(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक भूलतज्ज्ञ दिन

    विल्यम मोर्टन नावाच्या दंतचिकित्सकाने अमेरिकेतील बोस्टन येथे ‘ईथर’चा वापर करून, सर्वप्रथम भूलचे प्रात्यक्षिक केले होते. त्या काळी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना प्रचंड वेदना होत असत, पण या प्रात्यक्षिकादरम्यान रुग्णाला वेदना झाल्या नाहीत. संपूर्ण शस्त्रक्रिया निर्वेध पार पडली. या प्रसंगाने वैद्यकीय विश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली.

      October 16, 2021


  • मधुमेह – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

    मधुमेह किंवा डायबिटीस, अगदी शाळकरी मुलांनाही परिचित असे हे शब्द. ह्याविषयी शास्त्रीय आणि किचकट भाषेत अनेक लेख किंवा पुस्तके आपल्याला वाचायला मिळतात. मात्र साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत मधुमेहविषयक महत्वाची माहिती ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत. ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.

      April 7, 2015


  • शहीद दिन

    भारतमातेसाठी बलीदान करणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

      March 23, 2022


  • उर्मिला एक व्यक्तिचित्र

    दहिसर पश्चिमेला आमचा मासळीबाजार. दहिसर पूर्वेकडून सबवे मधल्या चिंचोळ्या उंचवट्यावरून तिरपं चालत पश्चिमेला गेलं की लगेच मासळीबाजार लागतो. त्याला समांतर पंचवीस तीस पावलं चालल्यावर, दोन तीन फुलंवाल्या फुलांचे वाटे घेऊन बसतात. प्रत्येकीच्या डाव्या उजव्या बाजुला, घाऊक बाजारातून आणलेल्या फुलांची बोचकी असतात, आणि त्यातल्या फुलांचे वाटे समोर मांडलेले असतात.

      September 4, 2022


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ६

    नमन्मौलिमंदारमालाभिषिक्तम् |
    नमस्यामि शंभो पदांभोरुहं ते
    भवांभोधिपोतं भवानी विभाव्यम् ‖ ६ ‖

    स्मरणा नंतरची अवस्था असते वंदन. भगवान श्री शंकरांच्या चरणकमलांना प्रेमभराने वंदन करण्यासाठी सिद्ध भगवान जगद्गुरु आचार्यश्री त्या भगवान श्री विश्वनाथांच्या चरणकमलांचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
    स्वसेवासमायात- सेवा करण्यासाठी स्वतः एकत्रित आलेल्या,
    देवासुरेंद्रा- देवता तथा सुरेंद्र म्हणजे देवराज इंद्र.
    नमन्मौलि- त्यांनी नमन् म्हणजे झुकविलेल्या मौली म्हणजे मस्तकांवर,
    मंदारमाला- धारण केलेल्या मंदार म्हणजे स्वर्गात असणाऱ्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांनी,
    अभिषिक्तम् - ज्याच्यावर अभिषेक केला जातो असे.
    कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या वंदनासाठी आलेल्या देवतांच्या मस्तकावर असणाऱ्या पुष्पमालांनी त्या चरणांवर पुष्पाभिषेक होतो. ही कल्पना किती सुंदर आहे?
    वास्तविक या देवता सगळ्यांसाठी वंदनीय. मात्र भगवान विश्वनाथ या देवतांसाठी देखील वंदनीय. म्हणून तर देवांचे देव महादेव.
    नमस्यामि - मी नमस्कार करतो.
    शंभो ते - हे भगवान शंकरा आपल्या,
    पदांभोरुहं- चरण कमलांना.
    कशी आहेत हे भगवान श्री शंकराची चरणकमले? तर आचार्य श्री पुढे म्हणतात,
    भवांभोधिपोतं - भव म्हणजे संसार. अंभोधी म्हणजे सागर. तर पोत म्हणजे नौका. अर्थात या संसाररुपी सागरातून तारुन नेणारी नौका असणाऱ्या, संसार मुक्तीचा मार्ग असणाऱ्या,
    भवानी विभाव्यम् - भवानी म्हणजे आई जगदंबा पार्वतीने चरणसेवा रुपी सत्कार केलेल्या, त्या श्री चरणांची मी वंदना करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 15, 2020


  • पद्मभूषण उस्ताद अहमदजान थिरकवा खाँसाहेब

    बालगंधर्वांच्या गाण्यातील लयची गंमत म्हणजे थिरकवा तर; थिरकवांच्या वाजवण्यातील लालित्य म्हणजे बालगंधर्व ! असे हे थिरकवा बालगंधर्वांनी महाराष्ट्राल दिले तर बालगंधर्वांच्या गुरूनी भास्करबुवा बखल्यांनी ते बालगंधर्वांना दिले.

      May 7, 2011


  • जेनेरिक औषधे

    रुग्णांना चांगल्या आणि स्वस्त दरातील आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद सरकार प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने सरकारने स्वस्त औषधांची उपलब्धता आणि अत्यावश्यक औषधांच्या किंमती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पावले उचलली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारने जेनेरिक औषधांच्या माध्यमातून जनतेसाठी स्वस्त पण दर्जेदार जीवनावश्यक औषधे उपलब्ध करून दिली आहेत.

    स्वस्त उपचारांसाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याची तयारी करत आहे. या कायद्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना स्वस्त जेनेरिक औषधे लिहून देणेही बंधनकारक होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

    आज काल आपण सर्वजण विविध माध्यमातून जेनेरिक औषधांविषयी ऐकतो आहोत.

    पण काय आहेत ही जेनेरिक औषधे?
    खरंच परिणामकारक आहेत का?
    कुठे उपलब्ध आहेत?
    मी आत्ता घेत असलेल्या औषधांसाठी कोणता जेनेरिक पर्याय उपलब्ध आहेत ?
    व ती तुलनेत एवढी स्वस्त कशी?
    जेनेरिक औषधे म्हणजे काय?

    ‘जेनेरिक औषधे’ म्हणजे ब्रॅँडेड नसलेली स्वस्त पण दर्जेदार औषधे. जेनेरिक औषध व त्याचे ब्रॅण्डेड औषध यात खालील साधम्र्य असते. मुख्य घटक पदार्थ शरीरात शोषले जाण्याचा वेग आणि रक्तातली पातळी औषधाचे डोसेज फॉर्म (उदा. टॅब्लेट, कॅप्सूल, सिरप)

    अनेक वर्षांच्या संशोधनातून शोधल्या गेलेल्या फॉर्म्युल्यानुसार औषध तयार केले जाते. दरम्यान, या औषधांचा उत्पादन करण्याचा खर्च जरी कमी असला तरी संशोधनावर झालेला खर्च भरून काढण्यासाठी त्या कंपनीला त्या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी देण्यात येतो, म्हणजेच पेटंट देण्यात येते. या औषधाला कंपनी विशिष्ठ नाव देते, त्यालाच आपण ‘ब्रँडेड औषध’ असे म्हणतो. पेटंटचा कालावधी सात ते वीस वर्षांदरम्यान असतो. या कालावधीनंतर इतर औषध कंपन्या त्या कंपनीचा फॉर्म्युला वापरून व तिच्या परवानगीशिवाय त्याच गुणवत्तेचे औषध वेगळ्या नावाने म्हणजेच जेनेरिक नाव देऊन तयार करू शकतात. हे तयार केलेले औषध म्हणजेच ‘जेनेरिक औषध’ होय.

    जेनेरिक औषधांची किंमत कमी का असते?

    जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने पेटंटच्या कालावधीत वसूल केलेला असतो. अर्थातच औषध निर्मितीचा खर्चही कमी असल्याने त्याची किंमत मूळ ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी होते. यामुळे नागरिकांनी स्वतःहून जेनेरिक औषधांची मागणी करायला हवी. यामध्ये पैशांचीही बचत आणि उपचारही उच्च दर्जाचा असेल.

    उदा. डोकेदुखी, अंगदुखी, ताप यांपासून आराम देणारे ‘पॅरासिटॅमॉल’ नावाचे एक औषध आहे. ‘पॅरासिटॅमॉल’ हे जेनेरिक नाव झाले. तर क्रोसिन, मेटॅसीन, कॅलपोल आदी ब्रँडेड औषधे आहेत. ही जी निरनिराळ्या ब्रँडनेमखाली मिळतात त्यांना ‘ब्रँडेड-जेनेरिक’ असे म्हणतात. भारतात सुमारे ९०० जेनेरिक औषधांपासून बनलेली ६०००० ‘ब्रँडेड-जेनेरिक’ औषधे आज भारतात विकली जातात.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 25, 2017


  • व्हिएतनाम : इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ

    व्हिएतनाम : इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ

    दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देश पर्यटनासाठी लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी व्हिएतनाम हा देश विशेष वेगळेपण घेऊन उभा आहे. येथे एकीकडे हिरवीगार भातशेती, उंचसखल डोंगररांगा, मोहक समुद्रकिनारे तर दुसरीकडे आधुनिक शहरे, गजबजलेली बाजारपेठ आणि रंगीबेरंगी संस्कृती पर्यटकांना आकर्षित करतात. भारतीय प्रवाशांसाठी व्हिएतनाम हा तुलनेने किफायतशीर, जवळचा आणि सहज व्हिसा मिळणारा देश असल्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

      April 17, 2026


  • याला जीवन ऐसे नाव भाग २५

    पाणी शुद्धीकरण भाग पाच

    पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.

    त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
    एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.

    याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.

    हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
    काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.

    पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
    आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.

    पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.

    केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.

    एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.

    नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    01.01.2017

      January 1, 2017


  • एकेकाचे खाणे

    रुमालात लाईटचा बल्ब फोडून त्याच्या काचा खायच्या. त्याच्या नंतर उसाचे कांडे खावे तशी ट्यूबलाईट तिरकी हातात धरून खायचा. एखादी खमंग शेव खावी तसे खिळे खायचा. तर एखादा तोंडातून, घशातून आख्खी तलवार आत घालायचा. एखादी परदेशातली बातमीही त्यावेळी वाचायला मिळायची की, अल्याण्या गावच्या फल्याण्या माणसाने आख्खी मोटारकार हळू हळू म्हणजे पाच दहा वर्षात खाऊन संपवली अर्थात एक एक पार्ट वेगळा करून.

      June 5, 2024