शास्त्रज्ञ हे क्षेत्र भारतात तसे अतिशय दुर्लक्षित क्षेत्र आहे. खरे पाहता शास्त्रज्ञ हे आपल्या देशाचे खऱ्या अर्थाने हिरो आहेत. पण ते उच्चशिक्षित असूनही दुर्दैवाने अतिशय दुर्लक्षित राहतात. त्यातून स्त्री शास्त्रज्ञ ह्या तर कर्तृत्ववान असूनही त्यांची माहिती सामान्य भारतीयांना नसते. म्हणूनच ‘भारतीय स्त्री वैज्ञानिक’ या सदरातून मराठीसृष्टीचे लेखक श्री रविंद्र वाळिंबे हे भारतातल्या स्त्री शास्त्रज्ञांची माहिती आपल्या वाचकांना देणार आहेत.
शीना राणी यांचा जन्म केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे झाला.त्या दहावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आईने केले. शीना ह्या एक प्रशिक्षित इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअर आहेत आणि त्यांना संगणक शास्त्रात विशेष ज्ञान आहे. त्यानी तिरुवनंतपुरममधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली आहे.
५७ वर्षीय शीना राणी ह्या हैदराबादमधील डीआरडीओच्या हाय-टेक लॅबमध्ये शास्त्रज्ञ आहेत . त्या १९९९ पासून अग्नि मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालींवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले होते. शिला राणी यांनी अग्नि ५ मिसईल बनवले. हे मिसाईल ५ हजार किलोमीटर दूर टार्गेट वर मारा करू शकते त्यामुळे चीन व युरोपचा काही भाग निशाण्यावर येतो.त्यामुळे चीन आणि पाकिस्तान दोघांचे टेंशन चांगलेच वाढले आहे म्हणजे एक स्त्री सुद्धा इतर देशांना कीती दडपणाखाली ठेऊ शकते हे लक्षात येते. यामुळे आता शीना राणीची ‘दिव्य कन्या’ म्हणून चर्चा होत आहे.शीना राणी यांना ऊर्जा केंद्र आणि क्षेपणास्त्र राणी म्हणूनही ओळखले जाते .