वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
साधारण 50 वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या झवेरी बाजार शाखेत कृष्णादवाला म्हणून प्रमुख प्रबंधक होते. बँकिंग लॉपेक्षा प्रॅक्टीसमध्ये हुशार होते. क्लार्क वर्गात त्यांचा दरारा बरोबर आदरही होता. कोण कामसू, कोण कामचोर ते बरोबर हेरायचे. बँकेतील प्रत्येक विभागाचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. बुक बॅलंसिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता.
April 22, 2023
1978 साल, बँकेच्या काऊंटरवर एक नेहमी येणारा खातेदार येऊन उभा राहिला. त्यावेळी भारत-पाकिस्तान कसोटी मालिका सुरू होती. काउंटरवरील क्लार्क ट्रांझिस्टरवर कॉमेंट्री ऐकत होता.
May 12, 2023
हरीद्वारला आमचा मुक्काम विष्णू घाटावरील एका लहानश्या आणि बऱ्याश्याही हाॅटेलात आहे. हाॅटेलातील रुमच्या खिडकीतून समोर अव्याहत वाहणाऱ्या गंगेचं सततच दर्शन होतं असतं.
May 24, 2017
मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं
सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् ।
येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां सुखरूपां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ५॥
आई जगदंबेचे मानवी शरीरातील सूक्ष्मतम अस्तित्व म्हणजे कुंडलिनी शक्ती. नाभीजवळ साडेतीन वेटोळ्यात, वर्तुळाकारात ती सुप्तावस्थेत असते.
तिचा रंग अत्यंत आकर्षक लालबुंद वर्णिलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, नागिनचे पोर कुंकुमे अर्चिले , अशा सुंदर उपमेने तो लाल रंग दाखवितात.
योगमार्गाने या आदिशक्तीला जागृत केल्यानंतर तिच्या होणाऱ्या प्रवासाचे वर्णन करताना या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं- मूलाधारा पासून वर सरकत वीथी म्हणजे मार्गाने विधिरंध्र म्हणजे मस्तकातील सहस्त्रार कमल, ब्रह्मरंध्रात पोहोचणारी.
ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर पाठीच्या दांड्याच्या खाली असणाऱ्या मूलाधार चक्रातून ऊर्ध्वगामी होत स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा अशा चक्रांचा मार्ग पार करीत , ब्रह्मरंध्रात स्थिर होते.
सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् - सूर्यनाडी चंद्रनाडी स्वरूपात वर्णन केलेल्या इडा आणि पिंगला या नाड्यांना व्यापून, अत्यंत दिव्य तेजस्वी स्वरूपात असणारी.
सूप्तावस्थेत लालबुंद असणारी ही कुंडलिनी मार्गक्रमणा करताना अत्यंत तेजस्वी सुवर्णमयी स्वरूपात चकाकते. ' सुवर्ण नागिन लचकत मुरडत आकाशी चालली ' अशा स्वरूपात संत तिचे वर्णन करतात.
येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां- ह्या अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म शरीर असणाऱ्या तिला. आई जगदंबे ला इथे सूक्ष्मातिसूक्ष्म म्हटले आहे . जी गोष्ट जितकी सूक्ष्म तितकी अधिक शक्तिशाली, असा शास्त्र सिद्धांत आहे. आई जगदंबा परमशक्ती असल्याने सूक्ष्मातिसूक्ष्म.
सुखरूपां- तिचे हे ब्रह्मरंध्रात स्थिर होणे हेच परमसुख आहे. ते जिचे मूलभूत स्वरूप आहे अशा,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 3, 2020
पूर्वी केंद्र सरकारच्या कार्यालयांत फक्त सचिवाला गाडीची सुविधा होती. बाकी वरिष्ठ अधिकार्यांना फक्त जाण्या-येण्यासाठी गाडी. तेही किमान २ अधिकार्यांना एकाच गाडीत आणले जायचे. पण आजकाल सर्वच प्रशासनिक सेवेच्या अधिकार्यांना स्वतंत्र गाडी दिली जाते. महानगरचे प्रदूषण वाढविण्यात साहेबांच्या गाडीचा हि योगदान आहेच.
May 23, 2018
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा । आरती कालीका अंबा।
मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।
अदि मध्य अवसानी व्यापक होसी । अंबे व्यापक होसी ।
अणू रेणू जीव तुझा तया न त्यागिसी ।।1।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
भास हा अभास जिचा सौरस सारा । अंबे सौरस सारा ।
सारासार निवडू जाता न दिसे थारा ।।2।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।
काळातील कळानिधी पर्वती ठाण । अंबे पर्वती ठाण ।
भत्त* शिवाजीसी दिधले पूर्ण वरदान ।।3।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।
चिच्छत्ते*, चिन्मात्रे, चित्त, चैतन्य बाळे । अंबे चैतन्य बाळे ।
विठ्ठल सुतात्माजी दावी पुर्ण सोहाळे ।। 4 ।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।
गायक - श्री.मनोहर पवार
October 15, 2015
बांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. तस्करी रोखण्यात यश आले तर, बांगलादेशी घुसखोरी पण कमी होइल. भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दल आता भारतातून बांगलादेशात होणार्या गायींच्या चोरट्या निर्यातीविरोधात उभे ठाकले आहेत.
July 9, 2015
कौल रघुनाथाचा हे 27 ओळींचे अत्यंत मौलिक असे वेणास्वामीने रामरायाला मागितलेले पसायदान आहे. कौल म्हणजे आधार, आश्वासन, संमती. या कौल रघुनाथामध्ये वेणास्वामींनी आपल्या कल्पनेने रामरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे.
April 30, 2024
‘वेळ कसा मारुन न्यावा’ नावाचे पुस्तक वाचून आल्याप्रमाणे यॉर्की कप्तान वागत होता. ते त्याने वाचलेले नसेल तर कुणीही रसिक प्रेक्षक बसल्या बसल्या या शीर्षकाचे पुस्तक लिहून पूर्ण करू शकला असता! इंग्रजांना हे खपणार नव्हतेच. कप्तान ब्रायन क्लोज खपला.
August 18, 2010
तोंडात हात जाण्यापूर्वी काय करावे, काय विचार करावा, कसा विचार करावा आणि का करावा, याचे थोडे चिंतन व्हावे.
या संदर्भातील अशीच आणखी एक छान रचना (कवि अज्ञात)
वदनी कवळ घेता
नाम घ्या मातृभूचे l
सहज स्मरण होते
आपुल्या बांधवांचे l
कृषिवल कृषिकर्मी
राबती दिनरात l
श्रमिक श्रम करोनी
वस्तु त्या निर्मितात l
करुनी स्मरण तयांचे
अन्न सेवा खुशाल l
उदरभरण आहे
चित्त होण्या विशाल ll
किती अर्थपूर्ण आणि व्यावहारीक आहे ना.
आपण अनेक वेळा अनेक श्लोक, आरत्या, स्तोत्र नुसते पोपट होऊन म्हणत असतो. त्यात नेमकं काय सांगितलंय, कोणासाठी सांगितलंय, काऽऽही लक्षातच घेत नाही.
भोजन करताना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विचारांबरोबर सामाजिक विचारही तेवढाच महत्वाचा आहे. जी स्पंदने ईश्वरापर्यंत पोचतात, तीच स्पंदने शेतकरीवर्गापर्यंत पण पोचतात.
आपण आहारातून घेत असलेल्या प्रत्येक कणामागे, ती जमिन नांगरणारा, तो कण पेरणारा, जमिनीला पाणी पुरवठा करणारा, उन्हात घाम गाळून त्याचे रक्षण करणारा, त्यांच्या वाढीमधे अडथळा निर्माण करणार्या तणाला दूर करणारा, त्याची योग्य वेळी कापणी करणारा, कचरा पाखड दूर करणारा, ते धान्य पोत्यात भरणारा, ते ओझे पाठीवरून वाहून नेणारा, चारचाकीने एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहाणारा, दुकानामधे साठवून ठेवणारा, विक्री करणारा, आपल्या घरापर्यंत आणणारा, इ.इ. असंख्य लोकांचा सहभाग असतो. या सगळ्यांचे श्रम यामागे कारणीभूत असतात, तेव्हा तो दाणा आपल्या ताटात नंतर पोटात जात असतो. याचे भान प्रत्येक कणाला स्पर्श करताना व्हायला हवे.
एवढेच नव्हे तर ते अन्न आपणाला ज्या माऊलीने शिजवून, सुपाच्य होईल, असे बनवून सुग्रास वाढले आहे, तिच्याबद्दल आदर कधी व्यक्त करतो का ? ( मीठ कमी पडले असेल, किंवा जरा तिखट कमी जास्त झाले की फक्त तिच्या नावाचा अगदी गजर सुरू होतो.)
या सर्व लोकांचे ज्ञात अज्ञात चेहेरे डोळ्यासमोर आणले की मग अन्नाची नासाडी केली जाणार नाही, ताटात वाया दवडले जाणार नाही. त्याची किंमत कळेल.
विशेषतः पुढील पिढीला अन्नाची किंमत कळायला हवी. ज्या पिढीसमोर पाश्चात्यांचाच आदर आहे, त्यांना अन्न निर्मितीची साखळी प्रत्येक घासाला आठवली पाहिजे. तिचे विस्मरण कदापि होता नये.
अन्नाची नासाडी करणे, केक, पिझ्झा एकमेकांवर फेकणे, हा फेकाफेकीचा संस्कार भारतीय नाही.
ओषधिभ्यो अन्नम्
अन्नात् पुरूषः
अन्नात् भूतानि जायन्ते
जातानि अन्नेन वर्धते
अन्नं भूतानां श्रेष्ठं
अन्नम् न निंद्यात
अन्नं ब्रह्म इति व्यजानात्
तैत्तिरीय उपनिषदामधे अन्नाचे आलेले हे वर्णन अन्नाचे सर्व महात्म्य सांगून जाते.
आहार हेच औषधस्वरूप आहे.
मनुष्यजन्मासाठी अन्नाच्या आधारेच आत्मा शरीरात प्रवेश करतो,
अन्य जीवांची उत्पत्तीदेखील अन्नामुळे होते.
समस्त जीवांचे पोषण अन्नानेच होत असते.
म्हणून सर्व सजीवात अन्न श्रेष्ठ आहे.
केवळ श्रेष्ठ नाही तर ते उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण आहे.अन्नच ब्रह्म आहे. त्याची कधीही निंदा करू नका.
अन्नाचा आदर ठेवा, अन्नाचा कणही वाया घालवू नका. म्हणूनच
गोपाळकाला झाल्यानंतर, काला खाल्ल्यावर हाताला लागलेले आपले उष्टे अन्नकण ( आणि त्यातून मिळणारे पुण्य, चोरून सुद्धा इंद्रादि देवांना मिळू नये म्हणून ) हात धुताना ते कण सुद्धा पाण्यात जाऊ नये. इतके हात चाटून पुसून स्वच्छ करा. असे सांगण्याचा प्रघात आहे.
किमान अन्नाची निंदा करू नका. पुढच्या वर्षी पर्यंत एवढी बुद्धी तरी दे, एवढे मागणे त्या बुद्धीदात्याकडे करायला हरकत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
06.09.2016
September 6, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti