वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
September 7, 2018
काळा घोडा’ चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो..हुतात्मा चौकात चर्चगेटच्या स्टेशनच्या दिशेने समोरच ‘सीटीओ’ची म्हणजे आपल्या ‘तार ऑफीस’ची इमारत आहे
April 25, 2016
उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते.
April 9, 2019
लहानपणी अध्यात्म वगैरे इतकं काही माहित नव्हतं. पण एक मात्र खरं आहे की, संध्याकाळी देवापुढे दिवे लागणं झाली की, शुभंकरोतीचे स्वर घरात निनादु लागायचे. आजीच्या मागोमाग एकएक श्र्लोक म्हणत म्हणत केव्हा दासबोधातील चरणं संपली हे कळायचंही नाही.
January 14, 2011
मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, निकाल झाला असला तरी हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल.
'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे.
कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील.
विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!
- ऍड. हरिदास उंबरकर,
बुलडाणा
मो. 9763469184
December 4, 2017


पक्ष्यांच्या जातींनुसार त्यांच्या अंड्यांच्या आकारात विविधता असते. काही अंडी गोलाकार असतात, तर काही अंडी लांबट असतात… काही अंडी दोन्ही बाजूंना सारख्याच प्रमाणात निमुळती असतात, तर काही अंडी एका बाजूला जास्त निमुळती असतात. अंड्यांचा आकार पक्ष्याच्या जातीनुसार वेगवेगळा असला तरी, तो काही गोष्टींच्या दृष्टीनं योग्य असायला हवा. उदाहरणार्थ, अंड हे उबवण्याच्या दृष्टीनं सोयीस्कर आकाराचं म्हणजे त्या पक्ष्याच्या दृष्टीनं फार मोठं असता कामा नये, तसंच त्या अंड्याच्या आत वाढणाऱ्या पिल्लाला सहजपणे सामावून घेता येईल, इतकं मात्र ते मोठं असायला हवं. त्याचा आकार हा, आतून निर्माण होणारा आणि बाहेरून पडणारा, असे दोन्ही ताण सहन करू शकणारा हवा. अशा विविध गरजा अंड्याच्या आकारावर अनेक बंधनं आणतात. या सर्व बंधनांमुळे, अंड्यांचे आकार हे फक्त काही मोजक्या प्रकारांत मोडतात.
अंड्यांचे आकार हे भूमितीतील आकृत्यांना जवळचे असल्यानं, गणितज्ञांना हे आकार गणितातील एखाद्या सर्वसमावेशक सूत्राच्या स्वरूपात मांडता येण्याची शक्यता पूर्वीपासून वाटत होती. अशा प्रकारचे प्रयत्नही केले गेले होते. परंतु आतापर्यंत, असं समाधानकारक सूत्र काही सापडत नव्हतं. आता मात्र अंड्यांच्या सर्व आकारांना सामावणारं गणिती सूत्र तयार केलं गेलं आहे. हे सूत्र म्हणजे इंग्लंडमधील केंट विद्यापीठातील डॅरेन ग्रिफिन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या संशोधनाचा परिपाक आहे. डॅरेन ग्रिफिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन अलीकडेच ‘अॅनल्स ऑफ दी न्यूयॉर्क अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
गोलाकार आणि लंबगोलाकार अंडी ही भूमितीच्या आकृतीत बसवता येतात. त्यामुळे हे आकार गणिती सूत्रात बसवणं शक्य आहे. सुमारे सत्तर वर्षांपूर्वीच, अंड्यांच्या या आकारांचं गणित फ्रिट्झ ह्यूगेलशाफर या जर्मन गणितज्ञानं मांडून या आकारांना एकाच गणिती सूत्रात बसवलं होतं. मात्र नासपती या फळासारख्या, एका बाजूला निमुळत्या होणाऱ्या अंड्याना हे सूत्र लागू होत नव्हतं. कारण अशी आकृती गणिती सूत्रात सहजपणे बसवता येत नाही. डॅरेन ग्रिफिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रश्न सोडवायचा ठरवून फ्रिट्झ ह्यूगेलशाफरच्याच सूत्रापासून आपल्या या संशोधनाला सुरुवात केली. ह्यूगेलशाफरचं सूत्र कोंबडीच्या अंड्याना लागू पडत असल्याचं माहीत असलं तरी, सर्वांत प्रथम या संशोधकांनी हे सूत्र कोबंडीच्या अंड्यांसाठी किती प्रमाणात लागू पडतं, त्यात काही त्रुटी आहे का, ते अत्यंत काटेकोरपणे तपासलं. त्यानंतरच त्यांनी आपला मोहरा इतर पक्ष्यांच्या अंड्यांकडे वळवला.
या संशोधकांनी अभ्यासलेल्या पक्ष्यांच्या अड्यांत, युरल घुबड, एमू (इम्यू), साँग थ्रश, ऑस्प्रे, थीक बील्ड मर, या पक्ष्यांच्या अंड्यांचा समावेश होता. यातील युरल घुबड या रशियातील युरल पर्वतराजीत आढळणाऱ्या घुबडाच्या अंड्यांचा आकार जवळपास गोलाकार आहे, तर एमू या शहामृगासारख्या पक्ष्याची अंडी ही लंबगोलाकार आहेत. तसंच साँग थ्रश या अंगावर ठिपके असणाऱ्या पक्ष्याची आणि ऑस्प्रे या ससाण्याची अंडीसुद्धा लंबगोलाकाराला जवळची आहेत. थीक बील्ड मर या उत्तर ध्रुवाजवळील सागरी पक्ष्याच्या अंड्यांचा आकार मात्र नासपतीसारखा आहे. या सर्व अंड्यांपैकी थिक बिल्ड मर या पक्ष्याची अंडी वगळता, इतर अंड्यांचे आकार ह्यूगेलशाफरच्या सूत्रात बसवता येत होते. परंतु, थिक बिल्ड मर या पक्ष्याच्या अंड्यांच्या प्रत्यक्ष आकारात आणि ह्यूगेलशाफरच्या सूत्रानुसार मिळालेल्या आकारात लक्षणीय स्वरूपाची त्रुटी आढळत होती.
नासपतीसारखा आकार असणाऱ्या या अंड्यांच्या आकारातील ही त्रुटी काढून टाकण्यासाठी, त्यानंतर ह्यूगेलशाफरच्या सूत्रांत या संशोधकांनी एका अतिरिक्त संज्ञेचा समावेश केला. टप्प्याटप्प्यानं या संज्ञेत बरेच गणिती बदल करून, तसंच त्याला संख्याशास्त्राची जोड देऊन या संशोधकांनी अखेर, नासपतीसारखा आकार असलेल्या अंड्यांनाही लागू होईल, अशा सर्वसमावेशक सूत्राची निर्मिती केली. डॅरेन ग्रिफिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आपलं गणिती सूत्र त्यानंतर, ग्रेट स्नाइप या दलदलीच्या प्रदेशात राहणाऱ्या पक्ष्याच्या अंड्यांसाठी, तसंच अंटार्क्टिकातील किंग पेंग्विनच्या अंड्यांसाठीही वापरून पाहिलं. नासपतीसारखा आकार असणाऱ्या या अंड्यांनाही हे सूत्र व्यवस्थितपणे लागू होत होतं!
डॅरेन ग्रिफिन आणि त्यांच्या सूत्रानुसार कोणत्याही अंड्याचा आकार हा चार घटकांवर अवलंबून असतो. या चार घटकांपैकी दोन घटक हे अंड्याचा आकार ‘केवढा’ आहे हे दर्शवतात तर, उर्वरित दोन घटक हे त्याचा आकार ‘कसा’ आहे ते दर्शवतात. अंड्याचा आकार केवढा आहे, हे दर्शवणारे दोन घटक म्हणजे अंड्याची एकूण लांबी व एकूण रुंदी. अंड्याचा आकार कसा आहे, हे दर्शवणाऱ्या दोन घटकांपैकी एक घटक आहे तो, अंड्याच्या सममितीशी संबंधित आहे. जमिनीवर ठेवलेल्या अंड्याचा उभा अक्ष हा किती कललेला आहे, हे या घटकाद्वारे दर्शवलं जातं. अंड्याचा आकार कसा आहे, हे दर्शवणारा दुसरा घटक म्हणजे अंड्याच्या टोकदार बाजूपासून एक-चतुर्थांश लांबीवरची त्याची जाडी. कोणत्याही पक्ष्याच्या अंड्याचा आकार योग्यरीत्या दर्शवण्यास, हे चार घटक पुरेसे आहेत. हे सूत्र सर्वच अंड्यांना लागू होत असल्यानं, पक्षी आणि त्यांच्या अंड्यांचा एकमेकांशी थेट संबंध आता जोडता येणं शक्य होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे नामशेष झालेल्या पक्ष्यांच्या अंड्यांचे जे अवशेष सापडतात, त्यांनाही ही सूत्रं लागू करता येतील व त्या पक्ष्यांबद्दलही अंदाज बांधणं शक्य होईल.
पक्षी ज्या परिसंस्थेत वावरतात, जिथे आपली अंडी घालतात, तिथल्या परिस्थितीचाही, अंड्याचा आकार ठरवण्यात सहभाग असतो. उदाहरणार्थ, डोंगर-कपारीवरील अडचणीच्या जागेत अंडी घातली जात असल्यास, ती घरंगळून जाता कामा नयेत. त्यासाठी त्यांचा आकार विशिष्ट स्वरूपाचाच असायला हवा. तसंच कमीतकमी जागेत ती न फुटता मावायला हवी. अंड्यांच्या आकारावर होणाऱ्या परिस्थितीच्या परिणामामुळे, अंड्यांचा आकार हा पक्ष्यांच्या उत्क्रांतीचाच एक भाग ठरतो. यामुळे डॅरेन ग्रिफिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन उत्क्रांतीच्या अभ्यासकांच्या दृष्टीनंही उपयुक्त ठरणार आहे.
अंड्याच्या आकाराचं हे गणित फक्त जीवशास्त्र किंवा उत्क्रांतिशास्त्रापुरतं मर्यादित नाही. अंड्यांसाठी केल्या जाणाऱ्या पक्षिपालनाच्या व्यवसायाठीही ते उपयुक्त आहे. कारण अंड्यांच्या आकारावरूनच पक्षिपालनगृहातील सोयीसुविधांचा विचार करावा लागतो. पक्षिपालनाशिवाय, अंड्यांचा आकार बांंधकामक्षेत्रातही महत्त्वाचा ठरतो. आज बांधल्या जाणाऱ्या आधुनिक स्वरूपाच्या इमारतींना, त्या आकर्षक दिसण्यासाठी काही वेळा अंड्यासारखा आकार दिला जातो. उदाहरणार्थ, लंडनचा सिटी हॉल किंवा किंवा लंडनचीच घेर्किन ही व्यावसायिक इमारत. भविष्यात अशा इमारती बांधताना, त्यांना अपेक्षित मजबूती लाभण्याच्या दृष्टीनंही या सूत्राचा उपयोग करता येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे डॅरेन ग्रिफिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधलेल्या या गणिती सूत्राचा मूळ संबंध जरी जीवशास्त्राशी असला तरी, त्याची व्याप्ती मोठी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-- डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: Klaus Rassinger and Gerhard Cammerer/Wikimedia
June 26, 2022
बाळाजी विश्वनाथाचा उल्लेख आधी झालेलाच आहे. १६८९ च्या सुमारास तो घाटावर आला. राजारामाच्या कारकीर्दीत तो पुण्याचा सरसुभेदारीवर होता. १७०७ च्या खेडच्या लढाईच्या वेळी तो धनाजी जाधवाच्या पदरी अंमलदार होता. त्यावेळच्या कारस्थानातील बाळाजीच्या सहभागामुळे शाहूची मर्जी त्याच्यावर बसली.
