
क्रिस्टिन लॅम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला हा शोध नासाच्या ‘टेस’ या कृत्रिम उपग्रहावरील, ताऱ्यांची तेजस्वीता मोजणाऱ्या प्रकाशमापकाच्या मदतीनं लावला. टेस हा उपग्रह विविध ताऱ्यांच्या बिंबांवरील, त्यांच्या ग्रहांनी केलेल्या अधिक्रमणांचा शोध घेतो. किमान एक लाख किलोमीटर, तर कमाल पावणेचार लाख किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा टेस हा उपग्रह पृथ्वीभोवतालची आपली प्रदक्षिणा सुमारे पावणेचौदा दिवसांत पूर्ण करतो. या उपग्रहाद्वारे केल्या गेलेल्या निरीक्षणांत जीजे ३६७ या ताऱ्याची तेजस्वीता किंचितशी बदलत असल्याचं आढळून आलं.
July 21, 2022
चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले संस्कार, चांगलं वळण हे विद्यार्थ्यांचं पुढील आयुष्य मनोहर करतं. केवळ भौतिक बाबतीत मनोहर नको, तर मानसिकतेतही मनोहर हवं. नाती जपणं ही मनोहरी अवस्था आहे. नाती दुरावली की मन उदास होतं. आपली मुलं परदेशात पैसा कमविण्यासाठी जातात हे मनोहर चित्र असलं तरीही पालकांना आपल्यापासून मुलं दुरावल्याची जाणीव उदास करते.
June 28, 2026

चंद्रावरील एकूण पदार्थांपैकी किमान साठ टक्के पदार्थ हे या ग्रहापासून आल्याचं विविध प्रारूपांतून दिसून येतं. चंद्राच्या जन्माला कारणीभूत ठरणाऱ्या या ग्रहाला खगोलशास्त्रज्ञांनी ‘थिआ’ हे ग्रीक पुराणातलं नाव दिलं आहे. चंद्राच्या जन्माची ही कहाणी जरी बऱ्याच अंशी स्वीकारली गेली असली तरी, या थिआचे अवशेष काही पृथ्वीवर सापडलेले नाहीत. त्यामुळे चंद्राच्या जन्मामागील सिद्धांतातील अनिश्चितता कायम राहिली आहे.
March 31, 2022
रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले.
December 23, 2021

नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती.
September 11, 2022
१९३५ साली स्थापन झालेली ‘रिझर्व्ह बॅंक’, भारतीय अर्थव्यवस्थेत आणि देशाच्या प्रगतीत ‘मध्यवर्ती बँक’ या स्वरूपात आधारस्तंभाची भूमिका निभावत असते. देशाला चलन पुरवठा करणे, राष्ट्राची गंगाजळी राखणे, देशाचे आर्थिक धोरण ठरवणे, विदेशी विनिमयाचे व्यवस्थापन करणे, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमचे नियमन करणे, केंद्र व राज्य सरकारे तसेच देशातील सर्व बँकांचे बँकर म्हणून काम बघणे अशी अनेक अतिमहत्त्वाची उत्तरदायित्वे रिझर्व्ह बॅंकेला पार पाडावी लागतात. त्यासाठी या रिझर्व्ह बॅंकेचा प्रमुख म्हणजे ‘गव्हर्नर’ही तसाच हुशार, कणखर, कर्तृत्ववान, अष्टावधानी, निर्णयक्षम असावा लागतो. स्थापनेपासून आजवर २६ जणांनी ही कामगिरी बजावली असून, त्यांची जंत्री खालीलप्रमाणे आहे
October 27, 2026
प्रश्न पडण्याचे कारण की शिक्षकांना अशैक्षणिक कामे इतकी आहेत की गुरुजी आयोगाचे, कां शाळेचे, कां विद्यार्थ्यांचे, कां सरकारचें, का संस्था चालकांचे ? शिक्षकांची भूमिका करणं व शिक्षकांची भूमिका जगणं वेगळं यात फारकत झाल्यामुळें गुरुजी कोणाचे? हा संभ्रम आहे. क्लासमध्ये काही मुलांना जवळ करण्याचा नादात गेस पेपर सांगणारे गुरुजी लोकप्रिय तर त्यामुळे काही असंख्य मुलांच्या गुणवत्ते वर परिणाम झाल्यामुळे काही गुरुजी नकोसे झाले आहेत. मुलींशी गैरवर्तन करणारे अनेक गुरुजी मुलींना आवडत नाहीत.
September 1, 2026

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.
May 25, 2023

शिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो.
November 22, 2021
एखादा पुरस्कार एखाद्या प्रेरणेला जन्म देतो. एक यश दुसऱ्या यशाला जन्म देतं. यशाचं शिखर गाठण्यासाठी यशामध्ये सातत्य लागतं.यशाला प्रेरणाच लागतें. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार असलं की माणसं निर्दास्तपणे वाटचाल करतात. तू फक्त लढ म्हणणारे सुद्धा थकलेल्या मनाला उभारी देण्यासाठी.
July 5, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti