(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्मरणशक्ती

    मेमरी म्हणजे स्मरणशक्ती . मेमरी ड्राईंग किंवा ‘ स्मरणचित्र ‘ , चित्रकलेच्या पहिल्या दुसऱ्या परीक्षांना असते . स्मरणपत्र म्हणजे आठवण करून देणारे पत्र . ‘ स्मरणिका ‘ म्हणजे ‘ सूव्हनिअर ‘ ( souvenir ) ‘ आठवण ‘ राहावी म्हणून प्रकाशित केलेली पुस्तिका , ‘ टु कमिट्टु मेमरी ‘ म्हणजे तोंडपाठ करणे . पण ‘ टु हॅव ए मेमरी लाइक सीव्ह ( sieve = चाळण ) म्हणजे आठवणीत न राहणे प्रातःस्मरण , ईशस्मरण म्हणजे शक्ती व आनंद . न्यूरॉलॉजिस्टस् असे म्हणतात की , आवाज हा घुसखोर आहे .

      July 1, 2024


  • किचन क्लिनीक – कलिंगड

    किचन क्लिनीक – कलिंगड

    उन्हाळा आला रे आला कि थंडगार कलिंगड खाल्ल्यावर खरेच अगदी आल्हाददायक वाटते.उन्हाची झळ हि काहि काळा पुरती का होईना बरीच कमी होते. ह्याला उन्हाळ्यातील थंडाव्याची झुळूक म्हटल्यास वावगे ठरणार नाही,नाही का!

    मस्त चाट मसाला घालून,किंवा मिरपुड व मीठ घालून देखील ह्याच्या फोडी रूचकर लागतात बरं का.कधी कधी तळपत्या उन्हातून आल्यावर ह्याचा ग्लासभर लाल लाल रस पिणे म्हणजे अमृत तुल्यच होय.हो पण हा रस फक्त उन्हाळ्यात क्वचित घेतल्यास चालू शकतो बरे अन्यथा फळ खाणे उत्तम.

    कलिंगडाचा वेल असतो,ह्याच्या काळी व पांढरी अशा दोन जाती आहेत.काळी गोल असते तर पांढरी लांबट असते.पांढऱ्या जातीची कलिंगडे मोठी व गोड असतात.कलिॅगड हे फळ चवीला मधुर,थंड,कफकर व वात पित्तनाशक आहे.

    चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूया:

    १)पौष्टिक म्हणून कलिंगडाच्या बिया मगज ६ ग्राम+६ ग्राम खडीसाखर एकत्र करून खावी.

    २)उन्हाळ्यात १ कप कलिॅगड रस+१/२ चमचा जीरे+१ चमचा खडीसाखर तीन वेळा घ्यावे शरीरातील उष्णता कमी होते.

    ३)१ ग्लास कलिंगड रस+२ चमचे लिंबू रस+ १ चमचा खडीसाखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे त्याने मळमळ,तोंडाचा बेचव पणा,छातीत जळजळ,उल्ट्या ह्या तक्रारी कमी होतात.

    ४)कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग+ कापूर+ चंदन हे मिश्रण अंगास लावल्यास अंगाची आग कमी होते.

    ५)बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास १ ग्लास कलिंगड रस+ १ चमचा आवळकाठी चुर्ण जेवणापुर्वी १ तास घ्यावे व मग जेवावे.

    कलिंगड सेवनाचा अतिरेकाने जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 17, 2016


  • नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडते

    सतत काहीतरी नवीन शिकण्याने आपल्या मनाला ताजेतवाने वाटते. वयाची मर्यादा न बाळगता आपल्याला जे आवश्यक आहे, जे आपल्या ध्येयाप्रती गरजेचे आहे किंवा जे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी आहे ते शिकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे.

      March 3, 2019


  • कॅल्शियम

    कॅ ल्शियम याला आपण चुना असेच म्हणतो. चुना हे आपल्या शरीरात सर्वत्र आढळतो. अगदी खनिज द्रव्यापासून ते सर्व हाडे, दांत, स्नायू वगैरे भागातून सतत मिळत असते. तसेच कॅल्शियम हे दोन प्रकारचे असते. पहिले म्हणजे आपल्या हाडाला अगदी घट्ट चिकटलेले असते आणि दुसरे म्हणजे आपल्या हाडापासून सुटून मिळत जाते.

      November 3, 2023


  • गुंतवणूक बाजार

    अगदी कसं सुरळीत चालू होतं !! आर्थिक क्षेत्रात बँका नुकताच पावसाळा संपल्यावर नद्या वाहतात तशा चालू होत्या . शेअर बाजार वाऱ्याच्या झोतांनी नारळाच्या झाडासारखा डुलत होता . मंदिरा खालोखाल पोस्ट ऑफिसांमध्ये निवृत्तांची गर्दी दिसत होती . सर्वत्र आलबेल !! पण अचानक कोरोना नावाचं वादळ आलं ते जणू तांडवनृत्य करीतच .

      October 25, 2022


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग बावीस

    “जा तेल लावीत” असे वाक्य आपण काही वेळा रागाने म्हणतो. हे खरं तर सकारात्मक वाक्य आहे.

      April 6, 2017


  • अंगत पंगत

    आदिमानवाच्या काळात माणूस जंगली प्राण्यांप्रमाणे मुक्त रहात होता. भटकंती करताना कंदमुळं खात होता. कालांतराने प्रगती झाली. तो व्यवस्थित जेवण करु लागला. ऋषिमुनीं आपल्या कुटीमध्ये मांडी घालून पत्रावळीवर भोजन करु लागले. रामायण, महाभारतातसुद्धा मांडी घालूनच सर्वजण भोजन करीत होते.

      January 26, 2023


  • कांबळेंचे भाग्यशाली अध्यक्षपद

    ठाणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या साहित्यिक उत्तम कांबळे यांची ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजूनघेताना’ हीआत्मचरित्रात्मक पुस्तके आणि इतर साहित्य सुपरिचित आहे. त्यांनी मराठी वाचन चळवळ गावोगावी पोचवणे, सामान्य माणसाला वाचनसंपन्न करणे, मांडवाबाहेरच्या पुरोगामी मंडळींना मुख्य मंडपात विचारमंथन करण्याची संधी देणे वगैरे उपक्रम योजले आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे वय यौवनाकडे झुकवणार्‍या कांबळेंसाठी हे अध्यक्षपद भाग्यशाली ठरावे.

      October 6, 2010


  • सर्वांग परिपूर्ण सुखाची परिभाषा मेघदूतम् !

    रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे.

      June 30, 2022


  • झोप – एक नैसर्गिक प्रक्रिया

    शालेय जीवनामध्ये मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत असे शिकवले जायचे. आज त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याही पेक्षा अधिक खूप काही मिळवण्यासाठी मनुष्य घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेगवान होत आहे. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचा इतका प्रभाव आजच्या पिढीवर पडला आहे की रात्रिचा दिवस करून धनवान बनण्याची स्वप्न साकारू पाहत आहे. हे सर्व करताना निसर्गाशी ताळमेळ तुटत चालला आहे याची मात्र खंत वाटते.

      August 17, 2021