January 18, 2022
५०० व १००० च्या नोटा नुकत्याच रद्द झाल्या आणि मराठी भाषेला, विमुद्रीकरण--चलनबंदी-- नोटबंदी -- मुद्राबंदी इ. अनेक शब्द आणि " वैचारिक वाद" लाभले. अनेक वृत्तपत्रे आजसुद्धा फक्त याच विषयावरच्या " हेडलाईन्स" छापतायत. पण काही वर्षांपूर्वी भारतीय चलनातील
५० रुपयाची एक नोट चलनातून अत्यंत गुपचूपपणे काढून घेतली गेली. त्याचीच ही "नोटकथा" !
१९७५ मध्ये श्री.एम.नरसिंहम यांच्या सहीने चलनात आलेल्या ५० रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूच्या चित्रात लोकसभेवरील भारतीय राष्ट्रध्वज गायब होता. नुसताच ध्वजदंड ( काठी) छापलेला होती. ही चूक फार गंभीर होती. त्यानंतरच्या आय.जी. पटेल व के. आर. पुरी यांच्या कार्यकालातही हा ध्वजदंड तसाच रिकामा राहिला. त्यानंतर गव्हर्नर पदी मनमोहनसिंग आल्यावर या नोटेवर पुन्हा ध्वज फडकला.
नंतर ५० रुपयांच्या या ध्वजविरहित नोटा अत्यंत गुपचूपपणे व्यवहारातून काढून घेण्यात आल्या. ना कसला गाजावाजा, ना कुठे परिसंवाद, हेडलाईन्स ! ही चूक झाल्यामुळे आणि ती निस्तरताना करदात्यांच्या किती कोटी रुपयांचा चुराडा झाला , हे कुणाला कळलेच नाही.
एखादी गोष्ट जर दोषपूर्ण असेल तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही.जितकी चूक मोठी तितकी ती वस्तू निरुपयोगी ! पण टपाल तिकिटे आणि चलनी नोटांच्याबाबतीत हे अगदी उलटे आहे. जितकी चूक गंभीर तितकी त्याची किंमत अफाट वाढते. विविध साईट्सवर ५० रुपयांच्या या बाद नोटा, संग्राहकांसाठी आज खूप मोठ्या किंमतीला विकल्या जात आहेत.
५०० व १००० च्या नोटा जवळ ठेवायलाही बंदी आहे आणि या ५० रुपयांच्या नोटेची मात्र केवढी मिजास ? असते एकेकाचे भाग्य !
-- मकरंद करंदीकर
June 4, 2017

धूमकेतूच्या केंद्रकाचा आकार हा सर्वसाधारणपणे दहा ते वीस किलोमीटरच्या दरम्यान असतो. हे केंद्रक खडक, धूळ, पाणी, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, इत्यादींपासून बनलेलं असतं. जेव्हा धूमकेतू अंतराळातून प्रवास करत असतो, तेव्हा या केंद्रकाचं तापमान खूप कमी असतं. परिणामी, त्यावरील पाणी, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, यांसारखे पदार्थ गोठलेल्या अवस्थेत असतात.
December 18, 2021
आपापल्या दैवतांची उपासना कशी करावी? हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न. समाधानासाठी माणसं काहीही करतात. घरी सत्यनारायण, धार्मिक विधी करुन अंधश्रध्दा निर्मूलन करणारेही आहेत. देव, धर्म, उत्सव यामुळे समाजामध्ये थोडे चैतन्यही आहे पण अवडंबर नको.
October 29, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti