वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
( अर्थात वटपौर्णिमा व्रत )
स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी
धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री //१//
ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल
हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले //२//
जरी येतां काळ चुकवावी वेळ
बदलेल फळ हेच दाखविले तीने //३//
समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा
मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं //४//
मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे अश्वपति
कन्या त्याची सावित्री प्रेम करी तिजवर //५//
कन्या होती उपवर धाडीले शोधण्या वर
राजा करी कदर कन्येच्या इच्छेची //६//
फिरुनी सर्व देशी न मिळे कुणीही तीजशी
आली एका आश्रमापाशी दृष्टीस पडला एक युवक //७//
नजर त्यावरी पडूनी स्तंभित राजकन्या होऊनी
रुप लागली न्याहाळूनी सत्यवान युवकाचे //८//
तेजोमय युवक पाहूनी भान जाय हरपूनी
राजकन्येने वरिले मनोमनी संकल्प लग्नाचा करी //९//
राजपूत्र होता सत्यवान पिता जाई राज्य गमावून
अंधत्व पित्याचे त्यास कारण वनवासी झाले सारे //१०//
सावित्री परतूनी घरीं सर्व हकीकत कथन करी
आवड तिची सत्यवानापरी मनीं त्यास वरिले //११//
चर्चा करीत समयीं नारदाचे आगमन होई
आनंदी भाव भरुनी येई पुता पुत्रीचे //१२//
वंदन करुनी देवर्षीला कन्येचा संकल्प सांगितला
आशिर्वाद मागती लग्नाला सावित्री सत्यवानाच्या //१३//
नारद वदले खिन्न होऊनी लग्न संकल्प द्यावा सोडूनी
विचार काढावा मनातूनी सत्यवानाविषयी //१४//
दुर्दैवी आहे सत्यवान त्याची आयुष्यरेषा लहान
एक वर्षांत जाईल मिटून जीवन त्याचे //१५//
हे आहे विधी लिखीत म्हणून होत निश्चीत
कोण करील बदल त्यांत प्रभूविना //१६//
ब्रह्मा लिखीत अटळ झडप घालीतो काळ
न चुके कधी ही वेळ हीच निसर्ग शक्ती //१७/
थर्रर्र कापला नृपति चकीत झाली सावित्री
ऐकून भयंकर भविष्याती सत्यवानाच्या //१८//
सावरोनी स्वतःशी विचार करी मनासी
वदू लागली नारदासी निश्चयीं स्वरानें //१९//
प्रथम दर्शनी वरिले मनोंमनीं पती मानिले
सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले कशी त्यागू मी त्याना //२०//
काया वाचा मन सत्यवाना अर्पून
पतिठायी त्याना वरुन ह्रदयीं बसविले //२१//
निवड करता पतीची मनीं बसवुनी प्रतिमा त्याची
कल्पना न यावी दुजाची हाच स्त्रीधर्म //२२//
सप्त-पावली हा उपचार होण्या सर्व जगजाहीर
धार्मिक विधी एक प्रकार राहीला असे //२३//
स्त्रीचा असता हा धर्म कां सुचविता अधर्म
सांगा यातूनीच मार्ग सावित्री विनवी नारदासी //२४//
पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति करोनी पति भक्ति
ईश्वर मिळविण्याची युक्ती सांगू लागले नारद //२५//
पतिभक्ति करुन तपसामर्थ्य येइल महान
तेच नेईल उध्वरुन पावन होता प्रभू //२६//
बघूनी सावित्रीचा निश्चय नारद आनंदी होय
आशिर्वाद देऊनी जाय नारायण नाम घेत //२७//
दृढ निश्चयाची शक्ति सावित्रीस चेतना देती
माहित असून भविष्याती उडी घेई जीवनयज्ञांत //२८//
राजकन्या सावित्री सत्यवानासंगे वनाती
लग्न करोनी राहती संसार करण्या //२९//
पतीसी समजूनी देव त्याचे ठायीं आदर भाव
मनीं बसवी त्यांचे नांव अवरित //३०//
नामात असते लय लयांत एकाग्रता होय
एकाग्र मनी ईश्वरी भाव परमेश्वर सान्नीध्याचा //३१//
पति हाच परमेश्वर न पूजे दुजा ईश्वर
सावित्री त्याचे चरणावर अर्पण करी सेवा //३२//
सेवेत असते तप शक्तीचा तो दीप
प्रज्वलीत होईल आपोआप तपः सामर्थ्य वाढता //३३//
सोडूनी काळजी काळाची पर्वा नव्हती वेळेची
