वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे पूर्वी फक्त एखाद्या प्रदेशाची खासियत होते. परंतु कालांतराने ते संपूर्ण राज्याची ओळख बनून गेले. उंधियो पदार्थ याच पठडीतला. उंधियोला सुरती उंधियो म्हणूनही ओळखलं जातं.
January 14, 2022
पहिल्या सहा कसोटी डावांमधून अवघी एक धाव काढणार्या मर्वन अटापट्टूचा जन्म आणि गिल्क्रिस्ट-लँगरने साकारलेला एक अशक्यप्राय कसोटीविजय
November 19, 2010
कामगार-मालक, मालक-नोकर, उत्पादक-ठााहक हे संघर्ष टोकाची भूमिका घेऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण वरकरणी संघर्ष दोन बाजूंमध्ये दिसत असला तरी वस्तुत: त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दोघांचेही हित परस्परांशी निगडित असते.
June 28, 2009

जटामांसीचे सरळ वाढणारे ०.५-१ मी उंचीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे मुळ १०-१२० सेंमी लांब असून त्यावर जटाकार केस असतात.ह्याची पाने मुलीय व काण्डीय असतात.फुले गुलाबी वा निळ्या रंगाची गुच्छात उगवतात.फळ ०.४ सेंमी लांब असून पांढरी लव असलेले असते.मुळांवरील पाने वाळून पडतात व त्यावर शिल्लक असणारे बळकट,तांबूस तपकिरी रंगाचे केस युक्त गाठी रहातात ज्यांना जटा म्हणतात.
जटामांसीचे गुणधर्म आता आपण जाणून घेऊयात:
हि चवीला कडू,तुरट,गोड असून थंड गुणाची व हल्की,स्निग्ध असते.हि प्रभावाने मानसदोष कमी करते.
आता आपण जटामांसीचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जटामांसी थंड असल्याने पाण्यात वाटून हिचा लेप लावल्यास दाह कमी होतो.
२)घामाच्या दुर्गंधीमध्ये जटामांसीचा लेप शरीरावर करावा.
३)जटामांसी चवीला तुरट व थंड असल्याने केसांची मुळे बळकट करते तसेच सुगंधी असल्याने केश्य म्हणून तेलात वापरतात.
४)जटामांसी निद्राजनन असल्याने झोपेच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.
५)जटामांसी चवीला कडू व हल्की असल्याने गर्भाशय शुद्ध करते व मासिक पाळी नियमीत करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 28, 2017
दादर पश्चिमेस “प्रारंभ” या इमारतीत, १९६७ रोजी सुरेश चाळकर या गृहस्थाने परिसरातील होतकरु तरुणांसह, सामाजिक बांधिलकी आणि एकोपाच्या भावनेनं “बाळ गोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाची” स्थापना केली;
September 17, 2013
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिःलक्ष्मीस्वयंवरण मंगलदीपिकाभिः ।
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम् ॥ १ ॥
आई जगदंबेच्या या नितांतसुंदर स्तोत्राचा पहिल्या चरणात आलेल्या कल्याणवृष्टी या पहिल्याच शब्दाच्या आधारे या संपूर्ण स्तोत्रालाच कल्याणवृष्टिस्तव या नावाने ओळखले जाते.
आई जगदंबे की दृष्टी सकल कल्याणाचे अधिष्ठान आहे, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात,
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिः- आई सकल कल्याणाची वृष्टी करणारी तुझी ही दृष्टी अमृताने भरलेली आहे.अर्थात ज्याच्यावर हा दृष्टिपात होतो त्याला अमृत प्राप्त होते. अमृत स्वर्गात असते. म्हणजे जणूकाही त्या साधकाला या जगातच स्वर्गीय आनंद प्राप्त होतो.
लक्ष्मीस्वयंवरण- आईच्या दृष्टीचे वैभव म्हणजे ती ज्याच्यावर पडते त्याच्याकडे लक्ष्मी स्वतःच धावत येते. जगात बाकी सगळ्यांना लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतात. मात्र आई जगदंबेच्या कृपा पात्र साधकाला या जगातील सर्व सुखे आपोआप
बसल्याजागी मिळतात. हे आचार्य कथन किती सुंदर आहे?
मंगलदीपिकाभिः- आईची दृष्टी मंगलाची दीपिका आहे. दीप प्रत्येक गोष्टीला प्रकाशित करतो. तो नसला तर समोर असलेली गोष्ट ही अंधारात दिसत नाही. तो असला की सर्वत्र लख्ख दिसू लागते. तशी आईची कृपादृष्टी प्राप्त झाली की सर्वत्र मंगलच मंगल दिसू लागते. अमंगलाचा अंधार दूर होतो.
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ- हे आई जगदंबे एकदा तुझा चरणकमलांची सेवा करण्याला सुरुवात केली की मग त्या सेवेने,
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम्- त्या भाग्यवान जणांच्या मनामध्ये असलेले काय होत नाही? अर्थात त्यांच्या मनात जे जे येईल ते पूर्ण सफलच होते.
अशी आईची सेवा करणाऱ्या साधकाला आचार्य भाग्यवंत म्हणत आहेत.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 12, 2020
गेले काही दिवस माझ्या मनात ‘विश्वास’ या विषयावर विचार येत होते. खरच विश्वास ठेवावा का कोणावर? कि ठेवूच नये? एखाद्यासाठी आपण जीवाला जीव द्यायला तयार होतो तो विश्वासानेच कि आपल्यावर तशी वेळ आली कि ‘तो एखादा’ तसेच वागेल या अपेक्षेने..? अशासारख्या अनेक प्रश्नांनी मनात गुंता झला होता..
January 2, 2017
पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेता भारतीय रेल्वेनं हरितक्रांती योजना विविध स्तरावर अमलात आणण्यास सुरुवात केलेली आहे.
भारतातील हरितक्रांतीचं प्रतीक असलेलं पहिलं स्टेशन मानवळ हे जम्मू-उधमपूर मार्गावरील आहे. या स्टेशनला विद्युत प्रवाह वारंवार खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत असे. आता स्टेशनवरचे सर्व दिवे, सिग्नल्स, सौर ऊर्जेवर चालतात. असा विद्युत पुरवठा आपत्कालीन वेळेकरता तयार ठेवला जातो.
ऊर्जा व्यवस्थापन कंपनी (एनर्जी मॅनेजमेंट कंपनी) असा वेगळा कक्ष रेल्वेत स्थापन केलेला आहे. त्यांच्यामार्फत व्यापक योजना आखली गेलेली असून, २०० रेल्वे स्टेशनांवरील दिवे, २६ रेल्वे स्टेशनांच्या इमारतींचे दिवे, गच्चीवरचे जाहिरातीचे फलक, २००० लेव्हल क्रॉसिंग्ज सौर ऊर्जेवर चालणार आहेत.
कोळशांवर चालणारी धुराची इंजिनं इतिहासजमा झालेली आहेत. रेल्वे-मार्गांच्या विद्युतीकरणाला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. जलऊर्जेबरोबर रेल्वे स्वत:ची सौरऊर्जाकेंद्रं व पवनचक्क्यांवर चालणारी विद्युतकेंद्रं बांधणार आहे.
मोठ्या प्रमाणात नवीन पद्धतीची विद्युत व बायोडिझेल इंजिनं बनविण्यात येत आहेत. यामुळे एरवी हवेचं प्रदूषण कमी होणार असून, इंधन बचत झाल्याने खर्चाचा बोजा कमी होणार आहे. चित्तरंजन कारखान्यातून अशी नवीन इंजिनं WAP7 तयार करून ती नागपूर-इटारसी मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्यांना जोडली जातात. या चढणीच्या मार्गावर पूर्वी गाडीच्या मागील बाजूनं दुसरं इंजिन (बॅकर) लावावं लागत असे, आता नवीन इंजिनामुळे त्याची गरज भासत नाही. यामुळे प्रत्येक गाडीमागे ७०० युनिट्स विद्युत बचत होते. २०१४ सालापासून WAP5, WAP7, WAG9 या पद्धतीची ३०० इंजिनं विविध मार्गांवरील मेल, एक्सप्रेस गाड्यांना लावली जाणार आहेत, ज्यामुळे वर्षाला १०० दशलक्ष युनिट्स विजेची बचत होणार आहे व त्यामुळे हवेत मिसळल्या जाणाऱ्या कार्बनचं प्रमाण १०५ टन इतकं कमी होणार आहे.
मल्टिगेन सेट पद्धतीची नवीन डिझेल इंजिनं वापरण्याने प्रत्येक वर्षी, प्रत्येक इंजिनमागे ३२ लाख रुपयांच्या डिझेलची बचत होणार आहे.
सौरऊर्जेवर संपूर्ण सिग्नल्स यंत्रणा, यु.आर.एस. आणि पी.आर.एस. सेंटर, स्वयंचलित तिकिटांची मशिन्स, स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये गरम पाण्याची सोय अशा विविध गोष्टी चालणार आहेत.
अनेक रेल्वे-कॉलन्यांत कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लाईट्स लावण्यात आलेले असून, काही ठिकाणी त्याचबरोबरीने सौरऊर्जेचा वापर अशा दुहेरी उपाययोजना केलेल्या आहेत.
'रेल्वेकरता सौरऊर्जेवर चालणारे वातानुकूलित डबे बनवण्याचं तंत्रज्ञान आय. आय. टी. मद्रास पुरविणार आहे. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस यांसारख्या संपूर्ण वातानुकूलित गाड्यांना पॉवर जनरेटर व्हॅनचा डबा असतो. तिथे डिझेलपासून ऊर्जा बनविली जाते. त्यामुळे संपूर्ण गाडीचं वातानुकूलन होत असतं, पण मेल एक्सप्रेस गाड्यांना २ ते ६ डबे वातानुकूलित असतात. त्यांना डब्याच्या खाली बसवलेल्या बॅटऱ्यांपासून ऊर्जा मिळत असते. जसजसा गाडीचा वेग वाढतो, तसतशा बॅटऱ्या चार्ज होत जातात, आणि डबा थंड होतो; पण या सर्व गोष्टींमुळे गाडीचं वजन वाढतं. त्यामुळे इंजिनाला जास्त ऊर्जा लागते. सौरऊर्जेचा उपयोग झाल्यावर सर्व बाजूंनी ऊर्जेची बचत होणार आहे. चेन्नई-बंगलोर अशी एक प्रवासी गाडी अशा ऊर्जेवर धावत आहे. यात अजून १०० टक्के यश आलेलं नाही. वातानुकूलनाकरता निराळे गॅस वापरले जात आहेत.
कलका-सिमला हेरिटेज गाडी व पठाणकोट-जोगिंदरनगर गाडी यांच्या सर्व डब्यांचे दिवे सौरऊर्जेवर चालतात. जयपूर व आग्रा विभागात हरितक्रांतीचा पट्टा तयार होत आहे.
जंगलसंपत्तीसंवर्धन हा हरितक्रांतीचा महत्त्वाचा पैलू आहे. रेल्वे रुळांच्या मध्यात बसविण्यात येणारे स्लीपर्स पूर्वी लाकडी असत, ज्याकरता हजारो वृक्ष कापावे लागत. आता लाकडी स्लीपर्स पूर्णपणे बाद झालेले असून, त्या ऐवजी एच.डी.पी.ई. पॉलिमरमॅट्रिक्सपासून स्लीपर्स बनविले जातात. जंगलं वाढविण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर ७६ लाख नवीन वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
तसंच, बायो टॉयलेट्सदेखील बनवली जात आहेत.
पर्यावरण बिघडविण्यात लॉय, बसेस, मोटारी, ऑटोरिक्षा यांचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर रेल्वेमुळे सर्वांत कमी प्रमाणात प्रदूषण होत असतं. त्यात भारतीय रेल्वेनं उचललेलं हरितक्रांतीचं पाऊल लाखमोलाचं आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
November 23, 2022
भारत देश विकासात्मक प्रक्रियेत अग्रेसर होत असून जगातील अर्थव्यवस्थेत तो आपले स्थान भरभक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटलायझेशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दि. १ जुलै २०१५ पासून भारतात ख-या अर्थाने डिजिटलायझेशनला सुरुवात झाली असे म्हणता येईल. डिजिटल इंडिया असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले.
July 22, 2023

तिबेटचं पठार म्हणजे एक आत्यंतिक परिस्थिती असणारं ठिकाण आहे. सुमारे पंचवीस लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या आकाराच्या या पठाराची सरासरी उंची चार हजार मीटरहून अधिक आहे. इथली हवा अत्यंत विरळ आणि थंड असते. इथलं तापमान हिवाळ्यात शून्याखाली वीस अंश सेल्सिअसच्या खाली जातं.
May 3, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti