वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शेवटी १ नोव्हेंबर १९५८ रोजी सीमाप्रश्नावर सत्याग्रह करण्याचा संयुक्त महाराष्ट्र समितीने निर्णय घेतला. भाई माधवराव बागल यांनी पहिल्या सत्याग्रहाच्या तुकडीचे नेतृत्व केले. तो शनिवारचा दिवस होता. बेळगावात बाजाराचा दिवस असतांनाही सत्याग्रहाला अभुतपूर्व पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे बेळगावातील कन्नड भाषिकांनीही आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन समितीच्या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबाच व्यक्त केला होता.
July 17, 2021
महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.
‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..?
मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ..?'
याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.
त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'
“ यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!
"मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!"
वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,
"काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?"
संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.
" महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे."
वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
"महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?"
"नक्कीच, ऐक तर,"
वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.
"पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, 'नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?" वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.
संजयाने मानेने नकार दर्शवला.
"कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?"
संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
"तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!"
वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
"भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही."
संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, "महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?"
वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,
" याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे."
संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"
"वा!"
वृद्ध योगी उद्गारला, "वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!"
"कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!'
संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.
पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून..!
August 6, 2017
गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon Citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे.
हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात.
उपयोग :
ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो.
कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.
पावसाळ्यासाठी तयारी करताना गवती चहाचे कंदही घरात कुंडीत लावता येतील. लहानशा कुंडीत लावूनदेखील काहीही कष्ट न घेता गवती चहाची पाने चांगली वाढतात. पावसात कधी तरी आल्याबरोबर गवती चहाची लहानशी जुडी चहात घालून तो वाफाळता चहा प्यायची मजा औरच! या ऋतूत घरात एकदा तरी गवती चहाचा काढा होतोच. गवती चहादेखील कफ कमी करणारा आहे. त्याबरोबरच वात कमी करणारा म्हणूनही तो उपयुक्त ठरतो, पण चहात किंवा काढय़ात घालण्याव्यतिरिक्त गवती चहाचे घरगुती तेलही तयार करता येते हे फार जणांना माहीत नसेल. पावसाळ्यात अनेकांचे सांधे दुखतात, गुडघेदुखीही उफाळते. त्यावर गवती चहाचे तेल लावून आराम पडतो. गवती चहाची पाने चुरगाळून ती तेलात अगदी थोडा वेळ उकळावीत. हे तेल गार झाल्यावर ते गाळून बाटलीत भरून ठेवावे. तिळाचे तेल 'वातघ्न' असल्यामुळे ते यासाठी वापरले तर उत्तमच. पण साधे खोबरेल तेल वापरूनही चालेल.
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
May 17, 2017
आंतर्दर्शीचा ( एण्डोस्कोपी ) शोध लागण्याआधी रोगाच्या बाह्य लक्षणांवरून रोगाचे निदान केले जाई आणि त्यावरून रोगावर उपचार केले जात असत . त्यामुळे रोग निदानात तितकीशी अचूकता नसे . पण आज आंतर्दर्शीच्या शोधामुळे माणसाच्या शरीराच्या आतील भागाचे प्रत्यक्ष निरीक्षण शक्य झाले , रोग निदानामध्ये अचूकता आली आणि अर्थातच त्यामुळे उपचार नेमके काय करायचे हे समजले .
May 15, 2014
अमेरिकेच्या पहिल्या तेरा वसाहतींमधे प्रामुख्याने प्रॉटेस्टंट लोकांचा भरणा होता. वर उल्लेखल्याप्रमाणे, या सुरवातीच्या काळात अमेरिकेस जाणार्या लोकांमधे, युरोपातील जाचक धार्मिक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी पळ काढणार्या लोकांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे १७७६ साली अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत अमेरिका हा प्रामुख्याने प्रॉटेस्टंट पंथीय देश होता. यात प्रामुख्याने इंग्लंड आणि उत्तर युरोपीयन देशातल्या लोकांचा समावेश होता. यात अॅंग्लीकन, बॅप्टीस्टस, कॅल्व्हीनीस्टस, प्युरीटन्स, प्रेसबीटेरियन, लुथर्न, क्वेकर्स, आमीश, मेथॉडीस्ट, मोरव्हारियन या प्रवाहातील लोकांचा भरणा होता. पुढे आयर्लंडमधल्या भयानक दुष्काळानंतर, तिथल्या गरीबी आणि उपासमारीला कंटाळून मोठ्या प्रमाणावर आयरीश लोक अमेरिकेत येऊ लागले. आयरीश, इटालियन, पोलिश, फ्रेंच, स्पॅनिश, हंगेरियन, जर्मन निर्वासीतांनी त्यांच्या बरोबर त्यांचा रोमन कॅथलिक पंथ अमेरिकेत आणला. पुढे हिस्पॅनिक (मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषा बोलणार्या देशांतील लोक) लोकांबरोबर, कॅथलिक पंथीयांची भरच अमेरिकेत पडत गेली. ग्रीक, रशियन व इतर पूर्व आणि मध्य युरोपीयन देशांतील लोकांनी अमेरिकेत आपल्याबरोबर ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन पंथाची परंपरा आणली.
गेल्या ५० वर्षांत, एशियन लोकांचे अमेरिकेतील प्रमाण आणि त्याचबरोबर मुस्लिम, हिंदू आदि धर्मियांचा विस्तार, हळू हळू का होईना पण होऊ लागला आहे. अशा प्रकारे एकीकडे अमेरिकेतली लोकसंख्या वाढत चालली आहे तर त्यातील प्रॉटेस्टंट पंथीयांचे प्रमाण कमी होत चालले आहे. अगदी अलीकडे म्हणजे १९७२ ते १९९३ या काळात देखील प्रॉटेस्टंटांचे अमेरिकेतील प्रमाण ६३% होते. ते २००२ साली ५२% झाले. २००६ च्या सुमारास, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच, प्रॉटेस्टंटांचे प्रमाण एकंदर ख्रिश्चनांमधे ५०% हून कमी झाले असावे असा अंदाज आहे. आज प्रॉटेस्टंटांच्या २०० हून अधिक शाखा-उपशाखा झालेल्या आहेत; त्यातील सदर्न बॅप्टीस्ट्स ही सर्वात मोठी. त्यामानाने कॅथलिकांमधे फारसे फाटे न फुटल्यामुळे, कॅथलीक्स हे आज अमेरिकेतील ख्रिश्चनांमधला सर्वात मोठा एकसंध प्रवाह (२४%) झालेले आहेत.
थोडक्यात ढोबळमानाने अमेरिकेची आजची धार्मिक विभागणी ही अशी आहे :-
कॅथलिक २३.९%
प्रॉटेस्टंट बॅप्टीस्ट (सर्व शाखा मिळून) १७.२%
इतर प्रॉटेस्टंट ३४.१%
इतर धर्मीय / विचार धारा ८.८%
(कुठल्याच धार्मिक संकल्पनेवर विश्वास नसलेले) १६.१%
याचाच अर्थ असा की :-
अमेरिकेतले निम्मे लोक प्रॉटेस्टंट आहेत.
दर सहावा अमेरिकन बॅप्टीस्ट आहे.
दर चौथा अमेरिकन कॅथलिक आहे.
दर चौथा अमेरिकन हा इतर धर्म/पंथाचा किंवा कुठल्याच धर्मसंकल्पनेवर विश्वास न ठेवणारा आहे.
भौगोलिक दृष्ट्या पहायला गेलं, तर अमेरिकेच्या नॉर्थ ईस्टमधे (जिथे आयरीश आणि इटालियन लोकांचे प्राबल्य आहे), सुमारे ४०% लोक रोमन कॅथलिक आहेत. दक्षिणेकडच्या राज्यांमधे प्रॉटेस्टंट लोकांचे प्रमाण खूप आहे आणि त्यात देखील सुमारे ४०% लोक सदर्न बॅप्टीस्ट या विशिष्ट प्रॉटेस्टंट शाखेचे उपासक आहेत. अमेरिकेचा नॉर्थ वेस्ट भाग हा पूर्वापार कमीत कमी धार्मिक असा भाग आहे. तुलनाच करायची झाली तर दक्षिणेकडच्या राज्यांमधले ८६% लोक देवावर विश्वास ठेवणारे आहेत तर पश्चिमेकडे हेच प्रमाण ५९% आहे. त्यामुळेच अमेरिकेतल्या दक्षिणेकडच्या या धार्मिक राज्यांना एकत्रितपणे “बायबल बेल्ट” असे संबोधले जाते.
-- डॉ. संजीव चौबळ
June 5, 2016
१९९४ सालात एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलगू देसम पक्षाने पुन्हा बहूमत मिळवले. किंबहूना सामान्य मतदाराला उघड आमिष दाखवून मते मिळाणारी ती पहिली निवडणूक असावी. एक रुपया किलो तांदूळ देण्याच्या आश्वासनाने रामाराव यांना प्रचंड बहूमत मिळालेले होते.
March 29, 2022
१५ ऑक्टोबर २००८ रोजी हा दिन पहिल्यांदा साजरा केला गेला. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने ही तारीख नियुक्ती केली होती. २००८ हे साल आंतरराष्ट्रीय स्वच्छतेचे होते.
October 15, 2020
मला तर वाटते कि मदन मोहन यांनी लताच्या आवाजाचा जितका सुंदर उपयोग करून घेतला तितका इतर संगीतकारांनी फार कमी करून घेतला.”कदर जाने ना “ हे गाणे ऐकून तर बेगम अख्तर सुद्धा चकित झाल्या फारसे शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसून कसे रागदारीवर गाणे केले.
August 9, 2022
लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असते. लग्न कशासाठी, याची समज येण्यासाठी आणि त्याचं अवलंबन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. विचारस्वातंत्र्य हवं आणि तरी विश्वास हवा. या दोन गोष्टींमधून प्रेम जन्म घेतं.
दर वर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी जागतिक लग्न दिवस साजरा केला जातो.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
February 14, 2024
दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
October 26, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti