वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज ८ सप्टेंबर . आजचा दिवस हा सगळ्यांचं आयुष्य बदलवणारा दिवस ठरू शकतो. ७ नोव्हेंबर १९६५ साली युनेस्कोने ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जावा हा निर्णय घेतला आणि ८ सप्टेंबर १९६६ पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला.
September 9, 2020
भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्याला बळ प्राप्त व्हावे या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याचा आग्रह धरण्यात आला. हा कायदा अस्तित्वात येताच विविध प्रकारे मिळवलेल्या माहितीद्वारे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. असे असताना माहिती मिळवणार्यांवर दबाव आणण्याचे, मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, याला जनताच प्रखर विरोध करेल आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाची नवी पहाट पहायला मिळेल असे वाटते.
January 10, 2011
नुकतेच टीव्हीवर पाण्यावरचा तरंगता दगड कुंभमेळा दरम्यान दाखवला होता. अनेक जण त्याला पाया पडताना दाखवले जात होते. कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन थांबत नव्हतें, थांबणार नाहीत.अध्यात्मासमोर कधीकधी विज्ञानही हतबल होतं. कोणताच हेतू नसलेले, कोणता तरी हेतू असलेले तर काही जण केवळ बघे म्हणून यात सामील होतात.
July 21, 2025
आपल्या सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याला अंत:करणापासून सलाम करण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईकवर किळसवाणं राजकारण करणाऱ्या कर्मदरिद्री राजकीय पक्षांच्या वर्तणुकीने व्यथित होऊन तीन वर्षांपूर्वी लिहिलेला हा माझा लेख आपल्या जांबाज सैनिकांना अर्पण करतो. शक्य असल्यास शेअर करून अनेकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद !
October 13, 2016
मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
September 16, 2017
पचन सुरू असताना शक्यतो दुसरे कष्टांचे काम करू नये. सवय नसेल तर नकोच. जर काम करायचे असेल तर जेवण नको. भरल्यापोटी अति श्रमाचे काम करणे म्हणजे पचन बिघडवणे. लमाणी लोकांची गोष्ट वेगळी. त्यांना पहिल्यापासूनच अति कष्टाच्या कामाची सवय असते.
पचन होत असताना त्यात पित्ताशयाकडून येणारे पित्त, स्वादुपिंडातून पाझरणारे स्राव इ. मदतीला असतात. हे पचनाचे काम करताना अन्य दुसरी अनावश्यक कामे बंद करणे अपेक्षित असते.
आता खरे पाचन सुरू होते. आपल्याला हवे तसे आपण संस्कारीत करून घेतले, दात जीभेला जे हवे तसे भरडून आत उतरवले, इथपर्यंत पचनावर आपला ताबा असतो. जे काही अपेक्षित बदल आहेत ते इथपर्यंतच. एकदा घश्याखाली अन्न उतरले की आपला अंमल संपला. डिपार्टमेंटच बदलले. आता त्याला हवे तसे योग्य ते बदल तो करू लागतो. आधीच ठरवलेल्या फाॅर्म्युल्याप्रमाणे योग्य ती पाचक द्रव्ये तिथे आणली जातात. नीट घुसळली जातात. सर्व रस एकजीव होतात. अग्निनारायण मदतीला असतोच. रंजक पित्त, पाचक पित्त, समान वायु, बोधक कफ हे मदत करीत असतात. त्या सर्वांचं एक मिश्रण तयार होते, आणि हळुहळू पुढे सरकू लागते. पोटाच्या म्हणजे जठराच्या अगदी सुरवातीला आणि शेवट असलेले दोन्ही दरवाजे बंद केले जातात. एकदा मिक्सर सुरू झाला की दरवाजे मधे उघडू नयेत.
आणि पोटाचे स्नायु उलट सुलट फिरू लागतात. म्हणजे मधेच उलट मधेच सुलट. अगदी पुरण यंत्राप्रमाणे, जेव्हा पुरण खाली पडायचे बंद होते तेव्हा मधेच दोन तीन वेळा उलट फिरवले की कसे, जाळीला चिकटून बसलेले पुरण कसे सोडवले जाते, तसे.
किंवा इमारतीला स्लॅबसाठी आवश्यक असलेले सिमेंट, वाळू, खडी, पाणी जसे अगोदरच ठरलेल्या प्रमाणात, त्या मोठ्या मिक्सरमध्ये घालून फिरवले जाते, आणि योग्य वेळानंतर दुसऱ्या बाजूला ओतले जाते, एक वेगळेच मिश्रण तयार झालेले असते.
अगदी तस्सच पोटात अन्नरस तयार झालेला असतो. त्यात अजूनही काही स्राव मिसळणे बाकी असते. हे पचन जिथे चालते त्या अवयवाचे नाव ग्रहणी असे आहे. पोट आणि लहान आतडे यांच्यामधे अर्धकंसाच्या ( आकाराचा हा अवयव असतो.
या अवयवाच्या दुष्ट होण्यामुळे किंवा अन्य दोषांच्या परिणामामुळे ग्रहणी नावाचा आजारही होतो, जो आजार चिकित्सेसह फक्त आयुर्वेदात वर्णन केला आहे.
कोण म्हणतं नावात काही नाही म्हणून ???
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.03.2017
March 28, 2017
जर्मनीमधील ट्युबिन्गन या छोट्या गावात जाण्याकरता स्वित्झर्लंडमधील झुरीक या स्टेशनवरून छोटी, धुराच्या इंजिनाची गाडी होती. दोन तासांचा प्रवास सुखाचा होता. जर्मन सरहद्दीवरील एका स्टेशनवर पाटी लिहिलेली वाचली आणि क्षणभर धडकीच भरली. 'तंबाखू व तत्सम पदार्थ बाळगण्यास बंदी असून तसे आढळल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.' मुंबईहून निघताना आमच्या एका मित्राने जर्मनीतील एका मैत्रिणीस भेट म्हणून अस्सल भारतीय तंबाखूचं भलं मोठं पाकीट दिलेलं होतं. जर्मन शिस्तीबद्दल लहानपणापासून बरंच वाचलेलं होतं. ताबडतोब सामानातून पाकीट काढून गाडीतून दूर फेकलं. नशीब, कोणी पाहिलं नाही! आम्ही जिथे जाणार होतो ते ट्युबिन्गन स्टेशन अगदी तळेगावसारखं छोटेखानी होतं, पण व्यवस्था व स्वच्छता उत्तम होती, गावात जाण्यासाठी बाहेर बसेस उभ्या होत्या. भाषेची अडचण बरीच जाणवत होती. पण अखेरीस मित्राच्या घरी डेरेदाखल झालो. ९ महिने पत्रांद्वारे केलेली आखणी फलद्रूप झाली होती. आमच्या आनंदाला उधाण आलं होतं.
जर्मन रेल्वे व हिटलर यांचं अजोड नातं होतं. त्याच्या अमदानीत जर्मन रेल्वे ही जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे म्हणून प्रसिद्ध होती. दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या अतिजलद इंटरसिटी एक्सप्रेस या प्रथम जर्मनीमध्ये सुरू झाल्या होत्या.
ट्युबिन्गनहून थेट बर्लिन गाठावं म्हणून रात्री स्टेशनवर आलो. तो दिवस होता शनिवार शनिवार व रविवारी ही गाडी बर्लिनला जात नाही. पण हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. टाईमटेबलच्या अभ्यासातील मोठी चूक प्रथमच झाली, पण त्यामुळे आमचं बर्लिन पाहणं हुकलं याची हुरहूर मनाला कायम राहिली. हिटलरची कर्मभूमी बघावी असं अनेक वर्षे मनातून वाटत होतं, पण योग नव्हता व तो परत येण्याची शक्यताही नव्हती. कार्यक्रमात ताबडतोब बदल करून स्टुटगार्डमार्गे पहाटे चार वाजता म्युनिकला उतरलो. रात्री गाडीत छान झोप लागत होती, परंतु साखरझोपेतून उठावंच लागलं कारण, गाडी शेवटी तेथेच थांबणार होती. रविवार पहाट. सुनंसुनं भव्य रेल्वे स्टेशन. भयाण शांतता. आम्ही तिघे विश्रामगृहात पेंगत होतो. एक वृद्ध प्रवासी बाजूला पेंगत होता. उजेड होण्याची वाट पाहत. बाहेर रस्त्यावर तर अस्वस्थ करणारी सामसूम होती. फक्त एखादी ट्राम जाताना दिसे. अर्धातास पायपीट करून अखेर आम्ही 'पेन्शॉन' शोधलं.
रेल्वे टाईमटेबलमध्ये युरोपमधील काही अविस्मरणीय ठरतील असे प्रवासमार्ग मुद्दामहून नमूद केलेले होते. त्यांतील म्युनिक-साल्सब्रुग-इन्सब्रुक असा साधारण तीन तासांचा प्रवास म्हणजे स्वर्गभूमी ऑस्ट्रियाचा प्रवास होता. स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या दोन देशांच्या पदरी निसर्गानं सौंदर्याचं माप भरभरून घातलं आहे. संपूर्ण गाडीचा रंग लालचुटूक व पांढरा आणि आमचा पहिल्या वर्गाचा डबा तर एखाद्या महालासारखा वाटत होता. डब्याच्या एका बाजूला आरामात उभं राहता येईल असा कॉरिडॉर, त्या बाजूला खिडक्यांच्या उत्तम, पारदर्शक, अतिशय लांब-रुंद काचा, मध्यात कसलाच अडसर नाही. तिथे उभं राहिल्यावर आपण डोंगरदऱ्यांतच उतरलो आहोत असा आभास होत होता. बसण्यासाठी उत्तम कुशन सीट्स होत्या आणि तिथे बसून दुसऱ्या बाजूचा निसर्गसुद्धा दिसत होता. त्यातही दोन्ही बाजूंकडील निसर्गपट इतका वेगळा, की प्रत्येक बाजूकडे नजर भिरभिरत होती. काही वेळा गाडीचा डबा डोंगरकपारीच्या इतका जवळून जात असे, की कपारींमधून उसळणारे पाण्याचे ओहोळ काचेवर धडकत. वाटेत अनेक लहान-मोठे बोगदे होते. त्यांमधून बाहेर आल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार कुरणं दिसत होती. निसर्ग इथे अगदी शांतपणे पहुडलेला होता. गाडीही तितक्याच शांतपणे मार्ग आक्रमत होती. मध्येच गाडीची लय वाढे आणि एखाद्या खिंडीतून जाताना कानांवर पडणारा आवाज अंतर्मनापर्यंत भिडत राही. आम्ही तिघेही इतके मंत्रमुग्ध झालो होतो, की एकमेकांशी बोलूही शकलो नाही. निसर्गाची नानाविध रूपं मनावर लाटांसारखी स्वार होत होती. तीन तास कधी संपले हे कळलंच नव्हतं. त्याच गाडीने परतीच्या प्रवासात पुन्हा तितकाच भरभरून आनंद दिला होता. मन स्तब्ध झालं होतं. शब्दांना जागाच नव्हती.
जर्मनीतील अतिशय वेगवान इंटरसिटी एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे जर्मन रेल्वेची शान आहे. ह्या गाडीने प्रवास करणं केवळ युरेल पासमुळे शक्य झालं मध्य-जर्मनीतील मॅनहाईम व हायडेलबर्ग ही दोन अतिशय जुनी शैक्षणिक केंद्रांची शहरं म्हणून प्रसिद्ध आहेत. तिथे जाण्यासाठी थेट म्युनिकपासून ही गाडी होती. मॅनहाईम येथील हॉस्पिटलमध्ये काही दिवस मी उच्च शिक्षण घेण्याचं पत्रोपत्री पक्कं केलेलं होतं, परंतु तिथे पोहोचण्याच्या तारखा काही कारणाने बदलाव्या लागणार होत्या. तेव्हा त्या जागी प्रत्यक्ष जाऊनच आधी एकदा भेटावं असं विचाराअंती ठरविलं. निव्वळ युरेलचा पास व तेथील अति-जलद गाडीमुळे हे शक्य होणार होतं. म्युनिकहून सकाळी साडेसहा वाजता निघालो ते थेट २५० मैलांवर असलेल्या मॅनहाईम येथे साडेतीन तासांत पोहोचलो. गाडीत अनेक प्रवासी सुटाबुटांत, ऑफिसला कामासाठी निघालेले. आपल्या कामात मग्न. दहा वाजून दोन मिनिटांनी गाडी पोहोचणार असणार असेल, तर अक्षरश: त्या मिनिटाला तिथे हजर होती. वाटेत जर्मनीतील अनेक कारखाने, छोटी टुमदार गावं मागे पडत होती. आतून गाडीच्या वेगाची कल्पनाच येत नव्हती. मॅनहाईमधील सर्व कामं आटोपून, भरपेट जेवण घेऊन माझी स्वारी परतीची गाडी घेऊन थेट म्युनिकला संध्याकाळी साडेसहापर्यंत पोहोचली. चांगलं ५०० मैलांचं अंतर पार केलं होतं. थकवा तर अजिबात नव्हता. धूळ हा प्रकार विसरावयास झाला होता.
-- डॉ. अविनाश वैद्य
October 9, 2022
आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. ‘अॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो. तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘ फोटो काढून घेत होते. आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले. विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’.
August 8, 2021
भगवान श्री गणेशाच्या निर्गुण-निराकार स्वरूपाला अत्यंत सुस्पष्ट रीतीने आपल्या समोर ठेवणारा हा श्लोक.
January 19, 2020
लहानपणी शाळेत /गल्लीत कोणाला माझा वाढदिवस माहीत असण्याचे कारण नव्हते.नवीन कपडे वगैरे नसायचे. गोड म्हणून क्वचित शिरा किंवा केळीचे शिकरण ! आई औक्षण करायची. आई- आजींना नमस्कार करायचा. वडील बहुदा परगावी असत. एकुणातच या दिवसाची फार अपूर्वाई नसे आणि आतुरतेने वाट पाहणेही नसे.
August 26, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti