ : पहिल्या सामन्यात ५३ धावांवर सर्वबादची नामुष्की ओढवलेल्या (पहा : २८ ऑक्टोबर, अनपेक्षित हार) वेस्ट इंडीज संघाने दुसर्या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव राखून दणदणीत पराभव केला.
१९८५ : अतुलनीय रिचर्ड हॅडलीचा एक सनसनाटी दिवस. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ५२ धावांमध्ये ९ तर एकूण १२३ धावांमध्ये १५ फलंदाजांना तंबूची वाट दाखवीत हॅडलीने ऑस्ट्रेलियाची वाट लावली.
October 29, 2010
१ जानेवारी २०१० ला ‘कुतूहल’ या सदराची जबाबदारी ‘समन्वयक’ म्हणून माझ्याकडे आली. माझ्या अगोदरच्या समन्वयकांनी या सदराला उच्च स्वरूप आणले होते त्यामुळे माझी जबाबदारी वाढली होती. वयाच्या ७८ व्या वर्षी वर्षभर सोमवार ते शनिवार सदर सातत्याने चालविण्याची जबाबदारी स्वीकारताना तेही माझ्या वैद्यकीय व्यवसाय व इंडस्ट्रियल अॅटॅचमेण्टस् सांभाळून- जरा विचार करावा लागला; पण प्रकृतीने उत्तम साथ दिली.
April 9, 2023
फ्रान्सच्या एका लहानशा खेड्यात १४१२ साली जन्मलेली एक मुलगी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अल्पवयात जगातील महान योद्ध्याची भूमिका बजावून इंग्रजांशी लढा देता देता आपल्या प्राणाची आहुती देते, ही घटना आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वाटते.
January 4, 2024
…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात.
April 29, 2024
दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
October 26, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti