भारतीय स्त्री वैज्ञानिक डॉ. मंजू बन्सल

डॉ. मंजू बन्सल  या आण्विक बायोफिजिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्या बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या आण्विक बायोफिजिक्स युनिटमध्ये सैद्धांतिक बायोफिजिक्स ग्रुपमध्ये प्राध्यापक होत्या . त्या बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल इन्फॉर्मेटिक्स अँड अप्लाइड बायोटेक्नॉलॉजीच्या संस्थापक संचालक आहेत.

डॉ. मंजू बन्सल यांचा जन्म १ डिसेंबर १९५० रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद आणि डेहराडून येथून घेतले. त्यांना विज्ञानात रस होता आणि नंतर त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. केले. १९७२ मध्ये त्या डॉक्टरेट संशोधन आणि पदवीसाठी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या मॉलिक्युलर बायोफिजिक्स युनिटमध्ये सामील झाल्या.

त्यांना जी.एन. रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली तंतुमय प्रथिने कोलेजनच्या ट्रिपल हेलिकल स्ट्रक्चरच्या सैद्धांतिक मॉडेलिंगवर काम करण्याची संधी मिळाली. १९७७ मध्ये त्यांना पीएचडी पदवी मिळाली. त्यानंतर, त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पीएचडीसाठी संशोधन सुरू ठेवले आणि १९८१ पर्यंत डीएनएच्या इतर असामान्य रचनांवर काम केले. त्यानंतर त्या जर्मनीला एक वर्षासाठी युरोपियन आण्विक जीवशास्त्र प्रयोगशाळेतील हायडलबर्ग येथे अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट संशोधक म्हणून गेल्या आणि फिलामेंटस फॅगसच्या संरचनेवर काम करत राहिल्या .

डॉ. बन्सल यांना जर्मनीतील EMBL व्हिजिटिंग फेलोशिप आणि AVH फेलोशिप आणि यूएसएतील सिनियर फुलब्राइट फेलोशिप मिळाली आहे. त्या अमेरिकेतील रटगर्स विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक आणि अमेरिकेतील बेथेस्डा येथील एनआयएच येथे अभ्यागत सल्लागार म्हणून काम करत आहेत. डॉ. बन्सल यांना १९७९ मध्ये यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या १९९८ पासून इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस, बंगळुरू आणि नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस (इंडिया), अलाहाबाद येथे संशोधक आहेत.

— रवींद्र शरद वाळिंबे

Author