वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं रक्तांगुलीय-लसदंगुलि-पल्लवाढ्याम्।माणिक्य-हेम-वलयांगद-शोभमानां पुण्ड्रेक्षु-चाप-कुसुमैषु-सृणीर्दधानाम्॥२॥
आई ललितांबेच्या मुखकमलाचे स्मरण केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्य श्री आई जगदंबेच्या हस्त कमलाचे वैभव विषद करीत आहेत. ते म्हणतात,
प्रातर्भजामि- मी सकाळी आराधना करतो, स्मरण करतो. ललिताभुजकल्पवल्लीं- आई ललितांबेच्या हाताचे. जे कल्पवल्ली प्रमाणे आहेत. अर्थात एकदा हा हात मस्तकावर असला की काय वाटेल ते प्राप्त होते. मनात येताच हवे ते मिळते.
रक्तांगुलीय- लाल रंगाच्या अंगठ्या,
लसद्- त्याने चकाकणारी,
पल्लवाढ्याम्- जणू पालवी प्रमाणे अत्यंत सुंदर असणारी.
अंगुली- बोटे.
आई जगदंबेच्या हातातील बोटात लाल रंगाच्या अंगठ्या शोभून दिसतात. लाल सर्वाधिक हा आकर्षक रंग आहे. त्यामुळे अत्यंत आकर्षक अंगठ्या असाही अर्थ होतो.
आईचा हात गोरापान असल्यामुळे त्यावर लाल रंग सुंदर दिसतो त्यामुळे लाल रंगाच्या, असाही अर्थ होतो.
माणिक्य- माणिक नावाच्या लालबुंद रत्नांपासून बनविलेले,
हेमवलय- सोन्याची कंकणे,
अंगद- बाजूबंद, वाकी इत्यादी हातातील अलंकार.
शोभमानां- या सगळ्यांनी आईचे हात शोभून दिसत आहेत. आई ललितेचे स्वरूप चतुर्भुज असते. या चार हातांमध्ये,
पुण्ड्रेक्षु- लाल रंगाचा ऊस.
चाप- धनुष्य
कुसुमैषु- इषु म्हणजे बाण. फुलांचे बाण.
सृणी:- अंकुश.
दधानाम्- धारण करणाऱ्या, या हातांचे मी स्मरण करतो.
आईला चार हात आहेत. अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ आईच्या हातात आहेत.
यात रसपूर्ण फल देणारा ऊस धर्माचे, पराक्रमाची माध्यम असणारे धनुष्य अर्थाचे, फुलांचे बाण हे कामाचे तर आत्म नियमनकारी अंकुश हे मोक्षाचे प्रतीक आहे.
या चारही गोष्टी आईच्या हातात आहेत.
आपल्या भक्तांना हे सर्व देते म्हणून त्या हातांचे स्मरण.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 29, 2020
मधमाश्या या आपल्या मित्र आहेत, हे आपल्याला ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी आपले पुष्कळ हित होईल. सध्या त्यांना शत्रू समजून आपण आपले नुकसान करून घेत आहोत…..
January 24, 2024
1) बाल गणेश ( गणपती ) —
सोनेरी रंगसंगतीचा हा श्री गणेश बालका समान आहे. हातात के ळ , आंबा , उस आणि फणस आहे .ही सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.
September 4, 2014
तसेही आता या पिढीला माया प्रेम कमीच आहे. व्यवहारी जगात कसे जगायचे हे जाणतात भावनेत गुंतून पडत नाहीत. याची मनाची तयारी हवी. पूर्वीचा काळ गेला आहे. त्यामुळे थोडी कणखरता ठेवून जगता आले पाहिजे. कदाचित तुम्हाला पटणार नाही पण हे कटू सत्य आहे हे मात्र खरं आहे.
December 30, 2021
नग्नो निःसड्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् ।
उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥९॥
भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना आचार्य श्री येथे त्यांच्या काही विशेषणांचा उल्लेख करीत आहेत. ते म्हणतात,
नग्नो- ज्यांचे मायारूपी वस्त्र गळून गेले आहे, ज्यांच्यावर कशाचेच आवरण पडूच शकत नाही, त्यांना शास्त्रात नग्न असे म्हणतात. निःसड्ग- ज्यांना कशाचाही संग अर्थात लेप लागत नाही.
शुद्ध- ज्यांच्या ठिकाणी मायेच्या मलीनतेचा अंश देखील नसतो त्यांना शुद्ध असे म्हणतात.
त्रिगुणविरहितो- मायेच्या सत्व, रज आणि तम या तीनही गुणांनी रहीत असलेले, निर्गुण निराकार. ध्वस्तमोहान्धकारो- ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा मोह शिल्लक उरलेला नाही असे.
नासाग्रे न्यस्तदृष्टि: - ज्यांनी आत्मध्यानासाठी नासिकाग्रावर दृष्टी स्थिर केली आहे असे,
विदितभवगुणो - अशा विविध गुणांनी युक्त असणाऱ्या,
नैव दृष्टः कदाचित् - आपल्या स्वरूपाचे मी कधीही दर्शन घेतले नाही.
उन्मन्यावस्थया - उन्मनी अवस्थेमध्ये,
त्वां विगतकलिमलं - कली अर्थात दोषांचा मळ नष्ट झालेल्या आपले,
शड्करं न स्मरामि- हे भगवान शंकरा ! मी कधीच स्मरण केले नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या सगळ्या अपराधां करिता मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 28, 2020
रामसेतूबाबत अनेक भ्रम पसरलेले आहेत. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे हे वर्णनवाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.
दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्टही केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसालाही सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजही समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती. त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेही भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आजपेक्षा निदान २० फूट खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.
आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.
वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर घेऊन आले. किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.
वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारांच्या सैन्याला उथळ समुद्रावर रामसेतु निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.
टीप: वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:
ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥
ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥
बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥
संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.
समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥
दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥
मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥
संक्षिप्त अर्थ : कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥
December 10, 2015
वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्…एखादे शिल्प्… पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर… जिथे आपण वास्तव्य करतो. वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते.
November 12, 2020
शेती आणि शेतकरी देशातील सर्वात महत्त्वाचा घटक जो आपणास कधीही उपाशी ठेवत नाही मित्रहो आज आपण भारतीय शेतीचा इतिहास सुरुवात नवनिर्मिती तंत्रज्ञान प्रगती संशोधन उद्योग व्यवसाय निर्यात पर्यटन आणि बरेच काही या लेखातून आपण चर्चा करूया.
April 25, 2023
…मुरलीदरनचे सात चेंडू ‘नो-बॉल’ ठरविण्यात आले. त्याच्या मारकतेला प्रतिस्पर्ध्यांनी केलेला हा पहिला सलाम होता! प्रथम 1996 आणि नंतर 1999मध्ये आंक्रिपने त्याची गोलंदाजीची शैली नियमांमध्ये बसत असल्याचे स्पष्ट केले. या वेळपावेतो त्याने ‘दूसरा’ टाकावयास प्रारंभ केलेला नव्हता. ‘दूसर्या’शिवायच आपल्या कंदुकाच्या फिरकलीलांवर फलंदाजाला थरथरविण्यास मुरली आता राजरोसपणे तयार झाला.
August 28, 2010
रहस्यमय विषाणूमुळे अनेक खेळाडू आजारी असल्याने समालोचक आणि पत्रकारावर न्यूझीलंडसाठी क्षेत्ररक्षण करण्याची पाळी, हॅडलीचा विश्वविक्रमी बळी, पदार्पणात ९९ धावांवर बाद होणार्या पहिल्या फलंदाजाचा जन्म आणि गिल्क्रिस्टचा कसोट्यांमधील १००वा षटकार.
November 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti