(User Level: User is not logged in.)

परिचय – परिक्षण

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता – 2

    महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे.

      October 6, 2023


  • ग्राहक चेतना

    मायावी बाजारांच्या भुलभूलय्यात अडकलेल्या सर्व सामान्य माणसाला-ग्राहक राजाला सावध करणारे, त्याच्या हक्कांची अधिकारांची जाणीव करून देणारे आणि या सर्व व्यवस्थेत तो केंद्रस्थानी आहे, हे भान सर्वांना आणणारे हे तळमळीचे लिखाण लिहिले आहे ग्राहक पंचायतीचे प्रसिद्ध कार्यकर्ते श्री सुरेश बहिराट यांनी. दै. लोकमत मध्ये विक्रमी 20 वर्ष लिहिलेल्या ग्राहक चेतना या सदरातील अत्यंत निवडक, महत्वाच्या सार्वकालिक मूल्य असलेल्या लेखांचा हा संग्रह सर्वांसाठीच संग्रहनीयआहे. पृ.200 किं.200 रू. पुस्तकाचे नाव – ग्राहक चेतना : लेखक – सुरेश बहिराट : पाने : २०० किंमत – २०० रुपये श्रीपाद कोठे नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015

      September 29, 2012


  • आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला

    हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या अनिता या सिंधी सुखवस्तू कुटुंबातील. कॉर्पोरेट जगतात त्या काम करीत असताना डॅनी मुरजानी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

      February 17, 2024


  • माझे आवडते पुस्तक मृत्युंजय

    लहानपणापासून मला पुस्तकवाचनाची आवड लागली आणि उत्तरोत्तर ती वाढत गेली. कथा,कादंबऱ्या, कविता, भयकथा, रहस्यकथा, नाटकं,प्रवासवर्णने आणि असंख्य प्रकारची पुस्तके असा माझा वाचनाचा जबरदस्त कॅनव्हास आहे. पु ल देशपांडे यांच्यापासून ते दया पवार ,अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या असंख्य अभिजात साहित्यिकांची आणि लेखकांची अगणित पुस्तकं वाचताना मी झपाटून गेलो.विविध लेखकांच्या प्रतिभाविलासाने मी थक्क होऊन गेलो.

      April 26, 2023


  • वेदांच्या वेदीवरुन

    जगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे.

      July 28, 2023


  • सार्वजनिक ग्रंथालय मार्गदर्शक

    खेडोपाडी पसरलेल्या मराठी वाचकांची वाचनाची भूक लहानमोठी वाचनालये भागवित असतात. ही ग्रंथालये चालविणार्‍या कार्यकर्त्यांना ती कमी श्रमात अधिक चांगली चालविता यावी. शासनाच्या नियमांनुसार त्यांची कार्यवाही असावी. सर्व शासकीय योजना-माहितीचा लाभ घेऊन आपल्या ग्रंथालयांची स्थिती त्यांना अधिक चांगली करता यावी. याकरिता लागणारी सर्व ताजी माहिती एकत्र नीट वर्गीकृत स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा व त्यातून ग्रंथालय चळवळीला हातभार लावणारे सार्वजनिक ग्रंथालय मार्गदर्शक. नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015. पाने : ११२, किंमत : २०० रु.

      September 29, 2012


  • लिहिणे झाले सुकर…

    गेल्या काही वर्षात अनेक तरुण लेखक वाचकांसमोर आले. विविध विषय हाताळून ही तरुणाई बिनधास्तपणे व्यक्त होतेय.

      February 15, 2017


  • विभ्रम

    Vibhram-Front-300

    मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे.

    कवितांविषयी लिहिताना करूणाष्टके, स्वातंत्र्य शाहीर कुंजविहारी, प्रेम गौरव, भिजकीवही, द्रोण, संधिप्रकाशाचे लावण्य, तृतीय पुरुषाचे आगमन सारख्या प्रतिकात्मक काव्याचे सटीप विश्र्लेषण, तर कादंबरी या वाङमयाचा आढावा घेताना श्यामची आई, आस्तिक, बखर एका राजाची, गांधारी, किनारा, होमकुंड, भिन्न, विमु्क्ता यानंतर १९६० नंतरची मराठी कादंबरी व स्त्रीवाद यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.

    आत्मचरित्र या प्रकाराबद्दल लिहिताना डॉ. खोले यांनी आत्मचरित्र व चरित्र, आत्मचरित्राचे आकलन - एक दिशा, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, करुळचा मुलगा दलित आत्मकथने याविषयी सविस्तर तपशीलासह विवेचन केलेले आहे.

    विभ्रम
    लेखक
    : विलास खोले
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : ३५०/- रुपये
    पाने : ३०१

      October 18, 2016


  • नागरी बॅंकांसाठी सहकारी परिपत्रके 1988 ते 2007

    सहकार खात्याच्या मागील 20 वर्षांतील नागरी बॅंकांना लागू असणाऱ्या सर्व परिपत्रकांचे एकमेव व प्रथम संकलन. एकूण 106 परिपत्रकांचा यात समावेश आहे. पृष्ठे 160 असून आकार एक अष्टमांश डेमी आहे. नागरी बॅंकेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन असून हाताळण्यास अत्यंत सुलभ आहे.

      June 17, 2014


  • निवडक बॅंकिंग निवाडे

    `शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ असे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. तरी आपल्यापैकी अनेकांना काही ना काही कारणाने कोर्टाची पायरी चढावीच लागते. निरनिराळे बॅंकिंग व्यवहार वाढ्‌ल्यापासून तर हे प्रमाण फारच वाढले आहेत. बॅंकेशी किंवा वित्तीय संस्थांशी संबंध येणार नाही असा सुशिक्षित माणूस आता शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाचे बॅंकेत किंवा वित्तीय संस्थेत काही ना काही व्यवहार असतातच. अशावेळी दैनंदिन व्यवहारात किंवा पुढे प्रकरण कोर्टात पोहचल्यास निदान प्राथमिक माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. निवडक बॅंकिंग निवाडे हे पुस्तक आपली ती गरज पूर्ण करते.

      September 29, 2012