वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात.
August 11, 2023
श्रीविद्यॆ शिववामभागनिलयॆ श्रीराजराजार्चितॆ
श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ चिन्तामणीपीठिकॆ ।
श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ श्रीशांभवि श्रीशिवॆ
मध्याह्नॆ मलयध्वजाधिपसुतॆ मां पाहि मीनाम्बिकॆ ॥ १ ॥
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे.
यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,
श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या भागात अर्थात येथे असणाऱ्या हृदयात निवास करणारी. श्रीराजराजार्चितॆ- सामान्य जीवावर सत्ता गाजवतो त्याला राजा म्हणतात. अनेक राजांवर सत्ता गाजवतो तो राजराज. अशा अनेक सम्राटांनी अर्चना केलेली.
श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ- भारतीय संस्कृतीत वैभवशाली उपासना मार्ग विद्यमान आहे त्यापैकी एक श्रेष्ठ मार्ग आहे नाथपंथ. हे सर्व नाथ आई जगदंबे ला आपली गुरु मानतात. तिचे हे गुरुस्वरूपच तिचे दिव्य वैभव आहे. चिन्तामणीपीठिकॆ - चिंतामणी रत्नाच्या आसनावर विराजमान असणारी.
श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ - श्री म्हणजे देवी लक्ष्मी, वाणी म्हणजे देवी सरस्वती आणि गिरीजा म्हणजे देवी पार्वती, या त्रिगुणात्मिका तीन देवता जिच्या चरण कमलाला वंदन करतात अशी.
श्रीशांभवी- भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.
श्रीशिवॆ- अत्यंत पवित्र, शुद्ध.
मलयध्वजाधिपसुतॆ- दक्षिणे मध्ये असणाऱ्या पांड्य राजवंशातील मलयध्वज राजा ने आपली पत्नी कांचनमाला हिच्यासोबत भगवान शंकराची तपश्चर्या केल्यावर त्यांच्या आशीर्वादाने कन्या रुपात प्रकट झालेल्या,
मध्याह्नॆ मां पाहि मीनाम्बिकॆ- हे मीनाम्बिके या मध्याह्न काळात माझे रक्षण कर.मध्याह्न समयी अर्थात दुपारी सूर्य मस्तकावर असणे हा सर्वाधिक तापदायक काळ. अशा या तापातून माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 25, 2020
१९५९-६० साली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी वेस हॉल आणि चार्ली ग्रिफिथ यांच्या गोलंदाजीवर त्यांनी अत्यंत प्रभावी फटके मारून नाबाद १३२ धावा पहिल्या कसोटी सामन्यामध्ये केल्या. तर त्यांनी चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ११० धावा केल्या. त्यांनी त्या टूरमध्ये ६५.७५ च्या सरासरीने ५२६ धावा केल्या. त्यावेळी १९६१ मध्ये त्यांचे नाव ‘ विझडेन ऑफ द इयर ‘ मध्ये नोंदले गेले.
July 16, 2021
या सृष्टीच्या व्युत्पत्तीपासून विश्वाच्या निर्मितीचे गूढ उलगडताना मानवाचे स्वत:च्या लौकिक..परमार्थिक प्रगतीसोबत या अवकाशगंगेतील तमाम घटकांचे अस्तित्व उजळून टाकण्यासाठी सातत्याने संशोधन चालू आहे. आदिम काळापासून माणसाचे स्वत:च्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मार्ग शोधणे चालू होते. आणि जसजसे ते मार्ग सापडत गेले तसतसे माणसाच्या जगण्याला नवनवीन कंगोरे प्राप्त होत गेले.
March 31, 2018
ज्यांना जो पक्ष आवडतो, त्याना मतदार मतदान करत असतो. काहीजण पक्ष कुठलाही असे, आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करत असतो. अशांना देशापेक्षा जात महत्वाची वाटते. काही आपल्या धर्माच्या उमेदवाराला मतदान करत असतो. काही पक्षांची पारंपारीक मतं असतात, ती काही झालं तरी त्या पक्षाच्या उमेगवारालाच जातात .
April 20, 2019
हल्ली सर्वजण खूप प्रवास करतात. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही. पुर्वीसारखे परदेशवारीचे अप्रूप आता राहिले नाही. मोठ्या संख्येने मुले-मुली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जायला लागले. मग त्यांचे आई-वडील मुलीच्या -सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिका युरोपला जायला लागले.
April 20, 2023
सामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते. कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो.
October 14, 2020
व्यवसायानिमित्त किंवा पत्रकार म्हणून मला बरेचदा विदेशात जावे लागते. तिकडे गेल्यावर तिथली एकूण राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि आपल्याकडची परिस्थिती यात नकळत तुलना मनातल्या मनात होतेच. ही तुलना करतानाच ते लोक आपल्यापेक्षा पुढारलेले का, या प्रश्नाचे उत्तरदेखील मिळते.
September 14, 2008
ब्राझिल ब्राझ्झिललललल त रा रा रा…… रा रा या गाण्याच्या तालावर नाचण्यासाठी महिन्यातून वेळ मिळेल तेव्हा काही ना काही निमित्त काढून पार्टी केली जात असे. त्यावेळी कंपनीत अल्कोहोल पॉलिसी एवढी कडक नव्हती, प्या पण लिमिट मध्ये. पण प्यायला लागल्यावर कसलं लिमिट ना कसली शुद्ध. लिमिट बाहेर प्यायल्याने आणि शुद्ध हरपून अपघात व्हायला लागल्यावर कंपनीने हळू हळू हार्ड लीकर मग बीयर आणि पुढील दोन वर्षात सगळी जहाजे अल्कोहोल फ्री करून टाकली.
October 1, 2019
November 30, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti