(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मैत्री

    संस्कृत सुभाषिता मध्ये पण म्हटले आहे की मित्रच नसले तर सुख कुठुन मिळणार ? असे प्रतिपादित करून मैत्रीचे महत्व सांगितले आहे.बालपणात ती नकळत होते.गंमत म्हणजे निस्वार्थ भाव असला तरी, त्या वयात कट्टी/ दोस्ती करून ती तोडतां जोडतां येते. नातगोत एखाद्या केळ्यासारखे असते.तुटले तर जोडता येत नाही पण मैत्री एखाद्या लाडु सारखी असते.

      July 26, 2020


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२

    पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
    कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
    द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
    त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖

    कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
    ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
    पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
    तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
    त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
    अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
    कलंकीति वा - माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
    मूर्ध्नि धत्से तमेव - तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
    द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
    सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
    त्वदंगीकृताः
    शर्व सर्वेऽपि धन्याः - हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 21, 2020


  • श्री आनंद लहरी – भाग १८

    आई जगदंबेचा लोकोत्तर सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री येथे एक वेगळाच मार्ग अवलंबित आहेत. त्यांनी त्यासाठी भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेला आधार केले आहे. ते म्हणतात,

      February 23, 2020


  • महाराष्ट्रातील निवडणूकांचा इतिहास – एक दृष्टीक्षेप..

    महाराष्ट्रातील निवडणूकांवर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप

      July 2, 2014


  • चला करू स्वातंत्र दिन Meaningful

    नुकताच आपण ऑगस्ट 2015 रोजी भारत 69 वा स्वातंत्र दिन साजरा केला. स्वातंत्र मग ते कशाचेही मिळो आपण ते नेहमीच एनजाॅय करतो. मी आहारतज्ञ असल्याने मला असे वाटते की ह्या स्वातंत्र दिन पासून आपण रोगांपासून फ्रीडम (Freedom from Illness - Lifestyle Diseases) एनजाॅय करू या. आजार दोन प्रकारचे असतात – कम्यूनिकेबल आणि नाॅन कम्यूनिकेबल. सध्या प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा लाईफ स्टाईल डिसीजेस (जीवनशैली रोग) वाढताना दिसत आहे. मुले ही आपल्या देशाचं भविष्य असल्याने मुलांच्या आरोग्या विषयी काळजी घेणे अत्यंत मोलाचे ठरेल.

    लाईफ स्टाईल डिसीजेस म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?
    लाईफ स्टाईल डिसीजेस हे नाॅन कम्यूनिकेबल डिसीजेस म्हणून ही ओळखले जातात. व्यक्तीची स्वत:ची अशी जगण्याची एक जीवनशैली असते. अशा काही जीवनशैली असतात की त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो किंवा एखाद्या रोगाचा त्रास होऊ शकतो. आहारात, जीवनशैलीत बदल केल्यास वाढलेला धोका कमी होऊ शकतो अशा रोगांना नाॅन कम्यूनिकेबल डिसीजेस म्हणून संबोधले जाते. लठ्ठपणा, टाईप 2 डायबेटिस, कॅन्सर, हायपरटेंशन, स्ट्रोक, ह्रदय रोग, COPD, आणि Atherosclerosis ह्या रोगांना लाईफ स्टाईल डिसीजेस म्हणून संबोधले जाते.

    हे रोग बरे करण्यासाठी पैशाचा अपव्यय तर होतोच पण ह्या रोगामुळे होणारी "Disability adjusted life years" पण जास्त असते आणि ही 44 ते 59 ह्या वयोगटात जास्त प्रमाणात दिसते. तसेच ह्या आजारामुळे प्रेझेंटीझम आणि अॅबसेंटीझम वाढताना दिसत आहे. ह्या आजारांचे ओझे किती जास्त आहे हे खालील आकडेवारी वरून लक्षात येईल.

    • साधारणतः 40% हाॅस्पीटल मध्ये दाखल केलेले रूग्ण,आणि 35% आऊट पेशंट्स व्हिजिट ह्या लाईफ स्टाईल डिसीजेस साठी आढळतात
    • भारतीय व्यक्तींमध्ये रोगाचे निदान लहान वयातच होते - डायबेटिस 51 व्या वर्षी तर US मधे 58 व्या वर्षी; स्ट्रोक ने बाधीत झालेल्या 8 पैकी 1 व्यक्ती 40 वर्षा खालील आढळते; ह्रदय रोगाचा आस 50 वर्षा एवजी 20-30 वर्षातच दिसू लागला आहे; 40 वर्षा वरील रूग्णांचे प्रमाण 10% वरून 35 - 40% पर्यंत वाढले आहे.

    स्image-1त्रीया आणि मुख्यत्वे कामावर जाणार्या स्त्रिया ही अशा आजारांमधे मागे नाहीत असे सर्वेक्षणा वरून आढळले आहे. Associate Chember of Commerce and Industry (ASSOCHAM) ह्यांनी गेल्या वर्षी कामावर जाणार्या स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी केली तेव्हा त्यांना

    • 32 - 58 ह्या वयोगटातील स्त्रियांमध्ये आरोग्याची समस्या जास्त आढळल्या
    • 4 पैकी 3 स्त्रियांमध्ये आरोग्याच्या काही ना काही तक्रारी असल्याचे निष्पन्न झाले.
    • 78% स्त्रियांमध्ये लठ्ठपणा, डिप्रेशन, डायबेटिस, हाय कोलेस्टरॉल, ह्रदय रोग आणि किडनीच्या समस्या आढळल्या
    • 42% स्त्रीया लाईफ स्टाईल डिसीजेस मुळे त्रस्त होत्या तर 22% स्त्रियांना क्रॉनिक आजार होते.

    हे वाढणारे ओझे कमी करायचे असल्यास आपण सर्वांनाच हेल्दी प्रॅक्टीस आणि मुख्यत्वे करून योग्य आहार, दररोज व्यायाम आणि कामाच्या ठिकाणी वेलनेस प्रोग्रॅमचे आयोजन करावे लागेल. प्री डायबेटिस, प्री हायपरटेंशन असलेल्या व्यक्ती आणि लठ्ठ लहान मुले व तरूण पिढी ह्यांची विशेष करून काळजी घ्यावी लागेल म्हणजे आपोआपच ओझे कमी होण्यास मदत होईल.

    प्रीहाइपरटेंशन - ब्लडप्रेशर नाॅर्मल पेक्षा जास्त पण हायपरटेंशनच्या रेंज पेक्षा कमी

    प्री डायबेटिस - नाॅर्मल साखरे पेक्षा जास्त पण डायबेटीक व्हॅल्यू पेक्षा कमी जर आपण प्रीव्हेंटीव प्रॅक्टीस अंगीकारली तर

    image-2 होणार्या त्रासा पासून मुक्ती
    • आयुष्याची कालमर्यादा तर वाढतेच पण आरोग्यदायी वयोमान ही वाढ होते.
    • हाॅस्पीटल मध्ये भरती होणे, अचानक मृत्यू येणे, आणि रोगांपासून होणारे त्रास कमी होतात किंवा टाळता ही येऊ शकतात
    • औषधांवरील खर्चावर नियंत्रण येते. प्रयोग असे दाखवतात कि रोग टाळण्यासाठीच्या उपाययोजने वर फक्त 1/3 पर्यंतचा खर्च होतो तसेच उपाय योजना उशीरा सुरू केल्यास खर्चात 10% - 20% वाढ होऊ शकते.
    • 60% पर्यंत डायबेटिस व ह्रदय रोगाचा आस कमी होऊ शकतो
    • ह्रदय रोगामुळे होणार्या मृत्यू मध्ये वर्षाला फक्त 1% घट झाली तर 2030 साला पर्यंत 87% पर्यंत पर कॉपीटा इनकम मध्ये वाढ होईल ह्या वरून हेच सिद्ध होते की आपण आजपासून प्रीव्हेंटीव प्रॅक्टीस सूरू केली तर लाईफ

    स्टाईल डिसीजेस पासून फ्रीडम मिळवणे सहज शक्य होईल.

      August 18, 2015


  • द्वादशलिंग स्तोत्रम् – ६

    भगवान शंकरांच्या या बारा दिव्य ज्योतिर्लिंगांपैकी पाच वैभवशाली स्थाने महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी बालाघाटच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात विराजमान असणारे वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणजे श्रीक्षेत्र औंढा नागनाथ.

      September 9, 2020


  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग तीन

    ऐकलेले आणि बघितलेले यात चार बोटांचे अंतर असते, तसे नियम आणि वास्तव यात एक हाताचे अंतर असते.

      April 12, 2017


  • मराठा आरमार दिन – भाग १

    २४ ऑक्टोबर' हा दिवस 'मराठा आरमार दिन' म्हणून साजरा करूयात .

    भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.

    मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले. एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली. आणि... आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत. समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत. मोगलांची हि स्थिती तर आपली काय ? त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती. मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.

    शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो-

    देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी
    बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी
    जहाजे आरमार भर जलधि दुष्टांसी शिक्षा करी
    बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी

    हा झाला आपला इतिहास, मात्र आपण तो कदापी विसरता कामा नये.

    शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळीमध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला. ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या. ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य अशी जागा / तळ असणे गरजेचे होते. *ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत. लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते.

    आणि अखेर तो दिवस उजाडला..... दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली. आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. _यावर्षी या घटनेस ३५९ वर्षे पूर्ण झालेली आहेत._ हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

    अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली, म्हणून '२४ ऑक्टोबर' हा दिवस 'मराठा आरमार दिन' किंवा 'भारतीय आरमार दिन' म्हणून आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करूयात .......

    स्वतंत्र्य आणि सार्वभौम आरमारनिर्मिती हा हिंदवी स्वराज्याचा ठळक विशेष होय.तीन बाजूंनी सागराने वेढलेल्या हिंदुस्थानचे संरक्षण करण्यासाठी आरमार(नौदल) हे अत्यंत महत्वाचे अंग असल्याचे महाराजांनी ओळखले होते.विशेष म्हणजे ज्या काळात मुघल साम्राज्याजवळ सार्वभौम आरमार नव्हते,त्या काळात महाराजांनी स्वतंत्र्य आरमाराची उभारणी जाणीवपुर्वक केलेली आहे.पश्चिम किनार्यावरील सागरी संरक्षणाचे कार्य औरंगजेबाने जंजिरेकर सिद्दीवर सोपवले होते.पुर्व किनार्यावर मुघल आरमार होते पण ती जहाजे चालवणारी खलाशी फिरंगी असत व त्यासाठी वार्षीक चौदा लक्ष रुपये खर्च करी.अशाप्रकारे मुघली आरमार परावलंबी होते.मात्र महाराजांनी गलबते स्वत: बांधुन त्यावर आपलेच खलाशी ठेवले.हाच मुघली व मराठी आरमारातील ठळक फरक होता.

    मराठ्यांच्या आरमाराची सरकाररित्या संस्थापना छत्रपती शिवरायांनी केली.महाराजांनी स्वतंत्र्य आरमार उभारण्याचा हुकुम दिला.असा उल्लेख "मराठे व इंग्रज" या ग्रंथात आहे.दिसामासाने वाढणारे स्वराज्याची सिमा समुद्र किनार्यालाही लागून आहे.किनारपट्टीवर सत्ता अधिकार प्राप्त करुन घेतल्याशिवाय आपली कोकणपट्टी सुरक्षित नाही,याची खात्रीही पटली होती.बसरुरच्या मोहिमेनंतर आलेल्या अनुभवाने शिवरायांना आरमारी प्रतीकारासाठी काही नवीन उपाययोजना करण्याची निकड वाटली.

    शिवाजी महाराजांनी परदेशी पोर्तुगिज अभियंत्यांना जहाज बांधणीसाठी कामास ठेवले.
    "लैतांव व्हियेगस" व त्याचा मुलगा "फेर्नांव व्हियेगस" यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांनी पहिली वीस लढाई गलबते बांधण्यास सुरुवात केली.हा जो "लैतांव व्हियेगस" होता त्याच्या हाताखाली जवळपास ४०० माणसे होती. शिवरायांमध्ये हे एक चाणाक्ष नौसेनानी होण्याचा सर्व गुण होते आणि ह्या आरमारापासुन आपल्याला भविष्यात धोका निर्माण होणार हे पोर्तुगिज विजरई पु्र्ण पणे जाणुन होता त्यामुळे आरमार पुर्ण बांधुन होण्यापुर्वीच त्याने एक जाहिरनामा काढला की शिवरायांच्या आरमारात नौकरीस असलेल्या सर्व पोर्तुगिज लोकांनी स्वदेशी परत जावे.त्यामुळे एके दिवशी सर्व कारागीर महाराजांची नौकरी सोडुन गुप्तपणे पळुन गेले.

    शिवरायांचे आरमार दिवसेंदिवस वाढत होते.इतके की पोर्तुगिजांना मराठी नौदलाची भिती वाटत होता. महाराजांच्या आरमाराविषयी सन १६६७ च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास "विजरई कौंदि द सांव्हिसेंति" याने कळविले होते.विजरई लिहितो की, "शिवाजीचे नौदल मला भितीदायक वाटते.कारण त्याच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीपासुनच कारवाई न केल्यामुळे त्याने किनार्यावर किल्ले बांधिले आणि त्याच्या जवळ पुष्कळ तारवे आहेत,पण ती तारवे मोठी नाहित. शिवाजीराजे व संभाजीराजेंनी यांनी स्थानिक लोकांच्या कर्तबगारीचा सदुपयोग करुन पाश्चात्यांच्या मोठ्या आरमाराला तोंड दिले व आपल्या लोकांच्या समुद्रपर्यटनाबाबतच्या धार्मिक समजुतीत मोठी क्रांती घडवुन आणून त्यांना दर्यावर्दीपणात व आरमारी युद्धकलेत अल्प कालावधीत आघाडीवर नेऊन बसविले.

    व्यापारी धोरण:-

    स्वतंत्र्य आरमाराची स्थापना करुन शिवाजी महाराजांनी महारष्ट्राच्या इतिहासाला जी कलाटणी दिली तिच्या मागे आधुनिकिकरणाचे तत्वज्ञान होते.त्यांनी पश्चिम किनार्यावरील दरवाजा उघडुन पाश्चात्य सुधारणेचा कालवा इकडे आणण्याची तजवीज चालविली होती.परकिय व्यापारास उत्तेजन तर द्यायचेच सोबत आपल्या आरमाराचे नियमन करावयाचे असा दुहेरी बेत शिवरायांनी आखला.त्यांना पाश्चात्यांच्या नौकानयनाची पुर्ण जाणीव होती.त्यांनी डच,इंग्रज,पोर्तुगिज ह्यांच्याकडुन बर्याच कल्पना उचलल्या.मराठी राजवटीत शिवराय हे एकमेव राजे आहेत ज्यांनी तारवांतून स्वारी केली,ही गोष्ट याबाबत विसरण्यासारखी नाही.शेतीप्रमाणेच सरकारी उत्पन्नाचे दुसरे महत्वाचे साधन म्हणजे व्यापार व उद्योगधंदे.पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे म्हणजे एका अर्थी व्यापाराच्या रक्तवाहिन्या होत्या.इथूनच सर्वदूर मालाची आयातनिर्यात केली जाई.या मालावरील जकाती म्हणजे सरकाराते प्रंचड उत्पन्न होते.महाराजांच्या वेळी पोर्तुगीज,इंग्रज,डच,फ्रेंच,अॅबिसिअन,चिनी व बेहेरोनी,आर्निनियन,तार्तार,ग्रीक,अरब हे परदेशी व्यापारी भारताशी व्यापार करीत.स्वराज्यात फारसा माल तयार होत नव्हता,तरी राजापुरी पंचा व लोटा तसेच भिवंडीची हातमागावरील वस्त्रे व चौलचे रेशमी कापड,मीठ,आंबे,सुपारी,नारळ इ.वस्तुंची निर्यात लक्षणीय होती.

    महाराजांनी परदेशी व्यापार धोरण राबवण्यास सुरुवात केली."साॅल्ट फ्लीट "(Salt flit) म्हणजे मीठ वाहुन नेणार्या बोटींचा तांडा मराठ्यांकडे होता.मुलखातील चौल,दाभोळ,कल्याण,भिवंडी,वेंगुर्ला,पेण हि ठिकाणे चांगलीच भरभराटीस आले.चौल हे दख्खनेतील सर्वात मोठी बाजार पेठ होती.पश्चिम किनारपट्टी महाराजांच्या ताब्यात येताच त्यांनी भरपुर व्यापारी उत्पन्न मिळू लागले.शिवाय मीठाच्या व्यापारही प्रंचंड असुन त्याचे उत्पन्न दांडगे होते.काही मिठागरे पोर्तुगिज हद्दीत होते.पुष्कळदा व्यापारी स्पर्धा चाले.गोवेकरांच्या स्पर्धेमुळे स्वराज्यातील मीठ व्यापार धोक्यात आला बरीच मिठागरे ओस पडली अशा वेळेस ह्या व्यापाराय संरक्षण देण्याच्या दृष्टीने मीठावर जबर कर बसवला. अर्थशास्रामध्ये ह्या धोरणास'policy of protection" असे म्हणतात.मीठ वाहतुकीत बचतीसाठी त्यांनी कारंजाहुन मीठ आणण्याऐवजी ट्राॅंम्बेहुन मीठ आणण्याचा हुकुम नौदलास दिला.त्यामुळे ४०० खंडी मीठ आधी १०० आण्यास विकले होते तेच मीठ आता ४६ आण्यास विकले.

    अरबस्तानाशी व्यापार करण्यासाठी मजबुत व अवजड अशी दोन जहाज बांधली व ती जैतापुर मार्गे मोखा येते पाठवली. लढाऊ गलबतांवर मोठ्या व लहान तोफा,बंदुकी,हुक्के ही शस्त्रे असत.इंग्रज व पोर्तुगिजांकडून महाराजांनी तोफा विकत घेतल्या.इंग्रजांच्या पितळी तोफेचे प्रमुख गिऱ्हाईक महाराजाच होते.

    मराठा आरमार दिन
    २४ आॅक्टोबर

    (उद्या भाग-२ मध्ये महाराजांनी दुरदृष्टीने निर्माण केलेल्या आरमाराचा वारसा सांभाळणार्या पाश्चात्य शक्तींना नामोहरम करणार्या मराठा नौसेना अधिपती सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम पाहु)

      October 24, 2016


  • हमीचा (अ) भाव

    १.‘कापसाला सात हजार रुपये प्रती क्विंटल भाव देणार, उत्पादन खर्चावर आधारीत भाव शेतकऱ्याना मिळतील, अच्छे दिन येणार’- प्रतप्रधान नरेंद्र मोदी, सोलापूरची सभा.

    २.सत्ता द्या, शेतमालाला भाव देतो’- राज ठाकरे, ९ ऑक्टोबर २०१४.

    ३.शेतमालाला भाव नाही, अस्मानी संकटात मदत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय- सेनेचे ट्विट दि. २० एप्रिल २०१४

    मागील वर्षी लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाची ही प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांची व्यक्तव्ये.राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामेही चक्क कॉपीपेस्ट केल्यासारखे. आघाडी सरकारच्या काळात शेतमालाची एमएसपी किंवा हमीभाव दुप्पट केल्याचा दावा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होता. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के अधिकचा मोबदला मिळवून देण्याची घोषणा मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाने केली तर भाजपानेही हीच घोषणा करुन शेतकऱ्यांचा कैवार घेतला होता. अपुरा पाऊस, गारपीटीच्या माऱ्यातून सुटल्यानंतर हातात आलेल्या धान्याला कवडीमोलही किंमत मिळत नसल्याने दुष्काळाची भिषणता तर वाढतच आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांना आत्महत्येच्या कडेलोटावर नेऊन ठेवत आहे.

    मागील वीस वर्षात काही बदलले असेल तर फक्त खुर्चीवरची माणसे. दुसरीकडे शेती करणे आतबट्टयाचा व्यवहार होत गेला. पारंपारिक पिकांकडून शेतकरी नगदी पिकांकडे वळल खरा पण मका, कापूस, सोयाबीन यांच्या किंमतीतील हेलकावे सामान्य शेतकऱ्यांना पेलवले नाहीत. परिणामी एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे उत्पादन खर्चही निघणार नाहीत असे भाव या कात्राीत शेतकरी सापडला. शेतमालाला हमी भावाएवढा दर मिळाव एवढीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा पूर्ण होत नसल्याने शेतकरी आणखीच कंगाल होत चालला आहे.

    महाराष्ट्र शासनाने २३ एप्रिल २०१५ रोजी राज्य शेतमाल भाव समितीचे रुपांतर कृषी मूल्य आयोगात करण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत पीक उत्पादन खर्चाची आकडेवारी गोळा करण्यासाठी कायमस्वरुपी यंत्रणा असावी यासाठी राज्य शेतमाल भाव समिती होती. राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या मदतीने मागणी व पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीची स्थिती, बाजारातील किंमतीमध्ये होणारे चढउतार, आदी विचारात घेऊन शेतमालाच्या किंमती समिती ठरवत असे. त्या आधारे केंद्र शासन राष्ट्रीय पातळीवर किमान आधारभूत किंमत निश्चित करुन जाहीर करत असे. राज्यातील शेतमालाल किफायतशिर भाव मिळावेत व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा असा दुहेरी उद्देश ठेऊन समितीचे रुपांतर राज्य कृषी मूल्य आयोगात करण्यात आले.आयोग स्थापन्यामागचा सरकारचा उद्देश चांगला असला तरी शेतमालाच्या किंमती ठरवताना ग्राहकांचे हितच सरकारला सर्वोच्च स्थानी ठेवणे भाग आहे आणि ते प्रत्येकवेळी ठेवले जाते हे सिध्द झाले आहे. राज्यांनी सुचिवलेल्या हमी भावानंतर अंतिम अहवाल तयार करण्याचे काम कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोग (कमिशन फॉर अ‍ॅग्रिकल्चर कॉस्टस् अ‍ॅण्ड प्रायझेस) करत असला तरी या आयोगाच्या शिफारशी स्विकारण्याचे बंधन केंद्र सरकारवर नसते. शेतकऱ्यांचा विचार केल्यास हमी भावाच्या निर्धारणावर आक्षेप नोंदवायचा असल्यास तशी व्यवस्थाही नाही.

    आयात निर्यातीची धरसोड धोरणे शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहेत. कांद्याचे कोसळणारे आणि वाढणारे याचाच परिणाम आहे. १९९८ ते २००३ या काळात देशात सुमारे १५ ते २० लाख गाठींची आयात दर वर्षी होत होती. परिणामी देशात कापसाचे भाव हमी भावापेक्षाही खाली कोसळले. महाराष्ट्रातील कापूस एकाधिकार योजनेचा तोटा वाढत गेला अखेर ही योजनाच बंद झाली. साखर आयातीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत आले त्याचे थेट परिणाम ऊस दरावर झाला. चीन, पाकिस्तान, रशिया, अमेरिका या सर्वाधिक सोयाबीन उत्पादीत होते. आघाडी सरकारच्या काळात सोयाबीनवरील आयातशुल्क घटवण्यात आले त्यानंतर सोयाबीनच्या भावात झपाट्याने घट झाली. मका पिकाचे भावही आंतरराष्ट्रीय बाजारावरच ठरतात शेतमाल ऐन बाजारात येत असताना

    शेतमालाचे भाव पाडण्याचे चक्र वर्षानुवर्षे जसे सुरु आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराचा अभ्यास करुन शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारात केव्हा आणावा याचे ज्ञान त्यांना समजणाऱ्या भाषेत सांगणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही.
    शेतमालाला रास्त भाव मिळावा या एकाच मागणी भोवती शेतकरी चळवळी वाढल्या. या चळवळीतून सत्ताही प्राप्त झाली. तथापी मागील ३५ वर्षात ना शेतमालाला भाव मिळाला आहे ना भाव ठरवण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना महत्वाचे स्थान. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेल्या व्यापारी साखळीचे हितसंबंध जपले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हाती ३० ते ३५ टक्केच मोबदला पडतो. स्वामिनाथन समितीने शेतमालाल भाव वाढवून देण्याची शिफारस केली होती प्रत्येक राजकीय पक्षाने स्वामीनाथन समितीच्या शिफारशीचा उल्लेख जाहीरनाम्यात केला. त्यात भाजपही होते आता त्याच पक्षाच्या सरकारने समितीच्या निकषाप्रमामाणे शेतमालाला भाव देणे शक्य नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयाला लिहून दिले आहे यापेक्षा दुदैव ते काय म्हणावे.

    -- प्रज्ञा देशपांडे

      August 25, 2015


  • संयत वेदनेचा मारवा

    तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे “. ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा “स्वभाव” मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो

      November 27, 2018