(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बहुगुणी आपटा

    आपट्याचे झाड सर्वांना ऐकून, वाचून माहिती असते, पण फार थोड्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले असते.

    दसऱ्याला सोनं म्हणून आपट्यांची पानं वाटायची असतात, याचे ज्ञान सगळ्यांना असते; पण क्वचितच कोणी खऱ्या आपट्याची पाने वाटत असतील! याचे कारण कांचनाच्या विविध जातींशी असलेले त्यांचे साम्य. बिचाऱ्या कांचनाच्या झाडांचे बेसुमार खच्चीकरण, पर्यावरणाची हानी, कचरा समस्या आणि चुकीच्या आणि कालबाह्य समजुतीवर आधारलेली ही घातक प्रथा कमी होत चालली आहे, ती पूर्णपणे बंद होण्याची आवश्‍यकता आहे. संस्कृतमध्ये "वनराज' म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेलाय. दसऱ्याला त्याची रोपे वाटावीत, लागवड करावी, फार तर पूजाही करावी.

    आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात! त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

    अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
    मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।

    पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.

    उपयुक्त आणि टिकाऊ
    आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे इ. तयार करण्यासाठी होतो. उष्मांक मूल्य (कॅलॅरिक व्हॅल्यू) भरपूर असल्यामुळे सरपण, इंधन म्हणून ते फारच चांगले असते. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम व स्फुरद इत्यादींची संयुगे असतात. (कृषी ज्ञानकोश खंड 2 रा) त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते. जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दारे बनवतात. पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे बिड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर ही झाडे लावावीत, असे जुन्या ग्रंथात सांगितले आहे. झाडे खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळे खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्‍चित राहतात. छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो. आपट्याच्या मुळांवर नत्रस्थिरीकरण करण्याच्या करम्याच्या गाठी असतात.

    संस्कृतमध्ये आपट्याला कितीतरी नावं आहेत - वनराज, चन्द्रक, आम्लपत्रक, युग्मपत्र, मालुकापर्ण, कुद्दाली इत्यादी. इतर काही भाषांतली नाव अशी ः हिंदी - अष्टा, कचनाल, घिला, झिंझोरी; गुजराती - असुंद्रो ः बंगाली - बनराज, बनराजी; कन्नड - औप्टा, बन्ने, आरेपत्री; तमीळ - अराईवत्ता, आरेका; तेलगू - आरी, आरे. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे बाउहिनिया रेसिमोसा. बाऊहिनिया हे प्रजातीनाम बाउहिन नावाच्या दोन वनस्पतीशास्त्रज्ञ बंधूच्या स्मरणार्थ दिलं असून कांचनाच्या सर्व जातींचा समावेश त्यात केला जातो. रेसिमोसा म्हणजे विशिष्ट प्रकारचा फुलांचा तुरा येणारे झाड. त्यात फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारी असतात. बहावा, चिंच, गुलमोहर यांच्या कुळातला हा वृक्ष आहे (फॅमिली सिसालपिनेसी).

    उन्हाळ्यात फुलणारा आपट्याचा वृक्ष 2 ते 5 मीटर उंच वाढतो, कित्येक वेळा झुडूपवजा आणि वेडावाकडा वाढलेला दिसतो. तो पानझडी असली तरी जास्त पावसाच्या प्रदेशात पानगळ अल्पकाळासाठी होते. बुंधा 5 ते 25 सें.मी.व्यासाच असून साल काळसर तपकिरी रंगाची, खडबडीत, भेगाळलेली दिसते. कात्रज घाटातल्या एका वृक्षाच्या खोडावर मोठे अणकुचीदार काटे पाहायला मिळाले. फांद्यांचे शेंडे बहुधा खाली वाकलेले (ड्रूपिंग) असतात. खोडा- फांद्यांची आंतरसाल गडद गुलाबी दिसते. पाने एकांतरित, साधी, दुभागलेली, लांबीपेक्षा रुंदीला जास्त (2 - 5 ु 3 - 6 सें.मी.), चामट (कोरियारियस) वरच्या बाजूला गुळगुळीत हिरवीगार तर खालच्या बाजूने फिक्कट आणि लवयुक्त असतात. तळापासून निघालेल्या 7 ते 9 शिरा स्पष्ट, उठावदार दिसतात.

    फुलण्याचा हंगाम उन्हाळ्यात (मार्च - जून) असून फुलोरे (मांजिऱ्या, रेसीम्स) डहाळ्यांच्या अग्रभागी आणि पानांच्या देठाजवळही येतात. फुले लहान (1 ते 1.5 सें. मी.) हिरवट - पिवळसर - पांढरी, पाच निमुळत्या पाकळ्यांची असतात. कळ्या लांबट, टोकदार दिसतात. पुकेसर 10 असून ते सुटे, सूक्ष्म आणि केसाळ असतात. पावसाळ्यात वीतभर लांबीच्या चपट्या, वाकड्या, हिरव्या शेंगा झाडावर दिसू लागतात, त्या कित्येक महिने झाडावर राहून पुढच्या उन्हाळ्यात पिकून काळ्या होतात. प्रत्येक शेंगेत 12 ते 20 काळ्या, चपट्या लंबगोल बिया असतात. बिया सहजपणे रुजून रोपे तयार होतात.

    आपट्याची झाडे भारतात सर्वत्र, अगदी आसेतूहिमाचल पाहायला मिळतात. जंगलात वाढतात आणि लावलीही जातात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात (पर्जन्यमान 1000 ते 2000 मि. मी.) विपुल प्रमाणात झाडं आहेत. बाजी पासलकर जलाशयाच्या काठावरील "इको- व्हिलेज'मध्ये कितीतरी छान वाढलेली झाडे पाहायला मिळतात, तर मध्य प्रदेशातील राजस्थान सीमेवरील राजगढ जिल्ह्यातील निमवाळवंटी प्रदेशातही (पर्जन्यमान 250 ते 500 मिमी) ती मोठ्या संख्येने आढळतात. रोपवाटिकामधून रोपे मिळू शकतात. कोणत्याही हवामानात, कसल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी ही झाडे मुद्दाम लावली जातात. त्याच्या मुळांना फुटवे (रूट सकर्स) येतात, त्यांच्या रूपाने शाकीय पुनरुत्पादन घडून येते. अत्यंत उपयोगी, बहुगुणी अशा या वृक्षकाची लागवड वनशेती आणि ऊर्जालागवडीसाठी (एकसुरी लागवड टाळून) सर्वत्र आवर्जून करावी. उद्यानात, छोट्या परसबागेत, रस्ता दुभाजकांमध्ये, शेताच्या कुंपणावर आणि बांधावर, कॅनालच्या बाजूने लावण्यासाठी अश्‍मंतक हा एक उत्तम "वनराज' आहे.

    -- प्रा. श्री. द. महाजन

      March 3, 2017


  • खरच प्रगती होईल?

    आज चीन म्हणजे अमेरिकेलाही धाकात ठेवणारी ‘सुपर इकॉनॉमिक पॉवर’ ठरली आहे, त्या तुलनेत भारत कुठेच नाही. भारतातील भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्था हे त्यामागील एक मोठे कारण आहे. अनेक लोकोपयोगी प्रकल्प या भ्रष्ट व्यवस्थेने अक्षरश: पोखरून काढले आहेत.

      July 6, 2008


  • मनाचे श्लोक – १०१ ते ११०

    जया नावडे नाम त्या येम जाची | विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची |
    म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे | मुखे बोलता दोष जाती स्वभावे ||101||

    अती लीनता सर्वभावे स्वभावे | जना सज्जनालागि संतोषवावे |
    देहे कारणी सर्व लावीत जावे | सगूणी अती आदरेसी भजावे ||102||

    हरीकीर्तने प्रीति रामी धरावी | देहेबुध्दि नीरूपणी वीसरावी |
    परदव्य आणीक कांता परावी | यदर्थी मना सांडि जीवी करावी ||103||

    क्रियेवीण नानापरी बोलिजेते | परी चित दुश्र्चित ते लाजवीते |
    मना कल्पना धीट सैराट धांवे | तया मानवा देव कैसेनि पावे ||104||

    विवेके क्रिया आपुली पालटावी | अती आदरे शुध्द क्रिया धरावी |
    जनीं बोलण्यासारिखे चाल बापा | मना कल्पना सोडि संसारतापा ||105||

    बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा | विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा |
    दया सर्व भूती जया मानवाला | सदा प्रेमळू भक्तीभावे निवाला ||106||

    मना कोप आरोपणा ते नसावी | मना बुध्दि हे साधुसंगी वसावी |
    मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी | मना होइ रे मोक्षभागी विभागी ||107||

    सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे | क्रिया पालटे भक्तीभावर्थ लागे |
    क्रियेवीण वाचाळता ते निवारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||108||

    जनी वादवेवाद सोडूनि द्यावा | जनी सूखसंवाद सूखे करावा |
    जगी तोचि तो शोकसंतापहारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||109||

    तुटे वाद संवाद त्याते म्हणावे | विवेके अहंभाव याते जिणावे |
    अहंतागुणे वाद नानाविकारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||110||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 10, 2016


  • कानकून परिषद अनिर्णित

    कानकूनची आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषद कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेताच संपली. मात्र, क्योटो कराराची मुदत 2012 पर्यंत आहे. त्या मुदतीत तरी विकसित आणि अविकसनशिल देशांनी आपल्यातील मतभेद कमी करून व्यापक भूमिकेतून क्योटो कराराच्या जागी नवा मसुदा आणला पाहिजे. त्यातही अमेरिका सर्वात जास्त प्रदूषण करत असल्याने तिच्यावर अधिक जबाबदारी आहे.

      December 17, 2010


  • श्रीगजानन ज्ञान-विज्ञान

    आपल्या देवांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांच्या शरीरातला शिराचा (डोक्याचा) भागच वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळा असतो. उदा. हत्तीचं तोंड असेल तर गणपती, वानराचं तोंड असेल तर मारुती, सिंहाचं तोंड असेल तर नृसिंह, घोड्याचं तोंड असेल तर तुंबरू इ. तर देवांच्या या स्वरूपांमध्ये एक सांकेतिक संदेश आहे आणि तो आपल्या मंत्राशी निगडित आहे.

      September 16, 2023


  • नागपंचमी

    श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा करतात.हे एक व्रतसुद्धा आहे. व्रतामध्ये श्रावण शुद्ध चतुर्थीला एकभुक्त राहून पंचमीचे दिवशी पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढून त्यांच्यासोबत नागपत्यांचे सुद्धा चित्र काढतात. त्यानंतर संकल्प करून नागाची पूजा करतात. नागाला दूध -लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

    नागपंचमीला अखिल भारतीय महत्त्व आहें. भारतात सर्वच भागात नागपंचमीचा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी प्रत्येक पंचमीला अनंत, वासुकी वगैरे बारा नागांची पूजा करून वर्षभर व्रत करण्याचा प्रघात आहे.

    पौराणिक कथेप्रमाणे नागाची उत्पत्ति कश्यप व कडू यांचेपासून झाली आहे. या दंपतीला जी सर्पसंतती झाली त्यातील प्रमुख आठ सर्प आहेत. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक ,पद्म, महापद्म, शंख व कुलिक यांनाच उरष्टनाग असे म्हणतात.

    भारतीय संस्कृतीत वृक्ष, वेली, झाडे, प्राणी वगैरे सर्वांनाच देवत्व दिले आहे. याचे कारण या सर्व गोष्टी मानवाला उपकारक आहेत. काही वेळा माणूस भीतीने सुद्धा आपल्यापेक्षा वरचढ असणाऱ्या गोष्टींची पूजा करतो. सर्प हे शेती व्यवसायाला देखील उपकारक ठरतात. (उंदीर वगैरे खाऊन) या दोन्ही कारणांनी नागपूजन आले असावे.

    -- विद्याधर करंदीकर

      August 7, 2016


  • टाळ्या वाजवण्याचे आरोग्यदायी फायदे

    लहानपणी मुलांना प्रथम आपण टाळ्या वाजवायला शिकवतो. टाळ्या वाजवताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच असतो. लहानपणी शिकलेली टाळ्या वाजवण्याची सवय आपल्याला आजन्म उपयोगी पडते. कारण कुठल्याही चांगल्या प्रसंगी आपण आनंदाने टाळ्या वाजवतो.

      February 19, 2019


  • फॅक्स मशीन

    आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा पितामहच ठरला. नंतरच्या काळात याच तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण पाहिले.

      August 20, 2023


  • फेब्रुवारी १२ : “विशी”चे अवतरण

    स्क्वेअर-कट आणि खिलाडुवृत्तीसाठी विश्वविख्यात झालेला गुन्डप्पा विश्वनाथ

      February 12, 2011


  • १८ एप्रिल १९७५ – मराठी चित्रपट सामना प्रदर्शित

    १८ एप्रिल १९७५ रोजी "सामना" मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील "सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान र्‍हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा 'सामना' हा चित्रपट. या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. "सामना" चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडलंय काय' या गाण्यात 'पप्पा……… ' स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा 'सामना' खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा 'माईलस्टोन' सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनला गेला. बेचाळीस वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.

    सामना १९७५ सामाजिक
    ३५ मिमी/रंगीत/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी७६७०५/२-१-१९७५./यू

    निर्मिती संस्था :गिरीराज पिक्चर्स
    निर्माता :रामदास फुटाणे, माधव गानबोटे
    दिग्दर्शक :जब्बार पटेल
    कथा :विजय तेंडुलकर
    पटकथा :विजय तेंडुलकर
    संवाद :विजय तेंडुलकर
    संगीत :भास्कर चंदावरकर
    छायालेखन :सूर्यकांत लवंदे
    संकलक :शा. वैद्य
    गीतलेखन :आरती प्रभु, जगदीश खेबुडकर,जब्बार पटेल
    कला :दिनानाथ चव्हाण
    रंगभूषा :निवृत्त दळवी
    वेषभूषा :पांडुरंग खटावकर
    नृत्य दिगदर्शक :सोहनलाल
    स्थिरचित्रण :डी. व्ही. राव
    गीत मुद्रण :बी.एन्.शर्मा, रॉबिन चटर्जी
    ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, बाबा लिंगनूरकर
    निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर, शालिनी स्टुडिओज्, कोल्हापूर
    रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज

    कलाकार :अस्वले गुरुजी, आबू, आशा पाटील, उदय लागू, उषा नाईक, औंधकर, नंदू पोळ, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, मीटकर, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रमेश टिळेकर, लालन सारंग, विलास रकटे, शहाजी बारे, शिवाजी भोसले, श्रीराम लागू, संजीवनी बिडकर, सुरेखा शहा, स्मिता पाटील, हेमसुवर्णा

    पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र, श्रीराम लागू

    गीते :१) कुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, २) हा महाल कसला रानझाडी ही दाट, ३) कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय या टोपीखाली दडलय काय?, ४) सख्या चला बागांमधी रंग खेळू चला, ५) रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला
    कथासूत्र. खेड्यातून आता श्रीमंत झालेला बागाईतदारांचा एक वर्ग राजकारणात शिरून पुढारी बनतो व अनेक कृष्णकृत्ये करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यांना वेळीच काबूत ठेवले पाहिजे हे कथासूत्र.हिंदुराव धोंडे पाटील हे पुढारी आणि जुने ज्वलंत गांधीवादी मास्तर.दोघांची मैत्री जमली.म्हणजे पाटलांनी चातुर्याने जमवली.पण एका खुनाच्या प्रकरणाने मास्तर अस्वस्थ झाले आणि पाटील व मास्तर असा सामना सुरु झाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    खालील लिंक क्लिक करून "सामना‘ चित्रपट बघू शकता.

    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo

    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM

      April 19, 2017