अंतरीक इच्छा समर्पणाची पतीच्या अल्प अयुष्यी //३४//
वर्षा अखेरचा दिवस भयाण घेत विश्रांति सत्यवान
वटवृक्षाखाली होता झोपून सावित्री देत मांडीचा आसरा //३५//
आयुष्याची रेखा संपता जीवन दोर जाई तुटतां
प्राणज्योत नेई यमदुता त्याक्षणीं //३६//
फांस घेऊन यमदूत नेण्या सत्यवान प्राणज्योत
टाकले फांस गळ्यांत सत्यवानाच्या //३७//
सावित्रीची तपशक्ति देई तिज दिव्य दृष्ठी
सोडून फास गळ्याभोवती देई दूर फेकून //३८//
यमदूत जाई घाबरुन हतबल झाले ते बघून
सावित्रीची शक्ति जाणून रिक्त हस्तें गेले यमपूरीं //३९//
यमराज मृत्युदंडाधिपती संतापून ते येती
नेण्या प्राणज्योती सत्यवानाची //४०//
यमराज प्रभूचे दिक् पाळ मृत्युरुपी ते महाकाळ
अपूर्व त्यांचे बळ राज्यकरीं यमपूरी ///४१//
नेवून मानव प्राणज्योत कर्माप्रमाणे शिक्षा देत
पाठवूनी नविन देही परत जीवन गाडा चालवी //४२//
रेड्यावर बैसूनी यमराज आले धाऊनी
हातीं फांस घेऊनी प्राण नेण्या सत्यवानाचे //४३//
बसूनी सत्यवाना शेजारीं पतीधर्माचे ध्यान धरीं
रक्षण कवच उत्पन्न करी पती पत्नी भोवती //४४//
तपाची दिव्य शक्ति यमराजासी येण्या रोकती
फांस त्याचे न पोहोंचती सत्यवाना पर्यंत //४५//
बघूनी ते तेजोवलय यमराज चकीत होय
शोधूं लागला उपाय सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत //४६//
पतीकडून पाणी मागवून सावित्रीस दूर सारुन
प्राण ज्योती घेई काढून सत्यवानाची //४७//
यमराज निघाला स्वर्गी सावित्री त्याच्या मागे मार्गी
पतिव्रता शक्ति तिचे अंगीं चेतना देई मार्गक्रमण्यास //४८//
मनीं तिच्या पतिभक्ति बघून अपूर्व शक्ति
यमराज प्रसन्न होती सांगतले वर मागण्या //४९//
श्वशुराचे अंधत्व गेले राज्य तया परत मिळाले
वडीलांस पुत्र प्राप्त झाले सावित्री मिळवी तीन वर //५०//
न पावली समाधान पाठलाग चालूं ठेवून
यमासी ठेवीत झुलवून चर्चुनी विषय निराळे //५१//
शेवटचा मी वर देईन परी तू जावे परतून
मानव देहा स्वर्ग कठीण कसे राहशील तूं तेथें ? //५२//
जीवन आतां माझें व्यर्थ न उरे जगण्या अर्थ
एकटेपणा ठरेल अनर्थ माझ्या आयुष्यीं //५३//
इच्छा माझी व्हावे माता सानिध्य मुलाचे मिळतां
एकटेपणाचा भाव न राहता उर्वरीत जीवनामध्यें //५४//
पाठलाग घेण्या सोडूनी तथास्तू म्हटले यमानी
मान्य तिची विनंती करुनी वर देई तिला //५५//
तथास्तू म्हणतां क्षणी धरती गेली हादरुनी
भयंकर विजा चमकोनी निसर्ग उत्पात माजला //५६//
मान्य केले मातृत्व नसता जीवित पितृत्व
शक्य कसे हे अस्तित्व चुक उमगली यमराजा //५७//
निसर्गाच्या नियमाला तथास्तूने धक्का दिला
नियतीचा डाव उलटला सावित्रीच्या शक्तिनें //५८//
जसा सुटावा बाण तसा शब्द जाऊन
यमराज पेचांत पडून हारला सावित्रीपूढे //५९//
सोडून देई प्राणज्योत सत्यवान जीवदान मिळत
अखंड सौभ्याग्यवती वरदान मिळाले सावित्रीला //६०//
वटवृक्षाखालती पाऊनी सतीशक्ति
जीवदान मिळती सत्यवाना //६१//
ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला स्त्रीया पूजती वटवृक्षाला
अखंड मिळण्या सौभाग्याला सावित्रीप्रमाणे //६२//
पतिपत्नीतील प्रेमभाव समजोनी मनाचा ठाव
एकमेका आदरभाव हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली //६३//
// शुभंभवतु //
डॉ. भगवान नागापूरकर
१३- २५११८३
January 13, 2018
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर मराठी माणसांची मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. श्री दत्तगुरुंचे अवतार मानले गेलेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलोट येथे अनेक वर्षे वास्तव्याला होते. या काळात अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली.
श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात झाली होती. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी गुरूप्रतिपदेच्या उत्सवासाठी आपल्या हातातील सुर्यमणी व पादुका त्यांना दिल्या. स्वामींच्या फोटोमध्ये हा सूर्यमणी पहायला मिळतो.
प्रत्यक्ष श्री स्वामींनी दिलेल्या या पादुका व सूर्यमणी अक्कलकोट राजघराण्याने मोठ्या श्रद्धेने आपल्या देवघरात जपून ठेवल्या आहेत.
हा सूर्यमणी आणि पादूका आतापर्यंत राजघराण्याच्या देवालयात नियमितपणे पूजला जातात. मात्र त्यांचे दर्शन सर्वसामान्य नागरिकांना आतापर्यंत उपलब्ध नव्हते.
अक्कलकोटचे विद्यमान राजे श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) संयुक्ताराजे भोसले यांनी हा सूर्यमणी आणि पादुका यांचे सर्व स्वामीभक्तांना दर्शन घेता

यावे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच रविवार, 21 जुलै 2024 रोजी, जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात ठेवण्याचे आयोजन केले आहे. यासाठी राजघराण्याच्या वतीने त्यांनी तमाम स्वामीभक्तांना आमंत्रण दिले आहे.
आता तो सूर्यमणी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे.. त्यासाठी आग्रहाचे निमंत्रण
गुरुपौर्णिमा, रविवार, दि. २१ जुलै २०२४
श्री गणेश पंचायतन मंदिर, जुना राजवाडा, अक्कलकोट
सकाळी ९ ते रात्री ९ वाजता
अक्कलकोटच्या राजघराण्याने अनुभूती या नावाने एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत श्री स्वामी समर्थांची 108 फूटी भव्य मूर्ती, ध्यान केंद्र, मुल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल इत्यादिंचा समावेश आहे. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा...
July 18, 2024
जगद्गुरू आदि शंकराचार्यांची सर्वच स्तोत्रे रसाळ व अर्थगर्भ आहेत. प्रस्तुत कृष्णाष्टक प्रामुख्याने बालकृष्णाच्या स्तुतिपर आहे. अत्यंत्त सोप्या तरीही तरल व प्रवाही अनुप्रासयुक्त अशा या स्तोत्राची गेयता वेगेवेगळ्या शब्दसमूहांच्या योजनेतून द्विगुणित होते. कठोर उच्चाराची अक्षरे त्यात क्वचितच असल्याने त्याची कोमलता अधिकच प्रत्ययास येते. डोळे मिटून चालीवर ते गायल्यास बालकृष्णाची प्रतिमा समोर उभी राहिल्याशिवाय रहाणार नाही.
November 14, 2019
कोकणात घरांच्या रचनेमागे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथले वातावरण, जेव्हढे ऊन तेवढाच पाऊस. ओल्या दमट आणि गरम हवामानामुळे घरांमध्ये नैसर्गिक गोष्टींचा पारंपारिक पद्धतीने वापर केला जातो. पावसामुळे घरांमध्ये महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल म्हणजे उतरत्या कौलांची घरे. या मातीच्या कौलांमुळे धुवांधार पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होते आणि कडक उन्हाळ्यात देखील घरातील हवा थंड राहते.
December 23, 2022
नॅफ्था हे पेट्रोलियम द्रावण साधारणपणे ३० ते १७० अंश सेल्सिअसला ऊर्ध्वपातित होते. खते व पेट्रोरसायने तयार करण्यासाठी इंधन आणि कच्चामाल म्हणून नॅफ्थाचा प्रामुख्याने वापर होतो. नॅफ्थामध्ये पॅराफिनिक, नॅपशॅनिक आणि एरोमॅटिक रसायनांचा समावेश होतो. दोन प्रकारच्या नॅफ्थाची निर्मिती होत असते. एरोमॅटिक अंश जादा असलेल्या नॅफ्थाला ‘हाय एरोमॅटिक (एच.ए.एन.) आणि कमी एरोमॅटिक अंश नॅपथा’ असलेल्या या द्रावणाला ‘लो एरोमॅटिक नॅफ्था’ असे (एल.ए.एन.) संबोधिले जाते.
February 23, 2023
हिला नओळखणारी व्यक्ती भारतात तरी सापडणे नाही.आपण हाॅटेल मध्ये गेलो जेवून आटपले की बिल देताना (कदाचित त्याची चुटचुट लागू नये म्हणून असेल)प्रत्येक हाॅटेल मध्ये मुखशुध्दी करिता सुंदर प्लेट मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात (भाजून,साखरेचे रंगीत कवच असणारा,सुवासिक इ)हिला समोर ठेवले जाते.
तर अशी हि सुंदर सुवासीक बडीशेप गरम मसाला बनवताना त्यात देखील वापरली जातेच.शिवाय मुखशुध्दीकरीता देखील उपयुक्त आहेच.तसेच ब-याच घरांमधून काढा बनवताना त्यात देखील हिचा उपयोग केला जातो.त्यामूळे हिचे देखील घरचा वैद्य म्हणून उपयोग ब-याच जणांना माहीत असणार हे नक्की.
बडीशेपेचे लहान क्षूप असते आणी त्याला उगवणारी फळे म्हणजे बडीशेप होय.ह्याची चव गोड,कडू,तिखट अशी मिश्र स्वरूपाची असते.आणी हि गुणाने थंड असते.म्हणूनच ती शरीरातील वात आणी पित्त दोष कमी करते.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:
१)सुज आली असता बडीशेपेचा पोटीस सूज आलेल्या ठिकाणी बांधावा सूज उतरते.
२)वारंवार खोकला येत असल्यास बडीशेप चुर्ण खडीसाखरे सोबत मिसळून खावे आराम पडतो.
३)संडासला आव पडत असल्यास सुंठ व बडीशेप समप्रमाणात घ्यावी व तूपात भाजावी आणी बारीक पूड करून दिवसातून तीन वेळा गरम पाण्यासोबत घ्यावी त्वरित आराम मिळतो.
४)उल्टया होत असल्यास बडीशेप चूर्ण मोरावळयाच्या पाकासोबत चाटावे.
५)लघ्वीला जळजळ होत असेल तर बडीशेपेचा काढा करून घ्यावा.
६)पोटात वारंवार जंत होण्याची सवय असेल व त्यामुळे त्रास होत असेल तर बडीशेप चुर्ण मधात मिसळून सकाळी व रात्री रिकाम्या पोटी घ्यावे .
बडीशेप जास्त खाल्ल्यास संडासला साफ होणार नाही तसेच बडीशेप अतीप्रमाणात खाणा-या व्यकतींच्या शरीरातील धातूंना क्षीणता येते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 15, 2016
यू ट्यूब वर राज्य सभा चॅनेलवरील “विरासत “हा एस डी वर (बर्मनदा ) बनविलेला कार्यक्रम बघत होतो. एकदम एस डी -आर डी ही पिता -पुत्रांची जोडी आठवली. कार्यक्षेत्र एक पण स्पर्धा नाही, कारण दोघांची संगीतावर स्वतंत्र नाममुद्रा ! प्रत्येकाचे गाणे ओळखू येते. नातं रक्ताचं असलं तरी रचना परक्या !
April 12, 2022
कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा या संबंधी लेखन करणाऱ्या सुप्रसिध्द श्रीमती शारदा द्विवेदी व सुप्रसिध्द वास्तुशास्त्रज्ञ राहुल मेहरोत्रा यांनी लिहिलेल्या fort walks या पुस्तकाचा ‘फोर्टमध्ये फिरताना’ या नावाने भालचंद्र हर्डीकर यांनी अनुवाद केला आहे. रहस्यकथेपेक्षाही उत्कंठावर्धक असे हे पुस्तक नुसतेच वाचनीय नव्हे तर संग्रहात असावे असे आहे.
June 24, 2017
1948 ते 1972 या सालांच्या मध्ये काश्मीर मध्ये शांती होती. 1972 पासून ऑपरेशन टॉपेझ च्या प्लॅन प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोरी सुरू झाली. अनेक तरूणांना भडकवून पाकिस्तानी आतंकवादी ट्रेनींग कॅम्पस् मध्ये पाठवण्यात आले. या काळामध्ये आपले सरकार पूर्णपणे झोपले होते.
March 28, 2013
पांढरा ब्रेड वाईट आणि ब्राऊन ब्रेड चांगला ही आपली नेहमीची अंधश्रद्धा.
April 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti