एका असुराने ज्ञानाचं भांडार सामान्य जनांसाठी खुलं केलं म्हणून त्याचा वध झाला. वध होण्यापूर्वी तो हे ज्ञानाचं संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला. देवांच्या विनंतीवरून विष्णूने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या या असुराचा वध केला….. शंखात लपलेला म्हणून शंखासुर…. संकासूर. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर.
April 8, 2019


दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या दिशेनं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ठसे केव्हा उमटले असावेत याची माहिती मिळू शकली, तर गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या होऊ शकेल. यासाठी ठशांचं ‘वय’ शोधण्याचे प्रयत्न गेली काही वर्षं चालू आहेत; परंतु संशोधकांना यात अजून यश आलेलं नाही. मात्र नजीकच्या भविष्यकाळात हे शक्य करणारं संशोधन, अमेरिकेतल्या ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठातील यंग जीन ली यांनी अलीकडेच केलं आहे. यंग जीन ली यांनी अँड्रयू पॉलसन यांच्या सहकार्यानं केलेलं हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘सेंट्रल सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. हे संशोधन म्हणजे यंग जीन ली यांनी तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या स्वतःच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे.
आताच्या या अभ्यासात या संशोधकांनी एकाच व्यक्तीच्या बोटांचे चौदा ठसे घेतले. त्यानंतर हे ठसे ज्या काचांवर घेतले, त्या काचा प्रयोगशाळेतच, परंतु उघड्यावर ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी प्रयोगाच्या काळातलं, प्रयोगशाळेतलं तापमान, आर्द्रता, हवेतील ओझोनचं प्रमाण, इत्यादी सर्व गोष्टींची काटेकोर नोंद ठेवली. त्यानंतर त्यांनी, या चौदा ठशांचं वेगवेगळ्या दिवशी रासायनिक विश्लेषण केलं. सुरुवातीला मोजक्या रासायनिक पदार्थांचं मिश्रण असणाऱ्या या पदार्थांना, हवेतल्या ओझोनशी झालेल्या रासायनिक क्रियांमुळे अधिकाधिक गुंतागुंतीचं स्वरूप येऊ लागल्याचं या संशोधकांना आढळलं. या ठशांतील ट्रायअसाइलग्लिसेरॉल या रसायनाचं प्रमाण सात दिवसांत, तर स्क्वॅलिन या रसायनाचं प्रमाण तीन दिवसांत लक्षणीयरीत्या कमी झालं होतं. मात्र त्याचबरोबर या रासायनिक क्रियांत तयार होणाऱ्या डेकॅनॉइक आम्लासारख्या स्निग्धाम्लांचं, तसंच इतर अनेक रसायनांचं प्रमाण वाढत गेलं होतं. ओझोनशी क्रिया होऊन नष्ट होणाऱ्या रसायनांची, तसंच या क्रियेतून निर्माण होणाऱ्या रसायनांची, त्यांच्या प्रमाणानुसार तपशीलवार माहिती या विश्लेषणातून मिळाली. यांतील कोणत्या रसायनांच्या प्रमाणात काळानुरूप होणाऱ्या बदलाचा, ठशांचं वय काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो, याचा अंदाज या संशोधकांना येऊ शकला.
यंग जी लीन आणि अँड्रयू पॉलसन यांचे हे प्रयोग प्राथमिक स्वरूपाचे आहेत. या प्रयोगांत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीनं यापुढचे प्रयोग केले जाणार आहेत. याशिवाय पुढचे प्रयोग हे अनेक व्यक्तींवर केले जाऊन, त्यांतून सर्वंकष स्वरूपाची माहिती गोळा केली जाईल. या माहितीच्या विश्लेषणासाठी वेगळी संगणकीय पद्धतीही विकसित केली जाईल. त्यामुळे या तंत्रातील अचूकता वाढून, गुन्ह्याच्या तपासातील अचूकताही वाढण्याची खात्री या संशोधकांना वाटते आहे. किंबहुना फक्त हे संशोधकच नव्हे तर, गुन्ह्यांचा शोध घेणारे तज्ज्ञही या तंत्राबद्दल अपेक्षा बाळगून आहेत. अमेरिकेतल्या व्हर्जिनिआ राज्याच्या न्यायवैद्यक विभागातील रसायनशास्त्रतज्ज्ञ कार्ल डेसिल यांनीही, यंग जीन ली आणि अँड्रयू पॉल यांचं हे संशोधन, गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या तंत्राचं प्रमाणीकरण होण्यास काही वेळ लागणार आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात होत असलेली प्रगती पाहता, हा काळ फार मोठा असणार नाही हे नक्की!
(छायाचित्र सौजन्य - byrev/Pixabay and Young Jin Lee, et al)
February 7, 2023

शार्कसारख्या माशांना चुंबकीय क्षेत्राची जाणीव असल्याचं, संशोधकांना पूर्वीच समजलं होतं. ही जाणीव त्यांच्या शरीरातील लोहयुक्त स्फटिकांद्वारे होत असते, हेही संशोधकांना कळलं होतं. परंतु या माशांना ही फक्त जाणीव असते की या जाणिवेचा दिशाज्ञानासाठी उपयोग केला जातो, हे शोधणं महत्त्वाचं असल्याचं मत संशोधक गेली पाच दशकं व्यक्त करीत होते.
February 6, 2022
प्रक्रिया को लर्निंग स्पेस: शैक्षणिक प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अनेक पर्याय आज काल आपण समाजामध्ये पाहतो. अशीच एक पुण्यातील आगळीवेगळी प्रायोगिक शाळा म्हणता येईल अशी जागा प्रक्रिया को लर्निंग स्पेस बाळसं धरत आहे. नवनवीन विचारांची कास धरत व समाजात विकास रुजवण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्नशील असतात, त्यापैकीच मुग्धा व सचिन नलावडे हे एक जोडप आणि त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया Co learning Space ही मुलांसाठीची जागा….. या संस्थेच्या नावातच याची विचारधारा लपलेली आहे, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत सहभागी असणारा प्रत्येक घटक म्हणजे मुले, प्रवर्तक, पालक, संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी शिकत आहेत…..इथे येणारा प्रत्येकजण शिकण्याच्या भावात आहे, म्हणून नावात Colearning आहे, सहशिक्षणाची ही अव्याहत प्रक्रिया एकत्रितरित्या चालू ठेवण्याची ही जागा असा या नावाचा जन्म झाला आहे. सचिन ने नाव अनब इथे राबवली जाणारी शिक्षण पद्धती याचा हे नाव देताना अतिशय खोलवर विचार केलेला आहे.
June 22, 2026
मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.
June 2, 2026

शून्याखालील २७३.१५ अंश सेल्सियचं तापमान म्हणजे भौतिकशास्त्रात संशोधन करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पदार्थाचं तापमान जसंजसं या विशिष्ट तापमानाच्या जवळ जातं, तसे त्या पदार्थाच्या गुणधर्मांत आश्चर्यकारक बदल होत जातात. निरपेक्ष शून्य तापमानाच्या जवळ त्या पदार्थाचं एका नव्या स्थितीत रूपांतर होतं. या स्थितीत, त्या पदार्थातले सर्व रेणू एकत्रित होऊन, त्या सर्वांचा एक मोठा रेणू झाल्यासारखा भासतो. पदार्थाची ही स्थिती अत्यंत विस्मयकारक आहे.
June 23, 2022

आपल्याभोवती आढळणाऱ्या सर्व पदार्थांप्रमाणेच प्रतिपदार्थही अस्तित्वात आहेत. प्रतिपदार्थ हा सर्वसाधारण पदार्थासारखाच असतो, परंतु त्याचे काही गुणधर्म सर्वसाधारण पदार्थाच्या गुणधर्मांच्या विरुद्ध स्वरूपाचे असतात. उदाहरण द्यायचं, तर इलेक्ट्रॉनच्या प्रतिकणाचं – प्रतिइलेक्ट्रॉनचं – देता येईल. प्रतिइलेक्ट्रॉनचं वजन नेहमीच्या इलेक्ट्रॉनच्या वजनाइतकंच आणि त्याच्यावरचा विद्युतभार हा नेहमीच्या इलेक्ट्रॉनवरील विद्युतभाराइतकाच असतो.
November 5, 2023
गुप्त साम्राज्याचा काळ हा अनेक अर्थाने संपन्नतेचा कालखंड समजल्या जातो. या काळात धार्मिक जीवनात तर मोठाच बदल घडून येऊ लागला होता. धर्माच्या अनेक पंथ-उपपंथाची वाढ होऊ लागली होती. जुन्या वैदिक धमाचे स्वरुप पालटत होते. जुन्या वैदिक देवता व यज्ञ-याग हळुहळु लोप पावू लागल्या होत्या. धार्मिक जीवन अव्यक्ताकडून व्यक्ताकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे वळू लागले होते.
January 17, 2026

पृथ्वी झुकते आहे… खरं तर, पृथ्वी साडेतेवीस अंशांनी अगोदरच झुकली असल्याचं सर्वज्ञात आहे. पण ती आणखी झुकते आहे… पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते आहे, तो अक्ष आणखी कलतो आहे. परिणामी, पृथ्वीचे ध्रुव बिंदूही सरकत आहेत. अक्षाच्या दिशेतला हा बदल पृथ्वीवर होत असलेल्या बदलांमुळे होत आहे. नैसर्गिक कारणांमुळे असे बदल घडून येत असले, तरी या कारणांना अनेकवेळा अप्रत्यक्षपणे मानवी हातभारही लागलेला असतो.
June 28, 2023

शरीरातून उत्सर्जित झालेले बहुतांश अवरक्त प्रकाशकिरण, शोषले न जाता या कापडातून पार होत होते. यामुळे कापडाच्या आतलं तापमान कमी राहात होतं. मात्र या कापडाच्या वापराला एक मोठी मर्यादा होती. अवरक्त किरण न शोषता पार होण्यासाठी या कापडाची जाडी मिलीमिटरच्या विसाव्या भागापेक्षाही कमी असणं गरजेचं होतं.
January 2, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti