(User Level: User is not logged in.)

शैक्षणिक

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संबोध

    अनुभूती शिवाय संबोध स्पष्टता नाही.संबोध स्पष्ट नसले की बोध होत नाही. अर्थ माहीत नसताना बऱ्याचशा वेळेला अनेक विद्यार्थी पाठांतर करतात. पाठांतर जर समजून केलं तर संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. अनेक वेळा पाठांतर करून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना अर्थ विचारला असता ते निरुत्तर होतात. जीवनाचा संबोध स्पष्ट नसला की जीवन आत्महत्या जवळ करतं. जीवन कळायला जीवन समजलं पाहिजे. माणसांचेही संबोध काही वेळा कळत नाहीत ते समजून घ्यायला हवेत, यांच्याशी संवाद साधायला हवा. अनेक माणसे अशी कां वागतात हे आपल्याला कळत नाही कारण आपण त्यांना समजून घेतलेलं नसतं.आपण जेंव्हा म्हणतो तू मला समजूनच घेतलं नाही, तुला मी कळालोच नाही, बऱ्याच वेळेला माणसांचे मन कळत नाही.

      July 6, 2026


  • हॉकिंगचा नियम

    कृष्णविवर म्हणजे आपल्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणापायी आपल्याकडच्या प्रकाशालासुद्धा बाहेर पडू न देणारी वस्तू. प्रकाशही बाहेर पडत नसल्यामुळे, कृष्णविवराच्या केंद्रापासून ठरावीक अंतरापर्यंत, कुठली घटना घडते आहे, ते आपल्याला बाहेरून दिसू शकत नाही. या अंतराला कृष्णविवराचं ‘घटनाक्षितिज’ म्हटलं जातं. एका दृष्टीनं कृष्णविवराचा हा आकारच! कृष्णविवराचा हा आकार त्याच्या वजनावर अवलंबून असतो. कृष्णविवराचं वजन जितकं जास्त, तितका त्याचा आकार मोठा. जेव्हा दोन कृष्णविवरांचं विलीनीकरण होतं, तेव्हा नव्या कृष्णविवराचं वजन हे दोन्ही कृष्णविवरांच्या एकत्रित वजनापेक्षा कमी असता कामा नये, हे अपेक्षितच आहे. तसंच, विलीनीकरणातून निर्माण झालेल्या या कृष्णविवराचा आकारही, दोन्ही कृष्णविवरं एकत्रित केल्यानंतर अपेक्षित असलेल्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.

      May 5, 2022


  • वाढता लखलखाट

    रॉबर्ट होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विश्लेषणानुसार, २०१० सालच्या जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत पृथ्वीवर लखलखणाऱ्या दर हजार विजांमागे दोन विजा आर्क्टिक प्रदेशात नोंदल्या जात होत्या.

      January 9, 2022


  • कल्पकता : चौकटी बाहेर जाऊन विचार

    कल्पकता : चौकटी बाहेर जाऊन विचार

    माझी प्रमुख या नात्याने जबाबदारी होती, ती म्हणजे कारखान्याचे आर्थिक व्यवहार सुधारण्याची. मी कामाचा चार्ज घेतल्या नन्तर काही दिवसात माझ्या लक्षात आलं की कारखान्याच्या आवारातून खूप चोऱ्या होतात, ज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत होते. रात्र झाली की आजूबाजूच्या लोकांपैकी काही तारेच्या कुंपणातून आत शिरत आणि ज्याला चांगला विक्री भाव येतो अश्या वस्तूंची चोरी करत. आमच्याच कारखान्यातले काहीजण ह्या चोरी करणाऱ्या लोकांना मदत करत असेही माझ्या कानावर आले होते. आणि त्यांच्याशी कितीही अप्रत्यक्ष संवाद साधला तरीही ती लोकं अशी चोरीला मदत थांबवत नव्हती.

      December 29, 2025


  • जिवंत शुक्र!

    शुक्रावर ज्वालामुखी असल्याचे अनेक पुरावे पूर्वीच मिळाले आहेत. परंतु या ज्वालामुखींच्या अलीकडच्या काळातील सक्रियतेचे पुरावे मात्र सापडले नव्हते. त्यामुळे शुक्र हा सध्याच्या काळात भूशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला होता. आता मात्र शुक्र निष्क्रिय नव्हे, तर अगदी सक्रिय असल्याचा पुरावा सापडला आहे. हा पुरावा, अलीकडेच शुक्रावर ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेल्याचं दर्शवतो.

      April 14, 2023


  • शनीचा गाभा

    शनीला घन स्वरूपाचा पृष्ठभाग नाही. तरीही या संशोधनामुळे, त्याच्या गाभ्याच्या रचनेची माहिती करून घेणं, हे शक्य झालं. कारण क्रिस्टोफर मँकोविच आणि जीम फ्यूलर यांनी शनीच्या कड्यांनाच प्रचंड ‘भूलहरीमापक यंत्रा’चं स्वरूप दिलं आहे. या संशोधनातून शनीचा गाभा आगळा-वेगळा असल्याचं दिसून आलं.

      December 16, 2021


  • मानवपूर्व अग्नी

    सन १९७६-७७मध्ये इस्राएलमधील, भूमध्य सागराजवळच्या एव्हरॉन क्वॉरी या उत्खनन क्षेत्रात सुमारे आठ लाख ते दहा लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन वस्तू सापडल्या. या वस्तूंत हरणं, पाणघोडे, गवे, यासारख्या दिसणाऱ्या काही तत्कालीन शाकाहारी प्राण्यांच्या कवटीचे तुकडे, दात, इत्यादी अवशेषांचा समावेश होता. तसंच त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय शाकाहारी प्राण्याच्या सुळ्याचे तुकडेही तिथे सापडले. प्राण्यांच्या या अवशेषांबरोबरच तिथे गारगोटीच्या दगडापासून बनवलेल्या विविध साधनांचे तुकडे आढळले. हे तुकडे, दोन सेंटिमीटरपासून ते साडेसहा सेंटिमीटरपर्यंत वेगवेगळ्या लांबीचे होते. हे तुकडे ज्या दगडी साधनांचे होते, त्यातली काही साधनं धारदार होती, तर काही साधनं अणकुचीदार होती.

      August 13, 2022


  • चंदू चॅम्पियन मुरलीकांत पेटकर

    प्रत्येक व्यक्ती म्हणजे गुणसूत्रांचा समुच्यय. व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात काही दुर्गुण ही असतात.जे चांगले आहे ते घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच प्रेरणा घेणं. व्यंग, अपंगत्व वैगुण्य याकडे दुर्लक्ष करून चांगल्या बाबीकडेच लक्ष द्यावं. चागले जीन्स आपल्याला यशस्वी करतात कारण ते अनुवंशिकतेची देणगी असते. अनेक जीन्स वाईट प्रवृत्तीचे असतात , त्याचा आपण त्याग करायला हवा. काय गोंजारायचं आणि काय झिडकारायचं याचा निर्णय सदसदविवेक बुद्धीने घेतला तर ती व्यक्ती यशस्वी होते.

      July 1, 2026


  • भावनांचे बांध फुटू द्या

    वसई मध्ये एका मुलींला हत्याराने तिच्या प्रियकराने मरेपर्यंत मारले. ४०-५०लोक नुसतं बघत होते. थांबून थांबून मुलगी मेली नाही असे पाहून पुन्हा पुन्हा मारत होता. एका झटक्यात त्याने जीव घेतला नाही. थांबून थांबून हे सर्व चाळीस-पन्नास लोक पहात होते,एक जरी पुढे आला असता व त्याला रोखले असते तर मुलीचा जीव वाचला असता. प्रियकराने १६-१७ वार त्याच्या प्रेयसी वर केले आणि प्रत्येक वार झाल्यानंतर तो बघत असे ती मेली का नाही. आजूबाजूचे लोक जवळ येऊन पाहत होते, जिवंत आहे का मेली, पण कुणाचंही धाडस झालं नाही. चार जण जर धावत गेले असते तर त्याला अटकाव होऊ शकला असता, पण मन जेव्हा दगड होतं तेव्हा पाझर फुटत नाही. मागे दिल्लीला एका तरुणीला भोसकून भोसकून मारले पण कोणीही तिला वाचवले नाही. अशा अनेक घटना आहेत, हे सर्व पाहिल्यानंतर शिक्षणा पेक्षाही मूल्यांची रुजवणूक आवश्यक बनली आहे हेच जाणवतं. आई शिकलीतर कुटुंब शिकतं पण आता एक कुटुंब शिकलं तर समाज शिकेल.

      June 23, 2026


  • धावणारा काळ

    आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात.

      November 9, 2021